Author: अनंत पांगारकर
गुरुवार, दि. ३० मे प्रवरा नदी पात्रात मित्रांसमवेत पोहायला गेलेल्या शालेय विद्यार्थ्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून नदीपात्रात बळी जाण्याची मालिका अद्याप सुरूच असल्याचे यातून समोर आले. अविनाश पाराजी जोगदंड (वय १५ वर्षे, रा. कोल्हार भगवतीपुर) असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. स्थानिक नागरिक आणि आपत्ती दलाच्या जवानांनी राबविलेल्या पाच तासाच्या शोध मोहिमेत याचा मृतदेह नदीपात्राच्या कपारीत आढळून आला. अविनाश जोगदंड हा आपल्या मित्रांसोबत बुधवारी कोल्हार-बेलापूर रस्त्यालगत असलेल्या बागमळ्याच्या मागील बाजूस असलेल्या प्रवरा नदी पात्रात होण्यासाठी गेला होता. अविनाशचा नदीपात्रातील गाळात अथवा कपारीत अडकून मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अविनाश हा बीड जिल्ह्यातील…
गुरुवार, दि. ३० मे महाड येथील चवदार तळ्याच्या परिसरात आंदोलनादरम्यान महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे छायाचित्र फाडून विटंबना केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला संगमनेरात जोडे मारो आंदोलन करत निषेध करण्यात आला. यावेळी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ज्या मनुस्मृतीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जाळले तीच मनुस्मृती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी महाडमध्ये जाळली, मात्र मनुस्मृती दहन करण्याच्या नादात अनावधानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्रदेखील त्यांच्याकडून फाडले गेले. हा प्रकार लक्षात येतात जितेंद्र आव्हाड यांनी झाल्या प्रकाराबद्दल जाहीर माफी मागितली. मात्र याचे पडसाद सर्वत्र उमटत आहे. संगमनेरमध्ये या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी महायुतीच्यावतीने…
बुधवार, दि. २९ मे संगमनेर तालुक्यात मागील काही वर्षात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमीनींच्या व्यवहारांची सखोल चौकशी करावी, या जमीनींवर उद्योग उभारणी झाली नसल्यास या जमीनी तातडीने ताब्यात घ्याव्यात, जमीनी खरेदी करताना मुद्रांक शुल्कामध्ये घेतलेल्या सवलतींची पायमल्ली झाली असल्यास त्याची भरपाई संबंधीतांकडून वसूल करण्यात यावी अशा मागण्या एका निवेदनाद्वारे भाजपच्यावतीने प्रांताधिकार्यांकडे बुधवारी करण्यात आल्या. भारतीय जनता पक्षाच्यावतीने महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील तसेच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे वनजमीनींच्या खरेदीविक्री व्यवहारातील अनागोंदी कारभाराबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. पंधरा दिवसांत या वनजमीनींच्या खरेदी विक्री व्यवहारांची चौकशी न झाल्यास प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशाराही या शिष्टमंडळाने दिला. शिष्टमंडळात ॲड. श्रीराम गणपुले,…
बुधवार, दि. २९ मे | अनंत पांगारकर तब्बल नऊ महिने फरार राहिलेला दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या पोलीस कोठडीची मुदत बुधवारी संपल्यानंतर त्याला संगमनेरच्या जिल्हा न्यायालयाने १३ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली. कुटेला न्यायालयीन कोठडी मिळाल्याने त्याच्याकडून जामीन अर्ज दाखल होण्याची शक्यता निर्माण झाल्याने ठेवीदारांच्या चिंतेत वाढ झाली आहे. दूधगंगा पतसंस्थेचा संस्थापक चेअरमन असलेल्या भाऊसाहेब कुटेसह २१ जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात ८१ कोटीच्या अपहार प्रकरणी गुन्हा दाखल आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कुटे फरार होता. याच गुन्ह्यात त्याच्या कुटुंबियांना थेट सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यानंतर २४ मे रोजी कुटे स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला पाच…
संगमनेरच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील वाहतूक तासभर धरली रोखून! ६ जून पर्यंत तपासासाठी दिली डेडलाइन, पुढचे आंदोलन पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयासमोर बुधवार, दि. २९ मे १७ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे शेततळ्यात बुडून रितेश सारंग पावसे व प्रणव सारंग पावसे या दोन सख्या भावांचा मृत्यू झाला होता. हा अकस्मात मृत्यूचा प्रकार नसून घातपाताचा असल्याचा संशय ग्रामस्थांना असल्याने याप्रकरणी पुढे कोणताही तपास न झाल्याने, चौकशी करून आरोपींवर कारवाई करावी यासाठी बुधवारी (दि. २९ मे) नाशिक पुणे महामार्गावर हिवरगाव पावसातील टोल नाक्यावर ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन केले. ६ जून पर्यंत पोलीस प्रशासनाने या घटनेची सखोल चौकशी करत संबंधितांवर कारवाई…
बुधवार, दि. २९ मे पुण्याच्या विश्रामबाग पोलिसांनी न्यायालयात सादर केलेल्या अहवालाच्या आधारे खासदार राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार नोटीस बजावली जाणार आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी दाखल केलेल्या दाव्यात विश्रामबाग पोलिसांनी तपास अहवाल न्यायालयात सादर केला आहे. सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळून आल्याचे पोलिसांनी या अहवालात म्हटले आहे. या आधारे हे नोटीस बजावली जाणार आहे. खासदार राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यामुळे सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्याच्या शिवाजीनगर न्यायालयात गांधी…
बुधवार, दि. १९ मे लोकसभा निवडणूक प्रचारा दरम्यान वंचित बहुजन आघाडीच्या शिर्डी लोकसभेच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपींचा पोलिसांना अद्यापही शोध लागलेला नाही. घटनेला महिन्याचा कालावधी उलटत असून अद्यापही आरोपी मोकाट आहे. राखीव असलेल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांच्या उमेदवारीमुळे निवडणुकीत सरस वाढले होती. तिरंगी झालेल्या या लढतीत कोण बाजी मारतो हे चार जूनला समोर येणार आहे. एकीकडे निवडणुकीचा निकाल तोंडावर असताना दुसरीकडे मात्र महिनाभरापूर्वी झालेल्या उमेदवाराच्या वाहनावरील दगडफेक प्रकरणातील आरोपी शोधण्यात पोलिसांना अपयश आले आहे. निवडणूक प्रचारादरम्यान ८ मे रोजी रात्री प्रचार संपवून घरी परतत असताना रुपवते यांच्या वाहनावर चितळवेढे येथे…
बुधवार, दि. २९ मे ५०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करून त्या चलनात आणणाऱ्या त्रिकूटाला पोलिसांनी पकडले असून आणखी एकाचा शोध सुरू आहे. शेजारच्याच सिन्नरमधील एका हॉटेलमध्ये संशयित आरोपींकडून तयार केल्या जात होत्या. संगमनेरमध्ये देखील या नोटा आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाशिकच्या अंबड पोलिसांनी ही कारवाई केली. संशयित अशोक अण्णा पगार (वय ४५ वर्ष, रा. मेंढी, ता. सिन्नर) याला ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडे केलेल्या कसून चौकशीत हा प्रकार समोर आला. पोलिसांनी या प्रकरणी हेमंत लक्ष्मण कोल्हे (वय ३२ वर्ष, रा. वाशी, नवी मुंबई) याला नाशिकमधून व नंदकुमार तुकाराम मुरकुटे (वय ५२ वर्ष, रा. सिन्नर) याला सिन्नरमध्ये सापळा रचून अटक केली असून…
मंगळवार, दि. २८ मे गेल्याच आठवड्यात व्हाट्सअपवर करण्यात आलेल्या माजी मुख्यमंत्री, शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरेंवरील वादग्रस्त पोस्ट प्रकरणी भाजप पदाधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यापाठोपाठ आज पुन्हा एकदा याच ग्रुपच्या ॲडमिनवर वादग्रस्त पोस्ट टाकल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची मागणी संगमनेर शहर शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये तेढ निर्माण होईल, दोन धर्मियांच्या भावना दुखावतील अशा प्रकारच्या पोस्ट काही विघ्न संतोषी लोकांकडून जाणीवपूर्वक समाज माध्यमांवर टाकल्या जातात. संगमनेरमधील माध्यमही यात मागे नाही. बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर अशा प्रकारच्या पोस्ट व्हायरल होत असल्याने शहरातील शांततेला गालबोट लागण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पोलीस व प्रशासनाकडून अशा प्रकारच्या…
संगमनेर तालुक्यातील कासारे शिवारात कारवाई, दोघांना पकडले कार्यकर्त्यांच्या प्रखर भूमिकेमुळे वजन केल्यावर गोमांस भरले १३ टन मंगळवार, दि. २८ मे गोवंश हत्या बंदी कायद्यानंतर शेकड्याने कारवाया, आंदोलने करून देखील देशाच्या अनेक भागात, काना कोपऱ्यात गोमांस पुरविणारे संगमनेरातील बेकायदा कत्तलखाने सुरूच आहे. कोणत्याही कायद्याचा धाक येथील कसायांना राहायला नसल्याने पोलीस दलाच्या नाकावर टिच्चुन किंबहुना त्यांच्याच काही लोकांच्या आशीर्वादाने हे कत्तलखाने सुरू असल्याचा आरोप संगमनेरकर नागरिकांमधून नेहमी होतो. मोठ्या प्रमाणात जनावरांची कत्तल करून गोमांस वाहतूक होत असलेला एक आयशर ट्रक (MH17 BY7824) बजरंग दलाच्या श्याम प्रसाद थोरात, शाम रावबा नाईकवाडी, सुरेश मनोजकुमार कालडा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कासारे…
