Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर आंदोलने सुरू आहेत. जरांगे पाटील स्वतः आमरण उपोषणाला बसले असून त्यांना पाठिंबा म्हणून राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळताना दिसतोय. ग्रामीण भागात प्रत्येक तालुक्याच्या आणि जिल्ह्याच्या ठिकाणी साखळी उपोषणे सुरू आहेत. मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे यांचे उपोषण व त्यांना मिळालेल्या राज्यभरातील पाठिंबा नंतर चांगलेच ऐरणीवर आले आहे. जरांगे पाटील यांनी सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी चाळीस दिवसांचा वेळ देऊन देखील सरकार आरक्षण जाहीर करू शकले नाही. राज्य सरकार खोटेनाटे कारणे पुढे करत मराठा समाजाला झुलवत आहे. यामुळे संतप्त झालेल्या मराठा आंदोलकांनी थेट राज्य सरकारचे प्रतिकात्मक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पुरो उपदेशाचे डोस पाजण्यासाठी परंपरेने प्राप्त झालेल्या विजया दशमीच्या मेळाव्यांचा जो तो पध्दतशीर वापर करू घेऊ लागला आहे. उध्दव ठाकरे यांनी शिवतीर्थावरून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आझाद मैदानातून तर सरसंघचालक मोहन भागवत यांनी नागपूरच्या संघ मुख्यालयावरून आपापल्या कार्यकर्त्यांना संबोधित केलं. वर्षोत्सव असल्याने कोणी काय बोलावं याला मर्यादा नसतात. यामुळे नेते काय बोलतील, हे कोणीही सांगू शकत नाही. यातले पहिले दोन नेते जरा नवखेच. उध्दव ठाकरे यांच्या पक्षावर झालेल्या अन्यायामुळे ते सत्ताधार्‍यांवर शरसंधान करतील, हे अपेक्षितच. मुख्यमंत्र्यांसाठी कोणताच पर्याय नसल्याने ते विरोधकांची रेवडी उडवतील हे ही तितकंच ठरलेलं होतं. पण बुजूर्ग असलेले सरसंघचालक मोहन…

Read More

स्मशानभूमीसाठी पालकमंत्र्यांकडे मी निधी मागितला निकृष्ट काम मात्र ग्रामपंचायत सदस्य आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या भागीदारीत! निषेध ठराव घेताना कामाची गुणवत्ता नियंत्रण पथक करून तपासणीचा ठराव झाला असता तर भ्रष्ट्राचाराला पाठीशी घालणारे उघड पडले असते महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमध्ये विकास कामाच्या नावाखाली सुरू असलेल्या भ्रष्टाचाराला अमोल खताळ विरोध करत आहे. त्यांचे काम चांगले सुरू असल्यामुळे विनाकारण त्यांना बदनाम करण्याचे कारस्थान आमच्या गावातील लोकांना हाताशी धरून आमदार, त्यांचा भाऊ व एक ठेकेदार करत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे तालुका सरचिटणीस वाल्मीक शिंदे यांनी केला आहे. संगमनेर तालुक्याच्या विकासात योगदान नसलेले व चिकणी गावाशी कोणताही संबंध नसताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शैक्षणिक क्षेत्रासह खेळांमध्येही आपला दबदबा निर्माण करणार्‍या संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या योगासन संघाने सीबीएसईची प्रादेशिक योग स्पर्धाही गाजवली. या स्पर्धेत ध्रुवच्या योगासन खेळाडूंनी सांघिक व वैयक्तिक अशा दोन्ही प्रकारात चमकदार कामगिरी बजावतांना तीन गटांमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. योगासनांच्या विविध प्रकारांमध्ये केलेल्या उत्कृष्ट सादरीकरणाच्या बळावर ध्रुवला १९ सुवर्णसह एकूण २५ पदकांची कमाई झाली. कर्नाटकची राजधानी बेंगलुरुमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत सहभागी झालेल्या ध्रुव ग्लोबलच्या सर्व स्पर्धकांची पुढील महिन्यात गाझीयाबाद येथे होणार्‍या सीबीएसई नॅशनल गेम्ससाठी निवडही करण्यात आली आहे. चौदा वर्षांखालील मुलींच्या सांघिक प्रकारात तृप्ती डोंगरे, देवांशी वाकळे, वैदेही मयेकर, रिद्धी लगड व नीरल वाडेकर यांच्या संघाने प्रथम क्रमांक…

Read More

सत्तेच्या गैरवापरातून सुरू असलेली दमदाटी सहन करणार नाही – आनंद वर्पे महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या विकासात कोणतीही योगदान नसणारे व चिकणी गावात कोणताही संबंध नसताना पालकमंत्री समर्थक व स्वयंघोषित सामाजिक कार्यकर्ते अमोल खताळ यांनी गावात येऊन केलेली तोडफोड व दमदाटी खपवून घेणार नसून या विरोधात चिकणी ग्रामस्थांनी एकत्र येऊन निषेध नोंदवत पोलिसांना निवेदन दिले आहे. तर सत्तेच्या गैरवापर करून अशी दमदाटी सहन करणार नाही असा इशारा तालुका किसान काँग्रेसचे अध्यक्ष आनंद वर्पे यांनी दिला आहे. चिकणी येथे झालेल्या ग्रामसभेत एकमताने याबाबत ठराव करण्यात आला. यावेळी किसान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आनंद वर्पे, दूध संघाचे संचालक विलास वर्पे, भारत वर्पे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. भाजप कडून ट्विट करण्यात आलेल्या या व्हिडिओमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा भूकंपाची शक्यता वर्तविली जात आहे. सध्याची राजकीय परिस्थिती बघता राज्याच्या राजकारणात कधी कोणती उलथापालट होईल याची कोणतीही शक्यता राहिलेली नाही. विधानसभा निवडणुकीनंतर भाजपचा आता तोंडाशी आलेला सत्तेचा घास महाविकास आघाडीने हिरावून घेतला. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तिघांनी एकत्र येत अनपेक्षितरित्या महाविकास आघाडीची स्थापना केली होती. या सरकारचा अडीच वर्षाचा कार्यकाल होत नाही तोच एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गणेशनगर : दुष्काळामुळे उसाचा तुटवडा आहे, गणेश बंद व्हावा यासाठी टोकाचे प्रयत्न सुरू आहे मात्र तरीही परमेश्वराच्या आशीर्वादाने धुराडे पेटले आहे, इतर कारखान्यांच्या बरोबरीने योग्य भाव ऊसाला दिला जाईल, सभासदांची दिवाळी गोड व्हावी या भूमिकेतून सर्व सभासदांना दहा किलो साखर मोफत दिली जाईल, अशी घोषणा काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केली. श्री गणेश सहकारी साखर कारखान्याचा बॉयलर अग्नी प्रदीपन समारंभ ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन युवा नेते विवेक भैय्या कोल्हे उपस्थित होते. श्री गणेश कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हाईस चेअरमन विजय दंडवते, ज्येष्ठ…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे: एका खटल्याच्या साक्षीसाठी न्यायालयाने वारंवार बोलावून देखील न्यायालयात हजर न राहणाऱ्या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाला अटक करून न्यायालयात आणण्याचे आदेश पुण्याच्या न्यायालयातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सी. एस. पाटील यांनी दिला आहे. एस. डी. कांबळे असे या तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचे नाव असून ते कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात कार्यरत होते. हानिफ गुलामअली सोमजी (रा. बोट क्लब रोड) यांनी दिलेल्या तक्रारीवरून २० मे २०१३ या दिवशी कोरेगाव पार्क पोलीस ठाण्यात शिवाजी कांतीलाल शिंदे, साईनाथ निवॄत्ती सातव, सोमनाथ काळूराम सातव, विष्णू बाजीराव सातव, ज्ञानेश्वर किसन सातव, निळाराम शितकल (सर्व रा. केसनंद) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मारहाण करून…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज न्यायालयात दाखल असलेल्या खटल्यातून निर्दोष सुटलेल्या पोलिसाला सद्यस्थितीचा अहवाल देण्यासाठी दहा हजार रुपयांची लाच मागणारा पालघरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयातील सरकारी वकील एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. सुनील बाबुराव सावंत (वय 51 वर्ष, सध्या रा. शालिनी अपार्टमेंट, रूम नंबर 5, लक्ष्मीनारायण मंदिराच्या पाठीमागे, माहीम रोड, पालघर) असे लाच लुचपत विभागाने पकडलेल्या लोकसेवकाचे नाव असून ते अतिरिक्त सत्र न्यायालय पालघर येथे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता- वर्ग 1 या पदावर कार्यरत आहे. सरकारी वकील सावंत यांच्या विरोधात पालघर लाचलुचपत विभागाकडे तक्रार करण्यात आली होती. पालघर जिल्हा पोलीस आस्थापनेमध्ये पोलीस नाईक या पदावर कार्यरत असलेल्या तक्रारदाराविरोधात सन 2015 मध्ये तारापूर पोलीस ठाणे येथे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रिद समोर ठेऊन शहरात कार्यरत असलेल्या इनरव्हील क्लब ऑफ संगमनेर व रोटरी क्लब संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात व तालुक्यात ‘फुलझडी’ या दिवाळी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. फुलझडीचे हे पहिलेच वर्ष असून सणासुदीच्या दिवसांमध्ये गरजेच्या सर्व वस्तू एकाच छताखाली मिळाव्यात, बाहेरगावातील तसेच शहरातील छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना एकाच छताखाली व्यासपीठ मिळावे या हेतूने फुलझडी मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती इनरव्हील क्लबच्या अध्यक्ष सुनिता गाडे यांनी दिली. फुलझडी दिवाळी मेळ्यात सुमारे 110 स्टॉल असून यामध्ये दिवाळी सणाशी संबंधीत सर्व व्यावसायिकांचा समावेश व्हावा यासाठी आयोजकांनी प्रयत्न केले आहेत. लेटेस्ट फॅशनमधील महिलांचे व…

Read More