Author: अनंत पांगारकर

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – फॅब्रिकेशन व्यवसायासाठी भागीदार म्हणून घेतलेल्या बाप-लेकाची न वटणाऱ्या धनादेशाच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेरच्या न्यायालयाने अमृतवाहिनी पॉलिटेक्निक कॉलेजच्या प्राध्यापकाला दोन गुन्ह्यात प्रत्येकी सहा महिने कारावास आणि दहा लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे. तर दोन खटल्यांचा निकाल अद्याप प्रलंबित आहे. ईश्वर देविदास फापाळे (रा. घोडेकर मळा, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपी प्राध्यापकाचे नाव आहे. या संदर्भात सुरुवातीला मुरलीधर किसन काकडे यांनी संगमनेरच्या न्यायालयात सर्वज्ञ फॅब्रिकेशन व फर्निचर व्यावसायिक प्राध्यापक ईश्वर देविदास फापाळे यांच्या विरोधात प्रत्येकी दीड लाखाचे दोन आणि साडेतीन लाख रुपयांचे दोन धनादेश न वटल्याप्रकरणी निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट्स १३८ प्रमाणे ॲड. राजेश भुतडा यांच्यामार्फत…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर – कायद्याची पायमल्ली करत, राजरोसपणे सुरू असलेल्या कत्तलखान्यावर संगमनेरच्या पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकत शनिवारी रात्री कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सहा लाख रुपये किमतीचे तीन टन गोमांस आणि तीन लाखाची पिकअप जीप जप्त केली आहे. गेल्या काही दिवसातील पोलिसांची ही मोठी कारवाई मानली जाते. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दोघाजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून एक जण फरार झाला आहे. सादिक मुनीर शहा (वय २५ वर्ष, रा. जमजम कॉलनी, संगमनेर) असे पोलिसांनी कारवाईदरम्यान पकडलेल्या आरोपीचे नाव असून कारवाई केलेल्या कत्तलखान्याचा चालक असलेला कमरअली गुलाम जिलानी सौदागर (रा.…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर संगमनेर तालुका दूध संघासह तालुक्यात गाव पातळीवरील संस्थांवर सौर ऊर्जा युनिट बसविले जाणार आहे. त्याचबरोबर प्रत्येकी ५० लिटर दूध देणाऱ्या गाई निर्माण करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवत १२५० गाईंचा गट करून २५ डॉक्टरांच्या माध्यमातून त्यांची आरोग्य तपासणी, निर्जंतुकीकरण, रक्त तपासणीसह गाय भरणीसाठी दूध संघाच्या माध्यमातून काम केले जाणार असल्याची माहिती माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली. संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संघाची (राजहंस दूध) वार्षिक सर्वसाधारण सभा आमदार थोरात यांच्या उपस्थितीत आणि दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी पार पडली. यावेळी थोरात बोलत होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, डॉ.…

Read More

रविवार, दि. ०१ सप्टेंबर जगाला स्वाभिमानाने जगण्याचा संदेश देणारे, हिंदवी स्वराज्याचे कर्तेधर्ते, महाराष्ट्राचं अराध्य दैवत, राजाधिराज, योगीराज छत्रपती शिवाजी महाराज जिथे असतील तिथे आज काय म्हणत असतील? ज्या राज्याच्या आणि देशाच्या कल्याणासाठी जिवाचं रान केलं त्या राज्यात होत असलेल्या अवहेलनेने राजे निश्‍चितच अश्रू ढाळत असतील. ते आज आहेत, अशी साधी कल्पनाही या सत्तेला चिरडून टाकण्याला कारण ठरली असती. ज्या छत्रपतींच्या अवमानतेची एकही संधी ज्यांनी सोडली नाही, ते आज चार-चारदा माफी मागायचं ढोंग करत आहेत. माफी मागितली म्हणजे सारी पापं धुवून निघाली, अशी त्यांची धारणा झालेली दिसते. यामुळे कोणीतरी चिरकूट वरळीत गोविंदांच्या नाच्यांमध्ये महाराजांची माफी मागतो. ह्यांना जनाची नाहीच पण मनाचीही…

Read More

आजचे राशीभविष्य रविवार, दि. १ सप्टेंबर २०२४ मेष – दशमेश स्वस्थानी असल्याने उत्साही दिवस. राहू नेपच्यून अचानक लांबचे प्रवास योग दर्शवतात. सगेसोयरे, नातलग आज तुमच्यावर अतिशय खुश असतील. वृषभ – जन्मस्थानी असलेले हर्षल गुरु आज भरभरून आर्थिक लाभ दर्शवतात. सप्तमेश मंगळ धनस्थानी डोळ्याला इजा दर्शवितो. डोळ्यांबाबत सावध राहा. मिथुन –  आज कटकटीचा दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा म्हणजे व्यवहार सुरळीत होतील. धनस्थानातील चंद्र, बुध आर्थिक समस्या सोडवतील. कर्क – जन्मस्थानी असलेले चंद्र बुध मानसिक शांतता प्रदान करतील. भाऊबंद, सगेसोयरे मात्र आजच्या दिवशी त्रास देण्याची शक्यता. सिंह – स्वस्थानी असलेला रवी व सप्तमात असलेला शनि मंद गतीने प्रगती दर्शवितो. आजच्या दिवशी…

Read More

शनिवार, दि. ३१ ऑगस्ट  संगमनेर – चुलत भावांमधील वादातील शेत जमीन नांगरल्याचा राग येऊन रात्रीच्या वेळी कुऱ्हाडीने वार करत तर अन्य आरोपींनी काठ्या, लाथाबुक्क्याने मारहाण करत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने एका आरोपीला दोषी ठरवत पाच वर्ष कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य पाच आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली. सुरेंद्र देवराम तांगडकर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव असून प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मच्छिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर व मच्छिंद्र देवराम तांगडकर या अन्य आरोपींचा न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या समावेश आहे. जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. एस. घुमरे यांनी शनिवारी या…

Read More

शनिवार, ३१ ऑगस्ट “महाराष्ट्रातील सध्याची परिस्थिती निराशाजनक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळणे, बदलापुरात झालेली घटना यामुळे सरकारच्या कार्य पद्धतीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. या नकारात्मक वातावरणातून सुटका करून घेण्यासाठी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू केली जाणार आहे”, असा दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला. महाराष्ट्रातील विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. यंदा दिवाळी २९ ऑक्टोबर ते ३ नोव्हेंबर या कालावधीत आहे. सणासुदीच्या कालावधीत निवडणुका घेतल्या जात नाहीत. त्यामुळे दिवाळीच्या आधी किंवा दिवाळीच्या नंतर नोव्हेंबर महिन्यात निवडणूक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र निवडणुकांच्या तारखा पुढे ढकलल्याने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू होणार का? अशा चर्चा सुरु झाल्या आहेत, तसंच…

Read More

शनिवार ३१ ऑगस्ट  शिर्डी – सध्या नवीन कृषी तंत्रज्ञान विकसित होत असून कृषी क्षेत्रातील उत्पादन क्षमता वाढविण्यासाठी तरुणांनी नवीन कृषी तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. प्रवरा कृषी शास्त्र संस्था (लोणी), कृषी विज्ञान केंद्र, बाभळेश्वर (पायरेन्स) आणि शासनाच्या कृषी विभागाच्यावतीने लोणी येथे आयोजित शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाप्रसंगी ते बोलत होते. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे यांच्या १२४ व्या जयंती व शेतकरी दिनानिमित्त या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिवार फेरी व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन पालकमंत्री विखे पाटील यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती…

Read More

शनिवार, दि. ३१ऑगस्ट  पालघर : १३ दिवस झाले तरी गावाकडील आई वडील आणि बहिणीची संपर्क झाला नाही. त्यामुळे मनात हजारो शंका निर्माण होत चलबिचल सुरू झाली आणि त्याने गावाकडे जाण्याचा निर्णय घेतला. गावाकडील घरी जाऊन दरवाजा उघडून बघतो तर काय, घरात पसरलेल्या प्रचंड दुर्गंधीत त्याला आई-वडिल आणि बहिणीचे मृतदेह कुजलेल्या स्थितीत दिसून आले. समोरच दृश्य बघून त्याच्या पायाखालची जमीनच सरकली होती. राज्यात दररोज येथे धक्कादायक घटना समोर येत असतानाच या घटनेत आणखी एका घटनेची भर पडली आहे. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील नेहरोली गावात एकाच कुटुंबातील तीन जणांचे मृतदेह आढळून आले असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात…

Read More

शनिवार, ३१ ऑगस्ट  नागपूर – भारतीय जनता पक्षाचे आमदार परिणय फुके आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात नागपूरच्या अंबाझरी पोलीस ठाण्यात कौटुंबिक छळवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार फुके यांच्या मृत भावाच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार परिणय फुके, फुके यांचे वडील रमेश गोविंदराव फुके (वय ७२), आई रमा (वय ६७), नितीन फुके (वय ४०), पत्नी डॉक्टर परिणीता फुके (वय ४१) यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फुके यांचे मृत भाऊ संकेत फुके यांची पत्नी प्रिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार संकेत फुके यांना किडनीचा आजार होता. लग्नाच्या वेळी फुके…

Read More