Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली असून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि. १३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर संगमनेरमध्ये उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. हे राहणार उपस्थित: या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहू कानडे, यांच्यासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्‍या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्‍या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. शेतकरी सुखावलाय: आषाढातल्या बहुप्रतीक्षेनंतर अखेरीस अधिक श्रावणात पावसाचे दमदार आगमन महाराष्ट्राच्या कानाकोपर्‍यात झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहत असलेला शेतकरी राजा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केंद्र सरकारकडून देशभर राबविल्या जात असलेल्या “मेरी मिट्टी मेरा देश”अभियानात संगमनेर नगर परिषदेने सहभागी होत क्रांती दिनी संगमनेरमध्ये विविध उपक्रम राबविले, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सूचित केल्यानुसार राज्यभरात देखील 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान “मेरी मिट्टी मेरा देश”अभियान राबविले जात आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहिदांच्या स्मृतीस अभिवादन: याच अभियानाचा एक भाग म्हणून संगमनेर नगर परिषदेत देखील क्रांती देणे 9 ऑगस्टला “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानांतर्गत शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या अशोक…

Read More

आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात रॅली आणि मेळावा महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवचकुंडले आहे, मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आपसात भेद निर्माण करू पाहत आहे. मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेली अत्याचाराची घटना देशासाठी कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. रॅली आणि मेळावा: आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीत शेकडो आदिवासी, शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली. त्यानंतर मालपाणी लॉन्समध्ये…

Read More

अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू असताना नाशिकमध्ये एक तहसीलदार लाच स्वीकारतो, ही शरमेची बाब आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून न घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात कठोर बदल करण्याचा इशारा देत अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिर्डीत होणार कार्यक्रम: शुक्रवारी (ता. 11 ऑगस्ट) शिर्डी येथे “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते अहमदनगर येथे आले होते. महसूल विभागाच्या आढावा…

Read More

अविनाश बोधक, साईसुधा बच्चा–वनम, सविता हासे–घोलप आणि स्वप्नाली भुतडा–तापडे पहिल्या तीन क्रमांकात  महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – संगमनेर महाविद्यालय सुरू असलेल्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा 2022-23 यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अविनाश बोधक यांनी 73.28 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर साईसुद्धा बच्चा–वनम व सविता हासे–घोलप यांनी 71.42 टक्के गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय तर स्वप्नाली भुतडा–तापडे यांनी 70.14 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली. बारा वर्षापासून सुरू आहे अभ्यासक्रम: शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षापासून सावित्रीबाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मातृभूमी विषयी कृतज्ञता आणि स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाच्या स्मरण व्हावे यासाठी 9 ऑगस्ट पासून देशात “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान सुरू होत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व अभियानाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर, लोकसभा प्रभारी नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभागातून पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन…

Read More

जयहिंदच्या व्यवसाय प्रशिक्षण कार्यशाळेस युवकांचा मोठा प्रतिसाद महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरमध्ये व्यवसाय वृद्धीसाठी तरुणांना मोठी संधी आहे. नवीन कल्पनांना मूर्त स्वरूप देत उद्दिष्ट ठेवून काम केल्यास यशस्वी उद्योजक होता येते. युवकांना व्यवसायाच्या प्रशिक्षणासाठी जयहिंद लोक चळवळीमुळे मोठे व्यासपीठ मिळत असल्याचे गौरवोद्गार डॉ. आनंद गोडसे यांनी काढले. कार्यशाळेला यांची होती उपस्थिती: मालपाणी लॉन्स येथे जयहिंद लोकचळवळ व दे असरा या संस्थेच्यावतीने व्यवसाय व उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यशाळा झाली. अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते तर आमदार सत्यजित तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पुणे येथील प्रशिक्षक डॉ. आनंद गोडसे व ऐश्वर्या कुलकर्णी, सोमेश्वर दिवटे आदी उपस्थित होते. गोडसे म्हणाले,…

Read More

लोकसभेच्या ४८ मतदारसंघाचा विधानसभानिहाय आढावा घेणार. महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा गुजरातमधून सुरु होत असताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीही पदयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. राज्यातील सर्व विभागात पदयात्रा काढण्यासाठी प्रमुख नेत्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे. या पदयात्रेनंतर बसयात्रा काढली जाणार आहे. या बसयात्रेच्या माध्यमातून राज्यातील जनतेसमोर जाऊन भाजपाच्या भ्रष्ट कारभाराची पोलखोल केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे. हे नेते करणार नेतृत्व: गांधी भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले यांनी सांगितले की, राज्यातील सहा विभागात पदयात्रा काढण्यात येणार असून नागपूर विभागातील पदयात्रेचे…

Read More

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची राहणार उपस्थिती… महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – ११ ऑगस्टला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिर्डीमध्ये ‘शासन आपल्या दारी’ हा शासनाचा महत्त्वकांक्षी उपक्रम होत आहे. पदाधिकारी, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करत समन्वयातून हा उपक्रम यशस्वी करण्याचे आवाहन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मंगळवारी अहमदनगर येथील आढावा बैठकीत केले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचाव्यात यासाठी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचे शिर्डी येथे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा आढावा मंत्री विखे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीसाठी हे होते उपस्थित: यावेळी आमदार संग्राम जगताप, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार वैभव पिचड, माजी…

Read More