Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पर्यावरण संवर्धनाची सर्वात मोठी लोक चळवळ बनलेल्या दंडकारण्य अभियानाच्या माध्यमातून राजहंस दूध संघाने हिवरगाव पावसा येथील देवगड परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन केले असल्याने हा परिसर हिरवाईने फुलला असल्याचे प्रतिपादन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी केले आहे. तर हिरवाई हीच खरी समृद्धी असल्याचे दूध संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी म्हटले आहे. वृक्षारोपण: हिवरगाव पावसा येथील देवगड डोंगर परिसरात संगमनेर तालूका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रीया संघाच्यावतीने दंडकारण्य अभियानांतर्गत आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विविध वृक्षांचे रोपण करण्यात आले. हे होते उपस्थित: यावेळी प्रकल्पप्रमुख दुर्गाताई तांबे, दुध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख, उपाध्यक्ष राजेंद्र चकोर,…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – श्रेय लाटण्यासाठी राजकीय दबाव वापरत संगमनेरमध्ये भारतीय जनता पक्षाने ग्रामीण रुग्णालयामार्फत सुरू करण्यात आलेला दिव्यांग प्रमाणपत्र वाटपाचा कार्यक्रम बंद पाडला. नीतिमत्ता भ्रष्ट झालेल्या भाजपच्या दबावाला शासकीय अधिकारी देखील बळी पडल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शहर प्रमुख अमरभाऊ कतारी यांनी केला आहे. कतारी यांनी काय म्हटले आहे: दिव्यांग बांधवांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळावा, यासाठी शासनाकडून योजना राबविल्या जातात. यासाठी गेल्या महिन्यात संगमनेरमधील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी शासनाकडून कॅम्प आयोजित करण्यात आला होता. जिल्हा शासकीय रुग्णालयामार्फत संगमनेर तालुक्यातील साडेतीनशे दिव्यांग लाभार्थ्यांची यादी तयार करण्यात आली होती. राजकीय दबावातून…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – एकविरा फाउंडेशनच्या माध्यमातून महिला सबलीकरण व महिलांच्या आरोग्याबाबत केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिल्लीतील केजरीवाल सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G-20 अंतर्गत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई बाळासाहेब थोरात यांना राष्ट्रीय एकता पुरस्कार जाहीर झाला. रविवारी दिल्ली येथे शानदार कार्यक्रमात हा पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव: भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त दिल्ली सरकारच्या ओबीसी आयोगाकडून G20 अंतर्गत समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना राष्ट्रीय एकता पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. थोरात यांची निवड: डॉ. जयश्रीताई थोरात या मुंबई येथील टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटलमधील ब्लड कॅन्सर विभागात कार्यरत असून अत्यंत दुर्दम्य असणाऱ्या ब्लड कॅन्सर या आजारातील रुग्णांना त्यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईत लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वपूर्ण बैठक पार पडली असून राज्यातील ४८ मतदारसंघांमध्ये काँग्रेसने पूर्वतयारी सुरू केली आहे. नगर दक्षिण व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी निरीक्षक म्हणून माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येत्या रविवारी (दि. १३) नगर शहरात दक्षिण मतदारसंघातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्त्यांची तर संगमनेरमध्ये उत्तरेची बैठक आयोजित करण्यात आली असल्याची माहिती ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे व शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी दिली आहे. हे राहणार उपस्थित: या बैठकीसाठी निरीक्षक हंडोरे यांच्यासह दक्षिण मतदारसंघाचे नवनियुक्त समन्वयक वीरेंद्र किराड (पुणे), शिर्डी मतदारसंघाचे समन्वयक ज्ञानेश्वर गायकवाड (नाशिक), आमदार लहू कानडे, यांच्यासह…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – पावसाची अनेकविध रुपे आपल्याला माहित आहेत. घराच्या कौलांवरून कोसळणार्या सरी, अंगणात साचलेल्या डब्यात विहरणार्या कागदाच्या होड्या, दूर रानात पानापानावर टपटपणारा मुसळधार पाऊस आणि एका छत्रीतल्या दोन जीवांना शीलगावणारा पाऊस… पाऊस म्हणजे उत्सव, पाऊस म्हणजे धमाल… पावसाचा हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्यावतीने येत्या 12 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट दरम्यान भंडारदरा आणि आंबोली येथे वर्षा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती पर्यटन संचालनालयाचे संचालक डॉ. बी. एन. पाटील यांनी दिली आहे. शेतकरी सुखावलाय: आषाढातल्या बहुप्रतीक्षेनंतर अखेरीस अधिक श्रावणात पावसाचे दमदार आगमन महाराष्ट्राच्या कानाकोपर्यात झाले आहे. खरीप हंगामाच्या पेरणीसाठी चातकासारखी वाट पाहत असलेला शेतकरी राजा…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – केंद्र सरकारकडून देशभर राबविल्या जात असलेल्या “मेरी मिट्टी मेरा देश”अभियानात संगमनेर नगर परिषदेने सहभागी होत क्रांती दिनी संगमनेरमध्ये विविध उपक्रम राबविले, अशी माहिती मुख्याधिकारी राहुल वाघ यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्य शासनाकडून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. केंद्र सरकारने सूचित केल्यानुसार राज्यभरात देखील 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान “मेरी मिट्टी मेरा देश”अभियान राबविले जात आहे. या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. शहिदांच्या स्मृतीस अभिवादन: याच अभियानाचा एक भाग म्हणून संगमनेर नगर परिषदेत देखील क्रांती देणे 9 ऑगस्टला “मेरी मिट्टी मेरा देश” या अभियानांतर्गत शहरातील नेहरू चौक भागात असलेल्या अशोक…
आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात रॅली आणि मेळावा महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – भारतीय राज्यघटना ही गोरगरीब आणि आदिवासींची कवचकुंडले आहे, मात्र काही लोक जाती-धर्माच्या नावावर राजकारण करून आपसात भेद निर्माण करू पाहत आहे. मणिपूर मधील आदिवासी महिलांवर झालेली अत्याचाराची घटना देशासाठी कलंक असून लोकशाही व राज्यघटना वाचण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. रॅली आणि मेळावा: आदिवासी गौरव दिनानिमित्त संगमनेरात पारंपारिक वेशभूषा, पारंपारिक नृत्य आणि घोषणांच्या निनादात छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, बस स्थानक ते यशोधन कार्यालय दरम्यान झालेल्या रॅलीत शेकडो आदिवासी, शालेय विद्यार्थ्यांनी पारंपारिक वेशभूषा करून आदिवासी नृत्य सादर केली. त्यानंतर मालपाणी लॉन्समध्ये…
अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – राज्यात सर्वत्र महसूल सप्ताह सुरू असताना नाशिकमध्ये एक तहसीलदार लाच स्वीकारतो, ही शरमेची बाब आहे. अशा लाचखोर अधिकाऱ्यांना पुन्हा सेवेत सामावून न घेण्यासाठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांशी बोलून नियमात कठोर बदल करण्याचा इशारा देत अवैध धंद्यांना संरक्षण देणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेत राज्याचे महसूल मंत्री तथा नगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहे. शिर्डीत होणार कार्यक्रम: शुक्रवारी (ता. 11 ऑगस्ट) शिर्डी येथे “शासन आपल्या दारी” हा कार्यक्रम मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार आहे. या कार्यक्रमाचा आढावा घेण्यासाठी ते अहमदनगर येथे आले होते. महसूल विभागाच्या आढावा…
अविनाश बोधक, साईसुधा बच्चा–वनम, सविता हासे–घोलप आणि स्वप्नाली भुतडा–तापडे पहिल्या तीन क्रमांकात महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालय सुरू असलेल्या पदव्युत्तर वृत्तपत्रविद्या पदविका अभ्यासक्रमाचा 2022-23 यावर्षीचा निकाल शंभर टक्के लागला आहे. यात अविनाश बोधक यांनी 73.28 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला. तर साईसुद्धा बच्चा–वनम व सविता हासे–घोलप यांनी 71.42 टक्के गुण मिळवत संयुक्तरित्या द्वितीय तर स्वप्नाली भुतडा–तापडे यांनी 70.14 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक मिळवला आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे अभ्यासक्रम समन्वयक प्रा. सुशांत सातपुते यांनी दिली. बारा वर्षापासून सुरू आहे अभ्यासक्रम: शिक्षण प्रसारक संस्थेच्या संगमनेर महाविद्यालयात ज्येष्ठ पत्रकार, साहित्यिक डॉ. संतोष खेडलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या बारा वर्षापासून सावित्रीबाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – मातृभूमी विषयी कृतज्ञता आणि स्वातंत्र्यवीरांच्या योगदानाच्या स्मरण व्हावे यासाठी 9 ऑगस्ट पासून देशात “मेरी मिट्टी मेरा देश” हे अभियान सुरू होत आहे. अभियानांतर्गत जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे व अभियानाचे उत्तर नगर जिल्हा संयोजक भाऊसाहेब वाकचौरे पाटील यांनी दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव उपक्रमानिमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, वैभव पिचड, बाळासाहेब मुरकुटे, शिर्डी लोकसभा प्रमुख राजेंद्र गोंदकर, लोकसभा प्रभारी नितीन दिनकर यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत, तालुकास्तर, जिल्हास्तरावर लोकप्रतिनिधी, प्रशासन, लोकसहभागातून पंचप्रण प्रतिज्ञा, वसुधा वंदन, वीरों का वंदन…
