Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज- सोमेश्वर गणेश मंडळाने २००२ पासूनच डीजे व गुलाल बंदी करून संपूर्ण महाराष्ट्रापुढे एक आदर्श आणि शिस्तबद्ध परंपरा निर्माण केली. राज्यात निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर चिंता व्यक्त करत विघ्नहर्ता गणरायाच्या आशीर्वादाने उर्वरित काळात संपूर्ण महाराष्ट्रात भरपूर पाऊस पडावा आणि शेतकरी व नागरिक सुखी-समाधानी व्हावेत, अशी प्रार्थना राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरच्या १३१ वर्षांची समृद्ध परंपरा लाभलेल्या रंगारगल्लीतील मानाच्या सोमेश्वर गणपतीचे पूजन पारंपारिक पद्धतीने काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडले. गणपतीच्या पूजन सोहळ्यास माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, नगराध्यक्ष डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील १३१ वर्षांची ऐतिहासिक परंपरा लाभलेल्या रंगारगल्ली येथील ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानाच्या पहिल्या गणपतीच्या विसर्जन सोहळ्याची सुरुवात श्री सोमेश्वर मंदिरात महादेवाची तसेच गणपती बाप्पांची विधिवत पूजा करून करण्यात आली. यावेळी संगमनेरच्या नगराध्यक्षा डॉ. मैथिली सत्यजीत तांबे आणि आमदार सत्यजीत तांबे यांनी सपत्नीक श्री सोमेश्वर मंदिरात उपस्थित राहून महादेवाचे व गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. तब्बल १३१ वर्षांची परंपरा लाभलेल्या या मानाच्या गणपतीला ‘इच्छापूर्ती गणेश’ म्हणून संगमनेर शहरात विशेष श्रद्धेचे स्थान आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही विसर्जन सोहळ्याला सुरुवात करण्यापूर्वी श्री सोमेश्वर मंदिरात धार्मिक विधी आणि पूजा करण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने गणरायाची विसर्जन मिरवणूक काढण्यात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्री गणेश विसर्जन मिरवणुकीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या मनाई आदेशाचा भंग करत मोठ्या आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण केल्याप्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी (२४ सप्टेंबर) संध्याकाळी कोकणगाव येथील श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत हा प्रकार घडला. आरोपींमध्ये शिवम नंदकिशोर ढगे (अध्यक्ष, शिवबा प्रतिष्ठान कोकणगाव), हेमंत यशवंत धुमाळ (रा. सांबरवाडी, ता. फलटण, जि. सातारा), अजित अंबादास जोंगधडे (अध्यक्ष, शिवछत्रपती प्रतिष्ठान पानसरवाडी, कोकणगाव), अक्षय बाजीराव लोहकरे (रा. मांजर चांदोली, ता. आंबेगाव, जि. पुणे), जनार्दन लक्ष्मण पारधी (अध्यक्ष, उमाजी नाईक प्रतिष्ठान कोकणगाव) आणि आकाश विठ्ठल गुंजाळ (रा. बांडगाव, ता. संगमनेर) यांचा समावेश आहे. या विसर्जन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर येथील सामाजिक कार्यकर्ते इरफानभाई मन्सुरी यांची भारतीय जनता पार्टी अल्पसंख्याक मोर्चाच्या अहिल्यानगर उत्तर जिल्हा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. लोणी येथे आयोजित कार्यक्रमात जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि अल्पसंख्याक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रऊफ भाई शेख यांनी या नवनियुक्त कार्यकारिणीची अधिकृत घोषणा केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ पाटील, अल्पसंख्याक मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष इदरीस मुलतानी आणि भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड करण्यात आली आहे. इरफानभाई मन्सुरी यांनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाची आणि नागरिकांचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी केलेल्या कार्याची…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक फलदायी ठरेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि त्या तुम्ही लीलया पार पाडाल. आर्थिक बाजू मजबूत राहिल्यामुळे जुनी देणी पूर्ण करण्यात यश येईल. कुटुंबातील वातावरण आनंदी आणि सौहार्दाचे राहील. आरोग्याच्या बाबतीत किरकोळ तक्रारी वगळता दिवस उत्तम जाईल. वृषभ – आजचा दिवस संयम आणि शांतता बाळगण्याचा आहे. नोकरी किंवा व्यवसायात घाईगडबडीने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. आर्थिक व्यवहारात विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. संध्याकाळच्या वेळी एखादी चांगली बातमी मिळाल्याने मनातील ताण कमी होईल. मिथुन – आजचा दिवस तुम्हाला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – पावसाच्या खंडामुळे संकट सापडलेल्या शेतकऱ्यांना उभे करण्यासाठी शासन पूर्णपणे खंबीर असून सर्व शासकीय योजना, पीक विमा आणि कर्जमुक्तीचा लाभ प्राधान्याने दिला जाईल, अशी ग्वाही राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील शेतकरी सोपान चकोर यांच्या शेताच्या बांधावर प्रत्यक्ष जाऊन त्यांनी दुष्काळसदृश परिस्थितीमुळे झालेल्या सोयाबीन पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. या वेळी उपस्थित शेतकरी बांधवांना धीर देत, प्रशासनाने थेट बांधावर जाऊन शेतकऱ्यांना मदत पुरवावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. या पाहणी दौऱ्यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, कृषी आयुक्त सुरज मांढरे, जिल्हाधिकारी पंकज आशिया, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, कृषी संचालक विनयकुमार आवटे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात बेकायदेशीर वाळू वाहतुकीवर मोठी कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्याकडून विनाक्रमांकाचा ट्रॅक्टर आणि वाळू असा एकूण ६ लाख १० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या नेतृत्वाखालील पथक गुरुवारी पहाटे (२४ सप्टेंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, खांडगाव चौफुला कडून वैदुवाडीकडे लाल रंगाच्या ट्रॅक्टरमधून अवैध वाळू वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे पथकाने खांडगाव रोडवर सापळा रचून संशयास्पद ट्रॅक्टर अडवला. ट्रॅक्टर ट्रॉलीची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कपाशीच्या पिकात लपवून केलेली गांजाची लागवड उघडकीस आणत पोलिसांनी २ लाख ३२ हजार रुपये मूल्याची ११.६०० किलो वजनाची गांजाची पाच झाडे जप्त केली आहेत. या कारवाईत पूर्वी हद्दपार करण्यात आलेला आणि एका गुन्ह्यात फरार असलेला सराईत आरोपी किशोर बन्सी जायभाये (वय ३९, रा. येळी, ता. पाथर्डी) याला रंगेहाथ ताब्यात घेण्यात आले. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत पाथर्डी तालुक्यातील जांभळी गावच्या शिवारात ही छापामारी केली. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या पथकाने जिल्ह्यात अवैध व्यावसायिकांचा शोध सुरू केला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर शहरात सध्या वादळ उठवणाऱ्या कथित एमडी ड्रग्ज प्रकरणाने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडवून दिली असून, या प्रकरणाभोवती राजकीय आरोप-प्रत्यारोप आणि सोशल मीडियावरील अफवांचे पीक आले आहे. या प्रकरणातील धुळवड आणि परस्परविरोधी दाव्यांमुळे सामान्य नागरिकांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी आता पोलीस प्रशासनानेच पुढाकार घेण्याची गरज निर्माण झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाची नेमकी वस्तुस्थिती काय आहे, हे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी अधिकृतपणे जनतेसमोर मांडावे आणि माध्यमांमधील अपप्रचार व सोशल मीडिया ट्रायल त्वरित थांबवावी, अशी आक्रमक मागणी काँग्रेसचे संगमनेर तालुका कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे. संबंधित कुटुंबीयांनी पोलिसांच्या कारवाईवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित करत घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सार्वजनिक…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या तक्रारी आणि प्रशासकीय वादाची गंभीर दखल घेत अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी कर्जत नगरपंचायतीचे मुख्याधिकारी अक्षय जायभाये यांना सक्तीच्या रजेवर पाठवले आहे. २५ सप्टेंबर २०२६ पासून पुढील कायदेशीर कारवाई निश्चित होईपर्यंत जायभाये यांना रजेवर पाठविण्याचा आदेश २३ सप्टेंबर रोजी डिजिटल स्वाक्षरीने काढण्यात आला. जायभाये यांच्याविरुद्ध प्राप्त तक्रारी, मागवण्यात आलेले खुलासे आणि त्यानंतरही समाधानकारक खुलासा न आल्याने ही कारवाई करण्यात आल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. आष्टी मतदारसंघाचे आमदार सुरेश धस यांनी ८ डिसेंबर २०२५ रोजी नगरविकास विभागाकडे केलेल्या तक्रारीचा या आदेशात स्पष्ट संदर्भ आहे. कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पांतर्गत…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर शहरातील सर्वच प्रमुख चौकांमध्ये वाहतुकीची समस्या अत्यंत गंभीर बनली असून दररोज लागणाऱ्या वाहनांच्या लांबच लांब रांगांमुळे नागरिक पूर्णपणे बेजार झाले आहेत. वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष, चौकांमधील सिग्नल यंत्रणेचे उल्लंघन, भरधाव वेगाने स्टंटबाजी करणारे तरुण, बेशिस्त रिक्षाचालक आणि फुटपाथवर झालेले प्रचंड अतिक्रमण यामुळे संगमनेरकरांची रोजची वाट बिकट झाली आहे. या रोजच्या कोंडीतून संगमनेरकरांची सुटका कधी होणार, असा संतप्त सवाल आता नागरिक विचारत आहेत. शहरातील विस्कळीत वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी नगरपालिकेच्या वतीने दिल्ली नाका, अकोले नाका आणि बसस्थानक परिसरासह महत्त्वाच्या चौकांत स्वयंचलित सिग्नल यंत्रणा बसवण्यात आली. मात्र, अंमलबजावणी अभावी ही यंत्रणा कुचकामी ठरत आहे. अकोले नाका परिसरात घुलेवाडीकडे…
आजचे राशिभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक ऊर्जा आणि नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभल्यामुळे अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक बाबींमध्ये सुधारणा दिसून येईल, परंतु अनावश्यक खर्च टाळणे हितकारक ठरेल. कौटुंबिक वातावरणात आनंद आणि उत्साह राहील. आरोग्य उत्तम राहील, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवावे. वृषभ- आजचा दिवस संयम आणि शांतता बाळगण्याचा आहे. व्यवसायात घाईगडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळावे. कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे नियोजनानुसार काम करणे सोयीचे ठरेल. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन मोलाचे ठरेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद टाळण्यासाठी संवाद महत्त्वाचा आहे. संध्याकाळचा वेळ आत्मचिंतनात घालवावा. मिथुन- आज बुद्धिमत्ता आणि चाणाक्षपणाच्या जोरावर अनेक कठीण प्रसंगांवर मात…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- निळवंडे धरण लाभक्षेत्राला पाण्याचा प्रत्यक्ष लाभ देण्याच्या पार्श्वभूमीवर चिंचोली गुरव व पंचक्रोशीतील उपसा सिंचन योजनेसाठी ५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे परिसरातील शेकडो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार असून, चिंचोली गुरव आणि पंचक्रोशीतील शेतकऱ्यांची प्रदीर्घ प्रतीक्षा संपून त्यांच्या आयुष्यात आनंदाचा क्षण आला असल्याचे राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे. संगमनेर तालुक्यातील चिंचोली गुरव येथे उपसा सिंचन योजनेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी आमदार अमोल खताळ, जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रदीप हापसे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि लाभक्षेत्रातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंत्री विखे पाटील यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी काढण्यात आलेल्या जनआक्रोश मोर्च्यादरम्यान प्रांताधिकारी कार्यालयाच्या दालनात बळजबरीने प्रवेश करून गोंधळ घातल्याप्रकरणी विक्रम आत्माराम खांडरे (रा. कवठे कमळेश्वर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनियमित वीजपुरवठा, सक्तीचे भारनियमन, निळवंडे-भंडारदरा धरणातील पाण्याचा प्रश्न आणि दुष्काळी परिस्थिती यांसारख्या गंभीर प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संगमनेरात शेतकऱ्यांच्या महाआक्रोश मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसच्या तालुकाध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा काढण्यात आला होता. मोर्चादरम्यान प्रांताधिकारी अरुण उंडे निवेदन घेण्यासाठी येत नसल्याचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर तालुक्यातील आणि शिर्डी विधानसभा मतदारसंघातील प्रमुख केंद्र असलेल्या आश्वी व परिसरात अवैध धंद्यांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून उघडपणे सुरू असलेल्या बेकायदेशीर व्यवसायांमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत. सध्या सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा होत असताना शांतता व सुव्यवस्था राखण्याऐवजी परिसरात मटका, अवैध दारू, गुटखा विक्री आणि वाळू-मुरुमाची बेकायदेशीर वाहतूक जोरात सुरू आहे. स्थानिक पोलिसांच्या संशयास्पद दुर्लक्षामुळे या माफियांना नेमका कोणाचा पाठिंबा आहे, अशी चर्चा आता ग्रामस्थांमध्ये दबक्या आवाजात सुरू आहे. परिसरातील चौकाचौकांत मटक्याचे अड्डे आणि बंदी असलेला गुटखा उघडपणे विकला जात असल्याने तरुण पिढी वाईट मार्गाला लागत आहे. तसेच महसूल व पर्यावरणाची हानी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – चेक अनादर प्रकरणात संगमनेरचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी प्रसाद जोशी यांनी महत्त्वपूर्ण निर्णय देत आरोपी संजय मालक सागर यास दोषी ठरवले आहे. न्यायालयाने निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटस ॲक्ट १८८१ च्या कलम १३८ अंतर्गत आरोपीला एक वर्षाच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच, फिर्यादी कंपनीस २ लाख रुपये नुकसान भरपाई आणि २ सप्टेंबर २०२६ पासून प्रत्यक्ष वसुली होईपर्यंत त्यावर वार्षिक ९ टक्के साध्या व्याजासह रक्कम देण्याचा आदेश दिला आहे. ही नुकसान भरपाईची रक्कम न दिल्यास आरोपीस आणखी दोन महिने साध्या कारावासाची शिक्षा भोगावी लागणार आहे. हे प्रकरण श्री. गजानन महाराज शुगर लि. विरुद्ध संगमनेर येथील कंत्राटदार संजय मालक सागर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – मातृभाषेविषयी निष्ठा वृद्धिंगत करणे, वाचन संस्कृतीला चालना देणे आणि विद्यार्थी व पालकांमध्ये साहित्याविषयी सजगता निर्माण करण्याच्या उद्देशाने संगमनेरमध्ये सोमवारी (२८ सप्टेंबर) एकदिवसीय बालकुमार साहित्य संमेलनाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. आगामी शंभराव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची ही एक प्रकारे नांदीच ठरणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषद (पुणे), अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था (शाखा संगमनेर), समर्थ युवा फाउंडेशन आणि मराठी भाषा संचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्ष म्हणून प्रसिद्ध वक्ते व साहित्यिक डॉ. संजय कळमकर तर उद्घाटक म्हणून ज्येष्ठ पत्रकार व साहित्यिक…
अनंत पांगारकर महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- एखाद्या थरारक सिनेमाला शोभेल असा धक्कादायक आणि खळबळजनक प्रकार संगमनेर शहरात समोर आल्याने संपूर्ण तालुक्यात पॉलिसी वर्दीआडून झालेल्या कृत्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पोलीस उपनिरीक्षकाच्या मदतीने मित्राच्याच विश्वासाघाताने एका निष्पाप तरुणाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा भीषण कट रचला असल्याचे समोर येत असून, याप्रकारामुळे संगमनेर पोलिसांच्या कारभारावर आणि भूमिकेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. घडलेल्या घटनेनुसार, जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी मित्रांनीच कट रचून काशिफ कुरेशी याच्या दुचाकीच्या डिकीत तब्बल ३९ ग्रॅम एमडी (MD) ड्रग्ज लपवून ठेवले आणि पोलिसांना खबरीद्वारे माहिती देऊन शहर पोलीस ठाण्यातील वादग्रस्त पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत सावंत यांनी आपल्या सहकाऱ्यांसह छापा टाकून त्याला…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधींचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला आणि मेहनतीला चांगले यश मिळेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होईल. कौटुंबिक जीवनात आनंद आणि शांतता राहील. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न होईल. आर्थिक बाबींमध्ये अचानक फायदा होण्याची शक्यता आहे, परंतु अनावश्यक खर्च टाळणे योग्य ठरेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ – आजचा दिवस धीर धरणे आणि संयम बाळगण्याचा आहे. कामाचा ताण थोडा वाढू शकतो, परंतु तुमच्या नियोजनाने सर्व कामे पूर्ण होतील. नातेसंबंधात गैरसमज होणार नाहीत याची दक्षता घ्या, विशेषतः जोडीदाराशी संभाषण करताना शब्दांचा वापर जपून करा. व्यापारी वर्गासाठी नवीन करारांवर स्वाक्षरी करण्यासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न भेसळीला आळा घालण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) जिल्ह्यात व्यापक मोहीम उघडली असून संगमनेर तालुक्यातील एका खाद्य आस्थापनेवर अचानक छापा टाकून २ लाख ६० हजार ८२० रुपये किंमतीचा संशयास्पद ‘काऊ घी’चा साठा जप्त केला आहे. याचबरोबर बीड जिल्ह्यातील दूध भेसळ प्रकरणात सहभाग निष्पन्न झाल्यामुळे जामखेड तालुक्यातील एका दूध संकलन केंद्राचा परवाना तातडीने निलंबित करण्यात आला आहे. सणांच्या काळात नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि निकृष्ट अन्नपदार्थांची वाहतूक किंवा विक्री करणाऱ्या व्यावसायिकांवर अत्यंत कठोर कारवाई करण्याचा थेट इशारा प्रशासनाने दिला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सहायक आयुक्त (अन्न) सो. ह. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा…
