Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज रस्त्यातील खड्ड्यांपाठोपाठ आता भाजपने क्रीडा संकुलाकडे लक्ष केंद्रीत केले आहे. नगरपालिकेत भाजपची सत्ता आल्यास सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलाचे नांव बदलून ते ‘छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल’ असे केले जाणार असल्याची माहिती माजी उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पक्षाचे नेते जावेद जहागिरदार यांनी दिली. जहागिरदार म्हणाले, संगमनेर नगरपालिकेत ३० वर्षांपासून माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात व नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अधिपत्याखाली कॉग्रेसची सत्ता आहे. त्यावेळी मोठा गाजावाजा करत नगरपालिकेने सुमारे पाच एकर परिसरामध्ये क्रीडा संकुलाची उभारणी केली आहे. यासाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला. संगमनेर नगरपालिकेचे क्रीडा संकुल ही शासकीय मालमत्ता आहे.…
अहमदनगर | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क निळवंडे प्रकल्प हा राज्य शासनाचा अत्यंत महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. सर्वसामान्यांच्या दृष्टीने हितकारक असलेल्या या प्रकल्पाच्या कामात कुठल्याही प्रकारची दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही त्यामुळे हे काम निर्धारित वेळेत व गतीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला दिले. मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात निळवंडे प्रकल्प कामकाज आणि गौण खनिज या विषयावर आढावा बैठक झाली. या बैठकीत मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अप्पर जिल्हाधिकारी सुहास मापारी, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अधीक्षक अभियंता अरुण…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क भारतात सध्या महापुरुषांचे विभाजन सुरू आहे. संबंध मानव जातीसाठी जात, धर्म, प्रांताच्या पुढे जाऊन ज्या महामानवांनी काम केलं त्यांना एका चौकटीत बसवू नका, असे प्रतिपादन व्याख्याते अर्शद शेख यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात सभागृहात भारतरत्न अब्दुल कलाम आझाद यांच्या १३४ व्या जयंतीनिमित्त एकता सामाजिक सेवाभावी संस्थेच्यावतीने आयोजित व्याख्यान व पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी अब्दुल्ला हसन चौधरी, सुखदेव इल्हे, श्रीनिवास पगडाल, कारभारी देव्हारे, माजी नगरसेवक डॉ. दानिश खान, जावेद युनूस शेख, मुजाहिद पठाण, जाविद शब्बीर शेख, माजी गटविकास अधिकारी बी. डी. पारखे आदी उपस्थित होते. शेख म्हणाले, जोपर्यंत शिक्षण माणसाला माणूस बनवत…
अकोले | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अहमदनगर मधील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय तंत्र प्रदर्शनात सहभागी झालेल्या २७ शासकीय व खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या उपकरणाने यश मिळविले आहे. या उपकरणाची विभागीय पातळीवर होणाऱ्या तंत्र प्रदर्शनासाठी निवड करण्यात आली असल्याची माहिती अकोले आयटीआयचे प्राचार्य विद्याचंद्र सातपुते यांनी दिली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय मुंबई आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने या प्रदर्शनाचे उद्योजक किशोर कुलकर्णी यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रदर्शनामध्ये विद्यार्थ्यांनी कृषी, पारंपारिक ऊर्जा, पाणीबचत, फॅशन, खाद्यपदार्थ, यांत्रिक मॉडेल्स यावर आधारित जवळपास ७०…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज शेजारी-शेजारी राहणाऱ्या दोन महिलांमध्ये झालेल्या भांडणात दुसऱ्या महिलेला मारहाण करून तिचे कपडे फाडल्या प्रकरणी एका 38 वर्षीय महिला आरोपीला मुंबई महानगर दंडाधिकाऱ्यांनी दोषी ठरविले आहे. त्याशिवाय विनयभंग प्रकरणी एखादी महिलाही दोषी ठरू शकते असे स्पष्ट करत त्या महिलेला एक वर्षाच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. एक वर्ष कारवासाच्या शिक्षेसह या महिलेला सहा हजार रुपयांचा दंड देखील करण्यात आला आहे. आरोपी आणि तक्रारदार महिला दोघीही एकमेका शेजारी राहत असून या महिलांच्या दोन्ही कुटुंबीयांमध्ये अनेक वर्षांपासून वादविवाद आणि भांडण होत असे. दोन वर्षांपूर्वी आपसात झालेल्या भांडणांमध्ये आरोपी महिलेने तक्रारदार महिलेवर आधी चप्पल फेकली. त्यानंतर चप्पलने तिला मारहाण केली.…
मुंबई | महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्य सरकारने मंगळवारी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले. यात अवघ्या दोन महिन्यांपूर्वी राज्याच्या आरोग्य आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या तुकाराम मुंढे, शिर्डी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्यासह आणखी काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. दुपारी काढण्यात आलेल्या आदेशामध्ये तुकाराम मुंढे यांना ‘कार्यमुक्त व्हा आणि पुढील आदेशाची वाट पहा’ असे आदेश देण्यात आले असले तरी, त्यांची नियुक्ती शिर्डी संस्थांनच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी करण्यात आली असल्याचे दैनिक सामनाने म्हटले आहे. तर शिर्डी संस्थांनच्या कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांची बदली नागपूरला सदस्य सचिव, विदर्भ वैधानिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे. अवघ्या दोन महिन्यात मुंढे यांची बदली…
महाराष्ट्र संवाद न्यूज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिली पाच वर्षे उत्तर प्रदेश, बिहार आणि उत्तराखंडकडे लक्ष द्यावे. त्या राज्यांमधील लोकं घरदार सोडून दुसऱ्या राज्यात जातात, त्यावेळी दुसऱ्या राज्यांना त्याचा त्रास होतो. महाराष्ट्रातील उद्योगधंदे बाहेर जात आहेत. सर्व राज्यांची प्रगती झाली तर देश प्रगत होतो. मोदीजी, तुम्ही गुजरात गुजरात करू नका, प्रत्येक राज्य तुमचं अपत्य आहे, त्या प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीनं पाहणं गरजेचं आहे. अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी महाराष्ट्राबाहेर जात असलेल्या उद्योगधंद्यावरुन पंतप्रधान मोदींना सुनावले. मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी गोरेगावमधील नेस्को सभागृहात कार्यकर्त्यांना संबोधीत केले, त्यावेळी त्यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या बुलढाण्यातील सभेनंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे यांच्या आरोपाचा समाचार घेतानाच विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फ्रिज मधून खोके कोठे गेले… याचा आपण शोध घेणार असल्याचा इशारा ठाकरेंना दिला आहे. राज्यातील सत्तांतरानंतर शिंदे-ठाकरे गटातील वाद थांबावयास तयार नाही. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. उद्धव ठाकरे यांनी बुलढाण्यातील चिखली येथे झालेल्या शेतकरी मेळाव्यात शिंदे गटातील आमदार आणि खासदारांवर टीका केली होती. “बोक्यांना खोके हवे होते, म्हणून ते भाजपाला मिळाले”, तुम्ही खोके घेतले असतील तर त्यातील थोडे शेतकऱ्यांना देखील द्या, तुम्ही खोके घेतलेत हे मी म्हणत नाही तर तुमच्याच गटाचे आमदार सांगत…
महाराष्ट्र संवाद न्यूज “आपला नीतू आणि नीलू प्रचंड आगावू आहेत. नारायण राणे यांनी त्यांना चांगले संस्कार दिले नाहीत. तो व्हिडीओ जुना आहे. विचारांचे खंडन-मंडन करावे लागते. राणेंच्या मुलांचा अभ्यास कमी आहे. मी त्यांचा कणकवलीत जाऊन होमवर्क घेतल्याने ते अस्वस्थ झाले आहेत,” असे सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. एका जुन्या व्हिडीओचा आधार घेत भाजपाचे नेते नितेश राणे यांनी सुषमा अंधारे यांच्यावर टीका केली आहे. या टीकेला अंधारे यांनी नाशिकमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले आहे. याशिवाय त्यांनी शिंदे गटात नाराज आमदारांची संख्या वाढत असल्याने लवकरच शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असल्याचे म्हटले आहे. सुषमा अंधारे यांनी थेट नावे घेत सांगितले की, “नाशिकमधील सुहास कांदे…
महाराष्ट्र संवाद न्यूज गुजरातमध्ये सरकार कोणाचे असेल हे येत्या ८ डिसेंबरला ठरणार आहे. पहिल्या टप्प्यातील ८९ जागांसाठी एक डिसेंबरला तर दुसऱ्या टप्प्यात पाच डिसेंबरला मतदान होत आहे. ८९ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत करोडपती असलेल्या उमेदवारांचा भरणा सर्वाधिक आहे. एक-दोन नव्हे तर तब्बल २११ करोडपती उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पक्ष या वेळच्या निवडणुकीत उतरला असल्याने गुजरातची निवडणूक प्रामुख्याने भाजपा, आम आदमी पार्टी आणि काँग्रेस या तीन मोठ्या पक्षात होत आहे. सुरुवातीपासूनच चुरशीच्या बनलेल्या या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हाती राहणार याची उत्सुकता असली तरी देखील ही निवडणूक सामान्य माणसाची राहिलेली नाही. निवडणुकीच्या पहिल्या…
