Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिकमधील सुश्रुत हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. प्राची पवार यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे कारण फरार हल्लेखोरांना पकडल्यानंतर समोर आले आहे. प्राथमिक चौकशीत कोवीड काळात झालेल्या आत्याच्या मृत्युचा राग मनात धरून हा हल्ला केल्याच हल्लेखोरांनी सांगितल्याची माहिती ग्रामीण पोलीस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिली. राष्ट्रवादीच्या नेत्या असलेल्या डॉ. प्राची पवार ह्या नाशिकचे राष्ट्रवादीचे दिवंगत नेते डॉ. वसंत पवार आणि मविप्र संस्थेच्या माजी सरचिटणीस श्रीमती नीलिमा पवार यांच्या कन्या आहेत. डॉ. प्राची पवार यांच्यावर १३ डिसेंबर रोजी गोवर्धन शिवारात जीवघेणा हल्ला झाला होता. पवार यांच्यावर कोणी आणि कशासाठी हल्ला केला याचा उलगडा होत नव्हता. अखेर बुधवारी रात्री नाशिक ग्रामीण पोलिसांना हल्लेखोरांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेर येथील देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले यांची उपाध्यक्षपदी अक्षय भागवत यांची, श्री चौंडेश्वरी महिला मंडळाच्या अध्यक्षपदी दिपाली खोजे, उपाध्यक्षपदी संगीता भंडारे यांची निवड करण्यात आली. संगमनेर येथील मेनरोडवर असलेल्या देवांग कोष्टी समाजाचे चौंडेश्वरी देवीचे मंदिरामध्ये कोष्टी समाजाची युवक समितीची नूतन कार्यकारिणी निवडीसाठी नुकतीच बैठक पार पडली. यावेळी देवांग कोष्टी समाज पदाधिकारी यांनी युवक व महिला यांची एक समिती नेमण्यात यावी यासाठी प्रयत्न केले. त्यांनतर ही समिती नेमण्यात आली आहे. यामध्ये देवांग कोष्टी समाजाच्या युवक अध्यक्षपदी विशाल भारत ढोले, उपाध्यक्षपदी अक्षय भागवत, कार्याध्यक्षपदी आलेख कुदळ, खजिनदारपदी स्वप्नील खोजे, सचिवपदी अजित बडदे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राज्यात मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. यामुळे गुणवत्तेवर याचा मोठा परिणाम होत असल्याने जिल्हा परिषद मधील प्राथमिक शिक्षकांच्या जागा तातडीने भरजे गरजेचे असून सरकारने शिक्षकांच्या सर्व जागांसाठी तातडीने भरती करावी, अशी आग्रही मागणी विधान परिषदेतील काँग्रेस पक्षाचे गटनेते व नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. त्याचबरोबर शिक्षण क्षेत्रासह विविध मागण्याही त्यांनी आग्रहपूर्वक मांडल्या आहेत. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात तारांकित प्रश्नाद्वारे आमदार डॉ. तांबे मागणी करताना म्हणाले की, राज्यात आज मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. जिल्हा परिषद शाळेमध्ये या रिक्त असलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या जागा त्वरित भरणे आवश्यक आहेत. हजारो…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : रस्त्यावर दुकान टाकून बॅग विकण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाची परिणती थेट चाँपरचा वापर करत हल्ल्यापर्यंत जाऊन पोहोचली. यात एक जण जखमी झाल्याने शहर पोलीस ठाण्यात दहा ते अकरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  उमेर मेहबूब पारवे असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर निखिल मुर्तडक, श्याम अरगडे, नयन मुर्तडक, सुनील धात्रक, सागर (पूर्ण नाव माहित नाही) यांच्यासह आणखी पाच ते सहा जणांचा आरोपीमध्ये समावेश आहे. शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात जखमी युवकाच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे. बुधवारी सायंकाळी फिर्यादीचा मुलगा आणि आरोपींमध्ये बॅग विकण्याच्या कारणावरून वाद झाला होता. फिर्यादीचा मुलगा व त्याचे मित्र रात्री…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय योगासन क्रीडा स्पर्धेच्या दुसर्‍या दिवस अखेर महाराष्ट्र संघाने चमकदार कामगिरी करून उपांत्य फेरीत भक्कम आघाडी घेतली आहे. २७ डिसेंबर पासून ध्रुव ग्लोबल स्कुलच्या क्रीडा संकुलात तिसरी राष्ट्रीय योगासन स्पर्धा सुरू आहे. देशातील २९ राज्यातील ७८९ योगासनपटू या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. महाराष्ट्राला प्रथमच राष्ट्रीयस्तरावरील योगासन स्पर्धा आयोजित करण्याची संधी या निमित्ताने मिळाली आहे. महाराष्ट्र संघातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केल्याने उपांत्य फेरीत जोरदार आघाडी घेतली आहे. महाराष्ट्राच्या खालोखाल असणार्‍या तामिळनाडू, पश्चिम बंगाल, आसाम, हरयाणा, कर्नाटक इत्यादी राज्यांच्या खेळाडूंमध्ये अंतिम फेरीमध्ये चुरस पाहायला मिळणार आहे. योगासनांचे पारंपरिक (ट्रॅडिशनल) सादरीकरण, त्याचप्रमाणे संगीतमय कलात्मक (आर्टिस्टिक) सादरीकरण, तालात्मक…

Read More

अवैध ठिकाणी मद्यप्राशन कराल तर होईल कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : सरत्या वर्षाला निरोप आणि नवीन वर्षाचे स्वागत मोठया उत्साहाने केले जाते. या कालावधीमध्ये अवैध, परराज्यातील, बनावट मद्यविक्रीची शक्यता लक्षात घेता ते रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत नियोजन करण्यात आलेले असून या अवैध मद्य विक्री, वाहतूक तसेच अवैध ठिकाणी मद्य प्राशन करणाऱ्या व्यक्तींवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक गणेश पाटील यांनी दिली. राज्य उत्पादन शुल्क विभागाने कार्यकारी अधिकारी व भरारी पथके तसेच अकार्यकारी घटकावरील काही अधिकारी यांची आठ विशेष पथके जिल्हयात नेमली असून त्यांच्या कार्यक्षेत्रात सातत्याने रात्रगस्त घालण्यात येणार आहे. या पथकाद्वारे रात्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदवीधर, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, शासकीय व निमशासकीय, अशासकीय कर्मचारी, यांच्या विविध प्रश्नांसाठी विधानपरिषदेत सातत्याने पाठपुरावा करणारे, ‘नेता नव्हे मित्र’ अशी ओळख असलेले नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांची विधानपरिषदेच्या काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या गटनेतेपदी निवड झाली आहे. आमदार डॉ. तांबे यांनी बी. जे. मेडिकल सारख्या देशातील नावाजलेल्या महाविद्यालयातून एम. एस. शिक्षण घेतल्यानंतर संगमनेरमध्ये चार दशके गोरगरिबांना आरोग्य सेवा दिली. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्याचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरच्या सहकार, शिक्षण, समाजकारण, कृषी अशा विविध क्षेत्रात मोलाचे योगदान देताना आदिवासी, अपंग व मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी मोठे काम केले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : पोस्टर फाडण्याचा राग मनात धरून राजकीय वर्चस्व वादातून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते योगेश राळेभात व राकेश राळेभात या दोघा तरुणांची गोळ्या घालून हत्या केल्याप्रकरणी आरोपी गोविंद दत्तात्रय गायकवाड याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली तर उर्वरित 13 आरोपींची या खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. योगेश राळेभात व राकेश राळेभात यांची साडेचार वर्षांपूर्वी २८ एप्रिल २०१८ रोजी सायंकाळच्या वेळी बीड रस्त्यावर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारा समोर एका हॉटेलमध्ये चहा पीत असताना या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. यामुळे नगर जिल्ह्यात खळबळ उडाली होती. राजकीय वर्चस्ववादातून झालेल्या या दुहेरी हत्याकांड प्रकरणी तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सुदर्शन मुंडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनंत पांगारकर संगमनेर : म्हाळुंगी नदीला आलेल्या पुरानंतर स्वामी समर्थ मंदिर ते साईबाबा मंदिर, गंगामाई घाटाकडे जाणारा पूल खचल्याने तब्बल अडीच महिन्याच्या कालावधीनंतर देखील त्याची दुरुस्ती प्रशासनाला करता आलेली नाही. त्यामुळे शालेय विद्यार्थ्यांना या पुलावरून जीवघेणी कसरत करावी लागत आहे. पुलावरील शॉर्टकट प्रशासनाच्या अकार्यक्षमतेमुळे धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. या धोकादायक शॉर्टकटचा व्हिडिओ येथील नागरिकांनी महाराष्ट्र संवाद न्यूजला पाठवला आहे. यावर्षी म्हाळुंगी नदी वारंवार आणि दीर्घकाळ प्रवाही राहिली आहे. त्यातच झालेल्या पावसामुळे नदीला पूर आल्याने नदीवरील घोडेकर मळ्याकडे जाणारा कच्चा फुल वाहून गेला. मात्र या लगतच असलेला साई मंदिर, पंपिंग स्टेशन, गंगामाई घाट, घोडेकर मळा, वेताळेश्वर महादेव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क  संगमनेर : संगमनेर साहित्य परिषद आणि पिंपरणे येथील परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत १० तालुक्यातील ७३ विद्यालयामधील २४६ स्पर्धकांच्या सहभागामुळे या स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळाला. स्पर्धेचे हे बारावे वर्ष होते. परमपूज्य गगनगिरी महाराज विद्यालय संस्थेचे अध्यक्ष बापूसाहेब देशमुख आणि संगमनेर साहित्य परिषदेचे अध्यक्ष अरविंद गाडेकर यांच्या उपस्थितीत केलेल्या दीप प्रज्वलनाने स्पर्धेची सुरुवात झाली. यावेळी माजी प्राचार्य ज्ञानेश्वर गोंटे, डॉ. जी. पी. शेख, डॉ. हनुमंत मोटेगावकर, प्रा. शशांक गंधे, नंदकुमार बेल्हेकर, प्रकल्प सचिव कैलास काळे, सुरेश ठोंबरे, माजी गटशिक्षणाधिकारी सुभाष पवार, प्राचार्य मुकुंद डांगे, स्वाती देशमुख, प्रकल्पप्रमुख बाळकृष्ण महाजन, विभागप्रमुख ललित शेळके…

Read More