Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर -संगमनेर शहर पोलीस ठाणे लागत असलेल्या दुय्यम कारागृहातील गज कापून पलायन करणाऱ्या चौघा आरोपींना पोलिसांनी जेरबंद केल्यानंतर आता त्यांचे साथीदार रडारवर आले आहे. आरोपींना पलायन करण्यासाठी मदत केल्याच्या कारणावरून शहर पोलिसांनी आणखी तिघा जणांना शनिवारी रात्री अटक केली आहे. पळून जाणाऱ्या चार आरोपींसह त्यांना मदत करणाऱ्या दोघांना अहमदनगर एलसीबीने जळगावमध्ये पकडले होते. हे सर्व सहा आरोपी पोलीस कोठडीत असतानाच आता त्यांना मदत करणाऱ्यांचा शोध सुरू आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींविरोधात आयपीसी 224 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून या गुन्ह्यात नव्याने भारतीय दंड विधान कलम 307, 120 ब तसेच शस्त्र अधिनियम 3/25 ही कलमे वाढविण्यात आली आहे.…

Read More

रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो महाराष्ट्र संवाद न्यूज मानवी हक्काचं उल्लंघन करून तपास यंत्रणा एखाद्या व्यक्तीला कसं हैराण करून सोडतात याचे असंख्य दाखले आपल्याकडील तपास यंत्रणांच्या कारभाराने जनतेला दिले आहेत. यंत्रणेतील अधिकार्‍याच्या मनाला वाटेल तशी तो आपली अक्कल वापरतो आणि कारवाई करताना संबंधित व्यक्तीकडील यंत्रणांचा ताबा घेतो. घटनेच्या कोणत्याही कलमात अशी तरतूद नसताना तपास यंत्रणा बेदिक्कतपणे मस्तवालपणा करतात. याला अनेकदा विरोध झाला. पण तो करताना संबंधिताला इतक्या याचना सोसाव्या लागल्या की विचारता सोय नाही. देशात लोकशाही आहे, यावर जणू यंत्रणांचा आणि तिथे वावरणार्‍यांचा विश्‍वासच नसावा. न्यायालयात त्यांची रेवडी उडवली जाते. पण तरीही अक्कल त्यांना साथ देत नाही. येरे माझ्या..…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले असून आरक्षणासंदर्भात न्यायमूर्ती शिंदे आयोगाने दिलेल्या सूचनेनंतर जिल्हा प्रशासनाकडून विविध विभागांकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांमध्ये कुणबी नोंदींची तपासणी सुरू झाली आहे. आत्तापर्यंत ४६ लाख कागदपत्रांची तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये ८५ हजार नोंदी सापडल्या. मराठा समाजाच्या आरक्षण मागणीच्या आंदोलनानंतर कुणबी जातीच्या शोधासाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या नेतृत्वाखाली व अतिरिक्त जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या नियंत्रणाखाली विविध विभागांच्या प्रमुखांचा समावेश असलेला कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षाचे उपजिल्हाधिकारी अतुल चोरमारे यांनी ही माहिती दिली. तपासणी करण्यात आलेल्या कागदपत्रात १९६७ पूर्वीच्या कुणबी नोंदी आढळून आल्या आहे. सर्वात जुनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ शिंदे यांची काही दिवसापूर्वी अचानक तब्येत बिघडली आणि त्यांना हृदयविकाराचा झटका आला. ही माहिती मिळतच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी खडसेंसाठी एअर ॲम्बुलन्सची व्यवस्था करत त्यांना तातडीने उपचारासाठी मुंबईला आणण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे खडसेंना वेळेत उपचार मिळविण्यात यश आले. एकनाथ खडसे यांना हृदयविकाराचा झटका आला त्यावेळी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांनी मुख्यमंत्र्यांना फोन केला होता. तेव्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे साताऱ्यातील त्यांच्या दरे या गावी होते. त्यावेळी तिथून त्यांनी एअर ॲम्ब्युलन्सची व्यवस्था केली आणि खडसेंना जळगावहून मुंबईत आणण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या प्रयत्नाने त्यांचे प्राण वाचले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये एकनाथ खडसे यांच्यावर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – गोव्यात पार पडलेल्या ३७ व्या नॅशनल गेम्समध्ये महाराष्ट्राच्या योगासन खेळाडूंनी नेत्रदीपक सादरीकरणाच्या जोरावर स्पर्धेतील योगासनांची निम्मी पदकं मिळवली. योगासनांच्या विविध चार प्रकारांमध्ये झालेल्या या स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकेरीसह दुहेरी गटातही उत्तम कामगिरी करतांना पाच सुवर्ण पदकांसह तीन रौप्य व एका कांस्य पदकाची कमाई केली. या संपूर्ण स्पर्धेत महाराष्ट्र योगासन संघाचा डंका दिसून आला. पारंपरिक योगासनांच्या एकेरी प्रकारात मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या कल्याणी च्युटेने रौप्य तर छकुली सेलुकरने कांस्य पदकं मिळवले. कलात्मक योगासनांच्या एकेरी प्रकारात वैभव शिरमे याने थरारक सादरीकरणातून महाराष्ट्र संघाला पहिले सुवर्ण पदकं मिळवून दिले. उत्तर प्रदेशच्या प्रवीण पाठकने रौप्य तर हरयाणाच्या अभिषेकने कांस्य पदक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावरील तडीपारीचा गुन्हा मुंबई उच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आला आहे. यामुळे ऐन दीपावलीत ठाकरे यांना दिलासा मिळाला. कल्याण पोलिसांनी २०१० साधी बजावलेल्या तडीपारीच्या नोटीसवर ठाकरे यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. राज ठाकरे यांनी आपल्यावरील गुन्हे रद्द करण्यासाठी आणि त्याबाबतची न्यायालयात सुरू असलेली कारवाई रद्द करण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेवर यापूर्वी सुनावणी झाली. ठाकरे यांच्या याचिकेवरील कामकाज पूर्ण झाल्यानंतर १५ ऑक्टोबर रोजी न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती शर्मिला देशमुख यांच्या खंडपीठाने यासंबंधीचा निकाल राखून ठेवला होता. त्यानंतर शुक्रवारी (१० नोव्हेंबर) या संबंधीचा निकाल न्यायालयाने देत ठाकरे यांच्यावरील गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेरच्या तुरुंगातून पळून जाणाऱ्या चौघांना पकडण्यात अहमदनगर एलसीबीचे पोलीस यशस्वी ठरले. या चौघांसोबत त्यांचे दोन साथीदारे पोलिसांनी पकडले आता मात्र चौघांना पळून जाण्यासाठी मदत करणाऱ्यांचा पोलिसांनी शोध सुरू केला आहे. दरम्यान पकडलेल्या आरोपींना संगमनेर न्यायालयाने १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांनी बुधवारी पहाटे संगमनेरच्या तुरुंगातून पलायन केले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी या चौघांचा त्यांना मदत करणाऱ्या दोघा जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेरजवळ पकडण्यात आले. मदत करणाऱ्या दोघांमध्ये एक जण संगमनेरचा व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – निळवंडे धरणाचे पाणी दुष्काळी भागातील जनतेला मिळावे हे स्वप्न ठेवून आपण काम केले. या कामासाठी योगदान दिले. मात्र पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटनावेळी योगदान देणारे दूरच मात्र प्रकल्पग्रस्त किंवा साधा कामगारही उपस्थित नव्हता. ही बाब चांगली नाही. मोठ्या प्रयत्नातून मिळालेल्या निळवंडेच्या पाण्यामुळे तालुक्यात आनंदाची दिवाळी होत असून यापुढील काळात हे पाणी सर्वांना मिळेल, यासाठी काम केले जाणार आहे. निळवंडेचे पाणी हा परमेश्वराचा प्रसाद असल्याचे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. वडगाव पान येथे आयोजित कृतज्ञता सोहळा व जल पूजन कार्यक्रमात थोरात बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, साखर संघाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यभरातील 15 हजार सरकारी शाळा बंद करून 65 हजारापेक्षा जास्त सरकारी शाळा कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामुळे गोरगरीब जनतेचे शिक्षण बंद होणार असून हा निर्णय सरकारने मागे घ्यावा यासाठी संगमनेर छात्र भारतीने राज्य सरकारसह शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना काळा आकाश कंदील भेट पाठविला आहे. शुक्रवारी हा आकाश कंदील टपाल खात्यामार्फत पाठविण्यात आला आहे. राज्य सरकारच्या शाळा बंदी निर्णयामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार असून सरकारी शाळा बंद झाल्या तर गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मुकावे लागणार आहे. शाळा बंद होणे म्हणजे मोफत मिळणारे शिक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. त्यामुळे या निर्णयाविरोधात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज जळगाव – बुधवारी पहाटे संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून कोठडीचे गज कापून चार आरोपींनी सिनेस्टाईल पलायन केले होते. या चौघा आरोपींना त्यांच्या दोघा साथीदारांना अहमदनगर एलसीबीच्या पथकाने गुरुवारी दुपारी शेळगाव (ता. जामनेर) येथे एका शेतातून शिताफीने ताब्यात घेतले आहे. जळगावचे पोलीस अधीक्षक राजकुमार यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. पळालेले चौघेही आरोपी पकडण्यात पोलिसांना यश आल्याने त्यांचा पळून जाण्याचा घटनाक्रम आता उलगडणार आहे. बलात्कार, खून, कुणाचा प्रयत्न या सारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये कारागृहात असणाऱ्या राहुल देविदास काळे, रमेश थापा, अनिल छबू ढोले आणि मच्छिंद्र मनाजी जाधव या चौघा जणांना इतर कैद्यांसोबत जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. या…

Read More