Author: अनंत पांगारकर
आपल्या राजकीय फायद्यासाठी राज्याच्या, राज्यातील जनतेच्या हिताचा जराही विचार न करता मनाला वाटेल तशा योजना जाहीर करणार्या सत्ताधार्यांमुळे राज्याचा आर्थिक गाडा पुरता दोलायमान बनला आहे. करदात्यांच्या कष्टाच्या रक्कमेची ही लूट ज्यांनी केली ती त्यांच्याकडूनच वसूल झाली पाहिजे. या योजना जाहीर करताना राज्याचं काय होईल, इतकाही विचार त्यांनी केला नाही. केवळ सत्ता मिळावी, इतक्या कुटील हेतूने जाहीर झालेल्या योजनांनी महाराष्ट्राला बेजार केलंच पण राज्य जगावं म्हणून जे आपल्या खिशाला ताण देतात त्यांनाही जगणं मुष्कील करून टाकलं आहे. लाडक्या बहिणींच्या नावाने सुरू केलेल्या या योजनेने जनतेच्या सुमारे 21 हजार कोटी इतक्या रक्कमेला चुना लावल्याचं नुकतंच उघड झालंय. सुधारलेल्या महाराष्ट्राने देशाला लूट करण्याचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर तालुक्यातील एका दुर्दैवी ॲसिड हल्ला प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे विशेष दौऱ्यावर येत आहेत. मंत्री तटकरे यांनी आपला नियोजित विदर्भ दौरा रद्द करून रविवारी थेट लोणी (ता. राहाता) येथील रुग्णालयात पोहोचण्याचा निर्णय घेतला आहे. पीडितेच्या भेटीला प्राधान्य मंत्री तटकरे आज शनिवारी या पिडीत मुलीची व मुलीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी येणार होत्या. मात्र त्यांचा शनिवारचा दौरा अचानक रद्द झाला होता. संगमनेरमधील ॲसिड हल्ला प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि पीडित मुलीला मानसिक बळ देण्याच्या उद्देशाने त्यांनी तातडीने आपला दौरा बदलला आहे. पीडित मुलगी सध्या लोणी येथील हॉस्पिटलमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, नाशिक नाशिकमधील सातपूर परिसरात एका धक्कादायक घटनेत एका प्रथितयश पत्रकाराचा खरा चेहरा समोर आला असून, त्याने गेल्या दोन दशकांपासून अनेक गरीब महिलांचे लैंगिक शोषण केल्याचे उघड झाले आहे. खंडणी प्रकरणातील फिर्यादीच आरोपी म्हणून समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. रवींद्र एरंडे (वय ६३) असे या संशयित पत्रकाराचे नाव असून, तो एका साप्ताहिक आणि यूट्यूब चॅनेलशी संबंधित आहे. एरंडे हा सातपूर भागातील कामगारनगर आणि श्रमिकनगरमध्ये लघू उद्योगांसाठी ‘कन्सल्टंट’ म्हणून काम करत असे. लघू उद्योग सुरू करून देण्याचे आमिष दाखवून त्याने सन २००३ ते २०२४ या २१ वर्षांच्या काळात अनेक गरीब महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. या महिलांच्या हतबलतेचा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर समनापूर येथे दारूच्या दुकानात घुसून तोडफोड केल्याप्रकरणी आणि दुकानदाराला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना गुरुवारी (२ एप्रिल) सकाळी ११ ते १२ च्या सुमारास घडली. या प्रकरणी दिनेश मुरलीधर मिलाने यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी दिनेश मिलाने हे हॉटेल व्यावसायिक असून समनापूर गावात त्यांचे सरकारमान्य देशी दारूचे दुकान आहे. घटनेच्या दिवशी आरोपी देवा शेरमाळे आणि वंदना शेरमाळे यांनी दुकानात येऊन तेथे दारूचा व्यवसाय करू नये, असे म्हणत दुकानातील कामगार संतोष रावसाहेब गवळी याला शिवीगाळ केली. त्यानंतर संतोष यांनी घटनेची माहिती दुकानमालक दिनेश मिलाने यांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर संगमनेर नगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला पराभव स्थानिक भाजप कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला असून, आता हा असंतोष उघडपणे समोर आला आहे. या पराभवास जबाबदार धरत शहर कार्यकारिणीतील वरिष्ठ नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी थेट भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना पत्र लिहून पक्षाच्या शहर अध्यक्षांसह एका बड्या नेत्यावर कारवाईची मागणी केली आहे. गेल्या ४० वर्षांत पहिल्यांदाच नगरपालिकेत पक्षाचा एकही नगरसेवक निवडून न आल्याने ही नामुष्की ओढवल्याचा दावा पत्रात करण्यात आला आहे. या गंभीर पत्रव्यवहारात भाजपचे स्थानिक नेते, माजी नगरसेवक श्रीराम गणपुले यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तसेच पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या एका पीए मार्फत गणपुले यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर संगमनेर तालुक्यातील वडगाव पान येथे अकरा वर्षीय शाळकरी मुलीवर झालेल्या भीषण ॲसिड हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांचा नियोजित अहिल्यानगर जिल्हा दौरा ऐनवेळी रद्द करण्यात आला आहे. मंत्री तटकरे या शनिवारी संध्याकाळी लोणी येथे येऊन रुग्णालयात उपचार घेत असलेल्या पीडित मुलीची आणि तिच्या कुटुंबियांची प्रत्यक्ष भेट घेणार होत्या. या दौऱ्यामुळे पीडित कुटुंबाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा होती, मात्र आता दौरा रद्द झाल्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येथील वडगाव पान परिसरात १७ मार्च रोजी शाळेतून घरी परतणाऱ्या एका चिमुरडीच्या चेहऱ्यावर अज्ञात व्यक्तीने ॲसिड फेकल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अकोले भंडारदरा धरणाला शंभर वर्षे पूर्ण होत असताना, राज्य सरकारने हा सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले आहे. मात्र, धरणासाठी विस्थापित झालेल्या आदिवासी बांधवांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने अखिल भारतीय किसान सभेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. विस्थापितांना न्याय मिळेपर्यंत आणि जमिनींचे प्रश्न मार्गी लागेपर्यंत शताब्दी कार्यक्रम उधळून लावण्याचा इशारा किसान सभेने दिला आहे. धरणामुळे विस्थापित झालेल्या आदिवासींच्या विस्थापनालाही शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या प्रदीर्घ काळातही या बांधवांना हक्काचे पाणी मिळालेले नाही. पिण्यासाठी आणि सिंचनासाठी भंडारदरा धरणाचे पाणी मिळत नसल्याने या भागातील आदिवासी आजही पाण्यापासून वंचित आहेत. याशिवाय, विस्थापितांना मोबदला म्हणून दिलेल्या जमिनी अद्यापही त्यांच्या…
संगमनेर, प्रतिनिधी- संगमनेर तालुक्यातील वीटभट्टी व्यावसायिकांवर सध्या दुहेरी संकट ओढवले असून, माती, राख, कोळसा आणि भुसा यांच्या किमतीत झालेली प्रचंड वाढ यामुळे हा व्यवसाय आधीच आर्थिक तोट्यात गेला आहे. तर दुसरीकडे ऐन हंगामात झालेल्या अवकाळी पावसाने भट्टीधारकांचे कंबरडे मोडले आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले. या परिस्थितीत शासनाने तातडीने नुकसानग्रस्त वीटभट्ट्यांचे पंचनामे करून व्यावसायिकांना भरपाई द्यावी, अशी मागणी वीट उत्पादक संघ, संगमनेर-अकोले यांच्या वतीने करण्यात आली आहे. वीटभट्टी व्यवसायाला अद्याप कोणतीही विमा योजना लागू नाही. या गंभीर विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी अनेक वर्षांपासून सरकार दरबारी पाठपुरावा करूनही अद्याप कोणत्याही सरकारने या मागणीची दखल घेतलेली नाही. विमा कंपन्यांकडे दाद मागितली असता,…
संगमनेर, प्रतिनिधी- केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे, तर संगमनेरमध्ये महायुतीचे आमदार आहेत. असे असतानाही, संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाची झालेली वाताहात सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. एकेकाळी विधानसभा निवडणुकीपर्यंत तालुक्यात प्रभावी असलेला हा पक्ष आज स्वतःच्याच अस्तित्वासाठी धडपडत असल्याचे नगरपालिका निवडणुकीच्या निकालावरून स्पष्ट झाले आहे. पूर्वी सत्तेत नसतानाही प्रभावी कामगिरी करणारा हा पक्ष, आता सत्तेच्या केंद्रस्थानी असूनही पालिका निवडणुकीमध्ये भोपळाही फोडू न शकल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. अशातच जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत काय होणार अशा विवंचनेत पक्षाचे काही निष्ठावंत पदाधिकारी सापडले आहे. संगमनेरमधील भाजपच्या या घसरणीला पक्षांतर्गत गटबाजी आणि महायुतीतील समन्वयाचा अभाव…
संगमनेर, प्रतिनिधी- सहा वर्षांपूर्वी दाखल असलेल्या पोक्सोच्या गंभीर गुन्ह्यातील आरोपी अजिंक्य दामोदर मालुंजकर याची संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. या खटल्याची पार्श्वभूमी अशी की, कोरोना लॉकडाऊन च्या काळामध्ये १६ एप्रिल २०२० रोजी दुपारी चारच्या सुमारास अकोले तालुक्यातील खानापूर शिवार परिसरात बारा वर्षांची अल्पवयीन पीडित मुलगी तिच्या आजी आणि फिर्यादीसोबत शेतात चारा आणण्यासाठी गेली होती. त्यावेळी मोटारसायकलवरून आलेल्या आरोपीने त्यांना हटकले आणि लॉकडाऊन व संचारबंदीचे उल्लंघन केल्याचे कारण सांगून दमदाटी केली. पीडित मुलीच्या आजी आणि फिर्यादीने मुलीला घरी पाठवले, मात्र आरोपीने तिला वाटेत गाठले. तिला घरी सोडण्याचे आमिष दाखवून तो मुलीला मोटारसायकलवर बसवून एका निर्जन…
