Author: अनंत पांगारकर

संगमनेर – प्रतिनिधी जोर्वे गावात शुक्रवारी (३० मे) झालेली ग्रामसभा भ्रष्टाचाराच्या आरोपांनी चांगलीच गाजली. आदिवासी आणि विविध विकास कामांसाठी आलेला निधी नेमका कुठे गेला, या प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी विखे समर्थक सत्ताधाऱ्यांनी ग्रामसभा गुंडाळण्याचा प्रयत्न केल्याने मोठा गोंधळ आणि राडा झाला. जनतेच्या कष्टाच्या पैशाचा गैरवापर झाल्याचा आरोप करत, गेल्या अडीच वर्षांपासून सुरू असलेल्या गैरकारभाराचा जाब विचारण्यासाठी ग्रामस्थ एकवटले होते. ग्रामसभेला उपस्थित असलेल्या सामान्य जनतेने गावाच्या विकासासाठी आलेल्या निधीच्या गैरवापराबाबत सरपंच आणि ग्रामसेवकांना जाब विचारला. मात्र, त्यांच्याकडे समाधानकारक उत्तरे नव्हती. प्रश्नांची सरबत्ती सुरू असताना, सत्ताधाऱ्यांकडून प्रश्न विचारणाऱ्यांनाच धमकावणे, धक्काबुक्की करणे असे प्रकार सुरू झाले. विकासकामांचे डोंगर उभे केल्याचे सांगणाऱ्या सत्ताधाऱ्यांचे एक-एक घोटाळे…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी ऊस आणि दूध ही शेतकऱ्यांसाठी कायमस्वरूपी पिके आहेत. शेतीत ठिबक सिंचनासह नवीन तंत्रज्ञानाचा वापर करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सातत्याने होत असलेल्या शेतीच्या वापरामुळे जमिनीत सेंद्रिय द्रव्यांची कमतरता निर्माण झाली असून, ती भरून काढणे गरजेचे आहे. कमी पाणी आणि कमी श्रमात एकरी १०० टनांपेक्षा जास्त ऊस उत्पादन घेणे आवश्यक असून, यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचे आवाहन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. वाघापूर (संगमनेर) येथे सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्यावतीने आयोजित ऊस विकास मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी ऊस विशेषज्ञ सुरेश माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, ॲड. नानासाहेब शिंदे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  खंडणी घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेल्या बोगस महिला वकील स्नेहल हरिश्चंद्र कांबळे (वय ३२) हिच्यावर आता फसवणुकीचा आणखी एक गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे खळबळ उडाली असून, तिच्याकडून झालेल्या इतर फसवणुकीचे गुन्हे उघड होण्याची शक्यता वाढली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर येथे राहणाऱ्या मंदा सुरेश लांडगे (वय ५४) यांनी स्नेहल कांबळेविरोधात फसवणुकीची तक्रार दिली आहे. मंदा लांडगे यांच्या मुलीचे पतीसोबत वाद सुरू असल्यामुळे त्या आपल्या मुलीला माहेरी घेऊन आल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत, स्नेहल कांबळेने स्वतःला वकील असल्याचे भासवले. तिने मंदा लांडगे यांचा अज्ञानपणाचा फायदा घेऊन, त्यांची मुलगी व नातवांना न्याय मिळवून देण्याचे आमिष दाखवले.…

Read More

संगमनेर-अकोले (प्रतिनिधी) जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांशी लढताना वीरमरण पत्करलेले अकोले तालुक्याचे सुपुत्र, शहीद जवान संदीप पांडुरंग गायकर यांच्या कुटुंबीयांचे राज्याचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी गुरुवारी (२९ मे २०२५) सांत्वन केले. यावेळी त्यांनी या सुपुत्राचा संपूर्ण महाराष्ट्राला सदैव अभिमान राहील, असे गौरवोद्गार काढले. ब्राह्मणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी बाळासाहेब थोरात उपस्थित होते. याप्रसंगी वीरपत्नी रूपाली गायकर, शहीद जवान संदीप यांचे वडील पांडुरंग गायकर, तसेच विक्रम नवले, सुरेश गडाख, ॲड. आर. बी. हांडे, शिवाजी नेहे, सुभाष गायकर, भारत आरोटे, संदीप वाघमारे, रजनीकांत भांगरे यांच्यासह विविध पदाधिकारी आणि गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टरमध्ये…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहर पोलिसांनी धाडसी कारवाई करत दोन आरोपींना गावठी पिस्तूल आणि मोबाईलसह अटक केली. ही कारवाई महात्मा फुले शाळेजवळून घुलेवाडीकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. आरोपींकडून एकूण ६१,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला, यात ५०,००० रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, १०,००० रुपये किमतीचा वन प्लस नोड सी ई २ मोबाईल, आणि १,००० रुपयांचा एक बंद पडलेला मोबाईल फोन यांचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे शेख मुजम्मील शेख मजिद (वय २२, रा. वाणी मुस्लमान बौध्द वाडा, जमुना, ता. खामगाव, जि. बुलढाणा) आणि जमीरखान नजीरखान (वय ४०, रा. मिलन कॉलनी, ता. खामगाव, जि. बुलढाणा) अशी आहेत. संगमनेर शहर पोलिसांनी…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने राज्याच्या नवीन युवा धोरणासंदर्भात एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. ‘महाराष्ट्र राज्याचे युवा धोरण, २०१२’ या धोरणाच्या आधारे सुधारित युवा धोरण तयार करण्यासाठी एक नवीन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांचा समावेश करण्यात आला आहे. विधान परिषदेचे तीन आणि विधानसभेचे तीन अशा सहा आमदारांपैकी तयारी पक्षाचे पाच आमदार या समितीमध्ये असून सत्यजित तांबे या एकमेव अपक्ष आमदाराचा अपवाद वगळता विरोधी पक्षातील एकाही आमदाराला या समितीमध्ये संधी मिळू शकली नाही. या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे तांबे यांच्यावरील विशेष प्रेम समोर आले असल्याचे राजकीय…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील साईनगरकडे जाणारा पूल रखडल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये आलेल्या पुरामुळे हा पूल खचला होता. काँग्रेस नेते, आमदार बाळासाहेब थोरात आणि युवा आमदार सत्यजित तांबे यांनी पुलाच्या दुरुस्तीसाठी तातडीने पाठपुरावा करून निधीची मागणी केली होती. मात्र, स्थानिक भाजप पदाधिकाऱ्यांनी या कामाचे राजकारण करून ते जाणीवपूर्वक रखडवले असल्याचा गंभीर आरोप माजी नगरसेवक शैलेश कलंत्री यांनी केला आहे. कलंत्री यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, म्हाळुंगी नदीवरील पूल खचल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात आणि नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी तात्काळ पाहणी करून नागरिकांच्या सोयीसाठी पर्यायी पुलाची व्यवस्था केली होती. तसेच, ३० नोव्हेंबर २०२२…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील नवीन पुलाचे उर्वरित अपूर्ण काम १० जूनपर्यंत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश आमदार अमोल खताळ यांनी संगमनेर नगरपरिषद प्रशासन आणि संबंधित ठेकेदारास दिले आहेत. हा पूल स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिर दरम्यान असून, आमदार खताळ यांनी गुरुवारी सकाळी मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह या कामाची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत महायुतीचे नेते श्रीराम गणपुले, ज्ञानेश्वर कर्पे, कैलास वाकचौरे, शिरीष मुळे, कैलास लोणारी, अविनाश थोरात, दगाबाई धात्रक, अल्पना तांबे, शिवसेना शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी, आरपीआय (आठवले) पक्षाचे शहराध्यक्ष कैलास कासार, सागर भोईर, प्रशांत वाडेकर, निलेश कोंतम, लखन घोरपडे, विकास डमाळे, दिलीप अनाप, राहुल भोईर, शशांक नामन, सौरभ…

Read More

संगमनेर – प्रतिनिधी  जनसुरक्षा विधायक कायद्याच्या विरोधात संगमनेरमधील नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी आज (गुरुवारी २९ मे २०२५) प्रांताधिकार्‍यांना निवेदन दिले. हा कायदा जनतेच्या सुरक्षेऐवजी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारा असून, तो रद्द करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, जनसुरक्षा विधायक कायद्याचे नाव जरी जनतेच्या सुरक्षेचे असले तरी, प्रत्यक्षात या कायद्यात जनतेच्या सुरक्षेसाठी काय आहे हे त्यात स्पष्ट केलेले नाही. विशेषतः, ‘शहरी नक्षलवाद’ या संकल्पनेची व्याख्याच या विधेयकात स्पष्ट करण्यात आलेली नाही. माओवाद आणि नक्षलवाद यावर हा कायदा लागू करणे ठीक असले तरी, ‘शहरी नक्षलवाद’ या अस्पष्ट संकल्पनेखाली संपूर्ण राज्यात हा कायदा लागू करण्याचा प्रयत्न लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले…

Read More

संगमनेर, २९ मे २०२५ संगमनेर शहरातील लालतारा परिसरातील नागरिकांना सध्या वाढत्या अस्वच्छतेमुळे गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कचऱ्याचे ढिगारे, मृत जनावरांची कातडी आणि सर्वत्र पसरलेली घाण यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून, डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. या गंभीर प्रश्नावर नगरपालिका प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. लालतारा परिसरातील रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील अनेक भागांतील कचरा आणि विशेषतः मृत जनावरांची कातडी सर्रास लालतारा परिसरात आणून टाकली जाते. यामुळे या भागाला अक्षरशः कचराकुंडीचे स्वरूप आले असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली आहे. आम्ही प्रशासनाकडे वेळोवेळी या समस्येबद्दल…

Read More