Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत अद्ययावत अशा दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, एका राजकीय दबावाला बळी पडत स्थानिक पोलीस प्रशासनाने या अतिशय संवेदनशील कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत नगरपालिका कटिबद्धता दाखवत असताना पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या या बेजबाबदार उदासीनतेमुळे संगमनेर शहर आणि तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. संगमनेर हे आधुनिक आणि विकसित शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील महिलांना निर्भय वातावरण मिळावे आणि आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचावी याकरता नगर परिषदेने राज्यातील पहिली मानली जाणारी आपत्ती निवारण यंत्रणा उभारली…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शिक्षणातील लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथे राबविण्यात आलेल्या ‘एका विद्यार्थ्यासाठी एक बेंच, माझे अभिमानास्पद पालकत्व’ या अभिनव उपक्रमाला माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व दात्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत तब्बल ६८ हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून, या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ४० आकर्षक बेंच उपलब्ध करून देण्यात आले. पोषण महासप्ताह आणि पारंपरिक दहीहंडीच्या औचित्यावर आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सर्व बेंचचे लोकार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली सुनील कडलग यांनी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १,७०० रुपये…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धांदरफळ बुद्रुक येथे महावितरणचे वीजमीटर तपासण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शासकीय कामात अडथळा आणून लोखंडी रॉडने व हाताने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ यादव अशोक खाडे (वय ३२, रा. कसारा दुमाला रोड, संगमनेर) हे आपल्या सहकाऱ्यांसह धांदरफळ बुद्रुक येथील ‘मेसर्स प्रदीप इंजिनिअरिंग वर्क्स’ या दुकानाचे वीजमीटर तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रदीप भास्कर धुमाळ, भास्कर रावसाहेब धुमाळ आणि गणेश भास्कर धुमाळ (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी खाडे यांच्याशी वाद घातला. या दरम्यान…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगाव आणि संगमनेर शहर परिसरातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी लोणी परिसरातून दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरगाव येथील धारणगाव रोडच्या रहिवासी निलम अजितकुमार नय्यर या ४ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीसह स्कुटीवरून जात असताना श्रीराम पार्कजवळ अज्ञात दोन आरोपींनी त्यांच्या गाडीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय कला महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला असून, या शिबिरात तालुक्यातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळत असून, हा कला महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर डॉ. नामदेव गुंजाळ, समन्वयक प्रकाश पारखे, मुख्याध्यापक…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर तालुक्यातील कौठे मलकापूर येथे प्रस्तावित असलेल्या वादग्रस्त औद्योगिक वसाहतीच्या मुद्द्यावरून स्थानिक जनतेमध्ये प्रचंड संभ्रम निर्माण झाला असून, सत्ताधारी लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात आपली भूमिका त्वरित स्पष्ट करण्याची गरज निर्माण झाली आहे. विधानसभा आमदारांकडून या ठिकाणी “MIDC होणार” असा दावा केला जात आहे, तर दुसरीकडे पदवीधर आमदार “औद्योगिक वसाहतीसाठी प्रयत्न सुरू आहेत” असे सांगत आहेत. या परस्परविरोधी वक्तव्यांमुळे कौठे मलकापूरमध्ये नेमकी अधिकृत MIDC येणार आहे की केवळ एखादी सहकारी व स्थानिक औद्योगिक वसाहत उभी केली जात आहे, असा सवाल संगमनेर तालुका काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी उपस्थित केला आहे. कौठे मलकापूर येथील प्रकल्पावरून जनतेच्या भावनांशी खेळ…
Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजच्या दिवशी कामाच्या ठिकाणी तुमची ऊर्जा आणि उत्साह वाखाणण्याजोगा असेल. नवीन प्रकल्पांची सुरुवात करण्यासाठी हा काळ अत्यंत अनुकूल आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभल्यामुळे मनातील चिंता दूर होतील. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. सायंकाळी प्रिय व्यक्तीसोबत घालवलेला वेळ मनःशांती देणारा ठरेल. वृषभ – कौटुंबिक जीवनात आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण राहील. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले कायदेशीर किंवा मालमत्तेचे प्रश्न सुटण्याची शक्यता आहे. व्यवसायात धनलाभाचे योग बनत आहेत. आरोग्याची योग्य ती काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. संयमी वर्तनामुळे आज तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा प्राप्त होईल. मिथुन – आज तुमची संभाषण कौशल्ये आणि बुद्धिमत्ता…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: राजापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळेत शाळा व्यवस्थापन समितीची पुनर्रचना करताना गंभीर गैरप्रकार आणि मनमानी कारभार झाल्याचा आरोप करत ही निवड प्रक्रिया तत्काळ रद्द करण्याची जोरदार मागणी नागरिकांनी केली आहे. याप्रकरणी त्रस्त नागरिकांनी संगमनेर पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांना सविस्तर निवेदनाद्वारे तक्रार सादर केली असून, संबंधित प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे आणि शासन निर्णयाचे सर्रास उल्लंघन झाल्याचे निदर्शनास आणून दिले आहे. तक्रारीनुसार, शुक्रवारी (४ सप्टेंबर) आयोजित करण्यात आलेल्या पालक मेळाव्यात इतर महत्त्वाच्या विषयपत्रिकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करून शाळा व्यवस्थापन समिती सदस्यांची निवड एकाधिकारशाही पद्धतीने उरकण्यात आली. पालकांना नियमानुसार किमान पाच ते सात दिवस आधी अजेंडा न देता केवळ…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, सुप्त कलागुण आणि विविध कौशल्यांना प्रोत्साहन देण्यासाठी जयहिंद लोकचळवळ या संस्थेच्या वतीने संग्राम संस्थेचे विश्वस्त स्व. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या ३३ व्या जयंतीनिमित्त आयोजित ‘बालकला महोत्सवा’चे संगमनेर येथील स्व. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात उत्साहपूर्ण वातावरणात उद्घाटन झाले. आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या महोत्सवाचे उद्घाटन नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष तथा जयहिंद महिला मंचच्या अध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जयहिंद लोकचळवळीचे सेक्रेटरी डॉ. नामदेवराव गुंजाळ होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना डॉ. नामदेवराव गुंजाळ यांनी महोत्सवाची पार्श्वभूमी स्पष्ट केली. स्व. डॉ. देवेंद्र ओहरा यांच्या शैक्षणिक व सामाजिक…
Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जा आणि उत्साहाने भरलेला राहील. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. कुटुंबातील वरिष्ठ सदस्यांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे मनातील चिंता दूर होतील. नोकरीत वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील, मात्र घाईगडबडीत कोणताही निर्णय घेणे टाळा. व्यवसायात चांगला धनलाभ होण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुम्हाला आर्थिक बाबतीत विशेष सावधानता बाळगावी लागेल. नको असलेल्या खर्चांवर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा आर्थिक चणचण भासू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि प्रियजनांसोबत चांगला वेळ घालवता येईल. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः आहारावर नियंत्रण ठेवा. व्यापाऱ्यांसाठी दिवस सामान्य राहील. मिथुन – आजचा दिवस तुमच्यासाठी यश…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात पार पडलेल्या दिमाखदार सोहळ्यात महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांना महाराष्ट्र शासनाचा प्रतिष्ठेचा ‘डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या सन्मानामुळे संगमनेरच्या शैक्षणिक क्षेत्रात अभिमानाचे वातावरण आहे. उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या वतीने राज्यातील १२ विद्यापीठांच्या कार्यक्षेत्रातील प्राचार्यांमधून २०२५-२६ या वर्षासाठी ही निवड केली जाते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या क्षेत्रातून डॉ. गायकवाड यांना हा बहुमान मिळाला आहे. कार्यक्रमास उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: महात्मा फुले जन्मद्विशताब्दीच्या औचित्याने सत्यशोधक विचारमंचाच्या वतीने आयोजित व्याख्यानमालेचे १० वे पुष्प सोमवारी, (७ सप्टेंबर) गुंफले जाणार आहे. या विशेष कार्यक्रमात दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (JNU) प्रसिद्ध प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय वक्ते प्रा. डॉ. शरद बाविस्कर हे ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ या महत्त्वपूर्ण विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. हा वैचारिक सोहळा सायंकाळी ६ वाजता संगमनेर येथील डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळील पडतानी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये पार पडणार आहे. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक विचारांचा वारसा पुढे नेणे आणि समकालीन सामाजिक परिस्थितीवर भाष्य करणे हा या व्याख्यानाचा मुख्य उद्देश आहे. या कार्यक्रमास संगमनेर शहर व परिसरातील सर्व नागरिक, विचारवंत,…
आजचे राशीभविष्य- मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक राहील. कामाच्या ठिकाणी नवीन संधी प्राप्त होतील आणि तुमचे वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश असतील. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जुन्या मित्रांशी गाठीभेटी होतील. आर्थिक बाबतीत थोडी सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे. आरोग्य उत्तम राहील. वृषभ – आज तुम्हाला व्यवसायात चांगला आर्थिक फायदा होण्याची शक्यता आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज पूर्ण होतील. घरात मंगल कार्य ठरण्याचे योग आहेत. मनातील ताणतणाव दूर होऊन शांतता लाभेल. आहारावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. मिथुन – आजचा दिवस मिश्र स्वरूपाचा राहील. नोकरीत कामाचा ताण वाढू शकतो, त्यामुळे संयम ठेवा. बोलण्यावर नियंत्रण ठेवल्यास कौटुंबिक वाद टाळता…
प्रवीण पुरो कोणीही कितीही तरबेज असला तरी त्याच्या खोटं बोलण्याच्या कृतीला मर्यादा ही असतेच असते. तिथे जबाबदार व्यक्तीचीही सुटका नाही. त्याने तर अधिक समजदारीचे वर्तन केले पाहिजे. तसं न केलं तर ती व्यक्ती तोंडावर पडू शकते. त्यातच खोट्याला खर्याचे लेबल लावले तर पराकोटीची फजिती होत असते. आपल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असंच काहीसं होऊ लागलं आहे. आपल्या देशाचा विकास दर म्हणजे जीडीपी हा ७.८ टक्क्यांवर जाऊन पोहोचला असल्याचं त्यांनी ज्या कौतुकाने देशाला ऐकवले, त्याच कौतुकाने त्यांच्या घोषणेचा समाचार घेतला जाऊ लागल्याने खोटेपणाने केलेल्या घोषणेचा पुरता बोजवारा उडाला आहे. सामान्यतः देशातील तरुणांना त्यांच्या गरजेचे शिक्षण का मिळत नाही, हाताला रोजगार का मिळत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: मानवता धर्म वाढवणाऱ्या वारकरी संप्रदायाने संपूर्ण जगाला एक नवी आणि विचारांची दिशा दिली आहे. जात, पात आणि धर्म याच्या पलीकडे जाऊन मानवता हाच सर्वात महत्त्वाचा धर्म असून संगमनेर तालुक्याला या वारकरी संप्रदायाचा अत्यंत समृद्ध आणि मोठा वारसा लाभला आहे, असे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. तालुक्यातील विविध गावांमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहांना भेटी देऊन त्यांनी नागरिकांशी आणि भाविकांशी संवाद साधला. आपल्या दौऱ्यादरम्यान त्यांनी तालुक्यातील कोल्हेवाडी, कवठे कमळेश्वर, कोकणगाव आणि जोर्वे येथे ग्रामस्थांच्या वतीने आयोजित अखंड हरिनाम सप्ताहांना उपस्थिती लावली. यावेळी सर्वच ठिकाणी महिला आणि नागरिकांची…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- गणेशोत्सवाच्या तोंडावर वर्गणीच्या मुद्द्यावरून वादाची ठिणगी पडल्याचे समोर आले आहे. पुढच्या आठवड्यात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन होत असल्याने सर्वत्र गणेश मंडळांच्या तयारीला जोरदार वेग आला आहे. मात्र, याच पार्श्वभूमीवर शनिवारी बाजारपेठेत मागितलेली वर्गणी दिली नाही या क्षुल्लक कारणावरून एका व्यापाऱ्याला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकारामुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून प्रशासनाने या प्रकरणाची तात्काळ गंभीर दखल घेण्याची मागणी केली जात आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी शहरात पसरली असून समाजमाध्यमांवरही याची जोरदार चर्चा सुरू आहे. दरम्यान, बातमी लिहीपर्यंत या संदर्भात पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार दाखल करण्यात आलेली नव्हती. तक्रार दाखल नसल्यामुळे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: संगमनेर शहराच्या सुरक्षिततेत आणि सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या विविध विकासकामांचे लोकार्पण तसेच उद्घाटन सोमवारी, (७ सप्टेंबर) सायंकाळी ५ वाजता पार पडणार आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते आणि माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा आयोजित करण्यात आला आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या विशेष उपस्थितीत होणाऱ्या या सोहळ्याची माहिती नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे यांनी दिली आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहराचा कायापालट झाला असून, आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून नागरिक व विशेषतः महिलांच्या सुरक्षेसाठी शहरात व्यापक सीसीटीव्ही नेटवर्क उभारण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत अकोले नाका, त्रिमूर्ती…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर वचक बसवण्यासाठी पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) संगमनेर शहरात मोठी कारवाई केली. सुकेवाडी ते समनापूर रस्त्यावरील एका कांद्याच्या चाळीजवळ छापा टाकून पोलिसांनी तब्बल ५ लाख १० हजार रुपये किमतीचे १७०० किलो गोमांस आणि ६ लाख रुपयांचे महिंद्रा पिकअप वाहन (क्र. MH-17-BD-4661) असा एकूण ११ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय संदीप दरवडे, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, विजय ठोंबरे, संतोष खैरे, राहुल डोके, अमृत आढाव, योगेश कर्डीले व भगवान धुळे यांच्या पथकाने ही कारवाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – राज्यात पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक आधीच हवालदिल झाले असताना, महावितरण विभागाने सुरू केलेल्या मनमानी लोड शेडिंगमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या गलथान कारभाराविरोधात काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत महावितरण कार्यालयावर शुक्रवारी धडक दिली. सायंकाळी ६ ते ९ या वेळेत कोणतीही लोड शेडिंग न करता पूर्ण दाबाने वीज पुरवठा सुरू ठेवावा, या मुख्य मागणीचे निवेदन काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना सुपूर्द केले. यावेळी बोलताना युवक काँग्रेस अध्यक्षा डॉ. जयश्रीताई थोरात यांनी लोड शेडिंगमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर आणि सुरक्षिततेवर होणाऱ्या दुष्परिणामांकडे लक्ष वेधले. सायंकाळी शाळा सुटून घरी परतताना अंधार असल्याने हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढतो, तसेच याच वेळेत…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळ आणि संगमनेर तालुका कला शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने रविवारी, (६ सप्टेंबर) आणि सोमवारी, (७ सप्टेंबर) दोन दिवसीय ‘बालकला महोत्सवा’चे भव्य आयोजन करण्यात आले आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे होणाऱ्या या महोत्सवात विद्यार्थ्यांसाठी प्रात्यक्षिकासह मातीकाम, पेंटिंग, ड्रोन ऑपरेटर प्रशिक्षण, वॉटर कलर, संगीत, झुम्बा डान्स, कागदी फुले तयार करणे, थ्रीडी पेंटिंग, डूडल आर्ट, कॅलिग्राफी, बाहुली काम, म्युझियम आणि स्टील ऑन विल प्रशिक्षण यांसारख्या विविध नाविन्यपूर्ण उपक्रमांची रेलचेल असणार आहे, अशी माहिती माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी दिली. काँग्रेसचे वरिष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात…
