Author: Annant Ppangarkar
बुधवार, २ ऑक्टोंबर महायुती सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेला पैसे द्यावे लागत असल्याने अनुदानांच्या पैशांची शाश्वती नाही. त्यामुळे गुंतवणूकदारांनी सरकारच्या भरवशावर राहू नये, असे वक्तव्य केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर येथे केल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. दरम्यान या योजनेवरून विरोधकांनीही सरकारवर यापूर्वी टीका केली होती. उद्योगांसंदर्भात आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. कोणत्याही पक्षाचे सरकार असू द्या. गुंतवणूकदारांनी सरकारला बाजूला ठेवले पाहिजे. सरकार हे ‘विषकन्या’ असते. ज्यांच्याबरोबर जाते त्यांना बुडवते. तुम्ही त्यांच्या भरवशावर राहू नका. तुम्हाला अनुदान घ्यायचे आहे घ्या. मात्र, अनुदान कधी मिळेल, कधी नाही याचा काहीही भरवसा नसतो, असे नितीन गडकरी यांनी म्हटले आहे. ते पुढे म्हणाले…
बुधवार, दि. ०२ ऑक्टोंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा दिवस असेल. नवीन काम सुरू करणे तुमच्यासाठी चांगले राहील. अविवाहित लोकांच्या आयुष्यात नवीन पाहुणे येऊ शकतात. तुमचे उत्पन्न वाढल्याने तुमच्या आनंदाला सीमा राहणार नाही. प्रेम जीवन जगणारे लोक खूप रोमँटिक मूडमध्ये असतील आणि त्यांच्या जोडीदारावर प्रेम व्यक्त करण्यासाठी नवीन मार्ग स्वीकारतील. तुम्हाला तुमच्या कौटुंबिक समस्यांपासूनही बऱ्याच अंशी आराम मिळेल. तुम्ही तुमच्या आईला तिच्या मातृपक्षातील लोकांना भेटण्यासाठी घेऊन जाऊ शकता. वृषभ – आज तुम्हाला तुमच्या आरोग्याकडे पूर्ण लक्ष देण्याची गरज आहे आणि व्यवसायात कोणतीही मोठी जोखीम घेऊ नका, कारण त्यात नंतर अडचणी येण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीबाबत काही चांगले लाभ मिळू…
राज्यभरातील १२ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवार, ०१ आक्टोंबर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य पोलीस दलात पुन्हा एकदा बदल्यांचे सत्र सुरू झाले आहे. काही दिवसांपूर्वीच अहमदनगरच्या पोलीस मुख्यालयातून संगमनेरच्या डीवायएसपी पदाचा तात्पुरता पदभार घेतलेल्या हरीश दत्तात्रय खेडकर यांची नाशिकला बदली झाली असून त्यांच्या जागेवर कुणाल शंकर सोनवणे यांची शासनाने बदली केली आहे. खेडकर आणि सोनवणे यांच्यासह राज्यातील बारा पोलीस उपाधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. गेल्या काही दिवसांपासून नियुक्तीच्या प्रतीक्षेत असलेल्या कुणाल सोनवणे यांची संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर तत्कालीन पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची बढतीवर दौंडला बदली झाल्यानंतर त्यांच्या रिक्त जागेवर संगमनेरचा पदभार हरीश खेडकर यांच्याकडे सोपविण्यात आला…
मंगळवार, ०१ आक्टोंबर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डीक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये लांबविण्याचा प्रकार सोमवारी दुपारी संगमनेरमध्ये समोर आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वर्दळीच्या लिंक रोड रस्त्यावर घडलेल्या या घटने संदर्भात अधिक माहिती अशी, जेधे कॉलनी येथील आकाश कैलास जेधे या तरुणाने यासंदर्भात मंगळवारी (०१ आक्टोंबर) संगमनेर शहर पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, सोमवारी (३० सप्टेंबर) दुपारी एक ते सव्वा वाजण्याच्या दरम्यान शहरातील नवीन नगर रस्त्यालगतच्या लिंक रोड येथे असलेल्या एचडीएफसी बँकेबाहेर इलेक्ट्रिक स्कुटीच्या डिक्कीमध्ये ठेवलेले दोन लाख रुपये अज्ञात चोरट्याने स्वतःच्या फायद्यासाठी चोरून नेले आहे. या संदर्भात संगमनेर…
मंगळवार, ०१ ऑक्टोबर मुंबई – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या नायर रुग्णालयातील लैंगिक छळवणुकीच्या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या प्रकरणी कठोर कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले असून पीडितांना न्याय मिळवून देण्याची खात्री दिली आहे. डीनच्या बदलीचे तसेच विशेष चौकशी समिती नेमण्याचे आदेश… मुख्यमंत्र्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना रुग्णालयाच्या डीनची तात्काळ बदली करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी एका विशेष समितीची स्थापना करण्यात येणार आहे. रुग्णालयातील कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी अतिरिक्त उपाययोजना राबवण्यात येतील, अशा सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणाले, “आरोग्य क्षेत्रातील अशा घटना अत्यंत गंभीर आहेत. आम्ही या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कडक…
कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांची संकल्पना मंगळवार, ०१ ऑक्टोंबर यशवंतराव चव्हाण यांचा वारसा सांगणाऱ्या आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून आणि युवा नेत्या डॉ. जयश्री थोरात यांच्या संकल्पनेतून तरुणांना विविध स्पर्धा परीक्षा व वाचनाकरता अद्यावत सुविधा उपलब्ध व्हाव्या याकरता राज्यातील आदर्शवत प्रकल्प राबवताना तालुक्यातील नऊ गावांमध्ये अद्यावत अभ्यासिका व ग्रंथालय होणार आहे. संगमनेर हे गुणवत्तापूर्ण शिक्षणाचे केंद्र झाले असून अनेक युवक व युवतींना स्पर्धा परीक्षा व इतर परीक्षांसाठी अभ्यासाची चांगली सुविधा व्हावी. तसेच तालुक्यातील युवकांमध्ये वाचन संस्कृती वाढीस लागावी याकरता तालुक्यात नऊ गावांमध्ये युवा संवाद केंद्र अभ्यासिका ग्रंथालय आणि ई लायब्ररी उभारण्यात येणार आहे. येथे होणार अभ्यासिका व ग्रंथालय… कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री…
मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कोल्हापूर : जगभरात भारताची होत असलेली प्रगती आणि सांस्कृतिक पुनरुत्थान हे पाहवत नसल्यानं हिंदूविरोधी वातावरण तयार करण्याचं षडयंत्र रचलं जात असल्याचा आरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. कोल्हापुरात कणेरी इथं सिद्धगिरी मठात आयोजित संत समावेश या कार्यक्रमात ते बोलत होते. फडणवीस म्हणाले, हिंदू विरोधाच्या मुकाबल्यासाठी आता संतशक्तीनं पाठबळ द्यावं. लोकसभा निवडणुकीत महायुतीला व्होट जिहादचा फटका बसला असल्याचे स्पष्ट करत ते म्हणाले, लोकसभेच्या ४८ पैकी १४ जागांवर व्होट जिहाद झाल्याचं दिसून आलं. ठराविक वर्गातील लोकांनी हिंदुत्ववादी उमेदवाराला पाडण्यासाठी मतदान केलं. धुळ्यात पाच विधानसभा मतदारसंघात भाजपचा उमेदवार जवळपास दोन लाखांनी आघाडीवर होता. पण मालेगावमध्ये दुसऱ्या उमेदवाराला १.९४ लाख मते…
मंगळवार, ०१ ऑक्टोंबर कळस :- अकोले तालुक्यातील कळस खुर्द येथे निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याच्या आवर्तनामुळे मोठ्या प्रमाणात पाणी शेतांमध्ये आणि घरांमध्ये शिरले आहे. मात्र जलसंपदा विभागाने याकडे साफ दुर्लक्ष केले असून आदिवासी समाजाने आंदोलनाचा इशारा दिला आहे. गेले एक महिन्यापासून निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्याद्वारे पूर्व भागातील शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे, परंतु त्यामुळे जमिनीचे पृष्ठभाग उपळून आले असून शेतांमध्ये उभे पिक पाण्यात बुडाले आहे. अनेक शेतकऱ्यांची शेती उद्ध्वस्त झाली असून पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी समाजाच्या घरांमध्ये पाणी शिरल्यामुळे त्यांचे जीवन विस्कळीत झाले आहे. घरातून पाणी बाहेर काढण्यासाठी लोक जीवाचे रान करत आहेत. स्वयंपाक करायची आणि झोपायची सोय उरली…
मंगळवार, दि. ०१ ऑक्टोंबर मेष – आज तुम्ही शत्रूंपासून सावध राहा आणि कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नका. कुटुंबाकडून तुमच्याकडून काही अपेक्षा असतील, ज्या पूर्ण करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल. नशीब तुमच्या सोबत असेल, पण तुम्हाला थकवा आणि आळस येऊ शकतो. वृषभ – जर तुम्ही पैसे गुंतवले असतील तर तुम्हाला आज नफा मिळण्याची शक्यता आहे, परंतु खर्चही वाढू शकतात. अडकलेला पैसा परत येऊ शकतो आणि चैनीच्या कामांवर खर्च होईल. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणा टाळा. मिथुन – जर तुमचे काही दिवसांपासून एखाद्याशी चांगले संभाषण होत असेल तर ते संभाषण आज थांबू शकते. तुम्ही बोलता त्या व्यक्तीला राग येऊ शकतो, ज्यामुळे संवाद…
सोमवार, ३० सप्टेंबर राज्य सरकारच्या माध्यमातून सुरु असलेल्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत तालुक्यातील लाभार्थ्यांना ऑगस्टअखेरचे २ कोटी ५५ लाख ५५ हजार ८०० रुपये महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नांमुळे लाभार्थी खात्यात आज वर्ग करण्यात आले आहे, अशी माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. संजय गांधी निराधार अनुदान योजना सर्वसाधारण ५७२५ लाभार्थ्याना ८४ लाख ३८ हजार १०० रुपये, अनुसूचित जातीच्या ६२७ लाभार्थ्याना ९ लाख ३२ हजार ७०० रुपये, अनुसूचित जमातीच्या २५५ लाभार्थ्यांना ३ लाख ७९ हजार ५०० रुपये, श्रावणबाळ गट ब सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेच्या सर्वसाधारण ५२६१ लाभार्थ्यांना ७८ लाख ९१ हजार…
सोमवार, ३० सप्टेंबर दिल्ली – दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या सहाय्यक, आम आदमी पक्षाच्या नेत्या आणि माजी नगरसेविका निशा सिंग यांना २०१५ च्या एका खटल्यात दोषी ठरविण्यात आले असून हिंसा भडकवल्याबद्दल त्यांना न्यायालयाने सात वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. हरियाणा नागरी विकास प्राधिकरणाच्या अतिक्रमण विरोधी पथकाविरुद्ध हिंसक जमाव भडकविल्याबद्दल आणि त्यानंतर जमावाने गुडगावमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकले होते. २०१५ च्या या खटल्यात निशा सिंग यांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश मोना सिंग यांच्या न्यायालयाने गुरुवारी दोषी ठरविले. मोना सिंग यांच्या न्यायालयाने या खटल्यात निशा सिंग यांच्यासह अतिक्रमण विरोधी पथकावर हल्ला केल्याच्या आरोपाखाली दहा महिलांसह सतरा जणांना दोषी ठरविले. या खटल्यात दहा रुपयांना…
सोमवार, ३० सप्टेंबर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षात घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षाची महत्त्वपूर्ण बैठक संगमनेरमध्ये मंगळवारी (१ ऑक्टोंबर) आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस शहर व तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन संगमनेर शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केले आहे. पडताणी कॉम्प्लेक्समध्ये दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होत असून विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मतदार संघात या बैठकीत महत्त्वपूर्ण चर्चा केली जाणार आहे. संगमनेर तालुका अध्यक्ष आशिष शेळके, तालुका कार्याध्यक्ष विजूभाऊ खरात, शहराध्यक्ष कैलास कासार आदी पदाधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक होत आहे. बैठकीसाठी युवक अध्यक्ष योगेश…
सोमवार, दि. ३० सप्टेंबर मेष- आज तुमचा आत्मविश्वास जास्त असेल, ज्यामुळे तुम्ही तुमची कामे वेगाने पूर्ण कराल. कामाच्या ठिकाणी तुमच्या निर्णयांचे कौतुक होईल. आर्थिक बाबतीत थोडे सावध राहा, पण उत्पन्नात सुधारणा होण्याची चिन्हे आहेत. वृषभ- आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचा आणि समर्पणाचा तुम्हाला फायदा होईल. आर्थिक स्थिती सुधारेल आणि नवीन योजना समोर येऊ शकेल. मिथुन- आजचा दिवस तुमच्यासाठी सर्जनशीलता आणि नवीन कल्पनांनी परिपूर्ण असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कलागुणांचे कौतुक केले जाईल आणि तुम्ही नवीन प्रकल्पांमध्ये सहभागी होऊ शकता. आर्थिक बाबतीत स्थैर्य राहील, पण फालतू खर्च टाळा. कर्क- आज तुमच्यासाठी आत्मपरीक्षण करण्याचा आणि तुमच्या योजनांचे…
रविवार, २९ सप्टेंबर एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रकार नगरच्या बोल्हेगावमधील गांधीनगरमध्ये समोर आला आहे. पिडीत मुलीच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चेतन संतोष सरोदे (रा. नगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलगी शालेय अभ्यासाविषयीच्या झेरॉक्स काढण्यासाठी घराबाहेर पडली होती. पीडित मुलगी घराबाहेर पडल्याची संधी साधत आरोपीने तिच्या पाठलाग केला. तसेच रस्त्यात तिला गाठत आपल्या दुचाकीवर बसण्याची जबरदस्ती देखील केली. मात्र पीडित मुलीने आरोपीच्या दुचाकीवर बसण्यास नकार दिल्याने आरोपीने तिला शिवीगाळ करत बळजबरीने दुचाकीवर बसवत बोल्हेगावच्या गांधीनगर परिसरात नेले. तेथे असलेल्या एका खोलीत नेत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर याबाबत कोणाला काही सांगू नको, कोणाला काही…
रविवार, २९ सप्टेंबर अहमदनगर – जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने नाशिक विभागात माझी वसुंधरा अभियान ४.० मध्ये सर्वोत्तम कामगिरी करीत ४ नगर परिषदांनी व महानगरपालिकेने पुरस्कार मिळविल्याने पर्यावरण आणि वातावरणीय बदल विभागाचे प्रधान सचिव प्रवीण दराडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांचे पत्राद्वारे अभिनंदन केले आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याने भूमी, वायू, अग्नी, जल आणि आकाश या पाचही घटकात चांगली कामगिरी केली. घनकचरा आणि सांडपाणी व्यवस्थापन, सौर ऊर्जेचा उपयोग, एलईडी दिव्यांचा उपयोग, वृक्षारोपण, वॉटर ऑडिट, जल प्रदूषण कमी करणे, नागरिकांचा स्वच्छतेत सहभाग, वायू प्रदूषण मुक्ती, जनजागृती आदी क्षेत्रात विविध उपक्रम राबविले. नुकताच वसुंधरा अभियान ४.० चा निकाल जाहीर करण्यात आला. यात…
रविवार, २९ सप्टेंबर बदलापूर येथे बालवाडीच्या चार वर्षीय दोन चिमुरड्या मुलींच्या अत्याचार प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे जेलमध्ये होता, त्याच्या पहिल्या पत्नीने लैंगिक अत्याचाराच्या केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याकरता तळोजा कारागृहातून त्याला वारंट घेऊन बदलापूरकडे नेण्यात येत होते. त्याने पहिल्यांदा पोलिसांची बंदूक घेऊन फायर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी स्वत:च्या बचावासाठी त्याच्यावर गोळ्या झाडल्या त्या गोळीबारात अक्षय गंभीर जखमी झाल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले पण उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. एनकाउंटरची बातमी मिडियावर प्रसिद्ध होताच संपूर्ण बदलापूरमध्ये लोकांनी फटाके वाजून दिवाळी साजरी केली, दुसरीकडे ज्या विरोधी पक्षांनी बदलापूर अत्याचार प्रकरणांत पोलीस यंत्रणेवर आरोप करून आरोपींला फाशीची तात्काळ शिक्षा दया, नाहीतर आरोपीला आमच्या…
रविवार, दि. २९ सप्टेंबर मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी थोडा आव्हानात्मक असू शकतो, परंतु तुम्ही संयमाने आणि समजूतदारपणे काम केल्यास यश मिळेल. करिअरमध्ये प्रगतीची आशा आहे, परंतु त्याचवेळी जबाबदारीचे ओझेही वाढेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मानसिक शांती मिळेल. आरोग्याची काळजी घ्या, तणावापासून दूर राहा. आज कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेणे टाळा. प्रवासाची शक्यता आहे, परंतु सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत हुशारीने गुंतवणूक करा. आज तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील. ऑफिसमध्ये कामाचा दबाव वाढू शकतो, पण मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. घरगुती प्रकरणांमध्ये शांतता राहील आणि तुम्हाला कुटुंबासोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल. एखाद्या जुन्या मित्राची भेट…
रविवार, २९ सप्टेंबर गुन्हा कुठलाही असो, २६/११ चा मुंबईवरील अतिरेकी हल्ला असो, की त्याआधी मुंबईत झालेले सिरियल बॉम्बस्फोट असोत किंवा गँगरेप असो, आरोपीला एक्सपोज करणं, त्याच्या साथीदारांच्या मुसक्या आवळणं हे तपास यंत्रणेचं काम असतं. कोणत्याही गुन्ह्यात सामील असलेल्यांना लागलीच यमसदनी पाठवणं पोलिसांना अडचणीचं कधीच नसतं. मुंबई पोलिसांमधल्या जाँबाज चार अधिकार्यांना जिवे मारणार्या अजमल कसाब याला तर पोलिसांना जागीच ठार करता आलं असतं. पण या मागचा पाकिस्तानचा हात उघड झाला नसता. असे पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी खरं तर पोलिसांनी काळजी घेतली पाहिजे. पण कधीकधी पोलीस होत्याचं नव्हतं करतात. बदलापूर घटनेतील आरोपी असलेल्या अक्षय शिंदे याला एका गोळीत संपवणार्या पोलिसांना कोणाला…
शनिवार, २८ सप्टेंबर मुंबई: केंद्रीय निवडणूक आयोगाने नुकताच विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ११ पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा केली. शिवाय राज्यातल्या निवडणूक तयारीचा आढावाही घेतला. राज्यात २८८ विधानसभा मतदार संघ असून निवडणुकीला जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावे यासाठी आयोगाचे प्रयत्न असल्याचे सांगत शहरी भागात होत असलेल्या कमी मतदानाबद्दल मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी चिंता व्यक्त केली. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल अशी अपेक्षा होती मात्र, पत्रकार परिषदेत निवडणुकीची घोषणा करण्यात आली नाही. निवडणुकीसंबंधी घोषणा लवकरच पत्रकार परिषदेतूनच करू असेही त्यांनी स्पष्ट केले. राज्यात पुरुष मतदारांची…
शनिवार, २८ सप्टेंबर भारतीय जनता पक्षाचे नेते शेखर चंदेल यांचा मृतदेह छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाजवळ आढळून आला. यामुळे खळबळ उडाली असून ही हत्या आहे की आत्महत्या याबाबत पोलिसांनी तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार चंदेल हे माजी विरोधी पक्षनेते नारायण चंदेल यांचे धाकटे बंधू असून ते राजकारणात सक्रिय होते. चंदेल रात्री साडेआठ वाजता आपल्या राईस मिल मधून पायी निघून मोबाईलवर बोलत बोलत ते जात असल्याचे सांगितले जाते. शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास छत्तीसगडच्या नाईला रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक तीन आणि न्यायला केबिन दरम्यान अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांना या संदर्भात माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.…
