Author: अनंत पांगारकर

खासदार सदाशिव लोखंडे यांच्या उपस्थितीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते होणार शुभारंभ; अर्धन्यायिक प्रकरणाच्याही होणार शिर्डीत सुनावण्या… बाळासाहेब कोळेकर शिर्डीचे पहिले अपर जिल्हाधिकारी महाराष्ट्र संवाद न्यूज  शिर्डी – शुक्रवारपासून (15 सप्टेंबर) शिर्डीमध्ये नागरिकांच्या सेवेसाठी अपर जिल्हाधिकारी कार्यालयाचा शुभारंभ होत आहे. राज्याचे महसूल मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते या कार्यालयाचा शुभारंभ होत असून शिर्डीचे खासदार सदाशिव लोखंडे यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे. नव्याने सुरू होत असलेल्या या कार्यालयामुळे उत्तर नगरमधील कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, संगमनेर, अकोले व राहूरी या ६ तालुक्यातील नागरिकांना आता अर्धन्यायिक सुनावणी व इतर शासकीय कामांसाठी अहमदनगर येथे जाण्याची आवश्यक राहणार नसल्याने नागरिकांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – सध्या देश एका वेगळ्या संक्रमणातून जात असून हुकूमशाहीच्या दिशेने सुरू असलेली देशाची वाटचाल लोकशाहीसाठी धोकादायक असल्याने जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून काँग्रेसचा विचार सामान्य माणसांपर्यंत नेण्याचे आवाहन काँग्रेसच्या सचिव, राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते यांनी केले. जनसंवाद यात्रेस यांची उपस्थिती: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रदेश महासचिव व राज्य महिला आयोगाच्या सदस्य उत्कर्षा रुपवते, तालुका निरीक्षक सचिन गुजर यांच्या प्रमुख उपस्थितीत काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड. पंकज लोंढे, ज्येष्ठ नेते मामा पगारे, सावळीविहीरचे काँग्रेस अध्यक्ष साहिल म्हस्के यांच्या नेतृत्वाखाली सावळीविहीर गावामध्ये काँग्रेसची जनसंवाद यात्रा काढण्यात आली. या जनसंवाद यात्रेत…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले (अहमदनगर) – पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांनी देशातील व राज्यातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत आयुष्यमान भव: हा कार्यक्रम हाती घेतला आहे. या कार्यक्रमांतर्गत आरोग्याचे अनेक उपक्रम राबविले जाणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी आयुष्यमान भव: योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन अकोले नगरपंचायतचे उपनगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांनी केले. यांची उपस्थिती: अकोले ग्रामीण रुग्णालयात आयोजित “आयुष्यमान भव:” उपक्रमाचा शुभारंभ वडजे यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्राध्यापक सुरेश खांडगे होते. ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. बाळासाहेब मेहत्रे, नगरसेवक चौधरी, माजी नगरसेवक परशराम शेळके, नवनाथ मोहिते, वैद्यकीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर राजकीय प्रतिष्ठेचा बुरखा अंगावर चढला की एखाद्या संस्थेच्या माध्यमातून जनतेला सहज उल्लू बनविता येते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा अध्यक्ष भाऊसाहेब कुटे. बँकेतील ठेवीदारांच्या तब्बल 81 कोटींच्या ठेवींचा गैरवापर करून या रकमेचा अपहार करणाऱ्या प्रतिष्ठितांच्या टोळी विरोधात गुन्हा दाखल झाला असला तरी अद्याप मुख्य आरोपीसह अन्य आरोपींना अटक होत नसल्याने या गुन्ह्याच्या तपासावर मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. न्यायासाठी दबावाची आवश्यकता: दहा वर्ष कारखान्याचा व्हाईस चेअरमन, मावळत्या जिल्हा परिषदेचा सदस्य यासह संगमनेरच्या अर्थकारणातील महत्त्वाच्या असलेल्या दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या स्थापनेपासून अध्यक्ष राहिलेल्या भाऊसाहेब कुटेसह 21 जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात 81…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर वकील सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी ॲड. दिलीप साळगट व उपाध्यक्षपदी ॲड. जनार्दन वाळुंज यांचे बिनविरोध निवड करण्यात आली. यांच्या उपस्थितीत निवड: वकील सेवा संस्थेच्या अध्यक्ष, उपाध्यक्ष यांची निवड करण्यासाठी मंगळवारी (ता. १२ सप्टेंबर) संचालक मंडळाची बैठक बोलविण्यात आली होती. यावेळी संचालक ॲड. श्रीकांत उर्फ बापूसाहेब गोंगे, ॲड. सुनील सराफ, ॲड. पोपटराव शिंदे, ॲड. दीपक थोरात, ॲड. विजयानंद पगारे, ॲड. मोहनराव फटांगरे, ॲड. बाबासाहेब गायकर, ॲड. सचिन डुबे, ॲड. सीमा काळे, ॲड. मीना डोंगरे यांच्यासह सचिव संजय भंडारी उपस्थित होते. यांनी मांडली नावांची सूचना: बैठकीवेळी अध्यक्षपदासाठी ॲड. दिलीप साळगट यांच्या नावाची सूचना ॲड. बापूसाहेब गोंगे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शासनाच्या विविध खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त असून या जागांच्या भरतीसाठी विविध विभागांमधून सध्या जाहिराती दिल्या जात आहेत. यामुळे राज्यातील तरुणांमध्ये काहीसा आशावाद निर्माण झाला मात्र शासनाने कंत्राटी पद्धतीने विविध विभागांमध्ये नव्याने नियुक्तीचा घेतलेला निर्णय हा अत्यंत चुकीचा असून यामुळे नियुक्त झालेल्या युवकांच्या भवितव्याचे काय असा प्रश्न नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी उपस्थित केला आहे. तांबे म्हणाले, राज्यातील विविध विभागांमध्ये हजारो जागा रिक्त आहेत. गेली अनेक वर्ष नव्याने नोकर भरती न झाल्याने अनेक सुशिक्षित बेरोजगार या भरतीची वाट पाहत होते. मात्र पात्रता असतानाही कंत्राटी पद्धतीने भरतीमुळे त्यांचे भवितव्य काय असेल? असा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – नाशिक जिल्हा न्यायालयातील एका न्यायाधीशांविरोधात नाशिकच्या वकिलांनी एल्गार दिला आहे. कामकाजावेळी अरेरावी करणे, अपमानास्पद वक्तव्य करणे, उद्घटपणे वर्तणूक करणे अशा स्वरूपाचे वर्तन हे न्यायाधीश महोदय करत असल्याने त्यांची त्वरित बदली करण्याची मागणी वकिलांनी केली आहे. अन्यथा त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला आहे. प्रधान न्यायाधीशांना निवेदन: वकिलांनी नाशिक बार कौन्सिलच्या वतीने आपल्या मागणीचे निवेदन प्रधान जिल्हा न्यायाधीश एस. डी. जगमलानी यांना दिले. एका न्यायाधीशांच्या विरोधात वकिलांनी उघड-उघड भूमिका घेत त्यांच्या समोरील कामकाजावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिल्याने हा विषय राज्यभर चर्चेचा ठरला आहे. तर मुंबई उच्च न्यायालयाकडे तक्रार: संबंधित न्यायाधीशांची जिल्हा विधी प्राधिकरणामध्ये बदली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – तहसीलदारांना केलेले फोन उचलले नाही म्हणून थेट तहसीलदारांच्या घरी जाऊन शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी देण्याचा प्रकार सोमवारी रात्री पावणे बारा वाजता संगमनेरमध्ये घडला. संगमनेरचे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. थोरात विरोधात गुन्हा दाखल: शुभम थोरात (पूर्ण नाव माहित नाही) रा. मालदाड रोड, संगमनेर असे आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात संगमनेर शहर पोलिसांनी भारतीय दंड विधान संहिता कलम 452, 504, 506 नुसार गुन्हा दाखल केला आहे. रात्री घडली घटना: सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास झोपेत असलेल्या तहसीलदार मांजरे यांच्या मोबाईलवर दहा ते बारा कॉल…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसचा विचार जन माणसापर्यंत पोहोचवण्यासाठी शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने प्रभाग 1, 3, 4, 11, 12 व 14 मध्ये झालेल्या जनसंवाद यात्रेस उस्फुर्त प्रतिसाद मिळाला असल्याची माहिती शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली. यांचा सहभाग: संगमनेर शहरात झालेल्या पदयात्रेत माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, मनोज पुंड, बाळासाहेब पवार, सुनंदाताई दिघे, मुन्ना कडलग, किशोर टोकसे, शाकिब बागवान, जीवन पंचारिया, सुभाष दिघे, निखिल पापडेजा, शैलेश कलंत्री, अंबादास आडेप, गणेश गोडसे, गौरव डोंगरे, चंद्रकांत काळंग, अशोक जाधव, संजय पुंड, श्याम करपे, संजय पुरी, हरी भोसले, सचिन पाबळकर, सचिन सोनवणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपली भाषा समृध्द असली की जाणीवा समृध्द होतात. संगमनेर महाविद्यालयातर्फे चालवल्या जाणाऱ्या पदव्युत्तर पदविका पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या माध्यमातून केवळ पत्रकारितेचे विविध पैलूंच शिकविले जात नाहीत तर जाणीवा समृध्द केल्या जातात, असे प्रतिपादन शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी यांनी केले. यांची उपस्थिती: संगमनेर महाविद्यालयाच्यावतीने चालवल्या जाणाऱ्या पुणे विद्यापीठाच्या पत्रकारिता अभ्यासक्रमाच्या गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्यात मालपाणी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उद्योजक कैलास सोमाणी, महाविद्यालयाचे कार्यकारणी सदस्य मधुसूदन नावंदर, महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. अरूण गायकवाड, पत्रकारिता अभ्यासक्रमाचे प्रमुख डॉ. संतोष खेडलेकर उपस्थित होते. मालपाणी म्हणाले, संगमनेर महाविद्यालयात मागील बारा वर्षांपासून चालविल्या जाणाऱ्या या अभ्यासक्रमात विद्यार्थी, गृहिणी, डॉक्टर्स, पत्रकार,…

Read More