Author: अनंत पांगारकर

शुक्रवार, दि. ३ मे नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील बलात्कार प्रकरणानंतर या प्रकरणातील पीडित तरुणीच्या नातेवाईकांनी नग्नावस्थेत रात्रभर स्मशानभूमीत बसविल्याने आरोपीच्या चुलत भावाने गळफास घेऊन आत्महत्या केली केली यामुळे पुन्हा एकदा राज्य हादरवून सोडणारी घटना समोर आली आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा कोपर्डीत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून कर्जत पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. नगर जिल्ह्यातील कोपर्डी गावात (ता. कर्जत) अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा खून केल्याच्या घटनेने राज्य हादरले होते. या अत्याचाराच्या घटनेने देश पातळीवर प्रतिक्रिया उमटल्या होत्या. विठ्ठल उर्फ नितीन शिंदे असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे…

Read More

शुक्रवार, दि. ३ मे पोटगीपोटी शेतजमिनीचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात दावा करणाऱ्या पत्नीचा न्यायालयाच्या परिसरात चाकूने भोसकून खून करणाऱ्या पतीसह चार जणांना वैजापूर न्यायालयाने जन्मठेप व पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. मोयिऊद्दीन एम. ए. यांनी हा निकाल दिला. ३ ऑक्टोबर २०२० मध्ये घडलेल्या या खुनाच्या घटनेत केशरबाई कारभारी गवळी (८०) रा. भिंगी बोरसर या वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात न्यायालयाने मुख्य आरोपी कारभारी किसन गवळी (८०), त्याची दोन मुले भारत कारभारी गवळी (४७), अतुल कारभारी गवळी (२१) सर्व रा. घायगाव ता. वैजापूर व त्यांचा नातेवाईक रघुनाथ जगन्नाथ सरोवर (३०) रा. गारज यांना…

Read More

शुक्रवार, दि. ३ मे  सोने व्यापाऱ्याकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणी मुंबईतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि राज ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू असलेले अविनाश जाधव, वैभव ठक्कर यांच्या विरोधात लोकमान्य टिळक मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मरीन ड्राईव्ह येथील रहिवासी असलेल्या शैलेश कांतीलाल जैन यांनी यासंदर्भात पोलीस ठाण्यात बुधवारी तक्रार दाखल केली आहे. जैन हे सोन्याचा व्यवसाय करतात. जैन त्यांच्या ज्वेलरी शॉप मध्ये वैभव ठक्कर यांच्यासोबत व्यवहार करत असताना अविनाश जाधव, त्यांचा चालक आणि इतर पाच-सहा जण सुरक्षा रक्षकासह बळजबरीने ज्वेलरी शॉप मध्ये आले. तेथे जैन यांचा मुलगा सौमील याला मारहाण केली. तसेच पाच कोटी रुपये…

Read More

गुरुवार, दि. २ मे  राज्यातील हाय व्होल्टेज लढतीमधील एक प्रमुख लढत अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघामध्ये होत आहे. भाजपाचे विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे पाटील व नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात ही लढत होत आहे. ही लढत राज्यात चर्चेचा विषय ठरली आहे. या मतदारसंघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे पारनेरचे माजी आमदार विजय औटी यांनी काल महायुतीचे उमेदवार सुजय विखे यांना पाठिंबा दिला आहे. विखे यांना दिलेला पाठिंबा हा या मतदारसंघात महा विकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे. विधानसभेचे माजी उपसभापती आणि पारनेरचे माजी आमदार असलेल्या विजय औटी यांनी पक्षाचा आदेश न पाळल्याने…

Read More

गुरुवार, दि. २ मे देशी दारू विक्रीचा व्यवसाय सुरळीत चालू ठेवण्यासाठी तसेच बिअर बार परमिट रूमवर कारवाई न करण्याकरिता तक्रारदाराकडून ११ हजाराची लाच घेणारा राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाचा सहाय्यक दुय्यम निरीक्षक लाच लुचपत विभागाने कोपरगावमध्ये पकडला. खलील खुर्शीद शेख (वय ४० वर्षे, रा. खडकी रोड, चर्चचे समोर, कोपरगाव, ता. कोपरगाव जि. अहमदनगर) असे लाचखोर भरारी पथकाच्या सहाय्यक दुय्यम निरीक्षकाचे नाव आहे. शेख याच्या विरोधात कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नासिक विभागाच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे-वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकच्या पथकाच्या पोलीस निरीक्षक गायत्री जाधव यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी कोपरगावमध्ये ही कारवाई करण्यात आली. जाधव यांच्या सापळा पथकात…

Read More

गुरुवार, दि. २ मे  लोकसभा निवडणुकीचे वातावरण राज्यात चांगलेच तापले आहे. निवडणुकीचे दोन टप्पे पार पडल्यानंतर राज्यात प्रचार सभांनी आता मोठा वेग घेतला आहे. पंतप्रधानांपासून राज्यातील बडे बडे नेते आपल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी राज्यात सभा घेत असतानाच महाविकास आघाडीतील काँग्रेसचे स्टार प्रचारक, प्रमुख नेते, भूमिपुत्र बाळासाहेब थोरात यांच्या प्रचार सभांना देखील राज्यातून मोठी मागणी असून काँग्रेससह महाविकास आघाडीचा किल्ला राज्यात ठीक-ठिकाणी लढवितांना थोरात दिसत आहे. राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भ व दुसऱ्या टप्प्यात पश्चिम विदर्भातील निवडणुका पार पडल्या. या मतदारसंघातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, रामटेक, अमरावती, नांदेड, हिंगोली येथे थोरात यांच्या प्रचार सभा झाल्या. काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी, सरचिटणीस…

Read More

बुधवार दि.१ मे – संगमनेर आता मनातील किंतु-परंतु नको, मी पालकमंत्री आहे माझ्या इभ्रतीचा प्रश्न आहे. उगीच लाईटली घेऊ नका, हसण्यावारी नेऊ नका, शंभर टक्के काम करून संगमनेरमधून महायुतीच्या उमेदवाराला मताधिक्य मिळालेच पाहिजेत. पाठोपाठ जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. गटातून मताधिक्य मिळणार नसेल तर उमेदवारी मागू नका असा थेट इशाराच राज्याचे महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पदाधिकारी कार्यकर्त्यांना दिला. संगमनेरमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचार कार्यालयाच्या शुभारंभासाठी मंत्री विखे बुधवारी आले होते. यावेळी ते बोलत होते. महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. विखे म्हणाले, निवडणूक थोड्या दिवसांवर आली आहे. त्यामुळे पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी झटून कामाला लागण्याची गरज आहे.…

Read More

शिर्डी, बुधवार – दि. १ मे  शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक पोलीस निरीक्षक म्हणून भारतीय पोलीस सेवेतील वरिष्ठ अधिकारी एम. व्ही. जया गौरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचे शिर्डी लोकसभा मतदारसंघात आगमन झाले आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली आहे.‌ निवडणूक पोलीस निरीक्षक यांचा पत्ता शिर्डी शासकीय विश्रामगृहातील कृष्णा कक्ष आहे. जया गौरी यांचा संपर्क क्रमांक ९०२२०१४२०३ व ई-मेल आयडी shirdipoliceobserver@gmail.com असा आहे. निवडणूक निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी म्हणून प्रियांका आठरे (महिला पोलीस उपनिरीक्षक) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक पोलीस निरीक्षक सर्वसामान्य व्यक्तींना शासकीय विश्रामगृहात सकाळी १०.३० ते ११.३० या वेळेत भेटतील. असे निवडणूक निर्णय…

Read More

बुधवार, दि.१ मे – पाथर्डी खासदार डॉ. सुजय विखे व आमदार मोनिका राजळे या भाजपमधील आमच्या सारख्या जुन्या निष्ठावंतांना योग्य तो सन्मान देत नसल्याचा आरोप करत भाजपचे माजी तालुकाध्यक्ष व विद्यमान जिल्हा उपाध्यक्ष माणिक खेडकर यांनी सोमवारी भाजपला सोडचिठ्ठी दिली. या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना खेडकर म्हणाले, विखे यांनी उमेदवारी दाखल केल्यापासून त्यांच्या एकाही कार्यक्रमाला त्यांनी मला बोलावले नाही. त्यांचे साडेतीन कार्यकर्तेच त्यांचा कारभार पाहतात. गेल्या पस्तीस वर्षांपासून मी भाजपचे काम करतो मात्र माझ्यासह जे पंकजा मुंडे यांचे काम करतात त्यांना भाजपमध्ये नंतर आलेले राजळे व विखे हे सातत्याने डावलण्याचे काम करतात. ह्या दोघांच्या कार्यपद्धतीला कंटाळूनच शेवगावच्या शेकडो कार्यकर्त्यांनी…

Read More

बुधवार, दि.१ मे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेमलेल्या भरारी पथकाच्या हाती निवडणुकीआधीच मंगळवारी मोठ घबाड लागलं आहे. मुंबईत भरारी पथकाने केलेल्या दोन मोठ्या कारवाया केल्या आहे. सायनमध्ये केलेल्या कारवाईत एका कारमधून कोट्यावधी रुपये जप्त केले. तर आदल्या दिवशी सोमवारी दुपारी दादरपूर्व भागात शिंदेवाडी परिसरातून लाखो रुपयांची रोकड ताब्यात घेण्यात आली आहे. देशभरात लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू आहे. राजकीय नेते मंडळी प्रचारसभा, रॅलीत व्यस्त आहेत. अशातच निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. मंगळवारी (ता. ३० एप्रिल) निवडणूक भरारी पथकाला सायन परिसरातील एका कारमध्ये मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार भरारी पथकाने कारवाई करत कारमधून तब्बल १ कोटी ८७…

Read More