Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज २० फेब्रुवारीपासून सुरू असलेल्या महाराष्ट्रव्यापी बेमुदत संपाच्या अनुषंगाने साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेच्यावतीने अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यासंदर्भात अहमदनगरचे पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे. संघटनेच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जनता दरबारामध्ये पालकमंत्री विखे पाटील यांची भेट घेत मागण्यांचे निवेदन दिले. अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या संपामध्ये महाराष्ट्र साईश्रद्धा अंगणवाडी महिला संघटनेची संगमनेर येथील संघटना देखील सहभागी झाली आहे. महाराष्ट्र सरकारकडे अनेक वर्षांपासून विविध मागण्या प्रलंबित आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्यावतीने सतत याबाबत पाठपुरावा करण्यात आलेला आहे. सविस्तर मागण्या पालकमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नमूद केलेल्या असून त्यात प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देणे,…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेर तालुक्यातील घारगांव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील साकूर आणि माहुली येथे रविवारी रात्री घडलेल्या दोन घटनांनी पठार भाग हादरला आहे. तीन अज्ञात चोरट्यांच्या टोळीने एका तरुणाला शस्त्राचा धाक दाखवत त्याला मारहाण करुन लुटल्याची घटना घडली तर त्यापाठोपाठ काही वेळातच साकूरमधील एका पेट्रोलपंपावर पेट्रोल भरत कर्मचाऱ्यांना रिव्हाल्व्हर आणि चाकुचा धाक दाखवत पेट्रोल पंप लुटल्याची घटना घडली. पठार भागात असलेल्या स्वतंत्र घारगाव पोलीस ठाण्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेलाच चोरट्यांनी आव्हान दिल्याचे यातून समोर आले. पेट्रोलपंपावरील घटनेतदेखील एकजण जखमी झाल्याची माहिती मिळते. पहिल्या घटनेत माहुली येथे तीघा चोरट्यांनी एका लक्ष्मी टायर वर्क्समध्ये असलेल्या अनुदेव शैले या तेवीस तरुणाला रात्री दहा वाजण्याच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज भाऊसाहेब वाकचौरे ॥ अकोले आदिवासी विकास प्रकल्पाअंतर्गत चालविल्या जाणाऱ्या अकोले तालुक्यातील पैठण येथील मुलींच्या आश्रम शाळेत व्हायरल इन्फेक्शनमुळे तब्बल दीडशे विद्यार्थिनी आजारी पडल्याने प्रशासनाची धावपळ उडाली आहे. यातील काही विद्यार्थिनी आपल्या गावी परतल्या असून काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अकोले तालुक्यातील पैठण येथे असलेल्या मुलींच्या आश्रम शाळेमध्ये जवळपास चारशे विद्यार्थिनी असून दोन दिवसांपूर्वी टप्प्याटप्प्याने साधारणत: दीडशे विद्यार्थिनींना थंडी, ताप, उलट्या व जुलाबाची लागण झाल्याचे दिसून आले. त्यामुळे या विद्यार्थिनींना मुख्याध्यापक आणि शिक्षकांनी तातडीने कोतुळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. त्यातील काही विद्यार्थिनींना लोणी आणि संगमनेर येथे उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज देशातील जेष्ठ नागरिकांचा विचार करणारा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपाने प्रथमच देशाला मिळाला. राष्ट्रीय वयोश्री योजनेपासून ते जलजीवन मिशन पर्यतच्या सर्व योजनांमधून सर्वसामान्य नागरीकांचे हित जोपासण्याचा प्रयत्नच केंद्र सरकारच्या माध्यमातून होत असल्याचे प्रतिपादन नगरचे खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी सुरू केलेल्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतील पात्र लाभार्थींना साधन साहीत्याचे वाटप करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात खा. विखे पाटील यांनी स्व. अशोकराव मोरे यांच्या कार्याची आठवण करून त्यांना सुमनांजली अर्पण केली. कार्यक्रमास भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, डॉ. अशोक इथापे, वसंतराव देशमुख, बापुसाहेब गुळवे, रोहीदास डेरे, डॉ. सोमनाथ कानवडे, अशोक…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर रोटरीच्या ११८ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून रोटरी क्लब संगमनेरतर्फे आनंदी रस्ते या बहुप्रतिक्षीत उपक्रमाचे रविवारी (दि. २६ फेब्रुवारी) आयोजन करण्यात आले होते. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्यासह मान्यवर संगमनेरकरांचा या उपक्रमास प्रतिसाद लाभला. सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या रोटरी क्लबने धकाधकीच्या जीवनात संगमनेरकरांना काही आनंदी क्षण मिळावेत या हेतुने या उपक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांचेसमवेत संगमनेरचे नागरिक, बाळगोपाळ, रोटरी सदस्य मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते. यावर्षी या उपक्रमाचे हे 7 वे वर्ष होते. परिसराची साफसफाई, रस्त्यांवर आकर्षक चित्र, सजावट, रंगेबीरंगे…
महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव जिल्ह्याला देणे भूषणावह आहे. त्यांचे कर्तृत्व फार मोठे आहे. याबाबत निर्णय झाला तर, निश्चितच आम्ही त्याचे स्वागत करू. अशा शब्दात राज्याचे महसूल व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अहमदनगरच्या नामांतरास अनुकूलता दर्शविली आहे. संभाजीनगर आणि धाराशिव या नावांना अंतिम मंजुरी मिळाल्याबद्दल सरकारचे आभार मानताना अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवीचे नाव देण्याच्या निर्णयाचे आपण स्वागत करणार असल्याचे ते म्हणाले. छत्रपती संभाजी नगर आणि धाराशिव या नावांना केंद्राकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर आता अहमदनगर जिल्हा नामांतराचा विषय पुन्हा चर्चेत आला आहे. भाजपचे विधान परिषदेतील आमदार गोपीचंद पडळकर यांनी याबाबतची मागणी केल्यानंतर महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज ग्रामीण रुग्णालयातील महिला परिचारिकेशी केलेले असभ्य वर्तन कोपरगांवच्या तहसीलदारांच्या चांगलेच अंगलट आले असून आपल्या वर्तनाने कहर करणाऱ्या तहसीलदार बोरुडे यांच्यावर कोपरगांव शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. परिचारिकेने दिलेल्या फिर्यादीवरुन आता तहसीलदारांविरोधात हा गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर येत असून पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक भरत दाते पुढील तपास करत आहे. दरम्यान या प्रकरणी तहसीलदार बोरुडे यांच्यावर पोलीस आणि प्रशासन काय कारवाई करतात, याकडे लक्ष लागले आहे. कोपरगाव तहसील कार्यालयाचे दंडाधिकारी विजय बोरुडे यांनी शनिवारी ग्रामीण रुग्णालयात अचानक प्रवेश करून तेथील दरवाजा जोरजोराने ठोठावून तेथील पुरुष कर्मचाऱ्यांना बाहेर काढून तेथील परिचारिकेशी व…
महाराष्ट्र संवाद न्यूज आपली समिती.. आपली ताकद.. या टॅगलाईनखाली एकत्र आलेल्या सर्वपक्षीय शिवजयंती उत्सव समितीच्या २०२३ च्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी शनिवारी पार पडल्या. चंद्रशेखर चौकातील मोठे मारुती मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमीत्त नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नव्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी करण्यात आल्या. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातुन एकवटलेल्या शहरातील सर्व पक्षीय युवकांचे संघटन नेहमीच चर्चेचा विषय राहीले आहे. उत्सव समितीच्या माध्यमातून दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात. तसेच तिथीनूसार साजरी होणारी शिवजयंती लक्ष्यवेधी ठरत असते. त्यामुळे दरवर्षी या समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडीला देखील विशेष महत्व असते. समितीवर कोणाची वर्णी लागते याची मोठी उत्सुकता संगमनेरातील सर्वपक्षीय उत्सव समितीच्या कार्यकर्त्यामध्ये असते. पक्षीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तरुणांचा देश म्हणून भारत ओळखला जातो. सशक्त तरुण पिढी घडविण्यासाठी अमृतवाहिनी शिक्षण संस्थेने सातत्याने काम केले असून मेधा सांस्कृतिक महोत्सवांमधून विद्यार्थ्यांसाठी मोठी सकारात्मक ऊर्जा मिळत असल्याचे प्रतिपादन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी केले आहे. अमृतवाहिनीच्या मेधा महोत्सवातील अमृत कला मंच या ठिकाणी झालेल्या युवा संवाद या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी अध्यक्षस्थानी विश्वस्त शरयू देशमुख होत्या. व्यासपीठावर, कार्पोरेट ट्रेनर डॉ. रत्नाकर आहिरे, रेडिओ जॉकी अक्षय, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. व्ही. बी. धुमाळ, इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ. एम. ए. व्यंकटेश, मेधाचे समन्वयक प्रा. जी. बी. काळे, प्राचार्य डॉ. मच्छिंद्र चव्हाण, डॉ. मनोज शिरभाते, डॉ.…
रविवार विशेष लेख ● प्रवीण पुरो राजकारणात काही व्यक्तींची निर्मिती ही केवळ वादळ निर्माण करण्यासाठीच असते, असं म्हणतात. त्यात ती व्यक्ती प्रशासनाचा भाग असेल तर वादळांची काही कमी नाही. जेव्हा तेव्हा वादळं येतातच. नुकतेच राजीनामा देऊन घरी गेलेले एकेकाळचे संघ प्रचारक आणि महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची झिंग अजूनही उतरलेली दिसत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री अशी पदं भूषवून निवृत्त झालेल्या जबाबदार व्यक्तीने त्या काळातील सामान्य गोष्टींची फार वाच्यता करू नये. त्या पदाच्या गरीमेला ते शोभा देत नाही. तसं नसतं तर निवृत्त झालेल्या राष्ट्रपतीने आपल्या जीवनातील अनेक किस्से ऐकवले असते. राज्यपाल आणि मुख्यमंत्रीही मागे राहिले नसते. संकेत आणि संस्कृतीचा तो…
