Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी  बुधवार संगमनेरकरांसाठी दुर्घटनावर ठरला आहे. शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लबच्या मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजला आग लागून एक जण या आगीत गंभीर जखमी झाल्याच्या प्रकार घडला असताना शिवजयंतीसाठी महायुतीने बस स्थानकासमोर उभारलेली कमान कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. जागेवरून झालेल्या दोन गटातील वादानंतर सोमवारी संगमनेर मध्ये भव्य दिव्य शिवजयंती साजरी झाली. मोठ्या संघर्षानंतर दोन्ही गटांना प्रशासनाने दोन ठिकाणी परवानगी दिली होती. महायुतीने परवानगी दिलेल्या जागेवर किल्ला तर शिवजयंती उत्सव समिती स्वाभिमानी संगमनेर शहर तालुका यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला होता. शिवजयंती झाल्यानंतर हे देखावे…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी  कासारवाडी शिवारात असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब येथील विवाह समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या मालपाणी पॅलेस मध्ये उभारण्यात आलेल्या स्टेजला बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एक जण बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, नगरपरिषद आणि हजर झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी स्टेज उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरच्या निर्माण झालेल्या ज्वालांमुळे थर्माकोलने पेट घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मालपाणी पॅलेसचा वापर विवाह समारंभासह अन्य काही कारणांसाठी केला जातो. बुधवारी दुपारी पॅलेसच्या…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी बौद्ध धर्मीयांचे महाविहार, लेणी, दीक्षाभूमी ही ठिकाणे बौद्धांच्या ताब्यात नसून ही सर्व बौद्ध स्थळे भारतीय बौद्ध महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. बौद्ध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उत्कर्षाताई रुपवते, चंद्रकांत पवार, राजू मुन्तोडे, रामदास भालेराव, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, रवींद्र भालेराव, विशाल रुपवते, संगिता मिसाळ, शकुंतला जाधव, गौतम रोहम, संध्या खरे, सुनिता भालेराव, वैभव मोकळ आदी उपस्थित होते. यावेळी उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, अशोक सम्राट यांनी ८४ हजार स्तुप बांधले. यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  पुणे, दि. १९ मार्च –  ऐन रंगपंचमीच्या दिवशी पुण्याच्या पिंपरी-चिंचवडमध्ये मोठी दुर्घटना घडली आहे. पुण्याच्या हिंजवडी मध्ये धावत्या ट्रॅव्हलर बसला आग लागल्याने चार जणांचा होरपळून मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहे. मृतांची व जखमींची नावे अद्याप समोर आलेली नाही. सकाळी आठच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे. १५ प्रवासी घेऊन होमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कलवरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडीमध्ये होमा प्रिंटिंग प्रेस कंपनीच्या बसला आग लागली. तमन्ना सर्कलवरून रिजवानच्या दिशेने जाणाऱ्या बसने समोरून अचानक पेट…

Read More

अहिल्यानगर, दि. १९ मार्च – अहिल्यानगर शहरातील बेपत्ता व्यापारी दीपक लालसिंग परदेशी (वय ६८) यांचे खंडणीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. १० कोटी रुपयांच्या मागणीसाठी त्यांचे अपहरण करण्यात आले आणि नंतर गळा आवळून त्यांची हत्या करण्यात आली. या प्रकरणी तोफखाना पोलिसांनी एका बडतर्फ पोलिसासह दोघांना अटक केली आहे. या दोघांना न्यायालयाने २१ मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. किरण बबन कोळपे (वय ३८, रा. विळद, ता. अहिल्यानगर) आणि त्याचा साथीदार सागर गीताराम मोरे (वय २८, रा. ब्राह्मणी, राहुरी) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत. त्यांनी खुनाची कबुली दिली असल्याचे तपासी अधिकारी आणि तोफखाना पोलीस…

Read More

मुंबई दि. १८ मार्च : प्रतिनिधी राज्य सरकारने सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरूच ठेवला आहे. गेल्या काही दिवसांपासून दर ८ ते १५ दिवसांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्यांची घोषणा होत आहे. यापूर्वी १५ दिवसांपूर्वी काही जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांच्या बदल्या झाल्या होत्या. आता पुन्हा एकदा सहा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये नागपूरच्या अतिरिक्त महापालिका आयुक्त आंचल गोयल यांना मुंबईच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्त करण्यात आले आहे, तर छत्रपती संभाजीनगरसह इतर जिल्ह्यांमध्येही अधिकाऱ्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. नागपूरमध्ये नुकत्याच झालेल्या दोन गटांमधील तणावामुळे शहर चर्चेत आले होते. सध्या तिथली परिस्थिती नियंत्रणात असली तरी आता अतिरिक्त महापालिका आयुक्तांची बदली झाल्याने याबाबत चर्चा…

Read More

मुंबई, दि. १८ मार्च विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांना पदावरून हटवण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काही सदस्यांनी ५ मार्च २०२५ रोजी मांडलेला अविश्वास ठराव सभापती राम शिंदे यांनी नामंजूर केला. प्रस्तावात तांत्रिक चुका आणि अस्पष्ट मुद्दे असल्याचे कारण देत हा निर्णय घेण्यात आला. संविधानाच्या अनुच्छेद १८३ (ग) तसेच विधान परिषद नियम ११ व १०३ नुसार, ठरावासाठी १४ दिवसांची पूर्वसूचना आणि स्पष्ट मुद्दा आवश्यक आहे. मात्र, या निकषांची पूर्तता न झाल्याने आणि नैसर्गिक न्यायाच्या तत्त्वांचे पालन न झाल्याने सभापतींनी सूचना फेटाळली. “हा प्रस्ताव अस्वीकार्य आहे, त्याला अनुमती दिली जाणार नाही,” असे राम शिंदे यांनी ठामपणे सांगितले. यामुळे विधान…

Read More

कोल्हापूर, दि. १८ मार्च – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी प्रशांत कोरटकर याचा अंतरिम जामीन अर्ज कोल्हापूर सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. या निर्णयामुळे कोरटकरच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून, त्याला कधीही अटक होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या प्रकरणाची सुनावणी १७ मार्च रोजी पूर्ण झाली होती, तर निकाल १८ मार्च रोजी जाहीर करण्यात आला. कोल्हापूर सत्र न्यायालयाने सरकारी वकील आणि फिर्यादीच्या वकिलांची बाजू मान्य करत कोरटकरच्या अंतरिम जामीन अर्जाला नकार दिला आहे. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकरने इतिहास संशोधक इंद्रजित सावंत यांना फोनवरून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप आहे. यासोबतच, त्याने छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज…

Read More

मुंबई, दि. १८ मार्च: प्रतिनिधी विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीत मोठी घडामोड घडली आहे. अर्ज छाननी दरम्यान एका अपक्ष उमेदवाराचा अर्ज बाद झाल्यामुळे निवडणूक बिनविरोध झाली आहे. बिनविरोध झालेल्या उमेदवारांच्या निवडीची औपचारिकता बाकी आहे. या निवडणुकीत भाजपचे तीन, शिंदे गटाच्या शिवसेनेचा एक आणि अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवाराचा विजय झाला आहे. विजयी उमेदवार –   * दादाराव केचे (भाजप)  * संजय केणेकर (भाजप)  * संदीप जोशी (भाजप)  * चंद्रकांत रघुवंशी (शिंदे गट शिवसेना)  * संजय खोडके (अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस) महायुतीच्या या पाच उमेदवारा व्यतिरिक्त आणखी एका अपक्ष उमेदवाराने उमेदवारी अर्ज दाखल केला होता. अपक्ष उमेदवाराने सादर केलेल्या अर्जात आवश्यक…

Read More

संगमनेर, दि. १८ – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२४-२५ च्या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवारी (२० मार्च) होत आहे, अशी माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली. राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार मंत्री थोरात कारखाना साखर कारखानदारीसाठी दिशादर्शक ठरला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव कारखान्याने देत शेतकऱ्यांचा विश्वास जपला आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन ३०००/- रुपये ॲडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे. यावर्षीच्या…

Read More