Author: अनंत पांगारकर
संगमनेरमधील चौपदरीकरणाच्या कामांचे मंत्री पटेलांच्या हस्ते व महसूल मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले. संगमनेरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्रमांक ७१ अ या ६० किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.…
राज्यात 7675 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबल्या महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपत असलेल्या राज्यातील 7675 ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. नव्याने येणाऱ्या प्रशासन राज मुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 7675 ग्रामपंचायतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान 7649 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. आठ ग्रामपंचायतची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. मतदार याद्या, नव्याने करावयाची प्रभाग रचना यासाठी साधारणतः दोन-तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचा कालावधी जज-जसा…
लायन्स इनरव्हील दांडिया महोत्सव महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक वर्षाच्या सुरू असलेल्या उत्सवावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट घोंगावत होते. कोरोना निर्बंधानंतरचा पहिलाच नवरात्र उत्सव पार पडत असून या उत्साहात लयबद्ध तालावर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. लायन्स इनरव्हीलच्या वतीने मालपाणी लॉन्स मध्ये डीजे दांडिया नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासह नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा उपाध्यक्ष रचना मालपाणी, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट राजेश लाहोटी, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर, वैशाली मयूर आदी यावेळी उपस्थित होते. दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्र…
माजी आमदार बाळासाहेब दांगट यांचा ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेनेतील अंतर्गत कुरघोड्यांना कंटाळून बाहेर पडलेले आणि काँग्रेसमध्ये न रमलेले जुन्नरचे माजी आमदार बाळासाहेब दांगट यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पुन्हा शिवबंधन हाती बांधले आहे. शिवसेनेच्या फाटाफुटीनंतर पुणे जिल्ह्यातील खासदार श्रीरंग बारणे, माजी राज्यमंत्री विजय शिवतारे, माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा रस्ता निवडल्याने पुणे जिल्ह्यात शिवसेनेचे मोठी पडझड झाली होती. माजी आमदार बाळासाहेब दांगट यांच्या रूपाने ही पडझड रोखण्यासाठी आणि शिवसेना मजबूत करण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मोठी मदत मिळणार आहे. दांगट यांच्या माध्यमातून ठाकरे आता…
अश्लील चाळे करणारे युगूल मोठ्या प्रमाणात आढळले २८ युवक-युवतींना ताब्यात घेवून समज देत सोडले महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर शहर पोलिसांनी गुरुवारी दुपारी शहरातील अनेक कॉफी शॉप, कॅफे शॉपवर अचानक छापे टाकले. पोलिसांना या ठिकाणी अनेक महाविद्यालयीन युवक-युवती चाळे करतांना आढळले असून या प्रेमी युगुलांना पकडत त्यांना पोलीस ठाण्यात आणत कारवाई सुरु केली आहे. दरम्यान कारवाईचे वृत्त शहरभर पसरल्याने खळबळ उडाली आहे. कारवाईच्या ठिकाणी आणि पोलिस ठाण्यात बघ्यांनी मोठी गर्दी केल्याचे दिसून आले. पोलिस ठाण्यात आणलेल्या युगूलांना पोलिसांनी त्यांची माहिती घेत समज देवून सोडून दिले तर कॅफे चालकांवर मुंबई पोलीस कायद्यानुसार कायदेशीर कारवाई सुरू होती. संगमनेर पोलिसांची गेल्या काही वषार्तील…
अहमदनगर जिल्ह्यातील सातशे शाळा बंद होण्याच्या मार्गावर महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क एकीकडे दिल्लीतील केजरीवाल सरकार शिक्षणाला प्राधान्य देत आपल्या बजेट मधील मोठा हिस्सा शिक्षणावर खर्च करत असताना दुसरीकडे महाराष्ट्रात खर्च कमी करण्याच्या नावाखाली शाळा बंद करण्याचा घाट घातला जात आहे. अहमदनगर जिल्ह्यातील जवळपास 700 शाळांना राज्य सरकारच्या या निर्णयाचा फटका बसणार आहे. वीस विद्यार्थ्यांपेक्षा कमी पटसंख्या असलेल्या जिल्ह्यातील जवळपास 700 शाळांमधील दहा हजाराहून अधिक विद्यार्थ्यांचे भवितव्य सरकार अंधारात ढकलणार आहे. याशिवाय 1321 शिक्षकांचा प्रश्न देखील निर्माण होणार आहे. यापूर्वीच्या सरकारने लागू केलेला शिक्षण हक्क कायद्याची पायमल्ली नव्या सरकारकडून सुरू असल्याचे दिसते. दिल्लीतील केजरीवाल सरकारने शिक्षणावर भर देताना सरकारी शाळांमध्ये मोठी…
शेतकऱ्यांचे गेट बंद आंदोलन, दोघांवर गुन्हा दाखल महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पिकअप गाडी पुढे-मागे घेण्याच्या कारणावरुन संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बुधवारी दुपारी व्यापारी आणि त्याच्या नातेवाईकाकडून मारहाण करण्याची घटना घडली. तालुक्यातील रणखांब येथील शेतकरी किरण बारवे यांना झालेल्या मारहाणीमूळे शेतकऱ्यांनी संबधितांवर कारवाईसाठी दोन तास कृषी उत्पन्न बाजार समितीचे गेटबंद आंदोलन केले. पोलीस प्रशासनाने केलेली कारवाई आणि राजकीय पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर आंदोलन मागे घेतले गेले. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे नाशिक-पुणे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा निर्माण झाला होता. रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटना घडली त्यावेळी वाहतुक पोलिसांनी प्रकरण मिटविण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना यश आले नाही. त्यामुळे घटनास्थळी पोलिसांना पाचारण करावे लागले. शेतकऱ्याला…
अध्यक्ष बाबा ओहोळ यांचे प्रतिपादन आमदार थोरात यांच्या नेतृत्वाखाली विकासाची वाटचाल महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क थोरात कारखाना ही तालुक्याची कामधेनु आहे. सहकाराबरोबर ग्रामीण विकास व आर्थिक चक्र तालुक्यात फिरत आहे. ही संगमनेरात विकासाची संस्कृती आहे. काँग्रेस नेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली तालुका सर्व क्षेत्रात अग्रगण्य आहे. यावर्षी सर्वत्र चांगला पाऊस झाला, त्यामुळे कार्यक्षेत्रात जास्तीत जास्त ऊसाची लागवड करावी. असे प्रतिपादन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याचा सन 2022 – 2023 या गळित हंगामाच्या बॉयलर अग्निप्रदिपन समारंभावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कांचनताई थोरात, दुर्गाताई तांबे,…
भल्या पहाटेच्या कारवाईत उत्तर जिल्हाप्रमुख मौलानाला पोलिसांनी घेतले ताब्यात महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क दहशतवादी संघटनांशी निगडीत असलेल्या पॉप्युलर फ्रंन्ट ऑफ इंडिया ‘पीएफआय’ या संघटनेच्या कार्यकर्त्यांचे धागेदोरे आता संगमनेरपर्यत येऊन पोहचले आहेत. या संघटनेशी निगडीत असल्याच्या कारणावरुन नगर जिल्ह्यात दोघांना ताब्यात घेण्यात आले असून यात संगमनेरमधील एका मौलानाचा समावेश आहे. मंगळवारी भल्या पहाटे स्थानिक पोलिसांनी केलेल्या या कारवाईत केंद्रीय तपास यंत्रणादेखील कार्यरत होती. संगमनेर शहरालगतच्या संगमनेर खुर्द येथे आणि नगर शहरात ही कारवाई करण्यात आली. नगरमधून या संघटनेशी निगडीत असलेल्या विभागीय अध्यक्षाला तर संगमनेर खुर्द येथून उत्तर जिल्हाप्रमुख असलेल्या एका मौलानाला ताब्यात घेण्यात आले. या दोघांविरोधात सुरु असलेल्या कारवाईबद्दल गोपनीयता बाळगली…
उपअधीक्षकांच्या पथकाला अवघ्या दिड दिवसांत यश महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अल्पवयीन मुलीला धाक दाखवत तिचे अपहरण करुन तिला घेवून तीन दिवस पसार झालेल्या आरोपीचा शोध घेण्यास पोलीस उपअधीक्षकांचे पथक यशस्वी ठरले आहे. अवघ्या दीड दिवसात पथकाने जिल्ह्याच्या श्रीगोंद्यात ही यशस्वी कामगिरी केली आहे. घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या या गुन्ह्याची उकल करण्यास स्थानिक पोलीस अयशस्वी ठरले असतांना उपअधीक्षकांच्या पथकाने केलेल्या कामगिरीमुळे मुलगी सुखरुप पालकांच्या ताब्यात मिळाली आहे. साकुर येथील एका महिलेची अल्पवयीन मुलगी महाविद्यालयीन शिक्षण घेत असून तिला आरोपी अमोल बापू खेमनर याने पंधरा दिवसांपूर्वी पळवून नेत पून्हा घरी आणून सोडले होते. त्यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी आरोपीला चांगलीच तंबी दिली होती.…
