Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क मुंबई महापुरुषांवरील सातत्याने केलेली टीका आणि विरोधकांच्या कायमच निशाण्यावर राहिलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राजीनामा राष्ट्रपतींनी मंजूर केला असून महाराष्ट्राला आता रमेश बैस यांच्या रूपाने नवे राज्यपाल लाभले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोश्यारी यांचा राजीनामा मंजूर करताना बैस यांच्यासह देशभरात तेरा राज्यात राज्यपालांच्या नियुक्त्या केल्या आहेत. याबाबतची माहिती राष्ट्रपती भवनाकडून देण्यात आली आहे. बैस यांनी यापूर्वी झारखंडचे राज्यपाल म्हणून काम बघितले आहे. ते महाराष्ट्राचे २० वे राज्यपाल असतील. राज्यपाल कोश्यारी यांनी वारंवार महापुरुषांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केलं होतं. त्यानंतर महाराष्ट्रात त्यांच्याविरोधात मोठं रान उठलं होतं. राज्यपालांना तातडीने पदावरून दूर करा, अशी मागणी विरोधकांनी लावून…
लेखक दैनिक आपलं महानगर चे माजी निवासी संपादक आहेत रविवार विशेष | प्रवीण पुरो गौतम अदानींच्या संपत्तीचा मामला आता प्रत्येकाचं घर घेरणारा ठरू लागला आहे. मी बुडेन पण तुम्हाला घेऊनच, या तयारीने अदानींच्या साम्राज्याला हादरे बसू लागले आहेत. जितक्या जलद वर जावं तितक्याच जलद गतीने खाली येण्याची क्रिया ही नैसर्गिक आहे. म्हणूनच अशियात श्रीमंती गाठण्यासाठी धिरुभाई अंबानींना 60 वर्षांचा काळ कामी घालावा लागला. 2014 मध्ये ज्या व्यक्तीची श्रीमंती जगात 120 क्रमांकावर होती ते मोदी सत्तेच्या आठ वर्षात दुसर्या क्रमांकावर पोहोचत असेल तर संशयाला बाधा उत्पन्न होणारच. अदानींच्या या श्रीमंतीचं राज काय, असा प्रश्न कोणी विचारला आणि पंतप्रधान तोंडाचा चंबू करून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पारनेर अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष, जी एस महानगर बँकेचे अध्यक्ष एडिशनल उदय गुलाबराव शेळके (वय ४५ वर्ष) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने शनिवारी निधन झाले. शेळके यांच्या रूपाने सहकार क्षेत्रातील एक दिग्गज व्यक्तिमत्त्व हरपले आहे. शेळके यांना काही दिवसांपूर्वी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांच्यावर पुणे येथील रुग्णालयात उपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी नेण्यात आले होते. त्यातच त्यांना ब्रेन स्ट्रोकचा झटका आल्याने शेळके यांच्यावर मुंबईचा लीलावती रुग्णालयात उपचार सुरू होते. गेल्या पाच महिन्यापासून ते बेशुद्ध अवस्थेत होते. शनिवारी रुग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पारनेर तालुक्यातील जलसेन पिंपरी येथील रहिवासी असलेले शेळके सहकारातील दिग्गज नेते म्हणून ओळखले…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर श्रीमंतीपेक्षा दातृत्वाचा ठेवा सर्वाधिक महत्त्वाचा असून या दातृत्वाने कडलग परिवाराने नावलौकिक प्राप्त केला आहे, असे प्रतिपादन पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे यांनी केले. इनरव्हील क्लबच्या संकल्पनेतून सुनील कडलग व वृषाली कडलग यांनी आपल्या मातोश्री स्व. शकुंतला किसनराव कडलग यांच्या स्मरणार्थ जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रामवाडी या शाळेला दिलेल्या डिजिटल सॉफ्टवेअर उद्घाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. मान्यवरांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना चित्रकला वही, रंगपेटी व गोष्टींची पुस्तके बक्षीस म्हणून देण्यात आली. फटांगरे म्हणाल्या, या डिजिटल सॉफ्टवेअरमुळे रामवाडीच्या विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावणार आहेत. दुर्गम शाळेतील विद्यार्थी डिजिटल सॉफ्टवेअरमुळे आपल्या अभ्यासात नक्कीच प्रगती करतील. कडलग परिवार व इनरव्हील क्लब…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर संगमनेर शहर व तालुका परिसरात सुरू असलेले अवैध धंदे बंद करावेत, या मागणी संदर्भात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांना निवेदन देण्यात आले. संगमनेर शहर व तालुका परिसरात अवैध धंदे, जुगार, मटका, वाळू तस्करी व अवैध गुटखा, बनावट दारू विक्री असे सर्वच प्रकारचे विविध अवैध व्यवसाय सर्रासपणे दिवसा-ढवळ्या सुरू आहे. सदर अवैध व्यवसायांमुळे अनेक गोरगरिबांची घरे उध्वस्त झालेली आहेत. तरी हे व्यवसाय २० फेब्रुवारीपर्यंत पूर्णपणे बंद न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोणत्याही वेळी रस्त्यावर उतरून लोकहितासाठी आंदोलन करील असा इशारा निवेदनाद्वारे मनसे शहर उपाध्यक्ष अभिजीत घाडगे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रतिनिधी संगमनेर तालुका मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने राजापूरचे (कोकण) पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या हत्येच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदारांनी पत्रकारांचे निवेदन स्वीकारले. राज्यभरात पत्रकारांवर सुरू असणाऱ्या हल्लेखोरांवर कठोर कारवाई करावी, मयत शशिकांत वारीशे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यात यावी व हा खटला जलद गती न्यायालयात चालवावा अन्यथा परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख सर व सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली यापुढील काळात तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. यावेळी अध्यक्ष शेखर पानसरे तसेच आनंद गायकवाड, गोरक्ष नेहे, संदीप इटप, श्याम तिवारी, निलिमा घाडगे, गोरक्ष मदने, सचिन जंत्रे, अमोल मतकर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर दिवंगत उद्योगपती माधवलाल मालपाणी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ येत्या रविवारी (ता. १२) लायन्स क्लब ऑफ संगमनेर सफायरच्यावतीने संगमनेरात मॅरेथॉन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होवून विजेत्या ठरणार्या स्पर्धकांना मालपाणी उद्योग समूहाच्या वतीने रोख बक्षिसे व सन्मान चिन्ह दिले जाणार आहे. स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे असे आवाहन सफायरचे अध्यक्ष उमेश कासट यांनी केले आहे. येत्या रविवारी 12 फेब्रुवारी रोजी सकाळी 7 वाजता मालपाणी लॉन्स येथून स्पर्धेला सुरुवात होणार आहे. स्पर्धेसाठी इयत्ता पाचवी ते आठवी आणि नववी ते बारावी असे मुला-मुलींचे वेगळे गट करण्यात आले आहेत. त्यापुढील वयाच्या स्पर्धकांसाठी खुला गट ठेवण्यात आला आहे.…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कॉम्प्युटर सायन्सच्या तिसर्या वर्षात शिक्षण घेणार्या अकोले येथील मूळ रहिवासी असलेल्या संकेत सुरेश नवले या विद्यार्थ्याच्या रहस्यमय खुनाच्या तपासात पोलिसांना यश आले असून याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या एका आरोपीला १३ फेब्रुवारीपर्यंत तर दुसऱ्या आरोपीला १४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र भोसले यांनी दिली असून संकेत नवले याचा खून करण्याचे कारण मात्र सांगण्यास त्यांनी स्पष्टपणे नकार दिला आहे. तर या प्रकरणी पोलिसांचा अजून एका तिसऱ्या आरोपीवर संशय असल्याची माहिती मिळाली आहे. हा तिसरा आरोपी या खुनामागील मास्टरमाईंड आहे की अन्य कोणी याबाबत…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पोलिसांच्या ११२ क्रमांकावरील फोन खणाणला. आणि समोरिल व्यक्तीने पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे असे सांगितले आणि फोन बंद केला. खुनासारखी गंभीर बाब असल्याने पोलिसांनी तात्काळ दखल घेत घटनास्थळी पोलीस पथक पाठविले. पोलीस घटनास्थळी गेले आणि वेगळीच बाब समोर आली. फोन करणारी व्यक्ती तडीपार इसम निघाल्याने पोलिसांनी तात्काळ त्याला ताब्यात घेतले. संगमनेर तालुक्यातील आश्वी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला आहे. रविवारी आश्वी टाऊन बीटचे काम बघणारे पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण रणधीर यांना ११२ क्रमांकावर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास एक फोन आला. फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीने हॅलो म्हणताच पोलीस मदत पाठवा, मी खुन करणार आहे. असे…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिर्डीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवत अकरा बेरोजगारांना प्रत्येकी पाच लाख रुपये गंडा घालणारी टोळी शिर्डी पोलिसांनी पकडली आहे. यात एका छायाचित्रकाराचा देखील समावेश आहे. शिर्डी विमानतळावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेरोजगारांना बनावट नियुक्तीपत्र देऊन फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. अकरा बेरोजगारांकडून आरोपींनी आत्तापर्यंत पंचावन्न लाख रुपये उकळले असल्याचे समोर आले आहे. १४ सप्टेंबरला बीड येथील चंद्रकांत विठ्ठलराव जाधवराव यांनी यासंदर्भात शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यात जाधवराव यांनी म्हटले की माझ्या मुलाचं एकूण अकरा मुलांकडून प्रत्येकी पाच लाख रुपये घेऊन शिर्डी विमानतळावर मोठ्या पगाराची नोकरी लावून देण्याचे आश्वासन दिले…
