Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क प्रलंबित असलेले अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल तातडीने मंजूर करून त्याचे कायद्यात रूपांतर करण्यात यावी, अशी मागणी ॲड. श्रेयस देशमुख यांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. पटेल संगमनेर दौऱ्यावर आले असतांना प्रत्यक्ष भेटीत ही मागणी करण्यात आली. सर्वच वकीलांशी संबधीत असलेल्या या मागणी संदर्भात केंद्रीय मंत्रालय काय निर्णय घेते हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. देशमुख यांनी निवेदनात म्हटले की, आपल्या देशात वकिल हे पोलिस आणि न्यायपालिकेप्रमाणेच न्याय वितरण प्रणालीतील एक आवश्यक दुवा म्हणून काम करत आहे. परंतु पोलिस आणि न्यायपालिकेला संरक्षण, सामाजिक सुरक्षा आणि विशेषाधिकार उपलब्ध असताना वकिलांना समाजकंटकांकडून होणाऱ्या कारवायांपासून योग्य सरंक्षण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका संदर्भात अद्यापही अनिश्चितता असली तरी जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्रातून प्रसिद्ध करण्यात आले आहे. अहमदनगर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी आरक्षित झाले आहे त्यामुळे या पदासाठी आता राजकीय पक्षांना तेवढाच मातब्बर उमेदवार शोधावा लागणार आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर या कालावधीत मुदत संपवणाऱ्या राज्यभरातील 7675 ग्रामपंचायत प्रशासक नेमण्याच्या सूचना राज्य निवडणूक आयोगाने दिल्या. त्यामुळे या निवडणुका लांबणीवर पडत असल्याचे स्पष्ट होत नाही तोच, जिल्हा परिषदेचे आरक्षण राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या हालचाली सुरू होण्याची चिन्हे आहेत. राजपत्राद्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले जिल्हानिहाय आरक्षण असे :…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क खरी शिवसेना कोणाची हा वाद अद्याप सुटला नसला तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवा सेनेचे पदाधिकारी जाहीर केले आहे. युवा सेनेचा अध्यक्ष ची निवड अद्यापही झाली नसले तरी विभागवार प्रमुखांच्या नियुक्त जाहीर झाल्या असून त्यामध्ये बहुतांशी मंत्र्यांच्या मुलांना संधी दिल्याचे समोर येत आहे. यातील विठ्ठल सरप पाटील यांना राष्ट्रीय कार्यकारिणीत संधी मिळाली आहे. कार्यकारिणीमध्ये संधी मिळालेले बहुतेक जण युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासोबत काम करत होते. शिवसेनेतील पडझडी नंतर अनेकांनी शिंदे गटाची वाट धरल्याने त्यांची मुलेही पर्यायाने शिंदे गटासोबत गेली आहेत. अशांना मुख्यमंत्री शिंदेंनी कार्यकारिणींमध्ये स्थान दिले असल्याचे दिसते. मुख्यमंत्री शिदे यांच्या बरोबर शिवसेना प्रमुख…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गेल्या ८ वर्षामध्ये पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अमृतकाळ निर्माण झाला. यापूर्वी देशात अनेक पक्षांची सरकारं सत्तेवर होती. परंतू पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदाच योजनांची वेळेत पुर्तता, सुरु असलेल्या योजनांचे कामं वेळेत पूर्ण करणे, यामुळेच देशामध्ये प्रथमच गरीबाला न्याय मिळत असून, यापूर्वीचे सरकार आणि मोदींचे सरकार यामध्ये निश्चितच फरक दिसत असल्याची माहिती केंद्रीय अन्नप्रक्रीया आणि जलशक्ती विभागाचे राज्यमंत्री प्रल्हाद पटेल यांनी दिली. लोकसभा प्रवास योजनेच्या पार्श्वभूमीवर पटेल यांनी शिर्डी लोकसभा मतदार संघात मागील दोन दिवसांपासून दौरा सुरु केला आहे. संगमनेर येथे त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत केंद्र सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या योजनांची अंमलबजावणी तसेच देशात भारतीय जनता…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चाळीस आमदारांनी शिवसेनेतून फुटत भाजपाशी हातमिळवणी करीत सरकार स्थापन केले असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मंत्र्यांना, शिवसेनेच्या आमदारांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे, याची प्रचिती पून्हा आली. दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर धुळ्यात येणाऱ्या पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांची गाडी शिवसैनिकांनी अडविण्याचा प्रयत्न करीत त्यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाल्यानंतर शुक्रवारी पुन्हा शिवसैनिकांनी गुलाबराव पाटील यांना टार्गेट केले. यावेळी ‘पन्नास खोके गद्दार ओके’ अशी घोषणाबाजीही करण्यात आली. मंत्री झाल्यानंतर पाटील प्रथमत:च धुळे दौऱ्यावर आले होते. शिंदे गटाच्यावतीने मुंबईत बीकेसी मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याच्या निमीत्ताने सायंकाळी धुळ्यात सैनिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क तालुक्यातील मेंगाळवाडी येथील मिराबाई रामभाऊ मेंगाळ या आदीवासी महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. माजी मंत्री, कॉग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून अखेर मृत महिलेच्या कुटूंबियांना राज्य सरकारकडून १० लाख रुपयांची मदत मिळाली. मदतीचा धनादेश मृत महिलेच्या कुटूंबियांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला. बिबट्याने केलेल्या हल्ल्यामध्ये मेंगाळवाडी येथील मिराबाई मेंगाळ या आदीवासी महिलेचा मृत्यू झाला होता. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तातडीने मृत महिलेच्या कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. त्याचवेळी थोरात यांच्या ‘यशोधन’ संपर्क कार्यालयाच्या माध्यमातून मेंगाळ कुटूंबियांना मदतही करण्यात आली होती. माजी मंत्री थोरात यांनी प्रशासनाला तातडीने या कुटूंबियाला शासकीय मदत मिळवून देण्याच्या…

Read More

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे प्रतिपादन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क राज्यात गेल्या अडीच वर्षात केवळ लुटीचा एकमेव कार्यक्रम सुरू होता. त्यातून वाळूमाफिया आणि बगलबच्चे यांना मोकळे रान मिळाले होते. त्याला नव्या सरकारच्या काळात अटकाव आला आहे. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जनतेच्या मनातील सरकार सत्तेत आले असल्याचे प्रतिपादन राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंग पटेल यांच्या हस्ते संगमनेरमध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अध्यक्ष स्थानावरून मंत्री विखे पाटील बोलत होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता रविंद्र पाटील, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरूळे, तहसीलदार अमोल निकम यांच्यासह राजेंद्र गोंदकर, रविंद्र अनासपुरे,…

Read More

संगमनेरमधील चौपदरीकरणाच्या कामांचे मंत्री पटेलांच्या हस्ते व महसूल मंत्री विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली उद्घाटन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विकास योजनांच्या कामांसाठी केंद्राकडे मुबलक निधी उपलब्ध आहे. राज्यांना पायाभूत सुविधांच्या निर्माणासाठी मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचे केंद्रीय अन्नप्रक्रिया उद्योग व जलशक्ती राज्यमंत्री प्रल्हाद सिंग पटेल यांनी सांगितले. संगमनेरमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्यावतीने केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० घुलेवाडी ते संगमनेर रस्ता तसेच राज्यमार्ग क्रमांक ७१ अ या ६० किलोमीटर पर्यंतच्या रुंदीकरण व चौपदरीकरणाच्या कामांचे उद्घाटन पटेल यांच्या हस्ते शुक्रवारी झाले. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील होते.…

Read More

राज्यात 7675 ग्रामपंचायतच्या निवडणुका लांबल्या महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क ऑक्टोंबर ते डिसेंबर 2022 दरम्यान मुदत संपत असलेल्या राज्यातील 7675 ग्रामपंचायत यांच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने लांबणीवर टाकल्या आहेत. त्यामुळे या सर्व ग्रामपंचायतीवर आता प्रशासक नेमण्यात येणार आहे. नव्याने येणाऱ्या प्रशासन राज मुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला आहे. 7675 ग्रामपंचायतीमध्ये अहमदनगर जिल्ह्यातील 204 ग्रामपंचायतींचा समावेश आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबर दरम्यान 7649 ग्रामपंचायतीची मुदत संपत आहे. आठ ग्रामपंचायतची नव्याने निर्मिती करण्यात आली आहे. याशिवाय आयोगाच्या अहवालात दिसत नसलेल्या 18 ग्राम पंचायतींचा यात समावेश आहे. मतदार याद्या, नव्याने करावयाची प्रभाग रचना यासाठी साधारणतः दोन-तीन महिन्यांचा कालावधी अपेक्षित आहे. त्यामुळे ग्रामपंचायतचा कालावधी जज-जसा…

Read More

लायन्स इनरव्हील दांडिया महोत्सव महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अनेक वर्षाच्या सुरू असलेल्या उत्सवावर गेले दोन वर्ष कोरोनाचे संकट घोंगावत होते. कोरोना निर्बंधानंतरचा पहिलाच नवरात्र उत्सव पार पडत असून या उत्साहात लयबद्ध तालावर बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे आणि संगमनेरच्या प्रथम महिला नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांना देखील ठेका धरण्याचा मोह आवरला नाही. लायन्स इनरव्हीलच्या वतीने मालपाणी लॉन्स मध्ये डीजे दांडिया नाईट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. बीजमाता पद्मश्री राहीबाई पोपेरे यांच्यासह नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इनरव्हील जिल्हा उपाध्यक्ष रचना मालपाणी, लायन्स क्लबचे प्रेसिडेंट राजेश लाहोटी, इनरव्हीलच्या प्रेसिडेंट वृषाली कडलग, मयूर ज्वेलर्सचे महेश मयूर, वैशाली मयूर आदी यावेळी उपस्थित होते. दोन वर्षाच्या खंडानंतर नवरात्र…

Read More