Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी  १६ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी, संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल संताजी कर्पे (वय ४७ वर्ष) याला संगमनेरच्या अतिरिक्त व जिल्हा सत्र न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी सोमवारी १० दिवसांची पोलीस कोठडी ठोठावली आहे. आता पोलीस चौकशीतून या अत्याचार प्रकरणी नेमकी काय माहिती समोर येते याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. रविवारी रामनवमीच्या दिवशी पहाटे डॉ. कर्पे याने आपल्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल असलेल्या एका १६ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला होता. रविवारी पहाटे सुमारे चार ते पाच वाजण्याच्या दरम्यान रुग्णालयात आलेल्या डॉ. कर्पे याने अल्पवयीन मुलीच्या तब्येतीची विचारपूस करत…

Read More

अकोले, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी उन्हाळी हंगामातील सिंचनाचे आणि बिगर सिंचनाचे पहिले एकत्रित पाणी आवर्तन आज, सोमवारी (७ एप्रिल) सकाळी ७:३० वाजता निळवंडे धरणातून प्रवरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे. जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, हे आवर्तन तब्बल २५ ते २८ दिवस सुरू राहणार आहे. भंडारदरा आणि निळवंडे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांकडून उन्हाळी पिकांसाठी पाण्याची मागणी सातत्याने होत होती. या मागणीची दखल घेत जलसंपदा विभागाने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आज सकाळी १६०० क्युसेकच्या वेगाने पाणी सोडण्यात आले असून, यामुळे प्रवरा नदी दुथडी भरून वाहणार आहे. पाणी सोडतेवेळी भंडारदरा धरणात ६९३४ दशलक्ष घनफूट (दलघफू) तर निळवंडे धरणात ३३३३ दलघफू पाणीसाठा शिल्लक होता. वाढत्या…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेरमधील प्रतिष्ठित डॉ. अमोल कर्पे याने अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्कारामुळे शहरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा तीव्र निषेध करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी शहर प्रमुख अमर कतारी यांनी आरोपी डॉ. अमोल कर्पे याला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. या मागणीसाठी आज शिवसेना आणि महिला आघाडीच्यावतीने पोलीस उप अधीक्षक कुणाल सोनवणे यांना निवेदन देण्यात आले. त्यानंतर या सर्व पदाधिकारी, शिवसैनिकांनी डॉ. कर्पे याच्या रुग्णालयात जात निदर्शने केली. निवेदनात शिवसेनेने स्पष्टपणे म्हटले आहे की, संगमनेर शहर आणि तालुक्यातील आरोग्यसेवेच्या चांगल्या परंपरेला डॉ. अमोल कर्पे याच्या कृत्याने काळीमा फासला आहे. एका निष्पाप अल्पवयीन…

Read More

संगमनेर, दि. ७ एप्रिल  सुप्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक आणि कवी नागराज मंजुळे यांनी व्यंगचित्रांच्या सामर्थ्यावर महत्त्वपूर्ण भाष्य केले आहे. ते म्हणाले, “व्यंगचित्र हे थेट आणि स्पष्टपणे समाजातील वास्तवाला लोकांसमोर मांडते. आपल्यातील त्रुटी आणि कमतरता स्वीकारायला कोणालाही आवडत नाही, परंतु व्यंगचित्र त्या नेमक्या चुकांवर बोट ठेवते. जेव्हा देशाचं आणि समाजाचं चित्र बिघडलेलं असतं, तेव्हा ते अधिक प्रभावीपणे व्यंगचित्रातून समोर येतं. त्याला कोणत्याही प्रकारचं ‘फिल्टर’ नसल्यामुळे ते अधिक परिणामकारक ठरतं. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला आणि संपूर्ण समाजाला व्यंगचित्राची नितांत गरज आहे.” मंजुळे महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती (अंनिस) च्या वतीने पुण्यातील बालगंधर्व कलादालनात आयोजित ‘विवेकरेषा’ या व्यंगचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More

पुणे, दि. ७ एप्रिल –  गर्भवती महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने झालेल्या मृत्यूप्रकरणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर राज्य शासनाच्या चौकशी समितीने ठपका ठेवला आहे. भाजपा आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी तनिषा भिसे यांना प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यास नकार देण्यात आला होता, कारण प्रशासनाने अगोदर १० लाख रुपये भरण्याची मागणी केली होती. यानंतर दुसऱ्या रुग्णालयात दाखल झाल्यावर तनिषा यांनी दोन जुळ्या मुलींना जन्म दिला, परंतु दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले होते. आता या पाच सदस्यीय चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालात रुग्णालयाने ‘नर्सिंग होम अँक्ट’मधील नियमांचे उल्लंघन केल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. रुग्णाला…

Read More

संगमनेर, दि. ६ एप्रिल – प्रतिनिधी शहरातील नामांकित डॉक्टर अमोल कर्पे यांनी एका सोळा वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दवाखान्याच्या टेरेसवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. दरम्यान फरार झालेल्या डॉक्टरला पोलिसांनी नाशिकमधून ताब्यात घेतल्याची माहिती समोर येत आहे. शहरात राम नवमी उत्सवाची धामधुम सुरू असतानाच समोर आलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून डॉ. कर्पेवर शहर पोलीस ठाण्यात बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान रुग्णालयात चौकशीसाठी गेलेल्या महिला पोलीस पोलीस अधिकाऱ्याला दवाखान्यातील महिला कर्मचाऱ्यांनी धक्काबुक्की केल्याचा प्रकार देखील घडला असल्याची माहिती समोर येत आहे. संगमनेर शहरातील कर्पे याच्या दवाखान्यात संगमनेर तालुक्याचा ग्रामीण भागातील अल्पवयीन पीडित…

Read More

रविवार, दि. ६ एप्रिल – लातूर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे (वय ५०) यांनी शनिवारी रात्री शासकीय निवासस्थानी स्वतःवर गोळी झाडून आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. गोळी डोक्यातून आरपार गेल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर लातूरमधील सह्याद्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुक्‍त बाबासाहेब मनोहरे यांनी शनिवारी रात्री सुमारे सव्वा अकरा वाजता त्यांच्या शासकीय बंगल्यावरील एका खोलीत स्वतःच्या रिव्हॉल्व्हरमधून डोक्यात गोळी झाडून घेतली. गोळीचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी तातडीने खोलीकडे धाव घेतली, तेव्हा ते रक्तबंबाळ अवस्थेत आढळले. त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. सह्याद्री हॉस्पिटलचे संचालक डॉ. हनुमंत किनीकर यांनी सांगितले की, गोळी त्यांच्या डोक्याच्या उजव्या…

Read More

पुणे, दि. ६ एप्रिल –  लाचेची रक्कम स्वीकारून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका महिला पोलीस कर्मचाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (५ एप्रिल) पिंपरी न्यायालयाच्या बाहेर करण्यात आली. रेश्मा बाळू नाईकरे (वय ३२) असे लाच घेणाऱ्या महिला पोलीस शिपायाचे नाव आहे. त्या भोसरी पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. या प्रकरणी एका ३५ वर्षीय व्यक्तीने एसीबीकडे तक्रार दाखल केली होती. तक्रारदाराच्या माहितीनुसार, त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे आणि त्यांची डेअरी रात्री उशिरापर्यंत सुरू राहत होती. त्यामुळे भोसरी पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. हा खटला न्यायालयात न पाठवण्यासाठी आणि कोणताही दंड न आकारण्यासाठी पोलीस…

Read More

राज्यात सध्या विशेष जनसुरक्षा विधेयकाचा बोलबाला सुरू आहे. राज्याची अवस्था भिकेच्या कटोर्‍यासारखी असली तरी इथे जनसुरक्षेला अधिक महत्व दिलं जात आहे. कंगालीमध्ये ओरड करण्याचं साधन सामान्यांच्या हाती राहू नये, असंच सरकारला वाटत असावं. जन म्हणजे जनता असा अर्थ कोणी काढून घेऊ नये. जन म्हणजे जनतेसाठी निवडून गेलेले आणि राज्य कारभाराच्या खुर्च्या सांभाळणारे. सत्ता सांभाळणार्‍या या मंडळींच्या सुरक्षेच्या प्रचंड काळजीत सध्या राज्यातलं महायुतीचं सरकार आहे. रस्त्यात कोणीही अडवेल, जाब विचारेल आणि सत्ता सांभाळणार्‍यांना धोका उत्पन्न करेल. या धोक्यापासून वाचवायचं असेल तर जनसुरक्षा कायदा करण्याची आवश्यकता असल्याचा दावा सरकारचा आहे. जनसुरक्षा नावाच्या या कायद्याची टूम आजची नाही. लोकसभा निवडणुकीत भाजप प्रणित युती…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणाचा सहा वर्षानंतर निकाल लागला आहे. या प्रकरणातील चार आरोपींपैकी मुख्य आरोपी अभय कुरुंदकर यानेच अश्विनी बिद्रे यांची हत्या केल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. तर कुंदन भंडारी आणि महेश फाळणीकर या दोघांचा या हत्या प्रकरणात सहभाग असल्याचे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. तर दुसरीकडे राजू पाटील याची निर्दोष मुक्तता केली आहे. मात्र या प्रकरणात झालेल्या तपासावरही न्यायालयाने अत्यंत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांडातील प्रमुख आरोपी बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकरला न्यायालयाने दोषी ठरवले आहे. तर दुसरा आरोपी आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचा भाचा राजू…

Read More