Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. २६ कोल्हार-घोटी मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम पूर्णत्वास जात आहे. मात्र याच मार्गाचा भाग असलेल्या आणि शहरातून जाणाऱ्या तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतच्या मार्गाचे मजबुतीकरण, डांबरीकरणासह अपूर्ण काम तातडीने करण्याची मागणी संगमनेर नगर परिषदेचे माजी नगरसेवक राजेंद्र वाकचौरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागासह संबंधितांकडे केली आहे. तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा बहुतांशी भाग वाकचौरे नगरसेवक असलेल्या प्रभागांमध्ये मोडतो. संगमनेरमध्ये कोल्हार घोटी मार्गाच्या पूर्णत्वाचे काम बहुतांशी झाले असल्याने या कामातून तीन बत्ती चौक ते अकोले नाका पुलापर्यंतचा म्हणजेच मेनरोडचे काम झाले नसल्याने हा रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या या रस्त्याचे मजबुतीकरण, डांबरीकरणाचे…
अजय अनिता दोघे ही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. दोघेही हुषार. त्यामुळे त्यांना लगेचच चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. हेही त्यांच्या लक्षात आले की They are in love. तेंव्हा त्यांनी लग्न करायचे ठरविले. दोघांच्या घरी एकमेकांची माहिती होतीच, त्यामुळे लगेचच दोन्ही घरचे भेटले व लग्न ठरलं. अनिताने मात्र सर्वांसमोर एक अट ठेवली. ती म्हणाली, मी एकत्र कुटुंबात राहणार नाही. हे ऐकून अजय व त्याचे आई-वडील तर चकित झालेच, बरोबर अनिताचे आई-वडील पण अनिताकडे आश्चर्याने बघू लागले. लगेचच अजयचे बाबा म्हणाले, ठीक आहे. मला अनिताचे कौतुक वाटतं की, तिने हे लग्नाआधी सर्वांसमोर सांगितले. थोडा वेळ द्या आम्हाला. आपण उद्या पुन्हा भेटू व पूढचे ठरवू,…
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुढचे तीन महिने पंतप्रधान नरेंद्र मोदी “मन की बात” करणार नाही. असे पंतप्रधान मोदी यांनी आज ११० व्या कार्यक्रमात देशाला संबोधित करताना सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मन की बात कार्यक्रमाचा ११० वा भाग रविवारी सकाळी ११ वाजता प्रसारित करण्यात आला, यावेळी त्यांनी ही घोषणा केली. पंतप्रधान मोदी प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी “मन की बात” करत असतात ऑल इंडिया रेडिओच्या ५०० हून अधिक प्रसारण केंद्रांद्वारे हा कार्यक्रम प्रसारित केला जातो. या कार्यक्रमाची सुरुवात ३ ऑक्टोबर २०१४ रोजी करण्यात आली होती. भारतीय समाजातील महिला, वृद्ध आणि तरुणांना समाविष्ट करून विविध घटकांशी जोडणे हा…
नवी दिल्ली, २५ फेब्रुवारी केंद्र सरकारने ब्रिटिशकालीन असलेल्या तीन महत्त्वाच्या कायद्यात बदल करून नवे फौजदारी कायदे लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. या कायद्याची अंमलबजावणी देशात एक जुलैपासून सुरू होईल. २० नव्या गुन्ह्यामध्ये आणि त्यासाठीच्या शिक्षेतही मोठा बदल करण्यात आला आहे. त्यासाठी नव्या कायद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम हे तीन नवीन फौजदारी कायदे अनुक्रमे भारतीय दंड संहिता (IPC), फौजदारी प्रक्रिया संहिता (CrPC) आणि भारतीय पुरावा कायदा डिसेंबर २०२३ मध्ये लोकसभेने पारित केला होता.याशिवाय सामूहिक बलात्कारात दोषी आढळल्यास २० वर्षांचा कारावास किंवा दोषी जिवंत असेपर्यंत तुरुंगवास अशी शिक्षा देण्यात येईल.…
प्रवीण पुरो – भारतीय जनता पक्षाला आता लोकसभेत ४०० चा पल्ला गाठायचा आहे. आजवर सत्ताधार्यांना मिळाला नसेल, अगदी इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या हत्तेनंतरच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसला मिळाला नसेल असा जनाधार त्या पक्षाला हवा आहे. यासाठी माती सुपिक करण्याची तळमळ सुरू आहे. उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्र हे खासदारकीचं सर्वात मोठं राज्य. यामुळे या राज्याकडे सर्वच राजकीय पक्षांचं लक्ष आहे. भाजप तर सत्तेसाठी काहीही करायला तयार असल्याने त्या पक्षाने महाराष्ट्राला सर्वाधिक महत्व दिलंय. थोडासाही हयगयपणा पल्ला गाठण्यात नाकाम ठरू शकतो. यामुळेच जेवढं शक्य आहे तितकं करण्याचा आणि अशक्य आहे ते रेटून नेण्याचा प्रयत्न भाजपचा आहे. एका ‘इंडिया’ संज्ञेने त्यांची पळता भूई झाली आहे.…
संगमनेर, दि. २४ बेकायदेशीर वाळू तस्करी रोखण्यासाठी राज्याचे महसूल, जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवे वाळू धरण आणले असले तरी या धोरणाचा फज्ज्या उडविण्याचे काम त्यांच्याच सरकारमधील सहकारी पक्षाचे कार्यकर्ते करत असल्याचे समोर आले आहे. नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाने खांडगाव शिवारात दोन ठिकाणी केलेल्या कारवाईत पाच आरोपीवर चोरीच्या गुन्ह्यासह पर्यावरण संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले. या कारवाईत निष्पन्न झालेले पाचही आरोपी फरार झाले असल्याचे माहिती पोलिसांकडून देण्यात आली. संगमनेरच्या गौण खनिज उत्खननात आणि वाळू तस्करीमध्ये राजकीय पक्षाचेच पदाधिकारी अग्रेसर असल्याचे सातत्याने पुढे आले आहे. त्यामुळे महसूल विभागाकडून देखील नेहमीच त्यांच्यावर कारवाईसाठी हात आखडता घेतला जातो. शनिवारी (ता. २४)…
संगमनेर, दि. २२ फेब्रुवारी तालुक्यातील घुलेवाडी येथील आनंदवन विद्यालयाचा विद्यार्थी सोहम मनोज कडलग याने स्टुडंट टॅलेंट परीक्षेत २१२ गुण प्राप्त करत तालुक्यात पहिला येण्याचा मान पटकाविला आहे. अहमदनगर येथील हिंद सेवा मंडळ आयोजित स्टुडंट टॅलेंट परीक्षेत कडलग याच्यासह दिगंबर गणेश सराफ विद्यालयाच्या कौस्तुभ गोरक्ष सरोदेने द्वितीय तर गगन संदीप शिंदेने तालुक्यात तृतीय क्रमांकाने यश मिळविले आहे. जिल्ह्यातील प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी हिंद सेवा मंडळामार्फत या परीक्षेचे आयोजन केले जाते. सोहम कडलग यास वर्ग शिक्षिका भारती केकाने-चौधर, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळे कडलगचे मुख्याध्यापक विलास शिरोळे, प्रकाश भागवत, मनीषा देशमुख, अनिल कडलग, दिलीप शेटे, वडील मनोज कडलग व आई उमा…
शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत ऑपरेशन करून दिल्याच्या मोबदल्यात सात हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी नाशिकच्या पिंपळगाव बसवंत येथील धन्वंतरी हॉस्पिटलचे दोन संचालक डॉक्टर लाच लुचपतच्या जाळ्यात अडकले आहे. डॉ. महेश प्रल्हाद परदेशी व डॉ. महेश रामविलास बुब अशी धन्वंतरी हॉस्पिटलच्या दोघा संचालक डॉक्टरांची नावे असून या दोन्ही डॅाक्टरांविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (ता. २३ फेब्रुवारी) करण्यात आलेल्या या कारवाईबाबत माहिती अशी…
शेअर मार्केट ट्रेडिंगमधून चांगल्या आर्थिक परताव्याचे आमिष दाखवून शहरातील एका व्यावसायिकास तब्बल ३ कोटी ७० लाखांना गंडा घालण्यात आला आहे. शेअर मार्केटचे आमिष नाशिकच्या व्यावसायिकाला चांगलेच महागात पडले असून या प्रकरणी नाशिक सायबर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सायबर भामट्यांनी नाशिक येथील एका व्यावसायिकास गेल्या महिन्याभरापासून व्हॉटसॲपवर एका ग्रुपमध्ये ॲड केले होते. त्यावर शेअर मार्केट ट्रेडिंगविषयी अधिकृत वाटेल अशी माहिती दिली जात होती. शेअर ट्रेडिंगमध्ये आर्थिक गुंतवणूक केल्यास मोठा परताव्याचे आमिष या व्यावसायिकाला दाखवण्यात आले होते. व्यावसायिकाला संशयितांनी साडेतीन कोटी गुंतवल्यास तुम्हाला थेट साडेसात कोटी मिळतील, अशी स्कीम सांगितली. आम्हीही असेच पैसे गुंतविले…
मुंबई, दि. २३ राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे ज्येष्ठ नेते डॉ. मनोहर जोशी (वय ८७ वर्ष) यांचे शुक्रवारी पहाटे निधन झाले. जोशी यांना दोन दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. आज पहाटे तीन वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. राज्यात १९९५ मध्ये शिवसेना-भाजप युतीचे सरकार सत्तेत आल्यानंतर शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली होती. तत्कालीन युती सरकारचे ते पहिले मुख्यमंत्री होते. त्यांच्या कार्यकाळात राज्याच्या विकासासाठी विविध योजनांची सुरुवात झाली. शिवसेनाप्रमुख ठाकरे यांच्या अतिशय विश्वासातील असलेले जोशी यांचा नगरसेवक, आमदार, विरोधी पक्षनेते, मुख्यमंत्री ते लोकसभा अध्यक्ष असा मोठा राजकीय प्रवास…
