Author: अनंत पांगारकर
विद्याचंद्र सातपुते महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक शेतकरी पिढीजात फुलशेती करत असले तरी सध्या वाढती मागणी आणि बदलते तंत्रज्ञानामुळे पारंपरिक फुलांसह नानाविध फुले शेतात बहरु लागली आहेत. पारनेर तालुक्यातील हंगा येथील नितीन साठे यांनी अशाच शेवंती फुलांची लागवड करुन फुलशेतीत वेगळी वाट शोधली आहे. शेवंती फुलशेतीतून साठे यांना अवघ्या पाच महिन्यात खर्च वजा जाता तीन लाखांचे निव्वळ उत्पन्न मिळाले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका म्हणून प्रसिद्ध आहे. तालुक्यातील शेती हंगामी व पावसावर अवलंबून असून, बहुतेक क्षेत्र कोरडवाहू आहे. तालुक्यातील हंगा हे गाव भौगोलिक दृष्ट्या आकाराने व क्षेत्रफळाने मोठे आहे. याच गावात पारंपरिक शेती करताना नितीन साठे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नूतनीकरण करत पाच दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेला गुजरातच्या मोरबीतील मच्छू नदीवरील केबल सस्पेन्शन ब्रिज कोसळल्याने आतापर्यंत साठ लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दुर्घटनेतील मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. रविवारी संध्याकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. यावेळी पुलावरून ये-जा करणारे सुमारे चारशे लोक नदीपात्रात पडल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मृतामध्ये दहाहून अधिक बालकांचा समावेश असल्याची माहिती समोर येत आहे. तर जवळपास शंभरहून अधिक लोकांना रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. गुजरात सरकारमधील मंत्री ब्रजेश मेरजा घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल देखील घटनास्थळी भेट देण्यास निघाले होते. गेल्या सहा महिन्यांपासून बंद…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क टाटा एअरबससह चार मोठे प्रकल्प राज्याबाहेर गेले आहे. त्या पाठोपाठ नागपूरच्या मिहानमध्ये होणारा सॅफ्रन कंपनीचा प्रकल्प देखील हैदराबादला गेल्याचे सांगितले जाते. त्यामुळे राज्यात मोठा प्रकल्प येईल असा लॉलीपॉप दाखविला जात असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केली. माध्यमांशी साधलेल्या संवादावेळी सुळे बोलत होत्या. पुढच्या वेळी यापेक्षा मोठा प्रकल्प राज्यात येईल, असा लॉलीपॉप दाखविला जात आहे. मी तर म्हणते की, सगळेच प्रकल्प राज्यात यायला हवेत. मात्र राज्यात ईडी सरकार सत्तेत आल्यानंतर अनेक मोठे प्रकल्प येथून राज्याबाहेर जात आहे. हे सरकार सत्तेत येऊन तीन महिन्यापेक्षा अधिक कालावधी झाला असला तरी राज्याबाहेर जाणाऱ्या प्रकल्पाचे खापर महाविकास…
आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला, जनता आमचे रक्षण करेल : काँग्रेस नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नेत्यांना सुरक्षा पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांची सुरक्षा काढली, काही हरकत नाही. आमच्या सुरक्षिततेची काळजी जनतेला आहे. जनता आमचे रक्षण करेल, असे माजी महसूल मंत्री काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी सांगितले. पुढील महिन्यात खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील ‘भारत जोडो यात्रा’ राज्यात प्रवेश करत आहे. या यात्रेच्या नियोजनासाठी थोरात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह शेगावमध्ये आले होते. माध्यमांशी बोलताना त्यांनी राजकारणाच्या घसरत्या पातळी बद्दल खंत बोलून दाखवत राज्य सरकारवर हल्ला चढविला. राज्य सरकारने बाळासाहेब थोरात, छगन भुजबळ, जयंत पाटील आदी राज्यातील पंधरा बड्या नेत्यांची सुरक्षा काढून घेतली यावर त्यांना छेडले असता त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ५० खोक्यांच्या आरोपावरून आमदार बच्चू कडू आणि रवी राणा या सत्ताधारी घटक पक्षातील दोन नेत्यांमधील वाद चांगलाच विकोपाला गेला आहे. या वादात आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार आहेत. त्यासाठी त्यांनी या दोन्ही आमदारांना मुंबईत दुपारी तीन वाजता बोलावून घेतले आहे. मुख्यमंत्री शिंदे या दोन नेत्यांमधील वादात नेमका काय तोडगा काढतात याकडे आता राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेतील मोठ्या बंडखोरी नंतर प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू हे देखील शिंदे गटासोबत गुवाहाटीमध्ये होते. यावेळी आमदार फोडाफोडीत मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल झाल्याची चर्चा राज्यात सर्वत्र असताना भाजपाशी सलगी असलेले आमदार रवी राणा यांनी देखील बच्चू…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आमच्या पक्षाचे राजकुमार पटेल हे सर्वप्रथम गुवाहाटीला गेले होते. त्यांच्या पाठोपाठ मी गेलो. तेथे मी शिंदे गटासोबत आहे एवढे त्यांच्याशी बोलून परत यायचं होतं, असे ठरले होते. खरंतर मला तिथे थांबायचं नव्हतं. पण ती वेळच तशी होती की, आलेला माणूस जाऊ द्यायचा नाही. राजकारणात ते करावं लागतं, त्यात काही चुकीचं नाही, असे आमदार बच्चू कडू यांनी सांगितले. आमदार कडू एका वृत्तवाहिनीशी बोलत होते. कडू यांच्या या विधानामुळे महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळे वळण लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्याबद्दल मला आजही आस्था आहे आणि ती कायम राहील, उद्धव ठाकरे ‘मातोश्री’वर जितके मजबूत आणि शोभून दिसायचे तितके…
रविवार विशेष : प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत.) “ राज्याच्या राजकारणात कटुता आल्याची जाहीर कबुली देत राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत:च आत्मपरीक्षणाची जागा निर्माण केली आहे. त्यांनी स्वत:च हे जाहीरपणे मान्य केलं हे बरं झालं. कारण राज्यात राजकीय कटूता निर्माण करण्यात त्यांचाच हात होता, हे साऱ्या महाराष्ट्राने पाहिलं आहे. संसदीय राजकारणात देशात प्रगल्भ मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासात इतक्या टोकाचा कडवटपणा आजवर कोणी पाहिला नाही. दाद मागण्याच्या व्यासपीठावर एकमेकांवर टीका करणारे त्या व्यासपीठावरून खाली आले की मागचं सारं विसरून जायचे. कारण त्यांच्या टीकाटिपण्णीत स्वार्थ आणि मतलबीपणा नसायचा. केवळ राज्याचं भलं चिंतण्याचीच त्यामागे तळमळ असायची.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क वाळू तस्करी करणारा डंपर पकडल्यानंतर त्याची माहिती मिळूनदेखील कारवाई न करता उलट तस्करांबरोबर संधान साधणाऱ्या धांदरफळचे तलाठी मुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी जनसेवा समता युवक संघटनेचे अध्यक्ष साहेबराव वलवे यांनी करताच प्रांताधिकाऱ्यांनी तातडीने वलवे यांच्या तक्रारीची दखल घेत तहसीलदार अमोल निकम यांना तलाठी मुळे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे यांना यासंदर्भात वलवे यांनी शुक्रवारी एक निवेदन दिले असून त्यात त्यांनी म्हटले की, वलवे गुरुवारी सायंकाळी त्यांच्या गावी जात होते. यावेळी ६ वाजून ४० मिनीटांनी त्यांना भोकनळ वस्तीपासून धांदरफळकडे वाळू तस्करी करणारा एक डंपर जातांना दिसला. त्यांनी याची माहिती प्रांताधिकारी डॉ.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क किरकोळ भांडणातून सराईत गुन्हेगाराचा खून करण्यात आल्याचा प्रकार नासिकमध्ये समोर आला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच जामीनावर हा आरोपी नाशिक मध्यवर्ती कारागृहातून बाहेर आला होता. अक्षय उत्तम जाधव असे होऊन झालेल्या गुन्हेगाराचे नाव आहे. शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या दरम्यान अंबड परिसरातील महालक्ष्मी नगरमध्ये किरकोळ भांडणातून हा प्रकार घडल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमध्ये नाशिक पोलिसांनी तन्मय मनोज गोसावी आणि आकाश अनिल साळुंखे या दोघा संशयतांना सापळा रचून अटक केली आहे. तर मृत अक्षय उत्तम जाधव याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यांमध्ये खून, शासकीय नोकऱ्यांवर हल्ला, जबरी चोरी, घरफोडी, चोरी यांसारखे १५ गुन्हे दाखल आहे. त्याच्यावर अंबड…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मोठा गाजावाजा केलेल्या सर्वात मोठ्या पोलीस भरतीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. १ नोव्हेंबरपासून या बहुचर्चित पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार होती. त्याशिवाय राज्य राखीव दलातील (एसआरपीएफ) पोलीस शिपाई भरतीही पुढे ढकलण्यात आली आहे. राज्यभरात तब्बल १४९५६ पदांसाठी ही भरती होणार होती. आता या भरतीबाबत पुढील आठवड्यात निर्णय घेण्यात येणार आहे. तात्पुरत्या स्वरूपात ही भरती थांबविण्यात आली असली तरी ती निश्चित केव्हा होणार याबाबत अनिश्चितता आहे. भरती संदर्भातील निर्णय सरकार पुढील आठवड्यात घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या कार्यकाळात मागील तीन वर्षांमध्ये पोलीस भरती झाली नव्हती. त्यामुळे अनेक इच्छुक तरुणांची…
