Author: Annant Ppangarkar

रविवार, ०६ ऑक्टोबर मुंबई : चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीत एकाच कुटुंबातील पाच जणांचा होरपळून मृत्यू झाला. तर अन्य जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आग लागण्यामागील नेमकं कारण स्पष्ट झालं नसलं तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे मंजू प्रेम गुप्ता (३० वर्षे), अनिता गुप्ता (३९ वर्षे), प्रेम गुप्ता (३० वर्षे), परीस गुप्ता (७ वर्षे), नरेंद्र गुप्ता (१० वर्षे) अशी आहेत. समोर आलेली माहिती अशी की, रविवारी पहाटेच्या सुमारास चेंबूरच्या सिद्धार्थ कॉलनीत आग लागली. यामध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला असून यात ७ वर्षांच्या आणि १० वर्षांच्या मुलाचाही समावेश…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर पुणे : पुणे शहरात तसेच परिसरात गेल्या काही दिवसात महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना लक्षात घेता पोलीस विभागाने अधिक सतर्क राहून अत्याचाराच्या घटना रोखण्यासाठी पोलीसांची गस्त वाढवावी असे निर्देश शनिवारी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी पुणे पोलीसाना दिले. पोलीस आयुक्त कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. यावेळी पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, पुणे शहर आणि परिसरात महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. ही बाब अत्यंत चिंताजनक असून पोलीसांनी आरोपींना पकडून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. बोपदेव घाट, दिवे घाट, वेताळ टेकडी, एनडीए परिसर तसेच अन्य निर्जन स्थळी नागरिकांच्या संरक्षणासाठी गस्त वाढवावी.…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोबर निवडणुका आल्या की लोकांच्या भावनेला हात घालायचा हा उद्योग आजचा नाही. लोकांच्या मनावर राज्य करण्यासाठी बेकामी नेत्यांना असे निर्णय हे घ्यावेच लागतात. मात्र अशा निर्णयांची स्वत:ला शुचिर्भूत मानणारे री ओढतात तेव्हा त्याची चिंता अधिक वाटते. मुख्यमंत्र्यांच्या लाडक्या बहिणींसाठी सुरू झालेली १५०० रुपये जमा करण्याची योजना असो वा ६० वर्षांवरील ज्येष्ठाला तीर्थक्षेत्राचं दर्शन असो. जे काम एखाद्या संस्थेने करायचं ते सरकार करू लागल्याने शासन म्हणून गाडा चालायचा कसा, असा साधा प्रश्‍न आहे. बहिणींना काहीही न करता १५०० रुपये देण्याच्या निर्णयाने राज्याच्या तिजोरीवर सुमारे ३५ हजार कोटींचं ओझं निर्माण होऊनही सरकारला आपण काही गैर करतो, असं वाटत नसेल तर…

Read More

रविवार, ०६ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर तुमच्या पार्टनरसोबत बोलण्यासाठी वेळ काढा. तुमच्या कार्यालयातील सहकाऱ्यांना काही गोष्टी समजावून सांगा. व्यावसायिक जीवनात सक्रिय व्हा. बचतीवर भर द्या. अनावश्यक खर्च करू नका. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांचे आरोग्य चांगले राहील. सुख समृद्धी येईल. तुमचे मनोबल उंच राहील. व्यवसायात गुंतवणुकीची चांगली संधी मिळेल. जुन्या गुंतवणुकीतूनही चांगला परतावा मिळेल. कौटुंबिक संबंध सुधारतील आणि आनंदी राहतील. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना आर्थिक परिस्थितीची चिंता आहे, परंतु यावेळी तुम्हाला सतर्क राहावे लागेल. जास्त उत्तेजित होऊ नका. कोणत्याही प्रकारची जोखीम न घेण्याचा प्रयत्न करा. गोष्टी समजून घ्या आणि मग प्रतिसाद द्या.…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर नाशिक – दररोजच्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिकमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशातच या गुंडाराजची प्रचिती गुन्हे शाखेच्या अंमलदाराला आली आहे. आता चाकू घेऊन दहशत माजविणाऱ्या गुन्हेगारास पकडत असताना त्यांनी अंमलदाराच्या पोटात चाकू मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे. नामदेव कारभारी सोनवणे (वय ५७ वर्ष, रा. धात्रक फाटा, आडगाव शिवार) असे हल्ला झालेल्या गुन्हे शाखेच्या पोलीस अंमलदाराचे नाव असून विकी संजय जाधव उर्फ गट्ट्या (रा. अवधूतवाडी, पंचवटी) असे हल्लेखोर संशयिताचे नाव आहे. संशयित विकी जाधव हा हातात चाकू घेऊन शुक्रवारी रात्री अवधूत वाडी परिसरात नागरिकांमध्ये दहशत माजवत होता. रस्त्याने जाणाऱ्या अंमलदार सोनवणे यांनी हा प्रकार…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर मुंबई – राज्यातील कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना २०२३ च्या खरीप हंगामासाठीच्या अनुदान वाटपास सुरुवात झाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील ४ लाख १२ हजार ३७१ शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर या अनुदानाचे १२९ कोटी ४३ लाख २५ हजार रुपये वर्ग करण्यात आले आहे. अनुदान वितरणाचा शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आला. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रत्येकी पाच हजार रुपये अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. राज्यभरात पहिल्या टप्प्यात ४९ लाख ५० हजार खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात २३९८ कोटी ९३ लाख रुपये जमा करण्यात येत आहे. कापूस…

Read More

शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – चोरी गेलेले दागिने मोबाईल परत मिळतील याची कोणतीही आशा उरली नसताना संगमनेर शहर पोलिसांनी मात्र तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे चोरीस गेलेले मोबाईल शोधत ते मूळ मालकांना परत करण्याची दिलासादायक घटना संगमनेरमध्ये समोर आली आहे. तत्कालीन पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि तत्कालीन पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या कार्यकाळातही अशाच प्रकारे मोबाईलचा शोध घेत ते परत करण्यात आले होते. त्याचीच पुनरावृत्ती नव्या अधिकाऱ्यांच्या कार्यकाळात देखील सुरू आहे. मोबाईल गहाळ होण्याच्या तसेच चोरी जाण्याच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसात वाढ झाली आहे. त्यामुळे चोरी जाणाऱ्या मोबाईलचा शोध घेण्याचे आदेश पोलीस उपाधीक्षकांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील शोध पथकाला दिले होते. संगमनेर…

Read More

सण, उत्सवात दागिने घालणे पडतेय महागात… शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – महाराणा प्रताप चौकात शुक्रवारी संध्याकाळी पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भरधाव वेगात आलेल्या दोघा दुचाकीस्वारांनी महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे मिनी गंठण लंपास करण्याचा प्रकार संगमनेरमध्ये समोर आला. नवरात्र उत्सवाच्या पहिल्याच दिवशी घडलेल्या या प्रकारामुळे उत्सवानिमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आहे. दरम्यान या संदर्भात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात कांता भानुदास शिंदे (वय ५८ वर्ष, रा. आनंदनगर कॉलनी, मालदाड रोड पूर्व, संगमनेर, जि. अहमदनगर) या महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात दोघा चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शुक्रवारी (४ ऑक्टोंबर) संध्याकाळी घराबाहेर पडलेल्या महिलेच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे…

Read More

सुसंस्कृत संगमनेरमध्ये नेमकं चाललय काय? शनिवार, ०५ ऑक्टोबर संगमनेर – संगमनेर शहरात पडद्याआडचे कॅफे कल्चर वाढीला लागल्यापासून अनेक उद्योग घडले आहेत. अशा बेकायदेशीर कॅफेमधून अल्पवयीन मुलींसह युवतींवर देखील अत्याचार झाल्याच्या घटना घडल्या आहेत. बेकायदेशीर कॅफे चालवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत असले तरी संगमनेरात असे उद्योग सुरूच असल्याचे उघड होत आहे. आठवडाभरापूर्वी झालेल्या या कारवाईचा माध्यमांना पोलिसांनी सुगावादेखील लागू दिला नाही. शहराच्या कुठल्या आडवाटेला अथवा निर्जन ठिकाणी ही घटना घडली नसून शहरातून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गा लगत असलेल्या उच्चभ्रू नागरिकांच्या वसाहतीत गणेश नगर परिसरातील (अगदी महामार्गावर) घडली. ‘गोंधळ मिसळ’ या दुकानातील एका छुप्या कॅफेवर तत्कालीन पोलीस उपअधीक्षकांच्या पथकाने छापा टाकला आणि त्या…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  शनिवार, दि. ०५ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांचे आरोग्य आज चांगले राहील. घर बदलण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. प्रेम संबंधांमध्ये कोणत्याही प्रकारचा दबाव आणू नका. आज तुमचे मन नवीन कल्पनांनी भरलेले असेल आणि तुम्ही ठरवलेले काम तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त फायदेशीर ठरेल. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांनी आज प्रेम, आशा, सहानुभूती, सकारात्मकता आणि निष्ठा यांसारख्या सकारात्मक भावना अंगीकारण्यासाठी स्वतःला प्रेरित केले पाहिजे. जेव्हा हे गुण तुमच्यात खोलवर रुजले जातात तेव्हा ते नैसर्गिकरित्या प्रत्येक परिस्थितीत सकारात्मकपणे प्रकट होतील. मालमत्तेशी संबंधित व्यवहार यशस्वी होतील आणि फायदेशीर सिद्ध होतील. कोणत्याही प्रकारची फसवणूक टाळा. मानसिक शांतीसाठी अशा कामांपासून दूर राहणे आवश्यक…

Read More

शुक्रवार, ०४ ऑक्टोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा पाऊस पडला. या बैठकीत ३३ मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ करण्यात येणार असल्याचा निर्णय महसूल विभागात घेण्यात आला आहे. तर प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे नुकसान केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास आणि एक लाखाच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. मंत्रिमंडळ बैठकतील ३३ मोठे निर्णय राज्यातील अकृषिक कर पूर्णपणे माफ (महसूल विभाग) महसूल न्यायाधीकरणाच्या अध्यक्ष व सदस्यांसाठी जाहिरातीद्वारे अर्ज मागवणार (महसूल विभाग) दौंड येथे बहुउद्देशीय सभागृह नाट्यगृहासाठी शासकीय जमीन (महसूल विभाग) त्र्यंबकेश्वर तालुक्यातील किकवी प्रकल्पाच्या कामास मान्यता (जलसंपदा विभाग) टेंभू उपसा सिंचन योजनेस स्व.…

Read More

शुक्रवार, ०४ ऑक्टोंबर  आगामी विधानसभा निवडणुका लक्षात घेत राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत जूलैपासून दरमहा दीड हजार रुपये देण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत भाऊबीज म्हणून दोन हप्ते एकत्रित देण्याचा निर्णय सरकारने घेतला असून आता ३००० रुपये बँक खात्यावर जमा होणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत घोषणा केली आहे. भाऊबीज म्हणून दिल्या जाणाऱ्या या पैशात नोव्हेंबर महिन्याचा हप्ता देखील ऑक्टोंबरमध्येच मिळणार आहे. त्यामुळे बहिणींचे दिवाळी सरकार गोड करणार आहे. योजनेअंतर्गत आतापर्यंत पात्र ठरलेल्या लाभार्थी महिलांना तीन हप्ते मिळाले असून त्यांच्या बँक खात्यात ४५०० रुपये जमा झाले आहेत. या महिन्यात यात आणखी तीन हजार…

Read More

शुक्रवार, ०४ ऑक्टोंबर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्यापूर्वीच धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याचा मुद्दा तापला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी शुक्रवारी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. सुदैवाने ते जाळ्यात अडकले. त्यांच्यापाठोपाठ इतर अनेक आदिवासी आमदारही कट्ट्यावर उतरले. महाराष्ट्रातील धनगर समाजाला एसटीचा दर्जा देण्याच्या निषेधार्थ उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे आमदार आणि उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली आहे. मात्र, ते तिसऱ्या मजल्यावरून खाली न पडता जाळीत अडकले. प्राथमिक माहितीनुसार, झिरवाळ हे धनगर समाजाला एसटी कोटा देण्याच्या विरोधात आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, झिरवाळनंतर आणखी काही आदिवासी आमदारांनीही कट्ट्यावर उडी घेतली. धनगर समाजाला एसटी कोट्यातून आरक्षण देऊ नये, असे झिरवळ आणि एसटी…

Read More

शुक्रवार, ०४ ऑक्टोबर अहमदनगर – देशाच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना राज्य परिवहन महामंडळाच्या बसमधून मोफत प्रवास योजना शासनाने सुरू केली असून जिल्ह्यातील सुमारे २ कोटी ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घेतला. तर १२ वर्षावरील महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या ५० टक्के सवलतीत एसटी प्रवासाचा लाभ जिल्ह्यातील ३ कोटी महिलांनी घेतला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १६ ऑगस्ट २०२२ रोजी राज्यातील ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटी बसमधून मोफत प्रवासाची घोषणा केली होती. अमृत ज्येष्ठ नागरिक योजनेचा लाभ राज्यातील सुमारे १५ लाख ज्येष्ठ नागरिकांना होणार असून एसटीच्या शिवनेरीसह सर्व सेवांसाठी ही मोफत प्रवास योजना लागू आहे.…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  शुक्रवार, दि. ०४ ऑक्टोंबर मेष- आज मेष राशीच्या लोकांमध्ये आत्मविश्वासाची कमतरता असेल. तुमचे मन आर्थिकदृष्ट्या अस्वस्थ राहील. तथापि, धीर धरा, अन्यथा नुकसान होऊ शकते. अनावश्यक राग टाळा. व्यवसायात वाढ होईल. मानसन्मान मिळेल. वडिलांच्या तब्येतीवर लक्ष ठेवा. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ आहे. वृषभ- वृषभ राशीच्या लोकांना आज कुटुंबाचा पाठिंबा मिळेल. संयम राखा. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडून सहकार्य मिळेल. कुटुंबातील एखाद्या ज्येष्ठाकडून पैसे मिळू शकतात. मुलांच्या बाजूने आनंदाची चिन्हे आहेत. तुमची आर्थिक स्थिती सुधारेल. व्यावसायिकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ आहे. नोकरी करणाऱ्या लोकांना…

Read More

लाचेचा पहिला हप्ता घेताना नगर जिल्ह्यात भूमी अभिलेखच्या निमतानदारास रंगेहाथ पकडले  गुरुवार, ०३ ऑक्टोंबर अहमदनगर – क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट, नकाशा न्यायालयात सादर करण्यासाठी तक्रारदाराकडे लाच मागणारा पाथर्डीच्या उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालयातील लाचखोर निमतानदारास लाचेचा पहिला हप्ता घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. अहमदनगर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने ही कारवाई केली असून संजय भीमराव मनवरे (वय ५६ वर्ष,रा. भगवाननगर, पाथर्डी, ता. पाथर्डी जि. अहमदनगर) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे. त्याच्याविरोधात पाथर्डी पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराच्या नावे असलेल्या मौजे कासार पिंपळगाव ता. पाथर्डी, जि. अहमदनगर येथील क्षेत्राच्या झालेल्या मोजणीबाबत व मोजणीचा रिपोर्ट व…

Read More

गुरुवार, दि. ०३ ऑक्टोंबर मेष- मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. तथापि, व्यावसायिक कामात व्यस्त राहू शकतात. मित्रांसोबत चांगले संबंध ठेवा. आपल्या आरोग्याबाबत जागरूक राहा. कुटुंबातील एखाद्या महिलेकडून तुम्हाला पैसे मिळू शकतात. वाहनांच्या सोयी वाढू शकतात. आर्थिकदृष्ट्या चांगले राहील. शैक्षणिक क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वृषभ- आज संयमाने कामे पूर्ण करा. शिस्त आणि प्रामाणिकपणाने तुमचे काम करून तुम्ही तुमच्या वरिष्ठांनाही प्रभावित करू शकाल. नोकरीमध्ये तुम्हाला काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. कामात वाढ होईल. आरोग्याची काळजी घ्या. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रियजनांची साथ असेल. आर्थिकदृष्ट्या तुम्ही चांगली कामगिरी कराल. मिथुन- मिथुन राशीच्या लोकांना…

Read More

बुधवार, २ ऑक्टोंबर  वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्काराने डॉक्टर प्रशांत बबनराव नाईकवाडी यांचा रविवारी मुंबईत राज्यपाल सीपी राधाकृष्णन, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सपत्नीक सन्मान करण्यात आला. नाईकवाडी यांना २०२० या वर्षीचा वसंतराव नाईक शेती मित्र पुरस्कार नुकताच जाहीर झाला होता. कृषि क्षेत्रात संघटनात्मक कार्य करणा-या व्यक्तीला हा पुरस्कार देण्यात येतो. सेंद्रिय शेतीतील राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील आजवरच्या कामगिरीसाठी हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला. नाईकवाडी यांचे सेंद्रिय तसेच अवशेष मुक्त शेतीतील कार्य हे संपूर्ण राज्याला दिशादर्शक असल्यामुळे त्यांची निवड ह्या पुरस्कारासाठी झाली. मुंबईत झालेल्या पुरस्कार वितरणावेळी कृषिमंत्री धनंजय मुंडे, राज्याच्या कृषी विभागाच्या प्रधान सचिव जयश्री भोज, राज्याचे कृषी…

Read More

बुधवार, २ ऑक्टोंबर  पुण्यात हेलिकॉप्टर कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. बावधन परिसरात घडलेल्या या घटनेत तिघा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे वृत्त समोर आले आहे. पुणे पोलिसांच्या मदतीने घटनास्थळी रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून धुक्यामुळे हेलिकॉप्टर कोसळल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, पुण्याच्या बावधन बुद्रुक मध्ये हेलिकॉप्टर कोसळण्याची ही घटना घडली आहे. गेल्या दोन दिवसांपासून पुण्यात धुक्याची चादर पसरली असून या धुक्यामुळेच हा अपघात झाल्याचा अंदाज आहे. या घटनेचा एक व्हिडिओही समोर आला आहे. या आधीही मुळशीमध्ये अशा प्रकारची दुर्घटना घडली होती. मात्र त्यात कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नव्हती. पुण्यातील ऑक्सफर्ड काऊंटी रिसॉर्टच्या हेलिपॅडवरुन या हेलिकॉप्टरने सकाळी साडेसात वाजता…

Read More

बुधवार, २ ऑक्टोंबर  महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला पैसे द्यावे लागत असल्याने अनुदानांच्या पैशांची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांनीही सरकारवर यापूर्वी टीका केली होती. उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असू द्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवले पाहिजे. सरकार हे ‘विषकन्या’ असते. ज्यांच्याबरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरवशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचे आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरवसा नसतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले…

Read More