Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज नासिक-पुणे महामार्गावर संगमनेर नजीक असलेल्या रायतेवाडी फाटा येथे एसटी बस आणि हुंडाई कारच्या झालेल्या धडकेत एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले आहे. जखमींवर संगमनेर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या अपघातासंदर्भात अधिक माहिती अशी, नासिक येथील मित्तल कुटुंबीय गुरुवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मालकीच्या हुंदाई कारमध्ये संगमनेरहून पुण्याच्या दिशेने जात होते. त्यांची कार रायतेवाडी फाटा येथे आली असताना समोरून पुण्याहून संगमनेर कडे येणाऱ्या एसटी बसने कारला जोराची धडक दिली. या अपघातात अजयकुमार राजेंद्रकुमार मित्तल, त्यांची पत्नी दीपशिखा अजयकुमार मित्तल, मुलगा शिखर अजय कुमार मित्तल आणि सून आहण शिखर मित्तल (सर्व रा. फ्लॅट नंबर ८, साईप्रसाद…
महाराष्ट्र संवाद न्यूज अल्पवयीन मुलीस रात्रीच्या वेळी अज्ञात इसमाने फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या वडिलांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात केली आहे. संगमनेर तालुक्यातील संगमनेर खुर्द येथे हा प्रकार घडला असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. यासंदर्भात अधिक माहिती अशी की, संगमनेर खुर्द येथे तक्रारदाराचे कुटुंबीय राहत असून ते मोलमजुरी करतात. मंगळवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास जेवण झाल्यानंतर सर्व कुटुंबीय झोपी गेले होते. पहाटे चार वाजण्याच्या सुमारास तक्रारदार कामावर जाण्यासाठी कुठले असताना त्यांची सोळा वर्षे सहा महिने वयाची मुलगी त्यांना अंथरुणावर झोपलेली दिसून आली नाही. त्यामुळे त्यांनी घराबाहेर येऊन आजूबाजूच्या परिसरात संगमनेर शहरात आणि नातेवाईकाकडे तिचा शोध घेतला, मात्र ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज न्यायालयात सुरू असलेल्या खून आणि मोका केस मधून तक्रारदाराच्या मावस भावाला सुटकेसाठी मदत करण्याकरिता सत्र न्यायालयाच्या वरिष्ठ लिपिकाने तब्बल दहा लाख रुपयांची लाच मागितली असल्याचा प्रकार समोर आला आहे. लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लावलेल्या सापळ्यात हा लाचखोर लिपिक दीड लाख रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडला गेला. सचिन अशोक देठे वय ३९ वर्ष असे या लाचखोर वरिष्ठ लिपिकाचे नाव आहे. लाच लुचपत विभागाने गुरुवारी ही कारवाई केली. तक्रारदाराच्या मावस भावाविरोधात खून व मोका केसचा खटला पुण्याच्या शिवाजीनगर सत्र न्यायालयात सुरू आहे. या खटल्याच्या साक्षीचे जाबजबाब टायपिंग करताना आवश्यक ते बदल करून केस मधून सुटकेसाठी मदत करतो असे सांगत सत्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यामधील आरोपीची संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. परीक्षेसाठी प्रवेश पत्र काढण्याकरिता अकोले येथील सायबर कॅफेमध्ये गेलेल्या बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यावर गावातीलच तरुणाकडून अनैसर्गिक वर्तन केल्याच्या कारणावरून आरोपी विरोधात अकोले पोलीस ठाण्यात बाल लैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. चार वर्षांपूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या या गुन्ह्याचा तपास तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक व्ही. एन. काळे यांनी करत संगमनेरच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात आरोपी विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. न्यायाधीश प्रशांत कुलकर्णी यांच्यासमोर या घटनेची सुनावणी सुरू होती. खटल्या दरम्यान आरोपी जामिनावर मुक्त होता. दोषारोप पत्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज आज सत्ता असल्यानं तुमच्याकडे सुरक्षा व्यवस्था आहे. तुम्ही आमची सुरक्षा काढली. आम्ही एकटं फिरतोय मर्दासारखं. आम्ही म्हणतो का सुरक्षा द्या म्हणून? आम्हाला कोणी हात लावतंय का? तुम्हीदेखील सुरक्षेशिवाय फिरण्याची हिंमत दाखवा. तुम्ही सुरक्षेत फिरताय याचा अर्थ तुम्हाला भीती आहे. जनता खवळलेली आहे, असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत शुक्रवारी नाशिक दौऱ्यावर आले या दौऱ्या दरम्यान झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी एकनाथ शिंदे गटावर पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. हिंमत असेल तर सुरक्षेविना फिरून दाखवा, असा इशाराच त्यांनी बंडखोरांना दिला आहे. आम्ही बघा सुरक्षेविना बिनधासत्पणे फिरू शकतोय, असंही ते म्हणाले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज बारा वर्षाच्या मुलीने सोळा वर्षाच्या मुलाबरोबर पळून जात लग्न केले. नंतरच्या लग्न संबंधातून या मुलीला दिवस गेल्याने ही बाब समोर आली. तसेच या मुलीच्या पतीचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्याचे देखील तिने सांगितले आहे. पीडित मुलीच्या तोंडून हा प्रकार ऐकल्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. यामुळे पुणे जिल्ह्यातील बालविवाहाचा हा प्रकार समोर आला. अल्पवयीन पीडित बालिकेची ओळख एका यात्रेमध्ये आरोपी असलेल्या सोळा वर्षीय मुलासोबत झाली होती. त्याने तिला लग्नाची मागणी घातली. मात्र या मुलीने लग्नास नकार दिल्याने, मी विष पिऊन आत्महत्या करेल अशी धमकी वजा विनवणी आरोपीने पीडित मुलीला केली होती. त्यामुळे मुलीने लग्नाला होकार देत त्याच्यासोबत पळून जाऊन लग्न…
महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी कोणत्याही प्रकारची जागा निश्चित करण्यात आली नसून पुतळ्यासाठी करण्यात आलेली तरतूद देखील ५० लाखावरून २५ लाख रुपयांवर नेण्यात आली आहे, अशाप्रकारे बोगस तरतुदी करण्यात आल्याचे स्पष्ट करत ‘खोटे बोला पण रेटून बोला, हे काँग्रेसचे विकास मॉडेल’ असल्याचे माजी उपनगराध्यक्ष जावेद जहागीरदार यांनी म्हटले आहे. राज्याचे महसूल मंत्री व पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष ॲड. श्रीराम गणपुले यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरमध्ये भाजपची सत्ता आल्यास छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार असल्याचे विधान जहागीरदार यांनी केले होते. त्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांनी जागा…
महाराष्ट्र संवाद न्यूज वाळू लिलावासाठी शासनाच्या नवीन धोरणाची लवकरच अंमलबजावणी सुरू होणार असून त्यासाठी जिल्हाधिकारी स्तरावर समिती नियुक्त करण्यात येणार आहे. सरकारच्या यंत्रणेमार्फतच वाळूचे डेपो उभे करून ऑनलाईन पद्धतीने वाळू दिली जाणार आहे. त्यामुळे प्रशासकीय स्तरावर वाळूचे लिलाव होणार नाहीत, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. नाशिकमध्ये विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या महसूल यंत्रणेच्या कामकाजाबाबत आढावा बैठकीत मंत्री विखे बोलत होते. त्यांनी जनावरांच्या लम्पी स्किन संदर्भात देखील आढावा घेतला. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिकचे जिल्हाधिकारी गंगाथरन डी., अहमदनगरचे जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, धुळ्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा, जळगावचे प्रभारी जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, नंदूरबारचे प्रभारी जिल्हाधिकारी महेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज मागील अडीच वर्षात महिलांच्या बाबतीत अनेक गैरप्रकार घडले होते. मात्र आता राज्यात शिंदे–फडणवीस यांचे सरकार असल्याने तेव्हा महिलांशी गैरवर्तन करणार्यांची यापुढे गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत महिलांशी संबंधित प्रकरणाचा त्वरित निपटारा करण्यासाठी जलदगती न्यायालय सुरु करण्याची मागणी राज्य सरकारकडे करणार असल्याचे भाजपच्या महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी म्हटले आहे. महिला मोर्च्याचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर वाघ प्रथमच ठाण्यात आल्या होत्या. ठाणे खोपट येथील भाजपा कार्यालयात पत्रकारांशी बोलताना त्या म्हणाल्या, आम्ही आता सत्ताधारी पक्षात आहोत. त्यामुळे आमची जबाबदारी वाढली असून केंद्र आणि राज्य सरकारच्या योजना गोरगरिबापर्यंत पोहचवण्याचे काम करणार आहोत. राज्यात पहिल्यांदा एका पुरुषाकडे महिला बालकल्याण…
महाराष्ट्र संवाद न्यूज युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे अनुवादित ‘सिटीझनविल’ या मराठी पुस्तकाचा प्रकाशन सोहळा बुधवारी 7 डिसेंबरला साडेतीन वाजता मुंबईमध्ये होत आहे. अमेरिकेतील कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर गॅविन न्यूसम यांनी ‘सिटीझनविल’ हे पुस्तक लिहिले असून या पुस्तकाचा युवक काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मराठीमध्ये अनुवाद केला आहे. प्रकाशनापूर्वीच तांबे यांनी अनुवादित केलेले हे पुस्तक बहुचर्चित ठरले आहे. पुण्याच्या अमेय प्रकाशनच्या माध्यमातून हे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाढती लोकसंख्या आणि त्यामुळे वाढणारा पायाभूत सुविधांवरील ताण कमी करण्यासाठी शहरांचा विकास नियोजनबद्ध रीतीने होणे गरजेच झालंय, किंबहुना ती काळाची गरजच बनली. ही नियोजनबद्धता आणण्यासाठी हवा असतो एक वेगळा दृष्टिकोन, इच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न.…
