Author: Annant Ppangarkar

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- श्रीरामपूरच्या टिळकनगर भागातील कामगार चौक परिसरात फटाक्याचे पैसे मागण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला करून खून केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत दोन मुख्य आरोपींना जेरबंद केले आहे. रविवारी (८ नोव्हेंबर २०२६) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी मोईनुद्दीन शकील पठाण हे त्यांच्या कामगार चौक, टिळकनगर येथील फटाक्याच्या दुकानात असताना आरोपी सागर राहुल गुंजेकर, अक्षय राहुल गुंजेकर, आनंद अमर पवार, अमित रविकांत पटारे, उमर शेख (सर्व रा. श्रीरामपूर परिसर) यांच्यासह इतर आरोपी दुकानावर आले. आरोपींनी फिर्यादीकडे फटाक्याच्या पैशांची मागणी केली. फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिल्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी हा आनंद आणि आपुलकीचा सण असला तरी, संगमनेर तालुक्यातील राजापूर येथील स्व. विकास हासे यांच्या कुटुंबासाठी यंदाची दिवाळी दुःखाची सावली घेऊन आली. अवघ्या दोन महिन्यांपूर्वी अल्पशा आजाराने विकास हासे यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन लहान मुले असा परिवार असून, कुटुंबाचा मुख्य आधार हरवल्याने या कुटुंबावर मोठे संकट ओढवले आहे. या कठीण काळात राहुल गांधी समर्थक संघाच्या वतीने (RGSS) हासे कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करत एक आदर्श सामाजिक बांधिलकी जपली आहे. दिवाळीच्या पार्श्वभूमीवर संघाच्या पदाधिकाऱ्यांनी राजापूर येथे जाऊन हासे कुटुंबाची प्रत्यक्ष भेट घेतली आणि त्यांना आर्थिक मदत सुपूर्द केली. याशिवाय कुटुंबाला दिवाळीचा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- ऐन दिवाळीच्या सणात रविवारी संगमनेर शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि थरारक घटना समोर आली आहे. संगमनेर शहरातील गजबजलेल्या अकोले रोडवर असलेल्या एका बॅटरीच्या दुकानाला सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागली. फटाक्यांची ठिणगी पडल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, आगीचे रौद्ररूप पाहून परिसरात एकच खळबळ उडाली आणि नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले. मिळालेल्या माहितीनुसार, सणाचा दिवस असल्याने अकोले रोड परिसरात सायंकाळी मोठी वर्दळ होती. याच दरम्यान एका बॅटरीच्या दुकानातून अचानक धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाला बाहेर पडू लागल्या. दुकानात बॅटरी आणि इतर ज्वलनशील साहित्य असल्याने आगीने काही वेळातच अत्यंत भयानक रूप धारण केले. ही आग…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. नोकरीच्या क्षेत्रात सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल, ज्यामुळे रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबींमध्ये गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला नक्की घ्या. संध्याकाळी कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मनाला सुखद शांतता लाभेल. वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक लाभाचा ठरेल. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळाल्याने मन प्रसन्न राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांति नांदेल आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागेल आणि उच्च शिक्षणासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे. मिथुन – आज आपल्याला संमिश्र फळे मिळतील. व्यवसायात नवीन योजना राबवण्यासाठी काळ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील मुख्य बाजारपेठेत खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत असताना आमदार अमोल खताळ पाटील यांनी थेट बाजारपेठेत उतरून जनसंपर्क साधला. कोणताही औपचारिकतेचा बडेजाव न करता त्यांनी पायी फिरून व्यापारी, खरेदीसाठी आलेले नागरिक, महिला आणि लहान मुलांशी अत्यंत आपुलकीने संवाद साधला. प्रत्येकाची भेट घेऊन हस्तांदोलन करत त्यांनी सर्वांना दीपावलीच्या मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत शिवसेना शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते. आमदार खताळ यांच्या या साध्या आणि आपुलकीच्या वागण्यामुळे संपूर्ण बाजारपेठेत एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला. दिवाळीच्या काळात बाजारपेठेत ग्राहकांची मोठी वर्दळ असते. या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांनी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आणि छोट्या व्यावसायिकांपासून…

Read More

रविवार विशेष लेख — बौद्ध धम्मात दिवाळी साजरी करावी की, विवेकाचा दीप प्रज्वलित करावा? प्रवीण बागडे दिवाळी आली की सर्वत्र प्रकाशाचा उत्सव सुरू होतो. घराघरांत पणत्या उजळतात, आकाशात आतषबाजी होते, मिठाईची देवाणघेवाण होती आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. मात्र, या झगमगाटात एका मूलभूत प्रश्नाकडे आपण कधी गांभीर्याने पाहिले आहे का? आपण तथागत गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारला आहे, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या वैचारिक क्रांतीचा वारसा अभिमानाने मिरवतो, मग बौद्ध समाजाने दिवाळी नेमकी कोणत्या विचाराने आणि कोणत्या धार्मिक संकल्पनेतून साजरी करावी? हा प्रश्न कुणाच्या श्रद्धेला दुखावण्यासाठी नाही, तर स्वतःच्या वैचारिक भूमिकेचा प्रामाणिक शोध घेण्यासाठी आहे. कारण धम्म म्हणजे केवळ उपासना नव्हे, तर विचार,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यात यंदा दुष्काळाचे भीषण संकट ओढवले असून शेतकरी, शेतमजूर आणि आदिवासी पाड्यांवरील गोरगरीब कुटुंबांसमोर उदरनिर्वाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाला आहे. अशा कठीण परिस्थितीतही वंचित घटकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हसू फुलावे या सामाजिक बांधिलकीतून महायुतीचे आमदार अमोल खताळ यांनी मदतीचा हात पुढे केला आहे. शिवसेनेचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार खताळ यांनी कर्जुले पठार येथील येठेवाडी, गुंजाळवाडी पठार येथील काटवणवाडी आणि डोळासणे येथील दुबेवाडी परिसरातील आदिवासी व गरजू कुटुंबांना दिवाळी शिधा, साड्या, मिठाई आणि फटाक्यांचे वाटप करून त्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड केली. यावेळी बोलताना आमदार अमोल खताळ म्हणाले की, राज्यात सध्या दुष्काळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- शेतातील मशागतीदरम्यान जेसीबीच्या सहाय्याने मोटारीची केबल तुटल्याच्या किरकोळ कारणावरून वाद होऊन ६५ वर्षीय ज्येष्ठ शेतकऱ्याला शिवीगाळ करत दगडाने व कुऱ्हाडीच्या लाकडी दांडक्याने जबरी मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. अकोले तालुक्यातील पठार भागातील बेलापूर गावच्या घोडेवहाळ शिवारात शनिवारी (७ नोव्हेंबर) सकाळी ११.४५ ते दुपारी १२.०० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी पीडित शेतकऱ्याच्या तक्रारीवरून अकोले पोलीस ठाण्यात आरोपी तरुणाविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बेलापूर येथील ६५ वर्षीय शेतकरी बाळू गणपत फापाळे हे आपल्या शेतात काम करत असताना शेजारील शेतकरी गणेश भाऊराव गोपाळे यांच्या मोटारीची केबल जेसीबीच्या कामादरम्यान अडकून तुटली. यावरून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- पवित्र मतदानाच्या माध्यमातून जनतेने लोकशाही मार्गाने आपले प्रतिनिधी निवडले, परंतु याच लोकप्रतिनिधींना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी खोके सरकारने नवनवीन कायद्यांची खोडसाळ ढाल पुढे केली आहे. ही सरळसरळ लोकशाहीची क्रूर हत्या असल्याचा घणाघाती आरोप आता राज्यभरातून होत असून, संगमनेरमध्ये याविरोधात संतापाचा तीव्र उद्रेक पाहायला मिळत आहे. कोल्हापूरच्या ‘गोकुळ’ दूध संघावर शासननियुक्त सदस्य ठोकण्याच्या या हुकूमशाही निर्णयाच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये ‘राहुल गांधी समर्थक संघ’ (RGSS) आक्रमक झाला आहे. शहरातील ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या रोखठोक फ्लेक्समुळे सत्ताधाऱ्यांच्या दडपशाही कारभाराविरोधात संपूर्ण नगर जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली आहे. सुमारे ५०० कोटींपेक्षा अधिक उलाढाल असलेल्या कोल्हापूरच्या प्रसिद्ध ‘गोकुळ’ दूध संघात सभासदांनी परिवर्तनाचा कौल देत माजी…

Read More

प्रवीण पुरो काहीही करा पण सत्ता मिळवा, या एका मंत्राने राज्यातले सत्ताधारी विशेषत: भारतीय जनता पक्ष पुरता पछाडला आहे. हा पक्ष सहकारी पक्षाचा आणि सहकारी नेत्यांचा जराही विचार करत नाही, हा अनुभव देशातील सगळ्याच राजकीय पक्षांना आहे. इतर राजकीय पक्षांवर अन्याय करणारे या पक्षाचे मंत्री आणि पदाधिकारी गेल्या आठवड्यात संविधान आणि लोकशाहीच्या बचावाच्या बाता मारत रस्त्यावर उतरले होते. संविधानाचे आपणच राखणदार आहोत, असं सांगणार्‍या या पक्षाने गेल्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये संविधानाचा खून केला, लोकशाही पायदळी तुडवली, लाजलज्जा विकून खाल्ली. सामान्यत: सत्ता राबवण्यासाठी कोणताही पक्ष आपली सारी शक्ती पणाला लावत असतो. मात्र काहीही न करता केवळ सत्ता आणि पैशांच्या जिवावर सहकार क्षेत्रात…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी आपल्याकडे सोपवली जाऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, तरीही खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. वृषभ – आजचा दिवस शांततेने आणि संयमाने घालवण्याची गरज आहे. कोणत्याही महत्त्वाच्या कामात घाईगडबड करू नका, अन्यथा नुकसान होऊ शकते. व्यावसायिक क्षेत्रात सावधगिरी बाळगा, विशेषतः आर्थिक व्यवहारांमध्ये मोठी गुंतवणूक करताना तज्ज्ञांचा सल्ला घ्या. घरातील सदस्यांसोबत वेळ घालवल्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्याच्या संदर्भात पाठदुखीचा त्रास जाणवू शकतो, विश्रांती घ्या. मिथुन…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथील गुंजाळ पाटील मळ्यात एका लग्नसमारंभादरम्यान गर्दीचा फायदा घेऊन नागरिकांच्या गळ्यातील सोन्याच्या चेन लांबवणाऱ्या चोरांचा संगमनेर शहर पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी चार आरोपी निष्पन्न करून त्यांच्याकडून तब्बल ३ तोळे वजनाच्या तीन सोन्याच्या चेन हस्तगत केल्या आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. ०३ मे २०२६ रोजी रात्री ८:३० ते ९:०० वाजण्याच्या दरम्यान गुंजाळ पाटील…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर नगरपालिका निवडणुकीत यश मिळाले म्हणून विरोधकांनी हुरळून जाऊ नये. तुमचे नगरसेवक टक्केवारी वसूल करण्याचे काम करतात; मात्र आमचे कार्यकर्ते नगरसेवक नसले तरी जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी रस्त्यावर उतरून जनसेवक म्हणून काम करत आहे शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिकांना कोणी धमकावण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी आपल्या विरोधकांना दिला आहे. संगमनेर शहरातील अकोले नाका परिसरात शिवसेनेच्या शिव वाहतूक सेनेचे उद्घाटन आमदार खताळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. व्यासपीठावर शिवसेनेचे शहरप्रमुख विनोद सूर्यवंशी, नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.…

Read More

आजचे राशीभविष्य मेष- आजचा दिवस तुमच्यासाठी ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला असेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम राहील, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबतीत केलेले जुने प्रयत्न आज फळाला येऊ शकतात. जोडीदारासोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. वृषभ- आजचा दिवस आर्थिक फायद्याचा ठरू शकतो. रखडलेले पैसे परत मिळाल्यामुळे मनाला आनंद होईल. कौटुंबिक वातावरण शांततापूर्ण आणि आनंदी राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः कंबर किंवा पाठीच्या दुखण्यापासून सावध राहा. विद्यार्थी वर्गाला अभ्यासात यश मिळवण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मिथुन-…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- देशाच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते तथा खासदार शरदचंद्रजी पवार हे मुंबई येथील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत असून, राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी शुक्रवारी रुग्णालयात जात त्यांच्या प्रकृतीची आस्थेवाईक विचारपूस केली. मागील दोन दिवसांपासून खासदार पवार हे मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीची माहिती समजल्यानंतर राज्यभरातील विविध राजकीय व सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आहे. पवार साहेबांच्या प्रकृतीबाबत महाराष्ट्रातील जनतेमध्येही काळजी आणि आपुलकीची भावना व्यक्त होत आहे. बाळासाहेब थोरात यांनी काल नाशिक येथील उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बैठकीत सहभाग घेतल्यानंतर मुंबईकडे प्रयाण केले होते.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मंत्रिपद म्हणजे केवळ अधिकार नाही तर कुटुंबातील सदस्यांप्रमाणे लोकांची जबाबदारी स्वीकारणे होय, अशी भावना राज्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिर्डीत आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीवर भाष्य करताना त्यांनी सांगितले की, सांगली, सातारा, कोल्हापूरसह मराठवाड्यात पाण्याचे संकट गंभीर असून, शेतीच्या पाण्याचे नियोजन करताना मोठी कसरत करावी लागते. धरणातील पाणीसाठा आणि लोकांच्या गरजा यांचा ताळमेळ साधताना कोणतीही चूक होऊ नये यासाठी प्रचंड मानसिक दबाव सहन करावा लागतो. राजकारणात अनेक पदे मिळतात, मात्र सामान्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणे आणि त्यांच्या अडचणींना कुटुंबातील समस्या मानून सोडवणे हेच जनसेवकाचे खरे कर्तव्य असते. विकासाचा प्रवास करताना…

Read More

प्रवीण बागडे दिवाळी आली की प्रत्येक घरात आनंदाचे दिवे उजळतात. बाजारपेठा सजतात, घराघरांत खरेदीची लगबग सुरू होती आणि नोकरदारांच्या खात्यात जमा होणाऱ्या बोनसची प्रतीक्षा सुरू होते. अनेक कुटुंबांसाठी हा बोनस म्हणजे केवळ अतिरिक्त पैसा नसतो, तर तो मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद, घरातील आवश्यक वस्तूंची खरेदी, सणाचा गोडवा आणि वर्षभराच्या कष्टांना मिळालेली छोटीशी आर्थिक उसंत असते. पण या बोनसकडे केवळ सणासुदीचा आर्थिक लाभ म्हणून पाहणे म्हणजे त्यामागील कामगार चळवळीचा इतिहास आणि श्रमिकांच्या संघर्षाचा विसर पडणे होय. बोनस हा मालकाचा उपकार नाही; तो कायद्याने आणि श्रमिकांच्या संघर्षाने मान्यता मिळवलेला हक्क आहे! भारतात बोनसची संकल्पना एका दिवसात जन्माला आलेली नाही. पहिल्या महायुद्धाच्या काळात, १९१७…

Read More

विशाल काळे- मला आठवते त्या दिवसापासून आजपर्यंत मी माझ्या आईला विड्या बांधताना पाहत आलो आहे. हा प्रसंग सांगण्याचे मुख्य कारण म्हणजे, आईच्या या कष्टाळू कामाचे आणि दिवाळीचे वर्षानुवर्षांचे एक अतूट नाते आहे. वर्षभर विड्या बांधून मिळणाऱ्या मोबदल्यासोबतच, दिवाळीच्या सणाला आईला एक विशेष बोनस मिळायचा. याच बोनसच्या पैशांवर आमच्या घरची दिवाळी साजरी व्हायची. आज मी स्वतः कमावता झालो आहे आणि मलाही चांगला बोनस मिळतो; पण माझ्या आईला त्या काळात मिळणाऱ्या त्या छोट्याशा बोनसचे अप्रूप आजही माझ्या मनात कायम घर करून आहे. खरं तर, आईच्या हाताला लागलेला कष्टाचा गंध आणि तिच्या घामातून उभे राहिलेले संसाराचे विश्व, यांची तुलना जगातील कोणत्याही संपत्तीशी होऊ…

Read More

आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साहाने भरलेला राहील. नोकरीच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि महत्त्वाची जबाबदारी पार पाडावी लागेल. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगावी, कारण अचानक खर्च वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत चांगला वेळ जाईल आणि आरोग्याची साथ लाभेल. वृषभ – आजचा दिवस आपल्यासाठी आर्थिक लाभाचा आणि प्रगतीचा असेल. जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरेल आणि व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील. वैवाहिक जीवनात गोडवा निर्माण होईल आणि जोडीदाराची पूर्ण साथ मिळेल. प्रवासाचे योग आहेत, परंतु प्रवासात सामानाची काळजी घ्या. मिथुन – आजचा दिवस वैचारिक पातळीवर थोडा गुंतागुंतीचा ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांसोबत वादविवाद टाळावेत आणि शांत राहून कामे पूर्ण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील खांबा गावासाठी वरदान ठरणारी ‘कामधेनू उपसा जलसिंचन योजना’ सध्या निकृष्ट काम आणि भोंगळ कारभारामुळे चहूबाजूने चर्चेत आली आहे. मुळा धरणावरून सुमारे सहा किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याच्या या १६ कोटी रुपयांच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पात ठेकेदाराने केलेल्या मनमानी कारभाराची आणि निकृष्ट कामाची गंभीर दखल घेत आमदार अमोल खताळ यांनी थेट जमिनीत गाडलेली संपूर्ण पाइपलाइन उकरून दर्जा तपासण्याचे सक्त आदेश दिले आहेत.  या दणक्यामुळे प्रशासकीय वर्तुळात आणि संबंधित ठेकेदारामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. सन २०२४ मध्ये मंजूर झालेली ही १६ कोटी खर्चाची योजना गेल्या दीड ते दोन वर्षांपासून रखडलेली आहे. वारंवार पाठपुरावा करूनही काम पूर्ण होत नसल्याने…

Read More