Author: Annant Ppangarkar
सोमवार १६ डिसेंबर सासऱ्याला निवृत्तीनंतर मिळालेले पैसे आपल्या नावावर करावे तसेच एक एकर जमीन आपल्या नावावर करावी, या मागणीसाठी सुनेने आणि तिच्या नातेवाईकांनी खोटा गुन्हा दाखल करत दिलेल्या त्रासाला वैतागून नैराश्य आलेल्या सासऱ्याने विष पिऊन आपली जीवनयात्रा संपवण्याचा दुर्दैवी प्रकार राहुरी तालुक्यात घडला आहे. भाऊसाहेब ब्राम्हणे असे दुर्दैवी सासऱ्याचे नाव आहे. याबाबत भाऊसाहेब ब्राम्हणे यांची पत्नी लताबाई ब्राम्हणे (रा. चिंचोलीफाटा, ता. राहुरी) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांनी आपल्या फिर्यादीत म्हटले आहे की, आपले पती हे ए.डी.सी.सी. बँकेत नोकरीला होते. २०१६ साली ते सेवानिवृत्त झाले. मुलगा विशाल याचा विवाह १३ वर्षांपूर्वी चंद्रकांत ओहोळ (रा. फत्याबाद, ता. श्रीरामपूर) यांची मुलगी वर्षा…
सोमवार १६ डिसेंबर न्यूयॉर्क – जगप्रसिद्ध तबलावादक आणि पद्मविभूषण उस्ताद झाकीर हुसेन यांची वयाच्या ७३ व्या वर्षी कॅलिफोर्नियामधील सॅन फ्रान्सिस्कोमध्ये उपचार सुरू असतानाच रविवारी रात्री प्राणज्योत मालवली. त्यामुळे अखेरीस आता तबला अबोल झाला आहे. रविवारी सकाळी त्यांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराशी संबंधित आजारामुळे त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. मात्र, रविवारी रात्री त्यांची तब्येत आणखीन बिघडली आणि त्यांनी शेवटचा श्वास घेतला. पद्मविभूषण, ग्रॅमीसह विविध पुरस्कारांनी सन्मानित … उस्ताद झाकीर हुसेन यांना १९८८ मध्ये पद्मश्री, २००२ मध्ये पद्मभूषण आणि २०२३ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. झाकीर हुसेन यांना तीन ग्रॅमी पुरस्कारही मिळाले होते. उस्ताद झाकीर…
रविवार १५ डिसेंबर नागपूर – सोमवारपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला नागपूर मध्ये प्रारंभ होत आहे. तत्पूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या रामगिरी या शासकीय निवासस्थानी नव्या मंत्र्यांची बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह नव्याने कॅबिनेट व राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेले नवे मंत्री उपस्थित होते. या बैठकीच्या प्रारंभी राज्याचे माजी राज्यपाल एस. एम. कृष्णा यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसा शोक प्रस्ताव मंत्रिपरिषदेने मंजूर केला. शपथविधी सोहळ्यानंतर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राज्य सरकार विरोधकांना देखील सोबत घेऊन काम करेन, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना…
रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटनेचे पडसाद राज्यभरात उमटण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. पोलिसांनी बेकायदेशीर कोंबिंग ऑपरेशन करत अनेक दलित कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करून जेलमध्ये टाकले आहे. त्यातच वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला जामीन मंजूर होऊन देखील त्याचा मृत्यू कोठडीत झाल्याने पोलिसांनी त्याचा खून केल्याचा दलित समाजातील कार्यकर्त्यांचा समज झाला असल्याने सरसेनानी आनंदराज आंबेडकर यांनी सोमवारी (१६ डिसेंबर) महाराष्ट्र बंदची हाक दिली असून संगमनेर बंदचेही आवाहन करण्यात आले आहे. आरपीआयचे कैलास कासार, राम सुरळकर, बापू रणधीर, राम दारोळे, रवी दिवे, आशिष शेळके, विशाल वैराळ, वंचित बहुजन आघाडीचे अजितभाई व्होरा आधी विविध संघटनांच्यावतीने प्रांत अधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज…
रविवार १५ डिसेंबर नागपूर – अखेर रविवारी महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला. नव्या सरकारमध्ये मुंडे बंधू-भगिनीला मंत्रिपदाची संधी मिळाली आहे. मंत्रिमंडळात मंत्र्यांचा अडीच अडीच वर्षाचा फॉर्मुला राहणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राज्यपालांनी नव्या मंत्र्यांना शपथ दिली. नागपूर मध्ये ३३ वर्षानंतर दुसऱ्यांदा शपथविधी समारंभ पार पडत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातून राधाकृष्ण विखे पाटील यांना पुन्हा संधी मिळाली आहे. विखे यांना कोणते खाते मिळते याची आता जिल्ह्यात उत्सुकता लागली आहे. महायुती सरकारमध्ये जिल्ह्यातून विखे एकमेव मंत्री आहेत. आज झालेल्या ३९ मंत्र्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या १९, शिवसेनेच्या ११…
रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – अपघाताच्या ठिकाणी समजावून सांगण्यासाठी गेलेल्या दोघांना सात जणांकडून मारहाण करण्यात आली. या मारहाणीत अभियंत्यासह दोघेजण जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या आरोपींवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकाजवळील पेट्रोल पंपासमोर शनिवारी सायंकाळी साडेसात ते आठ वाजण्याच्या सुमारास झालेल्या अपघातावेळी मिलिंद बबन घुगे आणि अविनाश रोहिदास गुंजाळ हे दोघे समोरच्यांना समजावून सांगण्यासाठी गेले असता त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दोघेही गंभीर जखमी झाले आहे. मारहाणीत आरोपींनी फिर्यादी आणि साक्षीदार यांना टनक वस्तूने, बेल्टने मारहाण केल्याचे समोर आले आहे. तसेच फिर्यादीचा मोबाईल फोडून…
रविवार, १५ डिसेंबर संगमनेर – सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या जन्मशताब्दी निमित्ताने काँग्रेस नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील सर्वसामान्य व आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांसाठी १ जानेवारी २०२५ पासून संगमनेर शहर व तालुक्यातील सर्व गावांमध्ये महाआरोग्य शिबिर राबविण्यात येणार आहे. प्रदीर्घ कालावधीसाठी असणाऱ्या या शिबिराअंतर्गत विविध आजारांची तपासणी तज्ज्ञ डॉक्टरांकडून केली जाणार आहे. या शिबिरात आढळणाऱ्या रुग्णांना पुढील उपचारासाठी एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्या माध्यमातून मोफत आणि अल्पदरात उपचार करण्यात येणार असल्याची माहिती जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी दिली. या आरोग्यशिबिराबाबत अधिक माहिती देताना डॉ. तांबे म्हणाले, एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटलच्यावतीने राज्यातील २७ जिल्ह्यासह संगमनेर…
रोज टीव्ही पाहून त्याला कंटाळा आला होता . तशी इतक्या दिवसांच्या सुट्टीची सवय नव्हती त्याला.. आज त्याने ठरवलं मौन व्रत करायचं.. कुणाशी बोलायचं नाही आणि काहीच करायच नाही.. घरात सगळ्यांना तस सांगूनही टाकल… त्याच्या बायकोला तसा आनंद झाला.. तसही चांगल बोलण ह्यांना माहीतच नाही.. निदान आज कंप्लेंट तरी ऐकायला मिळणार नाहीत असा मनात विचार करून ती मनोमन सुखावली. आज तिने नास्ताला सकाळी डोसा केला मुद्दाम. ह्यांना डोसा आवडत नाही पण आज बोलणार नाहीत ठरवलं आहे, मग काय निदान रागाराग तरी करणार नाहीत. मुलांनी आवडीने डोसा खाल्ला त्यांची आवडती डिश. त्याने ही गुपचूप खायला सुरवात केली. खाताना त्याच्या लक्षात आले. किती…
रविवार, १५ डिसेंबर पुणे – बिटकॉइनमध्ये गुंतवणूक करून जास्तीचा परतावा देण्याचे अमिष दाखवत ७९ गुंतवणूकदारांची सुमारे साडेसात कोटींची आर्थिक फसवणूक केल्याच्या आरोपावरून दोघांसह अन्य दोन अनोळखी व्यक्तीविरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीमध्ये संगमनेरमधील एका आरोपीचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. नितीन रावजी शेळके (रा. नारायणगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नितीन बाळासाहेब पोखरकर (वय ४१, रा. वारूळवाडी, नारायणगाव, ता. जुन्नर, जि. पुणे), राजेंद्र सूर्यभान उपाध्याय (उपाध्ये) (वय ४२, रा. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांच्यासह आणखी दोघा अनोळखी व्यक्तींवर नारायणगाव पोलीस ठाण्यात आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, नारायणगाव व परिसरातील सुमारे ७९ जणांची पीएलसी…
राज्यात आणि देशात सत्तेची तिसरी टर्म प्राप्त केलेला भारतीय जनता पक्ष हा देशातील सर्वाधिक घोडचुका केलेला नशिबवान पक्ष ठरला आहे. सत्तेची सत्तर वर्षं पूर्ण केलेल्या काँग्रेस पक्षाला जे जमलं नाही ते या पक्षाने लीलया करून दाखवलंय. असंख्य दोषांची मालिका भरीस असतानाही तो पक्ष सहज सत्ता मिळवतो आणि तितक्याच रुबाबात तो सत्तेची पाच वर्षं पूर्णही करतो. महाराष्ट्रात त्या पक्षाला जशी पवार कंपनी साथ देते तशी देशात कधी नितीशकुमार, चंद्राबाबू, तर कधी मेहबुबा आणि मायावती त्या पक्षाला तारतात. त्या पक्षाच्या विचारधारेपासून कोसभर दूर असलेले ‘अचानक’ मदतीला धावतात आणि सत्तेत सहभाग घेतात. २०१९ च्या महाराष्ट्रतील निवडणूक निकालानंतर मोक्याची वेळ साधत शरद पवार यांनी…
बाळासाहेब थोरात (माजीमंत्री महाराष्ट्र राज्य) सह्याद्रीच्या पर्वतरांगांनी वेढलेला अकोले तालुका हा पुरोगामी आणि डाव्या विचारांचा. संघर्ष आणि चळवळीतून तयार झालेले मधुकरराव पिचड हे अकोले तालुक्याने राज्याला दिलेले संघर्षशील नेतृत्व. विविध मंत्रिपदाच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरता राज्यभर मोठे काम उभे करताना जलसिंचनाच्या माध्यमातून अकोले तालुका सुजलाम सुफलाम करण्याचे श्रेय हे तालुक्याचे आधारवड असलेल्या मधुकरराव पिचड साहेबांना जाते. अकोले आणि संगमनेर तालुका हे भाऊ-भाऊ म्हणून ओळखले जातात. स्वातंत्र्य प्राप्तीसाठी या तालुक्यांमध्ये अनेक चळवळी झाल्या आणि त्यामुळे डावी विचारसरणी इथे रुजली. सह्याद्री पर्वतांमध्ये वसलेल्या राजूर गावात मधुकरराव पिचड यांचा जन्म झाला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांनी संघर्षातून नेतृत्व घडविले. सुरुवातीला अकोले तालुक्याचे सभापती आणि त्यानंतर ते…
शनिवार, १४ डिसेंबर संगमनेर – शालेय विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच व्यवसाय पूर्व कौशल्य मिळावीत, आपली कार्य संस्कृती आणि आधुनिक व्यवसाय याविषयी माहिती तसेच स्वतःचे करिअर निवडण्यासाठी प्रेरणा मिळावी यासाठी निरोगी व सुदृढ समाज निर्मितीसाठी कार्यरत असलेल्या जय हिंद लोक चळवळीच्या माध्यमातून संगमनेरमध्ये २१ ते २३ डिसेंबर दरम्यान भव्य कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. कला महोत्सवाच्या दरम्यान ७२०० विद्यार्थ्यांना तज्ज्ञांच्या माध्यमातून व्यवसाय पूर्व कौशल्य शिकविली जाणार आहे. महोत्सवादरम्यान २३ डिसेंबरला एकाच वेळी पाचवी ते नववी दरम्यान शिकणारे ७,२०० विद्यार्थी देशभक्तीपर गीतांचे गायन देखील करणार आहे. राज्याचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली होत असलेल्या या भव्य उपक्रमाची माहिती एका पत्रकार…
शनिवार १४ डिसेंबर मुंबई : काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा निवडणुकीतील पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारली असून, आपल्याला पदमुक्त करावे, अशी इच्छा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहून व्यक्त केली आहे. ‘माझ्या प्रदेशाध्यक्षपदाला चार वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यामुळे प्रदेश काँग्रेस कमिटी बरखास्त करून मला पदमुक्त करा’, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला अवघ्या १६ जागा मिळाल्याने काँग्रेसमध्ये आता या पराभवाची कारणमीमांसा सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी शुक्रवारी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे आपल्याला पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. प्रदेश कमिटी बरखास्त करा!… मी मागील ४ वर्षांपासून काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष आहे.…
शनिवार १४ डिसेंबर मुंबई : निवडणुका जवळ आल्या की, भाजपला हिंदुत्वाची आठवण होते. बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार होत आहेत, तेथील मंदिरे जमीनदोस्त करण्यात येत आहेत. तरीही भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मूग गिळून गप्प का? भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे हिंदुत्व गेले कुठे? निवडणुका जवळ आल्या की, मतांसाठी भाजपला हिंदुत्व आठवते, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला. हिंदुत्वावर भाजपची भूमिका काय ते आधी स्पष्ट करावे, असे खुले आव्हानही ठाकरे यांनी नरेंद्र मोदी यांना दिले आहे. बांगलादेशातील गोरगरीब हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुंबईत दादरमधील ८० वर्षे जुने हनुमानाचे मंदिर रेल्वे प्रशासन पाडायला निघाले आहे, आता…
प्रवीण पुरो / मुंबई शुक्रवार १३ डिसेंबर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३.० सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार शनिवारी किंवा रविवारी होण्याची शक्यता आहे. मात्र, महायुतीतील कुठल्या पक्षाला किती खाती मिळणार? कुठली खाती मिळणार? यावरून धाकधूक वाढली आहे. यातच शिंदेंच्या शिवसेनेतून कुणाला संधी मिळणार? याची नावे समोर आली आहेत. प्राप्त वृत्तानुसार, शिंदेंच्या शिवसेनेला ९ कॅबिनेट आणि ३ राज्यमंत्रिपदे मिळतील. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना जे आमदार मंत्री होते, त्यातील काही जणांना वगळून नव्यांना संधी देण्यात येईल, असंही सांगितलं जातं. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत भरत गोगावले आणि संजय शिरसाट यांचा समावेश असेल. यंदा गोगावले यांची कोट घालण्याची इच्छा पूर्ण होईल असं मानलं जातं. अडीच वर्षांच्या कार्यकाळात…
शुक्रवार १३ डिसेंबर सहा वर्षाच्या मुलीसह चित्रपट पाहून स्कुटीवरून घरी परतत असलेल्या संगमनेर महाविद्यालयातील महिला प्रोफेसरला शहरालगतच्या घुलेवाडी फाट्याजवळ चार चाकी वाहनाने दिलेल्या धडकेत माय-लेकी जखमी झाल्या आहे. जखमी मायलेकींवर शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. यासंदर्भात जखमी असलेल्या प्रोफेसर ललिता बाबुलाल मालुसरे सोनवणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून एम. एच. 05 – 8886 या चार चाकी वाहनाच्या अज्ञात चालकाविरोधात मोटर वाहन कायदा आणि भारतीय न्याय संहिता कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, बुधवारी (११ डिसेंबर) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास प्रोफेसर मालुसरे या आपल्या सहा वर्षे वयाच्या मुलीसह घुलेवाडी येथील छोटू महाराज टॉकीजमध्ये चित्रपट पाहून आपल्या स्कुटीवरून गोल्डन…
शुक्रवार १३ डिसेंबर मुंबई – महायुतीच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा फॉर्म्युला निश्चित झाला असून यात भारतीय जनता पक्षाला २१, शिवसेनेला १३ तर राष्ट्रवादी काँग्रेसला ९ मंत्रिपदे मिळणार आहे. नव्या मंत्रिमंडळात ४३ मंत्र्यांचा समावेश असेल. भारतीय जनता पक्षाकडून दिल्या जाणाऱ्या आणि समोर आलेल्या संभाव्य २१ मंत्र्यांच्या नावाच्या यादीत अहिल्यानगरचे माजी मंत्री राधाकृष्ण विखे यांचा समावेश नसल्याचे दिसते. त्यामुळे त्यांच्याकडून आता मंत्रिपदासाठी फिल्डींग लावली जाण्याची चिन्हे निर्माण झाले आहे. भाजप आणि शिवसेनेकडून जिल्ह्याला मंत्रीपद मिळणार असल्याचे चिन्ह असून राष्ट्रवादी काँग्रेस कडून मात्र चेहऱ्याला संधी दिली जाण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्रिमंडळात अनेक नव्या चेहऱ्यांना कॅबिनेट व राज्यमंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे. महायुती…
विशेष प्रतिनिधी / मुंबई गुरुवार १२ डिसेंबर – महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडला आहे. १६ डिसेंबरपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू होत आहे. त्यापूर्वी १४ डिसेंबर रोजी मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे. महायुतीत मंत्रिपदावरून एकमत होत नसल्यामुळे आणि कोणाला किती मंत्रिपद द्यायची? कुठली खाती द्यायची? यावरून एकमत होत नसल्यामुळे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार लांबणीवर पडल्याचं बोललं जातंय. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री पदावर ठाम आहेत. पण भाजपा हे खाते सोडण्याच्या तयारीत दिसत नाही. तर दुसरीकडे शिवसेनेला शांत करण्यासाठी शिंदे यांच्या पक्षाला सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि नगरविकास (UD) खात्यांची…
गुरुवार १२ डिसेंबर संगमनेर – संगमनेरच्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याचा प्रकार समोर आल्यानंतर पोलिसांनी संशयित आरोपींकडे केलेल्या तपासानंतर ही चोरी उघड करण्यात पोलिसांना यश आले. हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मध्ये काम करणाऱ्या रिसेप्शनिस्टने ही चोरी केल्याच्या समोर आले असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तसेच त्याच्याकडून रोकड हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. काय होती घटना – शहरालगत असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब अँड रिसॉर्ट मधून रविवारी सकाळी सात ते मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या दरम्यान व्यवस्थापक सचिन सदाशिव गाडे यांच्या केबिनमधील तिजोरीतून सहा लाख रुपयांची रोकड चोरी गेली होती. यांच्यावर व्यक्त केला होता संशय…
गुरुवार १२ डिसेंबर गेल्या काही दिवसांपासून संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोऱ्या, घरफोड्या सातत्याने सुरू आहे. शहरातील मालपाणी हेल्थ क्लबच्या रिसॉर्टमधून तब्बल सहा लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या संदर्भात रिसॉर्टचे कर्मचारी सचिन सदाशिव गाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गाडे यांच्या तिजोरीत सहा लाख रुपयांची रोकड जमा होती. तिजोरीतील ही रोख रक्कम चोरी गेली आहे. याप्रकरणी तिघा जणांवर संशय व्यक्त करण्यात आला असून त्यांनी ही रोकड चोरल्याचा आरोप आहे. दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी विशाल चंद्रकांत शिंदे, सचिन अशोक काळे व प्रथमेश संजय मिसाळ या तिघांविरुद्ध…
