Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : पदव्युत्तर परीक्षेमध्ये विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिली जाणारी तीन सुवर्णपदके एकाचवेळी मिळवत संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी गोपाल सानप याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहासात नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे. सानप याच्या यशामुळे संगमनेर महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वतीने दरवर्षी पदव्युत्तर परीक्षेत विशेष प्राविण्य मिळविणाऱ्या विद्यार्थ्यास दिले जाणारे कै. प्रमिला दत्तात्रय आलेगावकर सुवर्णपदक, जेष्ठ समीक्षक म. ना. अदवंत स्मृती सुवर्णपदक आणि नामदेव श्रीपती रानवडे स्मृती सुवर्णपदक एकाच वेळी सानप या विद्यार्थ्याने मिळविले आहे. सानप संगमनेर महाविद्यालयातील मराठी विभागाचा विद्यार्थी असून महाविद्यालयाच्या मराठी संशोधन केंद्रामध्ये प्रा. डॉ. अशोक लिंबेकर यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर / दौंड : पुणे जिल्ह्यात दौंड तालुक्यातील वाहणाऱ्या भीमा नदीमध्ये तीन लहान मुलांसह सात जणांचे मृतदेह सापडले आहे. एकाच कुटुंबातील सात जणांचे मृतदेह नदीत आढळल्याने पुणे आणि नगर जिल्ह्यासह राज्यभरात खळबळ उडाली आहे. प्रेम प्रकरणातून बदनामीच्या भीतीने या सर्वांनी आयुष्य संपविल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. मंगळवारी भीमा नदी पात्रात तीन लहान मुलांचे मृतदेह आढळले. तत्पूर्वी नदीपात्रात चार मृतदेह आढळले होते. एकाच वेळी सात मृतदेह आढळून आल्याने तपास यंत्रणा चक्रावून गेली होती. पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास सुरू आहे. मोहन उत्तम पवार (वय-४५), संगीता उर्फ शहाबाई मोहन पवार (वय-४० दोघेही रा. खामगाव…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर : नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी करणाऱ्या सत्यजित तांबे यांनी काँग्रेसने विश्वासाने दिलेला एबी फॉर्म गद्दारी करत खिशात घातला. आधी त्यांनी काँग्रेसला मामा बनविले, आता ते मतांसाठी सुशिक्षित पदवीधरांना मामा बनवत आहे. त्यांच्या रक्तात, श्वासात काँग्रेस नसून फक्त सत्ता असल्याचा गंभीर आरोप शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी केला आहे. सत्यजित तांबे यांच्या बंडखोरीनंतर महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये या संदर्भात महत्वपूर्ण बैठक आणि मेळावा झाला. या पार्श्वभूमीवर शहरामध्ये पदवीधर मतदारांच्या संवाद कार्यक्रमात काळे यांनी तांबे यांच्यावर टीका केली. पदवीधरांशी झालेल्या संवादानंतर जिल्ह्यात प्रचाराचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : सासू आणि नवऱ्याच्या छळाला कंटाळात संगमनेर तालुक्यातील खांबे येथील एका 25 वर्षीय विवाहितेने गळफास घेत आपले जीवन संपविण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी आश्वी पोलीस ठाण्यात विवाहितेचा पती आणि सासूच्या विरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला पोलिसांनी अटक केली आहे. काजल मच्छिंद्र वाघ असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी विवाहितेचे नाव असून तिचा विवाह संगमनेर तालुक्यातील खांबे येथील मच्छिंद्र बाळासाहेब वाघ यांच्याबरोबर 13 मार्च 2018 रोजी झाला होता. विवाह नंतरचे सुरुवातीचे चार-पाच महिने उभयंतांचा संसार चांगल्या पद्धतीने सुरू होता. नंतर मात्र त्यांच्यात कौटुंबिक कलह सुरू झाले. लग्न संबंधातून या दांपत्याला मुलगी झाली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : राष्ट्रीय स्थायी विकास संस्थेच्या वतीने दहा शाळांना शालेय क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथील देवगड विद्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. क्रीडा साहित्य वाटप कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती एस. जी. फटांगरे होत्या. जनता शिक्षण मंडळाचे उपाध्यक्ष रामदास राहणे, खजिनदार विठ्ठल कढणे, सह सेक्रेटरी अशोकराव राहाणे, देवगड विद्यालयाचे मुख्याध्यापक रमेश पावसे, सुभाष गडाख, सुजाता दवंगे, बजरंग पावसे, किरण पावसे, हरीश गडाख आदि यावेळी उपस्थित होते. स्थायी विकास संस्थेच्या वतीने वाटप करण्यात आलेल्या खेळाच्या साहित्यामध्ये क्रिकेट किट, झांज, ढोल, लेझीम, बॅडमिंटन किट, हॉलीबॉल किट, कॅरम बोर्ड अशा 19…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी देवेंद्र महाराजांना त्यांच्यातील दिव्यशक्ती सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर चर्चेत आलेल्या धीरेंद्र महाराजांबद्दल प्रसिद्ध लेखक, कवी हेरंब कुलकर्णी यांनी समाज माध्यमात केलेली पोस्ट चर्चेत आली आहे. मध्य प्रदेशातील बागेश्वर धाम सरकार हे नाव सध्या देशभरात प्रसिद्ध झाल आहे. चर्चेत आलेले बागेश्वर महाराज लोकांच्या मनात काय चाललंय, हे अचूक ओळखतात. असा दावा केला जातोय. या बागेश्वर सरकारांच्या दरबारात एकदा हजेरी लावली तर नशीब पालटत अशी श्रद्धा सध्या लोकांच्या मनात आहे. हे महाराज लोकांच्या समस्या त्यांच्या चेहऱ्याकडे पाहून जाणतात. तसेच एका कागदावर त्या व्यक्तीला भेडसावत असलेल्या समस्येचे उत्तर लिहून देतात, अशी धारणा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोलकत्ता : भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने पत्नी हसीन जहाँला दरमहा एक लाख तीस हजार रुपये पोटगी देण्याचे आदेश कोलकत्ता न्यायालयाने दिले आहेत. मोहम्मद शमी याची पत्नी हसीन जहाँ हिने २०१८ मध्ये न्यायालयात केस दाखल करत पती मोहम्मद शमी यांच्याकडून स्वतःसाठी व मुलीच्या देखभालीसाठी पोटगीची मागणी केली होती. दरम्यान, मोहम्मद शामीचे वार्षिक वेतन हे २०२०-२१ मध्ये जास्त होते. त्यानुसार दरमहा दहा लाख रुपये पोटगीची मागणी करण्यात आली, अशी माहिती हसीनच्या वकील मृगांका मिस्त्री यांनी न्यायालयाला दिली. शमीचे या काळात वार्षिक उत्पन्न तब्बल ७ कोटी रुपयांपेक्षा जास्त होते. याप्रकरणी मोहम्मद शामीचे वकील सेलिम रहमान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अल्पवयीन भाचीला आमिष दाखवून अज्ञात कारणासाठी पळवून नेणाऱ्या मामाची संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने त्यांच्यावरील सर्व आरोपातून निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायाधीश यो. प्र. मनाठकर यांच्या न्यायालयाने सोमवारी हा निवाडा केला. संगमनेर शहरातील पंधरा वर्षीय मुलीस तिच्या मामाने लग्नाचे आमिष दाखवून तिला फूस लावून अज्ञात कारणासाठी पळवून नेल्याची आणि त्यासाठी आणखी एका आरोपीने मदत केल्याची तक्रार मुलीच्या आईने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात १६ मे २०१९ रोजी केली होती. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून कृष्णा विष्णू दिवे आणि किरण शिंदे या दोघांविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण करणे, लग्नाचे अमिष दाखविणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. शहर पोलीस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : संगमनेरमध्ये ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पक्षाने सोमवारी सकाळी बसस्थानक चौकात शिवसेनाप्रमुख, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार सदाशिव लोखंडे व जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात ठाकरे यांची मोठे प्रतिमा लावण्यात आली होती. शिवसेनेमध्ये झालेल्या ऐतिहासिक बंडानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वत्र शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्येही मोठ्या उत्साहात ही जयंती साजरी करण्यात आली. यावेळी बोलताना तालुकाप्रमुख रमेश काळे म्हणाले, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून तसेच शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि जिल्हाप्रमुख राजेंद्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर : शिवसेनेची अस्मिता असलेल्या हिंदू हृदय सम्राट, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवसैनिक पदाधिकाऱ्यांनी अभिवादन केले. बस स्थानक चौकात झालेल्या या अभिवादन सभेसाठी शिवसैनिकांसह अंगीकृत संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी यावेळी ठाकरे यांना अभिवादन केले. यावेळी ठाकरे यांच्या जय जयकाराच्या घोषणांनी हा परिसर दणाणून गेला होता. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हास्तरीय नेते मुजीब शेख, शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब हासे, महिला आघाडी तालुकाप्रमुख शितल हासे, आशा केदारी, सुरेखा गुंजाळ, संगीता गायकवाड, युवा सेना जिल्हाप्रमुख अमित चव्हाण, युवा सेना शहर प्रमुख अमोल डुकरे, अक्षय बिल्लाडे, अक्षय…

Read More