Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: तालुक्यातील वडगाव पान येथील ‘दत्तधाम सरकार’ आश्रमाचा सर्वेसर्वा भोंदू बाबा गडगेबाबा याच्या अडचणीत आता मोठी वाढ झाली आहे. पोलीस कारवाईत आश्रम सील झाल्यानंतर आता महावितरणनेही या भोंदू बाबाला दणका दिला असून, वीज चोरी प्रकरणी सुमारे १ लाख ७८ हजार रुपयांच्या दंडाची नोटीस बजावली आहे. अधिकृत मीटरला बायपास करून ही वीज चोरी केली जात असल्याचे तपासात उघड झाले असून, आठवडाभरात दंडाची रक्कम न भरल्यास बाबावर वीज चोरीचा स्वतंत्र गुन्हा दाखल केला जाणार आहे. गेल्या तीन दशकांपासून अडल्या-नडल्या लोकांच्या अगतिकतेचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक लूट करणाऱ्या या बाबाच्या काळ्या कर्तृत्वाच्या कथा आता एकामागून एक समोर येऊ लागल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या पंचायत समिती मारहाण प्रकरणी अभिषेक थोरात आणि त्यांच्या इतर तीन साथीदारांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश एम. एम. शेख यांनी या प्रकरणातील सर्व चारही अर्जदारांचा अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, संगमनेर शहर पोलीस ठाण्यात काँग्रेस पक्षाचे नेते शरद नाना थोरात व त्यांच्या समर्थकांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणणे आणि पंचायत समिती मधील एका कर्मचाऱ्यास बेदम मारहाण केल्याचे आरोप करण्यात आले होते. मात्र, अर्जदारांच्या वतीने ॲड. शोण दिपक थोरात यांनी न्यायालयात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, सातारा: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवरून सत्ताधारी शिवसेनेत सुरू असलेला अंतर्गत कलह आता चव्हाट्यावर आला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा दौऱ्यातील कार्यक्रमांकडे कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांनी पाठ फिरवल्याने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा परिषदेत भाजपशी युती करून आपली पत्नी प्रिया शिंदे यांना अध्यक्षपदी निवडून आणल्यानंतर, आमदार शिंदे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यातील वाद आता विकोपाला गेल्याचे दिसून येत आहे. सोमवारी साताऱ्यात आयोजित करण्यात आलेल्या जाहीर सभा आणि पक्ष कार्यकर्त्यांच्या बैठकीला आमदार महेश शिंदे अनुपस्थित राहिले. या अनुपस्थितीबाबत स्पष्टीकरण देताना आमदार शिंदे यांनी पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यावर थेट निशाणा साधला. आपल्याला या कार्यक्रमाची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: महिला व बाल विकास विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या आठव्या राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्ह्याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ९ एप्रिल ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत राबवल्या जाणाऱ्या जनजागृती उपक्रमांमध्ये अहिल्यानगर जिल्ह्याने देशात अव्वल स्थान प्राप्त केले आहे. जिल्ह्याने आतापर्यंत तब्बल ३ लाख २४ हजार ७५ उपक्रमांची नोंदणी करून ही मोठी झेप घेतली असून, या यादीत पुणे जिल्हा दुसऱ्या तर बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर आहे. या पोषण पंधरवड्याचा मुख्य उद्देश बालकाच्या आयुष्यातील पहिल्या सहा वर्षांतील मेंदूचा विकास हा असून, याच संकल्पनेवर आधारित विविध उपक्रम सध्या जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: महाराष्ट्र आणि देशाच्या समृद्ध इतिहासातून प्रेरणा घेऊन निरोगी व प्रगल्भ समाज घडवण्यासाठी तरुणांनी राज्यघटना, लोकशाही आणि संत परंपरेचा विचार आत्मसात करणे काळाची गरज आहे. याच उदात्त हेतूने कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला ‘युवा संगम’ हा कार्यक्रम भविष्यात संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक आदर्श मार्गदर्शक ‘पॅटर्न’ ठरेल, असा विश्वास राजकीय क्षेत्रातील दिग्गजांनी व्यक्त केला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर संगमनेर तालुका युवक काँग्रेस आणि एनएसयुआय यांच्या संयुक्त विद्यमाने दोन दिवसीय युवा संगम कार्यकर्ता शिबिर व संवाद कार्यक्रम नुकताच उत्साहात पार पडला. या शिबिरामध्ये संगमनेर तालुक्यातील ५६० युवक-युवतींनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत सामाजिक आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: क्रांतीसूर्य महात्मा बसवेश्वर यांची जयंती संगमनेर शहरात अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. या मंगलमयी सोहळ्याची सुरुवात श्री. व सौ. तोरकडी यांच्या हस्ते महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेच्या भावपूर्ण आरतीने झाली. कार्यक्रमाचे पौरोहित्य चैतन्य लोणकर स्वामी यांनी केले. त्यांनी विधिवत पूजा संपन्न केल्याने संपूर्ण परिसरात धार्मिक व मांगल्याचे वातावरण निर्माण झाले होते. याप्रसंगी मृणाल बागडे हिने महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनप्रवासावर आणि त्यांच्या महान कार्यावर प्रकाश टाकणारे प्रभावी भाषण केले. बसवेश्वरांनी बाराव्या शतकात दिलेला समता, सामाजिक न्याय आणि शुद्ध मानवतेचा संदेश आजही कसा प्रस्तुत आहे, हे तिने आपल्या मनोगतातून उपस्थितांना पटवून दिले. त्यांच्या ‘कायकावे कैलास’…
अहिल्यानगर: नेवासा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी निखिल फराटे यांच्यावर गोळीबार करून त्यांच्या हत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी नेवासा नगरपंचायतीच्या उपनगराध्यक्षांचे पती संजय लक्ष्मण सुखदान यांच्याविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १३ एप्रिल रोजी घडलेल्या या घटनेनंतर मुख्याधिकारी प्रचंड दहशतीखाली असल्याने त्यांनी शनिवारी उशिरा फिर्याद दिली, त्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत. मुख्याधिकारी फराटे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संजय सुखदान यांनी यापूर्वीही अनेकदा नियमबाह्य कामांसाठी त्यांच्यावर दबाव आणला होता. मागणी पूर्ण न केल्याने त्यांनी मुख्याधिकाऱ्यांना चप्पल उगारून मारहाणीचा प्रयत्न केला होता आणि गंभीर परिणाम भोगण्याची धमकीही दिली होती. १३ एप्रिल रोजी सायंकाळी नगरपंचायत कार्यालयात सुरू असलेल्या वादाचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराचा सुरू झालेला भव्य जीर्णोद्धार आणि वनविभागाच्या जागेवर प्रस्तावित असलेला बिबट सफारी प्रकल्प यामुळे हे देवस्थान आगामी काळात संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख पर्यटन केंद्र म्हणून नावारूपास येईल, असा विश्वास राज्याचे महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला. श्रीक्षेत्र निझर्णेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धार कामाचा शुभारंभ नुकताच पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार अमोल खताळ, तहसीलदार धीरज मांजरे, पोलीस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, वनविभागाचे अधिकारी अमरजित पवार, प्रवरा बँकेचे उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, कैलास तांबे यांच्यासह मंदिर विश्वस्त समितीचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: न्यायालयाने आदेश देऊनही पत्नी आणि मुलांच्या पोटगीची रक्कम न भरणाऱ्या पतीला संगमनेर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात पीडित महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी ‘देवा ग्रुप फाउंडेशन’ने पुढाकार घेतला होता. आरोपी सरफराज कादर खान पठाण (रा. जमजम कॉलनी, संगमनेर) याने न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी व दोन मुलींच्या उदरनिर्वाहासाठी दरमहा १० हजार रुपये देणे बंधनकारक होते. मात्र, त्याने जाणीवपूर्वक या आदेशाचे उल्लंघन केले असून, त्याच्याकडे आतापर्यंत एकूण ३,९७,५०० रुपयांची थकबाकी जमा झाली होती. या अन्यायाविरुद्ध दाद मागण्यासाठी पीडित महिला, तिचे वडील आणि दोन लहान मुलींसह देवा ग्रुपचे पदाधिकारी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले. तेथे पोलीस निरीक्षक समीर…
देशाच्या संसदीय लोकशाहीचे मंदिर मानल्या जाणाऱ्या लोकसभेत एनडीए (NDA) सरकारने १६ तारखेला १३१ वी घटना दुरुस्ती विधेयक मांडले. त्या विधेयकात “नारी शक्ती वंदन कायदा” व “मतदारसंघ पुनर्रचना” ह्या दोन गोष्टींचा अंतर्भाव होता. आजपर्यंत कुठलीही घटनादुरुस्ती होत असताना भारताच्या संवैधानिक व संसदीय परंपरेला साजेसे वर्तन हे कुठल्याही सरकारचे राहिले आहे. यावेळी मात्र असे घडले नाही. अत्यंत संवेदनशील असा मतदारसंघ पुनर्रचनेचा विषय महिला आरक्षणाच्या विधेयकात घुसवून सरकारने विरोधी पक्षांना तोंडावर पाडण्याचा कुटील डाव रचला होता. यावरील चर्चेदरम्यान काँग्रेस पक्षाच्या नेत्या व वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रियांका गांधी यांनी भर संसदेत संपूर्ण सभागृहासमोर अन विशेषतः देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समक्ष सरकारची पोलखोल…
