Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज वर्धा : रखडलेल्या कामाविषयी विचारणा केल्याने आमदार रणजीत कांबळे यांच्याकडून ग्रामपंचायत सदस्याला मारहाण करण्याचा प्रकार घडला होता. ग्रामपंचायत सदस्याच्या तक्रारीवरून आमदार कांबळे यांच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वर्ध्यातील देवळी तालुक्यामधील सोनेगाव ग्रामपंचायतचे सदस्य गणेश सातव यांनी गावातील एका भूमिपूजन कार्यक्रमावेळी आमदार कांबळे यांना रखडलेल्या कामाविषयी विचारणा केली होती. या कामाचे भूमिपूजन तीन वर्षांपूर्वी झाले तरीही अद्याप काम सुरू झाले नाही याबद्दल सातव यांनी नाराजी व्यक्त केल्याने कांबळे यांनी त्यांना मारहाण केली. कांबळे काँग्रेसचे आमदार असल्याने मारहाणीच्या प्रकरणानंतर भारतीय जनता पक्षाने हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला होता. कार्यकर्त्याला न्याय मिळायला हवा, अशी मागणी खासदार रामदास तडस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली होती. यातील एक आरोपी तब्बल महिनाभर पोलिसांच्या कस्टडीत आणि ताब्यात असताना देखील न्यायालयासमोर पोलीस या आरोपीचा सहभाग सिद्ध करू शकले नाही, जी गोष्ट पोलिसांना सहज उपलब्ध झाली असती ती पोलीस तपासामध्ये कोठेही न आल्याने जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने अटकेत असलेल्या आरोपीचा जामीन मंजूर केला. या घटनेमुळे पोलीस तपास संशयाच्या भोवऱ्यात सापडला आहे. घटनेतील दोन आरोपी अद्यापही तुरुंगात असून एक-एक करत पाच आरोपी जामिनावर मुक्त झाले तर एक आरोपी अद्यापही पोलिसांना सापडू शकलेला नाही. दरम्यान यातील एक आरोपी जामिनावर मुक्त करताना न्यायालयाने तपासा संदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष @ प्रवीण पूरो नियतीची चक्र कशी फिरत असतात याचा धडा सध्या भाजप घेत आहे. याला कोणी कर्माचं फळ म्हणो वा नियतीचं चलचक्र. पापाचा घडा हा कधी तरी भरतोच. ती कोणत्या रुपात येतील हे कोणीही सांगू शकत नाही. केलेल्या पापांची फळं कधी तरी भोगाल, असे शाप महाराष्ट्रातल्या असंख्य राजकारण्यांनी भाजपच्या डोक्यावर फोडले आहेत. आज त्याची प्रचिती या पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना येत असेल. यावेळी निमित्त झालंय ते गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनाचं. आरक्षणात खोडा घातल्याचे सारे दोष आपल्यावर येतील, असं त्या पक्षाच्या नेत्यांनी जराही मनात आणलं नसेल. आज ते घडतंय हे मात्र त्यांना मान्यच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आपल्या दिशादर्शक कामातून राज्यातील सहकारी साखर कारखानदारीसाठी मापदंड ठरलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या 57 व्या गळीत हंगामात उत्पादित झालेल्या पहिल्या साखर पोत्याचे पूजन रविवारी (ता. 5 नोव्हेंबर) माजी मंत्री काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते दुपारी साडेचार वाजता करण्यात येणार आहे. अशी माहिती कारखान्याचे कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी दिली. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहणार असून नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहे. यावेळी आमदार सत्यजित तांबे, बाजीराव खेमनर, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, सुधाकर जोशी, रामहरी कातोरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ज्यांनी अवैध धंद्यांवर लगाम आणायचा त्यांनीच हप्तेखोरी करत अवैध व्यावसायिकांशी हात मिळवणी केल्याने संगमनेरमधील अवैध व्यावसायिक मुजोर बनले आहेत. त्यामुळे या व्यावसायिकांवर कारवाईसाठी नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांच्या विशेष पथकाला लक्ष घालावे लागले. “आमचे कोणीच काही वाकडे करू शकत नाही”, या तोऱ्यात असलेल्या सटरफटर व्यावसायिकांवर त्यांनी केलेल्या किरकोळ कारवाईचे वृत्त प्रसिद्ध केल्याने अवैध व्यावसायिकाकडून सायं दैनिकाच्या संपादकाला दमदाटी, शिवीगाळ करण्याचा प्रकार घडला आहे. संगमनेरमधील दैनिक प्रवरातीरचे संपादक धीरजसिंह ठाकुर यांनी यासंदर्भात संगमनेर शहर पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विजय भागवत उर्फ बुट्ट्या आणि देवा दाजी पूर्ण नाव माहित नाही या दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या 81 कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणातील सहआरोपी व अटकेमध्ये असलेल्या कॅशियर उत्तम लांडगे याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. दरम्यान या प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी केवळ व्यवस्थापकाला अटक झाले असून उर्वरित सर्व आरोपी बाहेर आहेत. मुख्य आरोपींपैकी काहींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले तर काहींना जामीन मिळाला आहे. व्हाईट कॉलर पुढारी आणि दूधगंगा पतसंस्थेचा अध्यक्ष असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या कुटुंबातील सहा व्यक्तींसोबत एकूण 15 जणांवर तब्बल 81 कोटी रुपयांचा अपहार केल्याचा तर या अपहाराला सहाय्य केल्याचा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 19 ऑगस्टला गुन्हा दाखल करण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : शे-पन्नास रुपयांची लाचखोरी आता तब्बल कोटीच्या घरात गेली आहे. लाचखोरीचे ग्रहण एमआयडीसी अधिकाऱ्यांनाही लागल्याचे समोर आले असून अहमदनगर येथील सहाय्यक अभियंता अमित किशोर गायकवाड (वय 32, रा. प्लॉट नंबर 2, आनंदविहार, नागापूर, अहमदनगर मूळ रा. चिंचोली ता. राहुरी) याला तब्बल एक कोटी रुपयांची लाच स्वीकारताना नाशिकच्या एसीबीने रंगेहात पकडले आहे. गायकवाड याने लाचेची रक्कम स्वतःसाठी व तत्कालीन उपविभागीय अभियंता गणेश वाघ यांच्यासाठी स्वीकारली असल्याची माहिती देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर येथील शासकीय ठेकेदाराने नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली होती. शुक्रवारी केलेल्या या कारवाईबाबत गोपनीयता बाळगली होती. नाशिक विभागात झालेली ही सर्वात मोठी कारवाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : केंद्र शासनाच्या आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व राज्य सरकारच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या एकत्रित अंमलबजावणीसाठी केंद्रात असलेल्या डॉ. ओमप्रकाश शेटे यांना पुन्हा महाराष्ट्रात बोलाविण्यात आले आहे. डॉ. शेटे यांच्याकडे राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेमध्ये सुसूत्रता व सुधारणा करण्यासाठी या नवीन अभियानाची धुरा देण्यात आल्याचं समजते. डॉ. शेटे हे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू समजले जातात. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्ष व केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांचे सहाय्यक खासगी सचिव राहिलेल्या डॉ. शेटे यांनी तत्कालीन भाजप-शिवसेना सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाच्या माध्यमातून फडणवीस सरकारची प्रतिमा घराघरात पोहोचविण्याचे काम केले होते. दिवस-रात्र काम करत साडेचार वर्षाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाने (राजहंस दूध) दीपावलीच्या अगोदरच दूध दर फरक, दुधाचे पेमेंट, दूध वाहतूक ठेकेदारांचे पेमेंट, अनामत, कामगारांचा बोनस, मेहनताना, पगार, व्यापारी देणे, चढ-उतार निधी असे एकूण 35.66 कोटी रुपये संबंधितांच्या खात्यावर बँकेत वर्ग करण्यात आल्याची माहिती दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली. देशमुख म्हणाले, थोर स्वातंत्र्य सेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर आमदार थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल करणाऱ्या राजहंस दूध संघाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्याची ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत झाली. दूध संघाच्या माध्यमातून सातत्याने शेतकरी व नागरिकांना मदत करण्यात आली. थोरात यांच्याच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर : संगमनेर तालुका विज्ञान गणित संघटनेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आले आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुका विज्ञान संघाच्या अध्यक्षपदी मनोज ऊपरे व सचिवपदी दत्तात्रय खरात यांची तर गणित अध्यापक संघाच्या अध्यक्षपदी बाळासाहेब राऊत व सचिवपदी अनिल वाकचौरे यांची निवड करण्यात आली. संगमनेर तालुका विज्ञान गणित अध्यापक संघाची बैठक राज्य विज्ञान महामंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय आरोटे यांच्या अध्यक्षतेखाली संगमनेर मधील दिगंबर गणेश सराफ विद्यालयात पार या बैठकीसाठी पुढील तीन वर्षासाठी कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे. याच बैठकीमध्ये अध्यक्ष सचिवांसह संपूर्ण कार्यकारिणीची निवड करण्यात आली असून निवडण्यात आलेली विज्ञान संघाची कार्यकारिणी पुढील प्रमाणे : प्रताप जोंधळे (उपाध्यक्ष),…

Read More