Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अनधिकृत वीज चोरून वापरल्या प्रकरणी दिलेल्या वीज बिलाचा भरणा न करणाऱ्या पठार भागातील दोघांविरोधात घारगाव पोलीस ठाण्यात भारतीय विद्युत कायदा 2003 चे कलम 135 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे सहाय्यक अभियंता समाधान घुगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मांडवे बुद्रुक येथील शशिकांत धोंडीबा कुटे आणि बिरेवाडी येथील बाळासाहेब पांडुरंग क्षीरसागर यांच्या विरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात घुगे यांनी दिलेल्या तक्रार म्हटले आहे की, 8 मे 2023 रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ते आणि बाह्यश्रोत कर्मचारी के. के. गाडेकर वरिष्ठ तंत्रज्ञ डी. एस. शेळके यांच्या समवेत कायमस्वरूपी विद्युत पुरवठा खंडित…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आत्महत्या करण्याच्या विचारात तो बियर बारमध्ये बियर पिण्यासाठी आला, त्याने बियर मागविली, अर्धी बियर पिला आणि उरलेली अर्धवट सोडून निघून गेला. नेमकं याचवेळी कोणी बघत नाही ही संधी साधून वेटरने ती अर्धी बियर फस्त केली आणि काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. प्रत्येकाचा मृत्यू विधीलिखित आहे. कोण किती वर्ष जगणार आणि केव्हा व कसा मारणार याची कोणीच कल्पना करू शकत नाही. बऱ्याचदा मनुष्य मृत्यूच्या दारातून परत आल्याची तर अनेकांना अनपेक्षितरित्या मृत्यूने गाठल्याची उदाहरणे आहेत. असाच काहीसा धक्कादायक प्रकार चंद्रपूर जिल्ह्यातल्या राजरू शहरात समोर आला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार राजरू मधील सोमनाथपूर मटन मार्केट बाजूला असलेल्या एका बियर बारमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – देशभरातील नामांकित अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी द्याव्या लागणार्‍या प्रवेश परीक्षेत संगमनेरची सानीया प्रफुल्ल खिंवसरा राष्ट्रीय पातळीवर चमकली आहे. जेईई ‘मेन’ आणि ‘एडव्हांस’ अशा दोन प्रकारात राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणार्‍या या परीक्षेत देशभरातील बारा लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात सानियाने 1244 वे मानांकन प्राप्त करीत संगमनेरचे नाव देशाच्या पटलावर नोंदविले आहे. सानीया मालपाणी उद्योग समूहाचे कार्यकारी अधिकारी प्रफुल्ल खिंवसरा यांची कन्या आहे. लहानपणापासूनच अभ्यासात एकाग्र असलेल्या सानीयाचे प्राथमिक व माध्यमिकचे शिक्षण संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलमध्ये झाले आहे. इयत्ता दहावीच्या शालांत परीक्षेत 99 तर इयत्ता बारावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळवून तिने आपल्यातील गुणवत्तेची चुणूकही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – सेतूचे दाखले देण्याचा सर्व्हरमध्ये अडथळे असल्याने ईडब्लूएस विद्यार्थ्याकडून अर्जाची पोहोच पावती व हमीपत्र भरुन घेऊन प्रवेश देण्यात यावा. तसेच विद्यार्थ्यांना उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याचे नॉन क्रिमीलेअर प्रमाणपत्र सादर करण्यासाठी ३ महिन्याची मुदतवाढ देण्यात यावी, अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेंद्र कोंढरे यांनी केली आहे. कोंढरे यांनी मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, राज्य सरकारने शैक्षणिक प्रवेशाच्या दाखल्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन काही दिवस फिफो यंत्रणा बंद ठेवून विद्यार्थ्यांचे अर्ज प्राधान्य क्रमाने निकाली काढावेत यासाठी निर्देश दिले होते. त्यामुळे प्रश्न सुटला असे वाटत असताना आता सर्व्हर बंद पडल्याने दाखले देण्याची प्रक्रिया…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सहा जूनला सकल हिंदू समाजाच्यावतीने काढण्यात आलेल्या भगव्या मोर्चाच्यावेळी जातीय तेढ निर्माण होईल, असे चितावणीखोर वक्तव्य केल्याच्या कारणावरून मोर्चाच्या संयोजकांसह तिघांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेल्यांमध्ये सुदर्शन चॅनलचे संपादक व भगवा मोर्चातील प्रमुख वक्ते सुरेश चव्हाणके यांच्यासह योगेश मनोहर सूर्यवंशी व विशाल भगवान वाकचौरे यांचा समावेश आहे. पोलिस उपनिरिक्षक बाळासाहेब यादव यांच्या फिर्यादीवरुन या तिघांवर गु.र.नं. ५१२/२०२३ भारतीय दंड विधान कलम १५३ अ, ३४ आणि ५०५ (२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यादव यांनी तक्रारीत म्हटले आहे की, भगवा मोर्चासाठी प्रशासनाकडून अटी, शर्तीवर परवानगी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज विविध गुन्ह्यांच्या तपासाकामी जप्त करण्यात आलेल्या आणि पोलिसांच्या रखवालीत असलेल्या दुचाकींची आता चोरी होऊ लागले आहे. हा धक्कादायक प्रकार संगमनेर शहर पोलीस ठाण्यातून समोर आला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध महिला पोलीस हेड कॉन्स्टेबलने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महिला पोलीस कर्मचारी अनिता गुंजाळ यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याच्या तपासाकामे जप्त करण्यात आलेली वाहने ही पोलीस स्टेशन, तहसील कार्यालयाच्या आवारात लावली जातात. ज्या ठिकाणी वाहने लावण्यासाठी जागा अपुरे असल्याने ही वाहने शहरातील जुन्या पोलीस वसाहतीच्या आवारामध्ये लावली जातात. तसेच काही दुचाकी वाहने ना दुरुस्त असलेल्या खोलीच्या वाड्यामध्ये लावण्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गेल्या आठ वर्षापासून गणेश कारखान्याची प्रगती थांबल्याने ऊस उत्पादकांचे हाल होत होते. गणेश साखर कारखाना हा राहाता तालुक्याची कामधेनू आहे. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी सभासदांनी दाखविलेल्या विश्वासाच्या बळावर हा कारखाना संगमनेर व संजीवनीप्रमाणे चालवून नवे संचालक मंडळ गणेशला पुन्हा गत वैभव प्राप्त करून देतील, असा विश्वास काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला गणेश कारखान्याच्या नूतन संचालक मंडळाचा सत्कार सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथी गृहावर करण्यात आला. यावेळी युवा नेते विवेकभैय्या कोल्हे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. एकनाथ गोंदकर, गणेशचे संचालक ॲड .नारायणराव कारले, बाबासाहेब कारले, विजय दंडवते, गंगाधर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर रोटरीच्या अध्यक्षपदी आनंद हासे, सेक्रेटरीपदी मधुसुदन करवा तर डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या गव्हर्नरपदी स्वाती हेरकळ यांची सन २०२३-२४ या वर्षाकरिता निवड करण्यात आली आहे. रोटरी क्लब डिस्ट्रीक्ट ३१३२ च्या निवडी नुकत्याच जाहिर करण्यात आल्या. क्लबच्या सन २०२३-२४ साठी नियुक्त केलेल्या सदस्यांमध्ये अमित पवार, महेश वाकचौरे, ऋषिकेश मोंढे, दिपक मणियार, डॉ. प्रमोद राजुस्कर, ओंकार सोमाणी, सुनिल कडलग, संजय लाहोटी, डॉ. विनायक नागरे, डॉ. विकास करंजेकर, प्रमोद मणियार, दिलीप मालपाणी, भुषण नावंदर, मयुर मेहता, अजित काकडे, संजय राठी, मोहित मंडलिक, पवनकुमार वर्मा, रविंद्र पवार, सौरभ म्हाळस, विश्वनाथ मालाणी, डॉ. किशोर पोखरकर, नरेंद्र चांडक, योगेश गाडे, संदिप फटांगरे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शेवगावमधील (अहमदनगर) बालाजी मंदिरासमोर असलेल्या भर वस्तीमध्ये वास्तव्यास असलेले भुसार मालाचे व्यापारी गोपीकिशन बलदवा कुटुंबीयांच्या घरावर पहाटे चार वाजण्याच्या सुमारास सशस्त्र दरोडा पडला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात दोघा जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. दरोडेखोरांच्या मारहाणीत अहमदनगर जिल्हा माहेश्वरी युवा संघटनेचे उपाध्यक्ष गौरेश बलदवा यांच्या मातोश्री पुष्पाताई आणि चुलते गोपीकिशन बलदवा यांचा मृत्यू झाला असून चुलती सुनिता यांना दरोडेखोरांनी वीट फेकून मारल्याने त्यांच्या डोक्याला देखील मार लागला आहे. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार दरोडेखोरांनी किमती ऐवज चोरून नेल्याची माहिती समोर येत आहे. दोघांचे मृतदेह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज गुरुवारी येणारी आषाढी एकादशी आणि बकरी ईद हे दोन्ही सण कायदा व सुव्यवस्थेला कोणतेही गालबोट न लागता शांततेत व उत्साहात साजरे व्हावे, यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून खबरदारीचा उपाय म्हणून पोलीस रेकॉर्डवरील 71 जणांना गुरुवारपासून आठ दिवसांसाठी संगमनेर अकोले तालुक्यात प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्रवेश बंदी केल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. गुरुवार (ता.22 जून) ते शुक्रवार (ता. 30 जून) पर्यंत या सर्वांना संगमनेर-अकोले तालुक्यात प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या सणांच्या पार्श्वभूमीवर रेकॉर्डवरील व्यक्तींकडून कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. या 71 जणांवर सीआरपीसी कलम 144(2) अंतर्गत संगमनेर…

Read More