Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कारागृहातून रजेवर गेलेला कैदी अद्याप परतला नाही, तब्बल वर्षानंतर जाग्या झालेल्या कारागृह प्रशासनाने या संदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. प्रकाश कांतीलाल पंचाळ असे या कायद्याचे नाव असून तो नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होता. कारागृहात शिक्षा भोगत असताना पंचाळ याने कारागृह प्रशासनाकडे काही दिवसांसाठी सुट्टीची मागणी केली होती. नाशिक रोड कारागृह प्रशासनाने त्याला 30 एप्रिल 2021 ते 16 मे 2021 अशी सुट्टी मंजूर केली होती. रजेवर गेलेला हा कैदी 16 मे 2021 मध्ये पुन्हा कारागृहात येणे अपेक्षित होते. मात्र हा कैदी पुन्हा आजतागायत नाशिक रोड कारागृहात परतला नसल्याचे समोर आले आहे. तब्बल वर्षभराचा कालावधी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत अपेक्षेप्रमाणे शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) ऋतुजा लटके यांनी विजय मिळविला आहे. विरोधकांनी उमेदवार दिला नसला तरी प्रतिष्ठेच्या बनविलेल्या ‘नोटा’ला दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली. तर उर्वरित सहा अपक्ष उमेदवारांपैकी एकही उमेदवार दोन हजाराचा पल्ला गाठू शकला नाही. शिवसेनेमध्ये झालेल्या सर्वात मोठ्या बंडा नंतर अंधेरी पूर्वची पोटनिवडणूक देशभर चर्चिली गेली. विविध कारणांमुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. शिवसेनेतील फुटी नंतर प्रथमतः उद्धव ठाकरे गटाने हे मोठे यश मिळविले आहे. आमदार रमेश लटके यांच्या निधनानंतर त्यांच्या रिक्त जागेसाठी ही पोटनिवडणूक झाली. पोट निवडणुकीआधीच शिवसेनेमध्ये मोठी फूट पडली होती. त्यामुळे या जागेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क चौथीही मुलगी झाली म्हणून पती-पत्नीने तिला विहीरीत टाकून मारले, मात्र बिबट्याने तिला पळवून नेल्याचा बनाव केला म्हणून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी पती-पत्नीची संगमनेरच्या अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २०१४ मध्ये ही घटना घडली होती. सुदाम भिमाजी कोटकर आणि उज्ज्वला सुदाम कोटकर अशी न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या पती-पत्नीची नांवे आहेत. संगमनेर तालुक्यातील देवगांव येथे २१ जानेवारी २०१४ रोजी बिबट्याने आठ दिवसांच्या मुलीस पळवून नेल्याची घटना घडली होती. या चिमुरडीचा मृतदेह रामनाथ नामदेव कोटकर यांच्या शेतातील विहीरीत आढळून आला होता. तत्कालिन सहाय्यक पोलीस निरीक्षक देवयानी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क गांजाची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरमध्ये 172 किलो गांजा सह तब्बल 24 लाखाच्या माध्यमातून हस्तगत केल्याची घटना शनिवारी रात्री घडली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून या गांजा प्रकरणी सखोल तपास करून याची पाळमुळे शोधण्याचे आव्हान शहर पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. पोलीस पोलीस या प्रकरणाच्या मुळाशी जातात की संबंधितांना क्लीन चिट देतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईलच. संगमनेर शहरानजीक कोल्हार-घोटी राज्यमार्गावर समनापुर शिवारात शहर पोलिसांनी ही कारवाई केली. एका ब्रिझा कारमधून कोल्हार घोटी मार्गावरील लोणी कडून संगमनेरच्या दिशेने गांजा आणला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांचे पथक संशयित वाहनाची तपासणी करण्यासाठी समनापुर…

Read More

रविवार विशेष | प्रवीण पुरो गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या भल्याच्या चर्चा करणार्‍यांमध्ये खरं कोण आणि खोटं कोण, याचा थांगच लागत नव्हता. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणं, मीच तितका खरा असल्याचं ठासून सांगण्यासाठी प्रचंड खोटं बोलणं आणि याद्वारे जनतेला मुर्ख बनवण्याचे उद्योग लीलया सुरू आहेत. राज्यात येऊ घातलेल्या उद्योगांनी गुजरातला अधिकची पसंती देण्याच्या घटनेने दोन्हीकडून सर्वत्र टीकेचं माहोल उठलं असताना आपणच कसे बरोबर आणि विरोधक खोटारडे असल्याचे पाढे भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच वाचले. त्यांच्या तोंडी गुजरात म्हणजे पाकिस्तान नव्हे, तो तर आपला भाऊच आहे. फडणवीस अगदी योग्य बोलले. याच भावाने गेल्या सात आठ वर्षात महाराष्ट्राची उपटलेली पिसं पाहिली…

Read More

आजारपणातही शरद पवारांनी पदाधिकाऱ्यांना केले मार्गदर्शन महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क महाराष्ट्रातून मोठ मोठे प्रकल्प राज्याबाहेर जात आहे, याची सरकारला कोणतेही काळजी नाही. राज्यात ओला दुष्काळ निर्माण झाला आहे. शेतकरी मदतीची वाट बघतोय मात्र अशा स्थितीत सरकार कुठे आहे? असा प्रश्न निर्माण होतो. पुरोगामी विचारांची कास सोडू नका, आगामी काळात पक्ष वाढवावा लागणार असून निवडणुकांसाठी कामाला लागा, असा आदेश राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिला. शुक्रवारपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे “राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा” हे दोन दिवसांचे शिबिर सुरू आहे. प्रकृती अस्वस्थामुळे चार दिवसांपासून रुग्णालयात उपचार घेत असलेले शरद पवार या शिबिरासाठी उपस्थित राहणार की नाही, अशी स्थिती निर्माण झाली असतानाच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क पत्नीचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याच्या कारणावरून पतीला नाशिकच्या जिल्हा व सत्र न्यायालयाने दोन वर्ष साध्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे. राकेश कैलास गायकवाड (रा. हिरावाडी रोड, नाशिक) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. 28 एप्रिल 2015 ते 2019 या काळात आरोपी पती राकेश गायकवाडसह सासरे कैलास गायकवाड, सासू शशिकला गायकवाड या संशयितांनी किरकोळ कारणावरून किरकोळ कारणावरून उपाशीपोटी ठेवत विवाहितेचा मानसिक व शारीरिक छळ केल्याची तक्रार आरोपीच्या पत्नीने पंचवटी पोलीस ठाण्यात दाखल केली होती. या गुन्ह्याचा तपास तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक उमा गवळी यांनी करून न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. कोर्ट क्रमांक 8 च्या अतिरिक्त…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांचा पुतळा जाणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एका निवेदनाद्वारे पोलीस उपाधीक्षकांकडे करण्यात आली आहे. पोलीस उपाधीक्षकांकडे मागणी करणाऱ्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आजी-माजी कार्यकर्त्यांमध्ये शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख जयवंत पवार, तालुकाप्रमुख जनार्दन आहेर, उप जिल्हाप्रमुख दिलीप साळगट, शहरप्रमुख प्रसाद पवार, युवा सेनेचे तालुकाप्रमुख गुलाब भोसले, अमोल कवडे, शहर संघटक पप्पू कानकाटे, उपतालुका प्रमुख सोमनाथ काळे, माजी पंचायत समिती सदस्य अशोक सातपुते, संतोष कुटे, समीर ओझा, रवी गिरी, बाळासाहेब घोडके आदींचा समावेश होता. शिवसेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या विरोधात संगमनेर अकोले कोपरगाव या ठिकाणी आंदोलने आणि निषेध…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क शिवसेना पदाधिकाऱ्यांना दूर ठेवत शनिवारी सकाळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करत त्यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. गेला काही दिवसापासून शिर्डी लोकसभा मतदारसंघात सुरू असलेल्या शिवसेनेतील अंतर्गत खदखद यामुळे समोर आली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशावरून संपर्कप्रमुख बबन घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे नवे पदाधिकारी जाहीर करण्यात आले होते. यात काही पदाधिकाऱ्यांचे पद काढून घेण्यात आले होते. तर त्यांचा पदभार नव्या पदाधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला त्यामुळे पक्षातील अनेक निष्ठावंत म्हणविणारे नाराज झाले. पदच्युत झालेल्या जुन्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्यावरील आपल्या निष्ठा कायम ठेवत त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपला निर्णय घेण्याचे जाहीर केले…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क आपली सत्ता केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच धोक्यात आणू शकतो याची जाण सत्ताधाऱ्यांना असल्याने ते राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका करत आहेत याचाच अर्थ आपला पक्ष बलशाली असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन दिवसीय राज्यव्यापी मंथन व वेध भविष्याचा या राज्यस्तरीय शिबिराला शुक्रवारी शिर्डीत सुरुवात झाली. यावेळी पाटील बोलत होते. शिबिरात बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला केला. राज्यात सत्ता नसताना आपण केंद्रस्थानी होतो. हल्लाबोल आंदोलन केले. पदयात्रा काढली. त्यानंतर विदर्भात बोंडअळी नुकसानग्रस्तांना मदत सरकारला द्यावी लागली. आज शेतकरी अडचणीत आणि अस्वस्थ आहे. सरकार मात्र याकडे लक्ष देत नाही. शेतकऱ्यांना मदत…

Read More