Author: अनंत पांगारकर
वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही: महसूल मंत्री विखे पाटील
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : वाळू माफीयांवरील कारवाई कोणाला दडपशाही वाटत असेल तर, मला त्याची फिकीर नाही. माफीयांच्या तावडीतून प्रवरामाई मुक्त केली याचे समाधान मला आहे. या वाळूच्या विरोधात आदरणीय खासदार साहेबांनी सुध्दा मोठा संघर्ष केला. त्याच विचाराने आपण या अवैध वाळू तस्करीला लगाम घातला असल्याचे प्रतिपादन महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. तालुक्यातील जोर्वे येथे जल जीवन मिशन अंतर्गत सुमारे १४ कोटी रुपयांच्या नळ पाणी पुरवठा योजनेच्या कामाचा शुभारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. निवृत्त पोलीस अधिकारी हरीभाऊ कोल्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भाजपाचे तालुका अध्यक्ष सतीश कानवडे, शहर…
होळी विशेष ● रवींद्र एरंडे अस्सल संगमनेरी बोंबाबोंब ऐकायची आणि सहन करायची असेल तर, संगमनेरच्या होळीमध्ये सामील व्हायला हवं. बदलत्या काळानुसार होळी उत्सवात बदल झाला असल्यास तरी जुन्या होळीच्या आठवणी कायम आहेत. होळी साजरं करणारं मंडळ आठवड्यापासूनच तयारीला लागतं. पूर्वी लहानपणी घरोघरी फिरून गोवर्या (गवर्या) मागीतल्या जात. वखारीतून लाकडं आणली जात, सायंकाळी होळीभोवती शेणसडा, रांगोळी, पूजा करुन होळी पेटवली जायची. मग गल्लीतल्या बायाबापड्या पुरणपोळीचा नैवेद्य घेऊन यायच्या. तांब्यातील पाण्याने प्रदक्षिणा मारायची. खोबर्याची वाटी जाळायची.त्याचा प्रसाद वाटायचा. “होळीच्या गवर्या पाच पाच…होळीपुढं नाच नाच” असा सूर निघायचा. तो साधारणतः साडे आठ पर्यंत… नंतर होळकरी पोरं टप्प्याटप्प्याने घरी जेवण करुन यायची आणि मग…
महाराष्ट्र संवाद न्यूज कांद्याच्या दराने शेतकऱ्यांना रडविले असताना आता कांद्याचा प्रश्न पेटला असल्याचे दिसत आहे. अमरावतीमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाहनावर कांदे फेकण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत एका व्यक्तीला ताब्यात घेतले. कमी कांद्याच्या उत्पादनामुळे जगातील अनेक देशांना रडवत असलेला कांदा आता मात्र आपल्या राज्यात भाव नसल्यामुळे शेतकऱ्यांना रडवत असल्याचे दिसत आहे. अहमदनगर जिल्ह्यात संगमनेरमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि पारनेरमध्ये आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी आंदोलन झाले असतानाच आता राज्यात कांदा प्रश्नी शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होताना दिसू लागला आहे. एकीकडे विरोधकांनी या प्रश्नी सभागृहात आवाज उठवताना आता आंदोलने देखील सुरू केले आहे. अशातच उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री…
महाराष्ट्र संवाद न्यूज लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षाने जनतेच्या सेवेकरांची संख्या अचानक वाढत असते. सेवेची बाधा झालेले हे लोक घरोघरी जात सेवेची संधी देण्याची मागणी करतात मात्र, त्यानंतर महिनाभरात ही साथ ओसरते आणि हे सेवेकरी जातात कुठे? असा प्रश्न उपस्थित करत याचे उत्तर पाच वर्षांनी मिळत असते, अशा शब्दात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. मोहन भागवत यांनी सध्याच्या राजकारणावर भाष्य केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवानिधी संस्थेच्यावतीने ‘सेवा भवन’ प्रकल्पाच्या इमारतीचे पुण्यामध्ये शनिवारी डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त गांधी लॉन्स येथे झालेल्या कार्यक्रमात…
महाराष्ट्र संवाद न्यूज नाशिक समस्या नसतील तर तिथे जीवनच नाही. प्रत्येकाच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या येतात. काही समस्या मार्गी लागतात तर काहींवर उपाय नसतो. अशा समस्या सोडवल्या जाऊ शकत नाहीत. अशा समस्यांचा सामना करण्यासाठी भावनिक आधार महत्वाचा आहे. समस्या कितीही असुद्या त्यांना सामोरे जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. संघर्ष असल्याशिवाय जीवन व्यर्थ आहे. नाती जपली पाहिजेत, मित्र जपले पाहिजेत, असा उपदेश प्रसिद्ध लाइफ कोच गौर गोपालदास यांनी केला. एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या शैक्षणिक संकूलात ‘एसएमबीटी फेस्ट २०२३’ या वार्षिकोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ते विद्यार्थ्यांना संबोधित करत होते. कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, एसएमबीटीचे मुख्य विश्वस्त…
महाराष्ट्र संवाद न्यूज माजी गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या घरी त्यांचे चुलत भाऊ चंद्रशेखर पाटील चाकूरकर यांनी स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केली आहे. तातडीने घटनास्थळी पोहोचलेल्या पोलीस पथकाने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला आहे. घटना घडली तेव्हा शिवराज पाटील चाकूरकर हे दिल्ली होते. चंद्रशेखर पाटील हे 80 वर्षांचे होते, ते शिवराज पाटील चाकूरकर यांच्या लातुर येथील घराच्याजवळ राहत होते. दररोज वृत्तपत्र वाचण्यासाठी आणि सहज फेरफटका मारण्यासाठी चाकूरकर यांच्या घरी ते यायचे. आजही ते सहजपणे शिवराज पाटील चाकूरकर यांच्या ‘देवघर’ या निवासस्थानी आले होते. तिथे त्यांनी स्वतः सोबत आणलेल्या बंदुकीतून डोक्यात गोळी झाडून घेतली. फायरचा आवाज झाल्यानंतर चाकूरकर यांचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ○ अनंत पांगारकर संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते साई मंदिरा दरम्यान असलेला म्हाळुंगी नदीवरील पूल गेल्या काही महिन्यापासून वाहतुकीसाठी बंद आहे. खचलेल्या या पुलाचे काम तातडीने सुरू करण्यात यावे, अशी मागणी संघर्ष सामाजिक संस्थेने केली आहे. अन्यथा यासाठी संस्थेच्या वतीने संघर्षाचा इशारा देण्यात आला आहे. स्वामी समर्थ मंदिरालगत असलेल्या या पुलावरून साई मंदिर, प्रवरा नदी, गंगामाई घाट, पंपिंग स्टेशन, कासारवाडी, साईनगर, घोडेकर मळा, दिगंबर गणेश सराफ विद्यालय, देवेंद्र ओहरा महाविद्यालय, मालपाणी हेल्थ क्लब आदी ठिकाणी ये-जा करता येते. साधारणत: ऑक्टोंबरमध्ये या भागाला जोडणारा म्हाळुंगी नदीवरील पूल मानवनिर्मित चुकांमुळे कसला आहे. जवळपास सहा महिन्याहून अधिक काळ हा…
रविवार विशेष ○ प्रवीण पुरो कायदे मंडळाची दोन सभागृहे खोटं बोलण्याची व्यासपीठ होऊ नयेत, असं कितीही म्हटलं तरी आता या सभागृहांचा वापर रेटून खोटं बोलण्यासाठी केला जातो, हे आता स्पष्ट होऊ लागलं आहे. आपल्यावरील आक्षेप ढकलून देण्यासाठी सत्ताधारी खुलेआम खोटेपणा करतात आणि हा खोटेपणा बहुमताच्या जोरावर टाळ्यांच्या गजरात खपवून घेतात. असे एक ना अनेक प्रसंग विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आताही घडतात आणि यापूर्वीही घडून गेलेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आणण्यात आलेल्या हक्कभंग प्रकरणानंतरही त्यांनी घेतलेली कोलांटउडी हा याच पठडीतील विषय ठरला आहे. कितीही खोटं बोललं तरी जिथे काहीच बिघडत नाही, असं हे ठिकाण बनलंय. आपण शहाण्यासारखं वागलं पाहिजे याचं भान…
महाराष्ट्र संवाद न्यूज रिव्हॉल्वरचा धाक दाखवून पेट्रोल पंपावरील अडीच लाख रुपयांचे लूट करणारे, पंचर दुकानदारावर हल्ला करून त्याचे मोटरसायकल लांबविणारे तीन गुन्हेगार नगरच्या स्थानिक पुणे शाखेला पकडण्यात यश आले. पेट्रोल पंपावरील लुटी सोबतच नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खून प्रकरणाचाही उलगडा या आरोपींकडून करण्यात पोलिसांना यश आले आहे. गेल्या रविवारी (ता. २६ फेब्रुवारी) संगमनेरच्या पठार भागात साकुर मांडवे रस्त्यावरील भगवान पेट्रोलियम या पेट्रोल पंपावर तिघा सशस्त्र चोरट्यांनी आपल्याकडील दोन्ही दुचाकीमध्ये पेट्रोल भरत पेट्रोल पंपावरील केबिनमध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून अडीच लाखाची लूट केली होती. तत्पूर्वी याच आरोपींनी माहूली गावच्या शिवारात एका पंचर दुकानदाराला रिव्हॉल्वरचा धाक दाखवत त्याच्यावर…
महाराष्ट्र संवाद न्यूज भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. मात्र मेट्रो आणि स्मार्ट सिटीकडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा व कोणत्याही शेतकऱ्यांची वीज कनेक्शन कट करू नये, अशी आग्रही मागणी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली. संगमनेरमध्ये महाविकास आघाडीच्यावतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी मोर्चा व धरणे आंदोलन झाले. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ.…
