Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. अरुण गायकवाड यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या “व्यावसायिक व्यवस्थापन आणि व्यावसायिक कायदे” या अभ्यास मंडळावर निवड झाली. कुलगुरूंकडून गायकवाड यांच्या नावाचे नामनिर्देशन करण्यात आले. प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड हे ३३ वर्षांपासून अध्यापनाचे कार्य करत असून वाणिज्य विभागाचे विभागप्रमुख म्हणुन कार्यरत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या बिझनेस ला बोर्डाचे अध्यक्ष, व्होकेशनल कॉमर्स अभ्यास मंडळाचे अध्यक्ष, विद्या परीषद सदस्य, अकौंटन्सी अभ्यास मंडळ सदस्य, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा सदस्य आदी अधिकार मंडळामध्ये वेगवेगळ्या शैक्षणिक जबाबदाऱ्या पार पाडल्या असून इतर विद्यापीठात व स्वायत्त महाविद्यालयाच्या विविध अभ्यासमंडळावर काम पहात आहेत. आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील अनेक चर्चासत्रात…
हप्ते वसुली करणाऱ्या सरकारी टोळ्यांवर काय कारवाई केली? बोगस बियाणे आणि खतांचा मुद्दा विधानसभेत गाजला काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार यांच्या आक्रमक पवित्र्यापुढे सत्ताधाऱ्यांची भंबेरी महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती कमी झालेल्या असतानाही केंद्र सरकारकडून खतांच्या बाबतीमध्ये नफेखोरी सुरू आहे, शेतकऱ्याला मदत करायची सोडून हा कसला प्रकार सुरू आहे आणि कृषिमंत्री केंद्र सरकारची ही नफेखोरी कबूल करायला का तयार नाही? आपण कोणाला घाबरता? असा सवाल करून काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले. विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाचा आज तिसरा दिवस होता. प्रश्नोत्तराच्या तासात बोगस बी बियाणे आणि…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ‘तुला घरी सोडतो’, असे सांगत साडेबारा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला दुचाकीवर नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला. पाच दिवसांपूर्वी घडलेल्या या घटनेमुळे संगमनेर तालुक्यात खळबळ उडाली असून आरोपी विरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी मात्र पसार झाला आहे. पंकज शरद डुबे (रा. पेमगिरी, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर) असे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरोधात भारतीय दंडविधान कलम 376(3), 363, 366(अ) व बाललैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यातील परिविक्षाधीन पोलीस उपाधीक्षक शिरीष वमने पुढील तपास…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – मंगळवारी पहाटेच्या सुमारास कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीत बेट मार्शल पेट्रोलिंग पथकातील दोघा कर्मचाऱ्यांनी तीन संशयित दुचाकी चोरांना पकडले. त्यांना घर झडतीसाठी नेले असता त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यातील दोघांना पकडण्यात पोलीस पथक यशस्वी झाले. तर एक जण पळून गेला. आरोपींच्या घर झडतीमध्ये पोलिसांना एक जिवंत राऊंड चार मोबाईल आणि लॅपटॉप आढळून आला. पोलिसांना हे प्रकरण संशयास्पद वाटू लागल्याने त्यांनी याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाला दिली आणि तपासा दरम्यान यातून मोठा उलगडा होऊ लागला. पोलीस अंमलदार प्रदीप चव्हाण आणि अमोल नजन या दोघांनी मोटर सायकल चोरीत पकडलेले संशयित चक्क मोस्ट वॉन्टेड आणि एनआयएच्या रडारवर असल्याचे…
भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर झाला कमी; पाणीसाठा पोहचला ७० तर निळवंडे ३४ टक्क्यांवर
महाराष्ट्र संवाद न्यूज अकोले – अहमदनगर जिल्ह्याचे चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊसाचा जोर ओसरला असला तरी ओढून आले प्रवाहित असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या २४ तासात ३५ मिलिमीटर पावसाचे नोंद झाल्याने धरणाचा पाणीसाठा ७७२४ दलघफु म्हणजेच ६९.९७ टक्क्यांवर तर निळवंडे धरणाचा पाणीसाठा २७६७ दलघफु म्हणजेच ३३.२६ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणांच्या लाभक्षेत्रासाठी ही समाधानाची बाब आहे. भंडारदरा आणि निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात नवीन पाण्याची आवक सुरू आहे. उत्तर नगर जिल्ह्याला ही धरणे वरदान ठरले आहे. नव्यानेच कालव्यांच्या चाचणी झालेल्या निळवंडे धरणाच्या पाण्याचा फायदा दुष्काळी १८२ गावांना होणार असल्याने हे…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – अमली पदार्थाच्या व्यापारास आणि प्रसारास आळा घालण्यासाठी आता राज्यातील सर्व पोलीस ठाण्यामध्ये स्वतंत्र अमली पदार्थ विरोधी कक्ष स्थापन करण्यात आला आहे. तसेच अमली पदार्थ बाळगणाऱ्यांना शिक्षा व्हावी यासाठी ते पदार्थ जवळ बाळगण्याची मर्यादा देखील कमी करण्याबाबत केंद्र सरकारला विनंती केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. कर्जत-जामखेडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी या संदर्भात विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. https://twitter.com/Dev_Fadnavis/status/1681240110568980480?s=19 फडणवीस म्हणाले अमली पदार्थाच्या व्यापार आणि प्रसाराचा आळा घालण्यासाठी राज्य सरकार कठोर पावले उचलत आहे. दहशतवाद विरोधी पथकाला समन्वय एजन्सी म्हणून…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक – तक्रारदाराच्या मित्राला पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात सहआरोपी न करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितल्याचे समोर आले आहे. पाच लाख रुपयांची मागणी करून तडजोडीअंती तीन लाखाची लाच घेताना पोलीस निरीक्षकासह पोलीस नाईक आणि एका खासगी इसमाला अँटी करप्शन च्या पथकाने रंगेहाथ पकडले. राहुल बाबासाहेब गायकवाड (पोलीस निरीक्षक बाजारपेठ पोलीस ठाणे, भुसावळ, जि. जळगाव) पोलीस नाईक तुषार पाटील आणि खासगी इसम ऋषी दुर्गादास शुक्ला (हनुमान वाडी, भुसावळ, जिल्हा जळगाव) अशी तिघा लाचखोरांची नावे आहेत ही कारवाई नाशिक लाचलुचपच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी, पोलीस उपाधीक्षक नरेंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपाधीक्षक अभिषेक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : राज्यात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून सरकारने कंत्राटी पद्धतीने शिक्षक भरती करण्याचा निर्णय रद्द करून तातडीने राज्यात शिक्षक भरती करावी अशी आग्रही मागणी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केली आहे. तातडीने भरती न केल्यास राज्यभरात मोठा उद्रेक होईल असा इशाराही त्यांनी मुख्यमंत्री व शिक्षण मंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातून दिला आहे. या पत्रात डॉ. तांबे यांनी म्हटले आहे की, राज्यभरात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये शिक्षकांच्या मोठ्या प्रमाणावर जागा रिक्त आहेत. मध्यंतरी शासनाने विनाअनुदानित शाळांना टप्पा अनुदान देण्याचा चांगला निर्णय घेतला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी माजी मंत्री काँग्रेस गटनेते, आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज मंत्र्यांचीच शाळा घेतली. विरोधी आमदारांनी उपस्थित केलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर उपमुख्यमंत्र्यांनी द्यावे हे सभागृहाला शोभत नसल्याचा खोचक टोला लावताना थोरात चांगलेच संतापले असल्याचे दिसून आले. विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ सदस्य आणि काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात आज सभागृहात आक्रमक झाले. मंत्री गांभीर्यपूर्वक प्रश्नांचा अभ्यास करत नाही, बिना तयारीचेच सभागृहात येतात, असा संताप थोरात यांनी व्यक्त केला. थोरात म्हणाले, सभागृहाच्या कामकाजाच्या सुरुवातीचा तास हा प्रश्नोत्तराचा राहील हे आपण सर्वानुमते ठरविले. सभागृहातील सदस्य अत्यंत महत्त्वाच्या आणि गंभीर प्रश्नांना वाचा फोडत असतात. मात्र संबंधित विभागाचे मंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – राज्यातील विविध पक्षांच्या नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांचे वस्त्रहरण करणाऱ्या भाजप नेता किरीट सोमय्या यांचे कथित अश्लील व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यात राजकीय वर्तुळात संतापाची लाट उसळली आहे. मंगळवारी दुपारी संगमनेरमध्ये शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी देखील बस स्थानक चौकात किरीट सोमय्याच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन केले. तसेच सोमय्याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. लोकशाही वृत्तवाहिनीने किरीट सोमय्यांच्या लंपटपणाचा आपल्या वाहिनीच्या माध्यमातून पर्दाफाश केला आहे. राजकीय नेत्यांवर चिखल फेक करणारच चिखलात लोळत पडल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. सोमय्यांचे चाळे समोर येताच सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे. संगमनेरमध्ये मंगळवारी दुपारी बस स्थानक चौकात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मुजीब शेख, तालुकाप्रमुख भाऊसाहेब हासे…
