Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्येष्ठ साहित्यिक, लेखक प्रा. रंगनाथ पठारे यांना अमेरिकेतील महाराष्ट्र फाउंडेशनचा ‘साहित्य जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. फाउंडेशनच्यावतीने या वर्षीच्या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. साहित्यातील सहा, समाजकार्यातील चार आणि नरेंद्र दाभोळकर स्मृती पुरस्कारांचा यात समावेश आहे. प्रा. रंगनाथ पठारे यांना दोन लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘साहित्य जीवन गौरव पुरस्कार’, राजन गवस यांना एक लाख रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला ‘कथा आणि कादंबरीसाठी’, सोनाली नवांगुळ यांना एक लाख रुपये आणि स्मृतीचिन्हाचा समावेश असलेला ‘विशेष पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. याशिवाय अनिल साबळे यांना पन्नास हजार रुपये आणि स्मृतिचिन्हाचा समावेश असलेला पिवळा पिवळा पाचोरा कथासंग्रहासाठी ‘ग्रंथ पुरस्कार’ भुरा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांनी सोमवारी शपथ घेतली. पटेल यांच्यासह त्यांच्या नव्या मंत्रिमंडळात 16 नव्या मंत्र्यांना शपथ देण्यात आली आहे. पटेल गुजरातचे अठरावे मुख्यमंत्री आहेत. गांधीनगर सचिवालयाच्या हेलिपॅड मैदानावर सोमवारी दुपारी दोन वाजता राज्यपालांनी या सर्वांना पदाची शपथ दिली. पटेल यांच्या नव्या सरकारमध्ये आठ कॅबिनेट दोन स्वतंत्र प्रभार आणि सहा राज्यमंत्री असतील. पटेल यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या पाठोपाठ 16 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह भाजपशासित राज्याचे मुख्यमंत्री शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित होते. महाराष्ट्रातूनही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. याशिवाय देशभरातील भारतीय जनता पार्टीचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दोन महिन्याच्या कालावधीतच राज्याच्या आरोग्य आयुक्त पदावरून तुकाराम मुंढे यांची अनपेक्षितरित्या बदली करण्यात आली. बदलीनंतर त्यांना अद्यापही नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आलेले नाही. मुंढे यांनी अल्पशा काळातच आरोग्य व्यवस्था सुधारण्यासाठी पाऊले टाकली. राज्याच्या जनतेच्या माफक आणि सुदृढ आरोग्यासाठी मुंढे यांची पुन्हा त्याच पदावर नियुक्ती करण्यात यावी, या मागणीसाठी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे प्रणित भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलनाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी कार्यालयाबाहेर सोमवारी घंटानाद आंदोलन केले आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तुकाराम मुंढे यांना आरोग्य खात्यात आयुक्तपदाची जबाबदारी दिली. मात्र अवघ्या दोन महिन्यातच त्यांची पुन्हा तेथून बदली करण्यात आली. तसेच नवीन नियुक्ती अद्याप देण्यात आली नाही.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयान दिलासा दिला आहे. सीबीआयनं दाखल केलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अखेर त्यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर देशमुख यांचा जामीन मंजूर झाला असल्याने तब्बल तेरा महिन्याच्या कालावधीनंतर देशमुख यांचा तुरुंगाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सीबीआयच्या सत्र न्यायालयानं अनिल देशमुख यांचा जामीन फेटाळला होता. त्याला देशमुख यांच्यावतीने उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं होतं. न्यायालयासमोर याप्रकरणाची सुनावणी पूर्ण झाली होती आणि न्यायालयाने सोमवारपर्यंत या संदर्भातील निकाल राखून ठेवला होता. सोमवारी न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी निकाल देताना अनिल देशमुख यांना जामीन मंजूर केला आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरात विधानसभा निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. त्यामुळे भूपेंद्र पटेल यांची मुख्यमंत्रीपदी निवड निश्चित झाली असून सोमवारी ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. नुकतीच गुजरात विधानसभेची निवडणुक पार पडली आहे. या निवडणूकीमध्ये भाजपाने 156 जागा जिंकून ऐतिहासिक विजय मिळवला आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्षाला या निवडणुकीत यश मिळू शकले नाही. गतवेळच्या तुलनेत काँग्रेसची या राज्यात मोठी पीछेहाट झाली आहे. भारतीय जनता पार्टीने सातव्यांदा गुजरात आपल्याकडे राखले. भूपेंद्र पटेल हे आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. भूपेंद्र पटेल यांचा आज शपथविधी सोहळा गांधीनगरमध्ये पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याची तयारी पूर्ण झाली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर निळवंडेच्या बंद पडलेल्या कामासाठी मोठा निधी मिळविला. कामाला गती देत ऑक्टोंबर २०२२ पर्यंत कालव्याद्वारे पाणी देण्याचे नियोजन होते. मात्र जूनमध्ये राज्यात सत्तांतर झाले आणि निळवंडे धरणाचे काम पुन्हा बंद पडले. कालव्याची कामे बंद पाडणे म्हणजे दुष्काळग्रस्तांच्या अन्नामध्ये माती कालविण्यासारखे आहे, असे प्रतिपादन माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीनंतर माजी मंत्री थोरात यांच्या हस्ते नव्या पदाधिकाऱ्यांचा सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात बोलत होते. आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे माधवराव कानवडे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दूध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नागपूरच्या मुख्य सोहळ्याचे शिर्डी इंटरचेंज येथे थेट दृकश्राव्य प्रक्षेपण करण्यात आले. नागरिकांचा या कार्यक्रमाला मिळालेला प्रतिसाद म्हणजे जनतेच्या मनाला जोडणारा हा विकासाचा महामार्ग असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले. हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर ते शिर्डी या पहिल्या टप्प्याच्या वाहतूक व दळणवळण सेवेचे लोकार्पण नागपूर येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रविवारी झाले. यावेळी ते बोलत होते. खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार सिमा हिरे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी, प्रांताधिकारी गोविंद शिंदे, कार्यकारी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरालगतच्या सुकेवाडी रस्त्यावरील पुनर्वसन कॉलनीजवळ असलेल्या नाल्यात शुक्रवारी सकाळी सापडलेल्या मृतदेहाची ओळख निश्चित करण्यात पोलिसांना यश मिळाले असले तरी, या तरुणाच्या मारेकऱ्यांना शोधण्यात अद्याप यश आलेले नाही. मात्र शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात मृताच्या आतेभावाने दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरच्या अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या संकेत सुरेश नवले याचा मृतदेह पोलिसांना शहरालगतच्या पुनर्वसन कॉलनीशेजारी असलेल्या एका नाल्यात आढळून आला होता. घातपाताचा संशय असल्याने सुरुवातीला अनोळखी असणाऱ्या या मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम पोलिसांना करावे लागले. त्यासाठी पोलिसांनी समाज माध्यमांचा वापर केल्याने मृतदेहाची ओळख पटविणे सोपे गेले. हा मृतदेह संकेत नवले याचा…

Read More

रविवार विशेष शिक्षण हा तिसरा डोळा, असे आपण म्हणतो. त्याचा प्रत्यय येथील इंदिरा नगरमध्ये राहणार्‍या एरंडे कुटुंबात आला असून विडी कामगार म्हणून काम करणार्‍या श्रीमती इंदुबाई एरंडे यांचा नातू तुषार उत्तम एरंडे महाराष्ट्र लोकसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन कणकवली येथे महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता म्हणून रुजू झाला आहे. सामान्य कुटुंबांना लढण्याचं बळ देणारी ही यशकथा होय. गणपत एरंडे व इंदुबाई एरंडे हे दांपत्य संगमनेरच्या भिकुसा यमासा क्षत्रिय विडी कारखान्यात विड्या वळण्याचे काम करीत. त्यांना रवींद्र, उत्तम व सुदाम ही तीन मुले. मुले लहान असतानाच वयाच्या ३० व्या वर्षी १९७३ मध्ये गणपत एरंडे यांचे निधन झाले. त्यामुळे नंतर निर्माण झालेल्या…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो राज्य निर्मितीच्या उत्सवापासून बेळगाव, कारवार, निपाणी या क्षेत्रावर अधिकार कोणाचा, हा प्रश्‍न संपता संपत नाहीए. या प्रश्‍नाच्या निमित्ताने महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्य सरकार आपलं तुणतुणं वाजवत राहातं. कर्नाटकात येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर हा भाग आपल्याकडे घेण्यासाठी काहीतरी करतो आहोत, हे दाखवण्याची संधी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना मिळाली आहे. कर्नाटकचे आजचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना नापास राजकारणातून बाहेर काढण्यासाठी सीमा प्रश्‍नाने हात दिला आहे. पाकिस्तानात निवडणुका आल्या की भारताविरोधी गरळ ओकावी तसं कर्नाटकात निवडणुका आल्या की महाराष्ट्राच्या सीमा भागांवर दावा सांगायचा हा सातत्याचा परिपाठ होय. दस्तरखुद्द मुख्यमंत्रीच वादग्रस्त वक्तव्य करत सीमा भागात अशांतता निर्माण करत आहेत. हे…

Read More