Author: अनंत पांगारकर

गुरुवार, २४ ऑक्टोंबर  विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया (राजहंस दूध) दूध उत्पादक, कर्मचारी आदींच्या बँक खात्यावर ३७ कोटी रुपये वर्ग केले असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी दिली आहे. दूध उत्पादक संस्थांनी गेल्या वर्षात पुरविलेल्या चांगल्या गुणप्रतीच्या दुधावर संघामार्फत दूध उत्पादकांना दिपावलीनिमित्त दूध दर फरक, दूधाचे पेमेंट, अनामत, कामगारांना बोनस आणि मेहनताना, व्यापारी देणे, चढ-उतार निधी आदींचा यात समावेश आहे. देशमुख म्हणाले, माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दूध संघाची वाटचाल कायमच कौतुकास्पद राहिलेली आहे. दूध संघाची मागील वर्षाची उलाढाल ५३८.१० कोटी रूपये झाली. दूध संघाकडून दरवर्षी चांगल्या…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोंबर  अहिल्यानगर – एमआयडीसीमध्ये गॅस पाईपलाईनचे कामकाज सुरू करण्यासाठी ठेकेदाराकडे दहा लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर हा प्रकार समोर आला. गॅस पाईपलाईनच्या कामासाठी दोघांनी दहा लाख रुपये खंडणीची मागणी केली असल्याची तक्रार बीपीसीएल गॅस पाईपलाईनचे ठेकेदार अंकित पारस पिचा (वय ३० हल्ली रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी, अहिल्यानगर) यांनी पोलिसांकडे आहे. ठेकेदाराच्या तक्रारीवरून सोमनाथ कराळे (पूर्ण नाव माहिती नाही, रा. नागापूर, अहिल्यानगर) व एक अनोळखी इसम यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गॅस कंपनीचे ठेकेदार ५ ऑक्टोबरला एमआयडीसी कार्यालय बाहेर उभे असताना तेथे आलेल्या सोमनाथ कराळे याने…

Read More

गुरुवार, २४ ऑक्टोबर २०२४ मेष – वैवाहिक सुख लाभून संतती सौख्य मिळेल. व्यवसाय धंद्यातील रखडलेली जुनी येणी वसूल होतील. आजूबाजूला अनुकूलता भरून राहिल्याने उत्साह आणि उमेद वाढेल. वृषभ – आपल्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवरती प्रभाव पडून आपली महत्त्वाची कामे पूर्ण करून घेण्यात यशस्वी व्हाल. महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मित्रमंडळींचा तसेच समाजातील मान्यवरांची मदत मिळेल. मिथुन – काही महत्त्वाच्या कामांमध्ये अडथळे निर्माण झाल्यासारखे वाटू शकतात पण जिद्द आणि चिकाटी ठेवणे गरजेचे आहे. कार्यमग्न रहा. इतरांवर डोळे झाकून विश्वास ठेवणे धाडसाचे ठरेल. कर्क – नोकरीमध्ये वरिष्ठांचे तसेच सहकाऱ्यांचे सहकार्य अपेक्षेप्रमाणे लाभेल. काही महत्त्वाचे बदल घडू शकतात ते बदल आपल्याला फायदेशीर ठरतील. मित्रमंडळींच्या समवेत मनोरंजनाकरीता…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोबर मुंबई – महाविकास आघाडीचा जागावाटपाचा तिढा काही अंशी सुटला असून त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. पहिल्या यादीतून त्यांनी ६५ उमेदवार जाहीर केले आहेत. या यादीनुसार आदित्य ठाकरे वरळी मतदारसंघातून लढणार असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात केदार दिघे मैदानात उतरणार आहे. ठाकरेंच्या शिवसेनेनं जाहीर केलेल्या यादीत काही वादग्रस्त जागांचाही समावेश आहे. यातील काही जागांवर काँग्रेसनं तर काही जागांवर अन्य छोट्या पक्षांनी दावा केलेला आहे. त्यामुळं उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्या यादीत काही दुरुस्त्या आहेत. त्यात काही प्रशासकीय चुका आहेत.…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोंबर अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी १५ ऑक्टोबर २०२४ पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. १५ ते २२ ऑक्टोबर २०२४ पर्यंत जिल्ह्यात सी-व्हिजिल (C-Vigil app) ॲपवर एकूण ३९ तक्रारी प्राप्त झाल्या. दाखल झालेल्या तक्रारीपैकी २८ तक्रारी आचारसंहिता विभागाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. उर्वरित ११ तक्रारींपैकी २ तक्रारी इतर जिल्ह्यांच्या असल्याने संबंधित जिल्ह्यांना वर्ग करण्याबरोबरच ९ तक्रारी विषयाशी संबंधित नसल्याने त्या निर्गत करण्यात आल्या.  तक्रारींचा निपटारा करण्याचा वेळ सरासरी ३१ मिनिट व ३९ सेंकंदाचा असल्याची माहिती आचार संहिता कक्षातर्फे देण्यात आली आहे. निकाली काढण्यात आलेल्या तक्रारीमध्ये अहमदनगर विधानसभा मतदारसंघाच्या १५, अकोले १, पारनेर १, शेवगाव १, कोपरगाव…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोंबर  मुंबई – महायुतीचा घटक पक्ष असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची पहिली ३८ उमेदवारांची यादी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बुधवारी जाहीर केली. उपमुख्यमंत्री अजित पवार बारामती मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहेत. बुधवारी जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तीन मतदारसंघांचा समावेश आहे. या तीनही मतदार संघातून विद्यमान आमदारांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप, कोपरगावमधून आशुतोष काळे व अकोलेमधून डॉ. किरण लहामटे यांना उमेदवारी देण्यात आले आहे. याशिवाय या यादीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, नरहरी झिरवाळ, धर्मराव बाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे,…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोंबर  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशावरून शिवसेनेची पहिली उमेदवारी यादी जाहीर झाली असून पहिल्या यादीत ४५ जणांचा समावेश आहे. मुख्यमंत्री शिंदे स्वतः कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार आहे. याशिवाय पहिल्या यादीत गुलाबराव पाटील, संजय राठोड, संतोष बांगर, अर्जुन खोतकर, अब्दुल सत्तार, प्रदीप जैस्वाल, संजय शिरसाट, सुहास कांदे, दादा भुसे, प्रताप सरनाईक, यामिनी जाधव, भरत गोगावले, तानाजी सावंत, शहाजी बापू पाटील, शंभुराजे देसाई, दीपक केसरकर आदी उमेदवारांचा प्रमुख उमेदवारांत समावेश आहे. संगमनेर विधानसभा मतदारसंघाची जागा गेल्या अनेक वर्षापासून ठाकरे यांच्या शिवसेनेकडे आहे. शिवसेना फुटीनंतर ही जागा मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे असल्याचे म्हटले जाते. शिंदे गटाकडे प्रबळ उमेदवार नसल्याने भाजपचे…

Read More

बुधवार, २४ ऑक्टोंबर दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेच्या सुमारे ८१ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी गेल्या अनेक दिवसांपासून जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या मुख्य आरोपी चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्या जामीन अर्जावर मंगळवारी संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने निर्णय देत जामीन अर्ज फेटाळला. यामुळे कुटेंची दिवाळी आता कारागृहात साजरी होणार आहे. ऐन दीपावलीच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हा निर्णय दिल्याने ठेवीदारांनी समाधान व्यक्त केले आहे. ऑगस्ट २०२३ मध्ये दूधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेचा आर्थिक घोटाळा समोर आला लेखा परीक्षकांनी दिलेल्या फिर्यादीनुसार सुमारे ८१ कोटी रुपयांच्या या घोटाळ्याच्या गुन्ह्यामध्ये मुख्य आरोपींत पतसंस्थेचा चेअरमन भाऊसाहेब दामोदर कुटे याच्यासह व्यवस्थापक भाऊसाहेब विठ्ठल गुंजाळ, चीफ अकाउंटंट भाऊसाहेब संतू गायकवाड, चेतन…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोबर लाखो रुपयांचे विदेशी मद्य घेऊन निघालेला एक मोठा ट्रक संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा शिवारात संगमनेर-अकोले तालुक्याच्या बॉर्डरवर एका ओढ्यात पलटी झाला. या ट्रकमध्ये असलेल्या लाखो रुपयांच्या विदेशी दारूच्या बाटल्यांचे खोके आजूबाजूच्या लोकांनी आणि काही संघटनांच्या कार्यकर्त्यांनी चोरले असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असला तरी या ट्रकचा चालक आणि दारू घेऊन पळालेले चोरटे अद्याप सापडलेले नाहीत. नाशिकहून पुण्याकडे जाणारा हा ट्रक मुख्य महामार्गाने न जाता ग्रामीण भागात घुसलाच कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथून मॅकडॉल कंपनीच्या दारूच्या बाटल्याचे बॉक्स घेऊन अशोक लेलँड कंपनीचा ट्रक (क्र. एम.एच.१२ एल.टी. ७३२९ हा पुणे…

Read More

बुधवार, २३ ऑक्टोबर २०२४ मेष – आजचा दिवस आपल्याला अनेक दृष्टीने अनुकूल ठरेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. दीर्घकाळ रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी चांगला दिवस. अपेक्षित गाठीभेटी होतील. धनलाभाचे योग. वृषभ – आपल्या कार्यक्षेत्रात तसेच नोकरीच्या ठिकाणी तुम्ही आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल. आरोग्य चांगले राहून आर्थिक लाभ संभवतो. स्थावर- जमिनी विषयीची कामे गतीमान होतील. मिथुन – व्यवसाय-धंद्यात अचानक धनलाभ संभवतो जुनी आर्थिक येणी येतील. परिवारातून आनंददायक वाढता मिळतील. कुटुंबात एखादे धार्मिक अनुष्ठान घडू शकेल. नातेवाईक आप्तेष्टांच्या गाठीभेटी होतील. कर्क – काही अप्रिय निर्णय स्वीकारावे लागण्याची शक्यता आहे. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शांतचित्ताने देणे द्या. वादविवाद टाळा. कुटुंबातील तरुण-तरुणींचे प्रश्न अथवा समस्या…

Read More