Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) अहिल्यानगरमध्ये एक मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किंमतीचे ७५ हजार ३५६ किलो वजनाचे संशयास्पद बटर जप्त केले आहे. एमआयडीसी भागातील एका शीतगृहावर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास टाकलेली ही धाड शुक्रवारी सकाळी संपली. जप्त करण्यात आलेले बटर कमी दर्जाचे असल्याचा संशय असून त्यावर मुदत संपण्याच्या तारखेचा उल्लेख नसल्याने लेबल वर्णनाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पाटस (ता. दौंड) येथील ‘मधुरमा क्रिमी डिलाईट’ या कंपनीने या पाश्चराईज्ड कुकिंग (अनसोल्टेड) बटरची निर्मिती केली…
गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध कलाकारांची नाटके, मनोरंजक स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच फरार आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने संगमनेर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर तब्बल २६,५८७ मतदारांची नावे रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने रद्द झालेल्या मतदारांची गाव, शहर आणि वॉर्डनिहाय स्वतंत्र यादी तातडीने जाहीर करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे. तालुक्यात SIR अंतर्गत पार पडलेल्या मतदार यादी मोहिमेनंतर हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, आपले नाव यादीत आहे की नाही हे शोधण्यासाठी नागरिकांना मोठा वेळ घालवावा लागत आहे. जर महसूल प्रशासनाने २६,५८७ रद्द मतदारांची यादी स्वतंत्रपणे सार्वजनिक केली, तर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीवर संगमनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार कृष्णा वालझाडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतेच पारित केले आहेत. माहिती व तंत्रज्ञान आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पथ विक्रेता अधिनियम २०१४ व महाराष्ट्र पथ विक्रेता नियम २०१६ अन्वये राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी शासकीय तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठी संगमनेर येथील सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम…
आजचे राशिभविष्य- मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि ऊर्जादायी ठरेल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा नाहक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि प्रियजनांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ आज मनात नवीन विचार आणि सकारात्मकता राहील. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून शुभ बातमी ऐकायला मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील आणि जुने मतभेद मिटतील. सायंकाळी मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. मिथुन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen-Z’ या नव्या टाउनहॉल मालिकेचा टीझर शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला. भारतातील लोकसंख्येत Gen-Z पिढीचा वाटा एक चतुर्थांशपेक्षा अधिक असल्याने, या नवीन राजकीय व सामाजिक घटकाला थेट जोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टीझरसोबत प्रसिद्ध केलेल्या संदेशात पक्षाने म्हटले आहे की, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या तरुण पिढीसोबत संवाद साधण्यासाठी ही टाउनहॉल मालिका आयोजित करण्यात येत आहे. टीझरमध्ये या मालिकेचा अधिक तपशील देण्यात आलेला नसून ‘लवकरच येत आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. टाउनहॉल बैठकीच्या माध्यमातून…
annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध सुगंधीत मावा तयार करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत मावा बनवण्याचे इलेक्ट्रॉनिक मशिन आणि सुगंधित तंबाखूचे साहित्य असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचे पथक पारनेर परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान भाळवणी येथील हॉटेल रुचिराच्या पाठीमागील एका खोलीत बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण करून मावा…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त लोकशाहीतच शक्य आहे. विस्कटलेला समाज आणि राज्य संस्था यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे लोकशाही होय. घटनाकारांनी भारतीय समाजमनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली, तीच लोकशाही आज धोक्यात आली आहे की काय, अशी भीती निर्माण करणारी परिस्थिती सध्या देशात पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या…
Annant Ppangarkar आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील, त्यामुळे पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभल्यामुळे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण कराल. आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा दिसून येईल आणि अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज तुम्हाला संयम आणि शांतता राखण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने समोर येतील, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने त्यावर मात करणे शक्य होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या स्वास्थ्याची…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT च्या अडथळ्याचे कारण देत रद्द करण्यात आल्यानंतर संगमनेरकरांसह चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनाची ‘हवा काढण्यासाठीच’ संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असा गंभीर आणि थेट आरोप संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला आहे. शेलकर म्हणाले, आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नेमके काय साध्य करण्यात आले, हा प्रश्न आजही संगमनेरकरांसमोर अनुत्तरित आहे. संगमनेरातील एका कार्यक्रमात आमदार महोदयांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही ‘अपूर्ण कागदपत्रांची…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर व तालुक्यातील गणेशभक्तांच्या भावनेचा विचार करून गणेशमूर्ती विसर्जनासाठी प्रवरा नदीपात्रात तातडीने पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी आग्रही मागणी नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी केली आहे. यासंदर्भात आमदार तांबे यांनी दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी जिल्हाधिकारी, अहिल्यानगर तसेच कार्यकारी अभियंता, अहिल्यानगर पाटबंधारे विभाग यांना पत्र देऊन तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. संगमनेर शहर व तालुक्यात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. गणेशमूर्तींचे विधिवत विसर्जन करण्यासाठी प्रवरा नदीपात्रात पुरेसे पाणी असणे अत्यावश्यक आहे. मात्र, नदीपात्रात पाणी उपलब्ध नसल्याने यापूर्वीही गणेश विसर्जनाच्या वेळी अडचणी निर्माण झाल्याचे पत्रात नमूद करण्यात आले…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: आगामी गणेशोत्सव भव्य, सुरक्षित आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पाडण्यासाठी संगमनेर नगरपरिषद प्रशासनाने कंबर कसली असून, शहरातील रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्यासोबतच गणेश मंडळांच्या अडचणी सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन चर्चा केली, तसेच शहरातील विविध गणेश मंडळांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधून तयारीचा सविस्तर आढावा घेतला. गणेशोत्सवाच्या काळात शहरात नागरिकांची आणि भाविकांची मोठी वर्दळ असते. मात्र, सध्या शहरातील अनेक प्रमुख रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिकांची मोठी अडचण होत आहे. उत्सवा दरम्यान गणेशभक्तांना आणि मिरवणुकांमध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी डॉ. मैथिली तांबे…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – सोशल मीडियावरील रिल्स, भ्रामक ट्रेंड आणि ऑनलाइन चर्चांच्या प्रभावाखाली येऊन भावनिक गुंतवणुकीचे निर्णय घेणे तरुणांसाठी आर्थिकदृष्ट्या अत्यंत धोकादायक ठरू शकते. व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम, यूट्यूब किंवा फेसबुकवरील प्रत्येक माहिती अचूक व सर्वांसाठी योग्य असतेच असे नाही. त्यामुळे दीर्घकालीन आर्थिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अभ्यासपूर्ण दृष्टिकोन, योग्य नियोजन आणि तज्ज्ञ मार्गदर्शनाला प्राधान्य देत तरुणांनी ‘गुंतवणूक भान’ जपणे गरजेचे आहे, असे स्पष्ट प्रतिपादन गुंतवणूक अभ्यासक व सामाजिक कार्यकर्ते सुनील कडलग यांनी केले. समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित समर्थ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, बेल्हे-बांगरवाडी येथील व्यवस्थापन विभागाच्या (MBA) वतीने एआयसीटीई प्रशिक्षण व शिक्षण (अटल) अकादमीच्या प्रायोजकत्वाखाली ‘डिजिटल युगातील…
Annant Ppangarkar आजचे राशीभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुमच्या मनात अनेक नवनवीन कल्पना मांडल्या जातील आणि तुमचे मनोबल उंचावलेले राहील. कौटुंबिक जीवनात सुख-शांतीचे वातावरण अनुभवायला मिळेल. व्यवसायात नवीन भागीदारी किंवा व्यवहाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमच्या प्रयत्नांना योग्य ते यश मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. सायंकाळचा वेळ प्रियजनांसोबत आनंदात व्यतीत होईल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी आर्थिकदृष्ट्या लाभदायक ठरेल आणि उत्पन्नाचे नवीन मार्ग सापडू शकतात. दीर्घकाळापासून प्रलंबित असलेले काम पूर्ण झाल्यामुळे मनाला मोठा दिलासा मिळेल. कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर सखोल चर्चा होऊ शकते. कामातील व्यस्ततेमुळे शारीरिक थकवा जाणवण्याची…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील महिलांची सुरक्षा आणि कायदा-सुव्यवस्थेच्या दृष्टीने संगमनेर नगर परिषदेने एक अत्यंत महत्त्वाकांक्षी पाऊल उचलत अद्ययावत अशा दोनशे सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची यंत्रणा कार्यान्वित केली. मात्र, एका राजकीय दबावाला बळी पडत स्थानिक पोलीस प्रशासनाने या अतिशय संवेदनशील कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिलांच्या सुरक्षेबाबत नगरपालिका कटिबद्धता दाखवत असताना पोलीस प्रशासनाने दाखवलेल्या या बेजबाबदार उदासीनतेमुळे संगमनेर शहर आणि तालुक्यात संताप निर्माण झाला आहे. संगमनेर हे आधुनिक आणि विकसित शहर म्हणून ओळखले जाते. शहरातील महिलांना निर्भय वातावरण मिळावे आणि आपत्कालीन स्थितीत तातडीने मदत पोहचावी याकरता नगर परिषदेने राज्यातील पहिली मानली जाणारी आपत्ती निवारण यंत्रणा उभारली…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शिक्षणातील लोकसहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा कल्पक वापर करत गणोरे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, शिंदेवाडी येथे राबविण्यात आलेल्या ‘एका विद्यार्थ्यासाठी एक बेंच, माझे अभिमानास्पद पालकत्व’ या अभिनव उपक्रमाला माजी विद्यार्थी, ग्रामस्थ व दात्यांचा अत्यंत उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. अवघ्या एका आठवड्याच्या कालावधीत तब्बल ६८ हजार रुपयांचा निधी संकलित झाला असून, या माध्यमातून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी ४० आकर्षक बेंच उपलब्ध करून देण्यात आले. पोषण महासप्ताह आणि पारंपरिक दहीहंडीच्या औचित्यावर आयोजित विशेष कार्यक्रमात विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या हस्ते या सर्व बेंचचे लोकार्पण करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका वृषाली सुनील कडलग यांनी विद्यार्थ्यांच्या बैठक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी १,७०० रुपये…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – धांदरफळ बुद्रुक येथे महावितरणचे वीजमीटर तपासण्यासाठी गेलेल्या वरिष्ठ तंत्रज्ञाला शासकीय कामात अडथळा आणून लोखंडी रॉडने व हाताने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीचे वरिष्ठ तंत्रज्ञ यादव अशोक खाडे (वय ३२, रा. कसारा दुमाला रोड, संगमनेर) हे आपल्या सहकाऱ्यांसह धांदरफळ बुद्रुक येथील ‘मेसर्स प्रदीप इंजिनिअरिंग वर्क्स’ या दुकानाचे वीजमीटर तपासण्यासाठी गेले होते. त्यावेळी आरोपी प्रदीप भास्कर धुमाळ, भास्कर रावसाहेब धुमाळ आणि गणेश भास्कर धुमाळ (सर्व रा. धांदरफळ बुद्रुक, ता. संगमनेर) यांनी खाडे यांच्याशी वाद घातला. या दरम्यान…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) धडक कारवाई करत कोपरगाव आणि संगमनेर शहर परिसरातील चैन स्नॅचिंगचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या प्रकरणी लोणी परिसरातून दोन सराईत आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून ५ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. कोपरगाव येथील धारणगाव रोडच्या रहिवासी निलम अजितकुमार नय्यर या ४ सप्टेंबर रोजी आपल्या मुलीसह स्कुटीवरून जात असताना श्रीराम पार्कजवळ अज्ञात दोन आरोपींनी त्यांच्या गाडीला धक्का देऊन खाली पाडले. त्यानंतर आरोपींनी मुलीच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र जबरीने चोरून नेले होते. या घटनेप्रकरणी कोपरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी जयहिंद लोकचळवळीच्या वतीने आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय कला महोत्सव अत्यंत यशस्वी ठरला असून, या शिबिरात तालुक्यातील सुमारे १२ हजार विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळत असून, हा कला महोत्सव संपूर्ण महाराष्ट्रासाठी दिशादर्शक ठरेल, असा विश्वास राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल येथे पार पडलेल्या या कला महोत्सवाच्या पारितोषिक वितरण समारंभात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे होते. व्यासपीठावर डॉ. नामदेव गुंजाळ, समन्वयक प्रकाश पारखे, मुख्याध्यापक…
