Author: अनंत पांगारकर
सण, उत्सवात दागिने घालणे पडतेय महागात… शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण लंपास करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे उत्सवानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कांता भानुदास शिंदे (वय ५८ वर्ष, रा. आनंदनगर कॉलनी, मालदाड रोड पूर्व, संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी (४ ऑक्टोंबर) संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे…
सुसंस्कृत संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – संगमनेर शहरात पडद्याआडचे कॅफे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवर देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असले तरी संगमनेरात असे उद्योग सुरूच असल्याचे उघड होत आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या या कारवाईचा माध्यमांना पोलिसांनी सुगावादेखील लागू दिला नाही. शहराच्या कुठल्या आडवाटेला अथवा निर्जन ठिकाणी ही घटना घडली नसून शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीत गणेश नगर परिसरातील (अगदी महामार्गावर) घडली. ‘गोंधळ मिसळ’ या दुकानातील एका छुप्या कॅफेवर तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या…
असा असेल तुमचा आजचा दिवस शनिवार, दि. ०५ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांचे आरोग्य आज चांगले राहील. घर बदलण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेम संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका. आज तुमचे मन नवीन कल्पनांनी भरलेले असेल आणि तुम्ही ठरवलेले काम तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी आज प्रेम, आशा, सहानुभूती, सकारात्मकता आणि निष्ठा यांसारख्या सकारात्मक भावना अंगीकारण्यासाठी स्वतःला प्रेरित केले पाहिजे. जेव्हा हे गुण तुमच्यात खोलवर रुजले जातात तेव्हा ते नैसर्गिकरित्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकपणे प्रकट होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील आणि फायदेशीर सिद्ध होतील. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळा. मानसिक शांतीसाठी अशा कामांपासून दूर राहणे आवश्यक…
शुक्रवार, ०४ ऑक्टोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला. या बैठकीत ३३ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचा निर्णय महसूल विभागात घेण्यात आला आहे. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकतील ३३ मोठे निर्णय राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ (महसूल विभाग) महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग) दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग) टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व.…
शुक्रवार, ०४ ऑक्टोंबर आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जूलैपासून दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भाऊबीज म्हणून दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. भाऊबीज म्हणून दिल्या जाणाऱ्या या पैशात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील ऑक्टोंबरमध्येच मिळणार आहे. त्यामुळे बहिणींचे दिवाळी सरकार गोड करणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले आहेत. या महिन्यात यात आणखी तीन हजार…
शुक्रवार, ०४ ऑक्टोंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याचा मुद्दा तापला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सुदैवाने ते जाळ्यात अडकले. त्यांच्यापाठोपाठ इतर अनेक आदिवासी आमदारही कट्ट्यावर उतरले. महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. मात्र, ते तिसऱ्या मजल्यावरून खाली न पडता जाळीत अडकले. प्राथमिक माहितीनुसार, झिरवाळ हे धनगर समाजाला एसटी कोटा देण्याच्या विरोधात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झिरवाळनंतर आणखी काही आदिवासी आमदारांनीही कट्ट्यावर उडी घेतली. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देऊ नये, असे झिरवळ आणि एसटी…
शुक्रवार, ०४ ऑक्टोबर अहमदनगर – देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. तर १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ जिल्ह्यातील ३ कोटी महिलांनी घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू आहे.…
असा असेल तुमचा आजचा दिवस शुक्रवार, दि. ०४ ऑक्टोंबर मेष- आज मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल. तुमचे मन आर्थिकदृष्ट्या अस्वस्थ राहील. तथापि, धीर धरा, अन्यथा नुकसान होऊ शकते. अनावश्यक राग टाळा. व्यवसायात वाढ होईल. मानसन्मान मिळेल. वडिलांच्या तब्येतीवर लक्ष ठेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. संयम राखा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून पैसे मिळू शकतात. मुलांच्या बाजूने आनंदाची चिन्हे आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना…
लाचेचा पहिला हप्ता घेताना नगर जिल्ह्यात भूमी अभिलेखच्या निमतानदारास रंगेहाथ पकडले गुरुवार, ०३ ऑक्टोंबर अहमदनगर – क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणारा पाथर्डीच्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर निमतानदारास लाचेचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून संजय भीमराव मनवरे (वय ५६ वर्ष,रा. भगवाननगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट व…
गुरुवार, दि. ०३ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तथापि, व्यावसायिक कामात व्यस्त राहू शकतात. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. कुटुंबातील एखाद्या महिलेकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. वाहनांच्या सोयी वाढू शकतात. आर्थिकदृष्ट्या चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ- आज संयमाने कामे पूर्ण करा. शिस्त आणि प्रामाणिकपणाने तुमचे काम करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही प्रभावित करू शकाल. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रियजनांची साथ असेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगली कामगिरी कराल. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना…
