Author: अनंत पांगारकर

मंगळवार, दि. २१ मे  संगमनेर तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना ६० लाखाचा न वटणारा धनादेश देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्हाध्यक्ष प्रवीण कुमार उर्फ बाळासाहेब बन्सीलाल नाहटा यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर न्यायालयाने काढलेल्या या आदेशामुळे नाहटा यांच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. नहाटा यांनी संगमनेरमधील दीपक काशिनाथ जाधव, मधुकर किसन ससाने, सुरेश संपतराव सावरे व भाऊसाहेब रामचंद्र वाघचौरे या चौघा डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांकडून डाळिंबाची खरेदी केली होती. या बदल्यात त्यांनी दि. ५ एप्रिल २०२३ रोजीचा चौघांचा एकत्रित स्टेट बँक ऑफ इंडियाचा (शाखा लोणी व्यंकनाथ) ६० लाखाचा धनादेश दीपक काशिनाथ जाधव यांच्या नावाने…

Read More

मंगळवार, दि. २१ मे अकोले तालुक्याला मानवतावादी, उदात्त विचारांचा राजकीय-सामाजिक- सांस्कृतिक वैभवशाली वारसा लाभला असला तरी सध्या राजकारणाचा घसरलेला स्तर खूपच चिंताजनक असून यात तालुक्याचे नुकसान होत आहे. यात तातडीने सुधारणा होऊन सामाजिक सौहार्द टिकवून एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम आखण्याची आणि त्याची सर्वांनी काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज सर्वपक्षीय नेते आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केली. सामाजिक सौहार्द, एकोप्याची भावना वाढीस लावण्यासाठी अकोल्यात सर्वपक्षीय नेते-कार्यकर्ते एकवटल्याचे सकारात्मक आणि आशादायी चित्र बघायला मिळाले. यांची उपस्थिती… अकोले तालुक्यातील सामाजिक सौहार्द आणि राजकारणाचा घसरलेला स्तर याबाबत विचार विनिमय करण्यासाठी रविवारी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयात विशेष बैठक झाली. ज्येष्ठ नेते दशरथ सावंत अध्यक्षस्थानी होते.…

Read More

सोमवार, दि. २० मे कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयतेने विना अन्न पाण्यावाचून एका पीकअपमध्ये नेल्या जात असलेल्या १८ गोवंश जनावरांची संगमनेर पोलिसांनी सुटका केली आहे. पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशावरून करण्यात आलेल्या या कारवाईत पोलिसांनी जिवंत जनावरांसह सुमारे साडेपाच लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. सोमवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास शहरातील कोल्हेवाडी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. एका पीकअपमध्ये कत्तलीसाठी जिवंत गोवंश जनावरे आणली असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. त्यांनी तातडीने यासंदर्भात आपल्या कार्यालयातील पोलीस कर्मचारी राहुल सारबंदे आणि राहुल डोके यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले. घटनास्थळी गेलेल्या पोलीस पथकाने संशयित पीकअप (एम. एच. १२…

Read More

सोमवार, दि. २० मे पुण्याच्या वानवडीतील महंमदवाडी येथे ज्वेलर्सच्या दुकानात शिरूर दिवसाढवळ्या दरोडा टाकणाऱ्या सात दरोडेखोरांच्या टोळीला पुणे पोलिसांच्या पोलीस शाखेने वेगवेगळ्या ठिकाणाहून अटक केली. काही तासांच्या आतच या टोळीकडून पोलिसांनी ६०१ ग्रॅम वजनाचे सोने, २ दुचाकी, १ चारचाकी, ६ मोबाईल असा सुमारे ५० लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरोडेखोरांच्या टोळीने शनिवारी महंमदवाडी रस्त्यावरील बीजीएस ज्वेलर्स येथे खरेदीच्या बहाण्याने चेहऱ्याला मास्क लावून सराफी पेढीत जात मालक आणि कर्मचाऱ्यांना बंदुकीचा धाक दाखवत दुकानातील दागिने घेऊन पोबारा केला होता. या घटनेची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे अपर पोलीस आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त अमोल झेंडे यांनी घटनास्थळी भेट दिली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ गुन्हे…

Read More

सोमवार, दि. २० मे  देशात पाचव्या टप्प्यातील मतदानाला प्रारंभ झाला आहे. राज्यातील १३ जागांसह एकूण ४९ जागांवर आज मतदान होत आहे. आतापर्यंत देशात चार टप्प्यातील मतदान प्रक्रिया पूर्ण झाली असून आज पाचव्या टप्प्यात मतदान होत आहे. आजच्या मतदानानंतर राज्यातील सर्व जागांवरील मतदान झाल्याने मतदान प्रक्रिया संपणार आहे. शेवटचे दोन टप्पे उरले असून ४ जूनला निवडणुकीचा निकाल समोर येईल. त्यानंतर देशात कोणाची सत्ता असेल हे स्पष्ट होईल. या राज्यात आज मतदान… महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, ओडिशा, झारखंड आणि जम्मू काश्मीर आणि लडाख या दोन केंद्रशासित प्रदेशांमधील एकूण ४९ जागांवर मतदान होत आहे. महाराष्ट्रात येथे सुरू आहे आज मतदान… धुळे,…

Read More

रविवार, दि. १९ मे  बीडमधील जिजाऊ मल्टीस्टेट १०० कोटीच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोपी करण्याची भीती दाखवून बिल्डरकडे १ कोटी रुपयांची लाच मागून त्यातील पाच लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या व्यापाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पकडल्यानंतर आर्थिक गणेश शाखेचा पोलीस निरीक्षक आणि सहाय्यक फौजदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आता त्या पाठोपाठ या दोघांनाही निलंबित करण्यात आलेले आहे. बीडच्या आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे आणि सहाय्यक फौजदार रवीभूषण जाधवर अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांची नावे आहेत. १ कोटीच्या लाचेचे प्रकरण समोर आल्यानंतर हे दोघेही अधिकारी फरार झाले आहेत. अद्यापही हे दोघे सापडू शकलेले नाही. या दोन्ही अधिकाऱ्यांच्या घर झडतीमध्ये लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांच्या…

Read More

रविवार, दि. १९ मे छात्रभारतीच्या विद्यार्थी संघटनेच्या संगमनेर तालुका कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. तालुका अध्यक्षपदी ज्ञानेश्वरी सातपुते, कार्याध्यक्षपदी मोहम्मद कैफ तांबोळी यांची निवड करण्यात आली. संघटनेची अन्य कार्यकारिणी पुढील प्रमाणे… सुरेश गाडे (तालुका संघटक), सुहानी गुंजाळ (तालुका उपाध्यक्ष), निकिता शिंदे (तालुका युवती संघटक), सुमित खरात, आकांक्षा जमधडे (तालुका सदस्य), अपेक्षा गुंजाळ (अभ्यास मंडळ प्रमुख), श्रेया शिंदे (सह्याद्री कॉलेज अध्यक्ष) छात्रभारतीचे कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिर साथी भास्कर दुर्वे नाना स्मारक या ठिकाणी पार पडले. येथे या निवडी करण्यात आल्या. प्रा. तुळशीराम जाधव, डॉ. सागर भालेराव, राजाभाऊ अवसक, अनिकेत घुले यांनी यावेळी सर्वांना मार्गदर्शन केले. छात्रभारतीचे राज्य कार्यवाह अनिकेत घुले, कृष्णामाई जाधव,…

Read More

प्रवीण पूरो | मुंबई  राजकारणात खरं सांगायला काही नसेल तर खोट्याचा आसरा घेण्याशिवाय पर्याय नसतो. लोकसभेच्या सुरू असलेल्या निवडणूक प्रचारात राजकीय पक्षांच्या नेत्यांनी खोटेपणाची हद्द पार करून टाकली. विशेषत: भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी प्रचारादरम्यान तोडलेले तारे पाहिले की इतकं खोटं बोलण्याचा सराव या मंडळींनी केला तरी कधी, असं राहून वाटतं. बरं खोटं किती बोलावं याला काही मर्यादा? या सार्‍या मर्यादा पार केल्याने या मंडळींचा समाचार घेण्यावाचून पर्याय नाही. घरातली प्रमुख कर्ती व्यक्ती जेव्हा खोटेपणाचा आसरा घेते, तेव्हा त्याच्या नेतृत्वाखाली काम करणारे पक्ष पदाधिकारी आणि कार्यकर्ते खोटेपणाचा बेमालूम वापर करतात. महाराष्ट्रात सुरू असलेल्या प्रचारात भाजपच्या नेत्यांनी हेच दाखवून दिलंय.  २०१४ च्या…

Read More

रविवार, दि. १९ मे अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षकांच्या पथकातील पोलीस कर्मचाऱ्यांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न वाळू तस्करांनी केल्याचा प्रकार राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये समोर आला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर येथे ही घटना घडली असून पोलिसांनी याप्रकरणी भामाठाण येथील तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईत पोलिसांनी वाळूने भरलेल्या दोन ट्रॅक्टरसह बारा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. श्रीरामपूर तालुक्यातील कमालपुर येथे गोदावरी नदीपात्रातून अवैध वाळू वाहतूक सुरू असल्याची माहिती प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलीस अधीक्षक जीवन बेनिवाल यांना शुक्रवारी (दि. १७) मिळाली होती. त्यामुळे कारवाईसाठी…

Read More

शनिवार, दि. १८ मे पतसंस्थेला कर्जाच्या थकबाकी पोटी दिलेला धनादेश न वटल्याने संस्थेची फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी न्यायालयाने शनिवारी संगमनेरातील सुवर्ण व्यावसायिकाला तब्बल चार लाख रुपयांचा दंड आणि एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली आहे. रुपेश सुभाष वर्मा असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आर्थिक संस्थांना न वटणारे धनादेश देणाऱ्यांमध्ये चपराक बसली असल्याचे मानले जाते. संगमनेरच्या बाजारपेठेतील सुवर्ण व्यावसायिक रुपेश सुभाष वर्मा यांनी शहरातील राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्थेकडून तीस लाख रुपयांचे जमीन व गृहतारण कर्ज २०१८ मध्ये घेतले होते. आज अखेर या कर्जाची थकबाकी ६७ लाखावर गेली आहे. संस्थेने वारंवार त्यांच्याकडे कर्ज रकमेची मागणी केल्यानंतर वर्मा…

Read More