Author: Annant Ppangarkar
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समग्र शिक्षा योजना सन २०२६-२७ अंतर्गत संगमनेर विधानसभा मतदारसंघातील कसारा दुमाला येथील सावंतवस्ती, तळेगाव दिघे येथील धनगरवाडी आणि मिर्झापूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये नवीन वर्गखोल्यांचे बांधकाम तसेच पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आमदार अमोल खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे ही माहिती दिली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार व सुरक्षित शैक्षणिक वातावरण मिळावे, यासाठी शाळांच्या भौतिक सुविधांमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी विद्यार्थ्यांच्या संख्येच्या तुलनेत वर्गखोल्या अपुऱ्या असल्याने अध्यापनावर परिणाम होतो. ही बाब लक्षात घेऊन संबंधित शाळांमध्ये आवश्यक वर्गखोल्यांचे बांधकाम करण्यासाठी हा निधी उपलब्ध करून देण्यात…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – तालुक्यातील धांदरफळ पंचक्रोशीसह परिसरात मागील अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अपुऱ्या आणि खंडित वीजपुरवठ्यामुळे शेतकरी कमालीचे त्रस्त झाले आहेत. सातत्याने निवेदने देऊनही महावितरणकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी आज धांदरफळ खुर्द येथील सबस्टेशनवर धडक देत जोरदार आक्रोश मोर्चा काढला. महावितरणच्या चुकीच्या नियोजनामुळे शेती पिकांचे नुकसान होत असून शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी जीव मुठीत धरून शेताला पाणी द्यावे लागत असल्याने आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. सबस्टेशनवर जमलेल्या शेतकरी आणि युवकांच्या शिष्टमंडळाने वीज विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या विविध समस्यांचा पाढा वाचून दाखवला व थेट निवेदन सुपूर्द केले. या प्रसंगी उपकार्यकारी अभियंता रमेश घुगे, ज्युनिअर इंजिनिअर पवार…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या प्रवासाची सोय करण्यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने ग्रामीण भागातील एसटी बसेस मुंबई आणि कोकण मार्गावर वळवल्या आहेत. या धोरणामुळे ग्रामीण महाराष्ट्रातील नियमित वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली असून प्रवाशांचे प्रचंड हाल होत आहेत. महामंडळाच्या या तुघलकी कारभारावर संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी तीव्र संताप व्यक्त केला असून, रद्द झालेल्या फेऱ्या तातडीने पूर्ववत न झाल्यास आगारप्रमुखांच्या कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा परिवहन विभागाला दिला आहे. कोकणातील प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन अतिरिक्त बसेसची सोय करणे ही एसटी महामंडळाची जबाबदारी आहे. मात्र, एका भागातील प्रवाशांची सोय करताना ग्रामीण…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शहरातील धार्मिक आणि सामाजिक सलोखा राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी ‘शांतता समिती बैठक’ आयोजित करण्याचा विसर प्रशासनाला पडला की बैठक जाणीवपूर्वक टाळली आहे. शांतता समितीच्या माध्यमातून प्रशासनाच्या उणिवांवर बोट ठेवून जबाबदार अधिकाऱ्यांना प्रश्न, जाब विचारण्याचा संगमनेरकरांचा हक्कच प्रशासनाने हिरावून घेतल्याचा थेट आणि गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे संगमनेर शहर प्रमुख अमित चव्हाण यांनी केला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर श्रींचे आगमन अवघ्या एका दिवसावर येऊन ठेपले असताना संगमनेर स्थानिक प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांमधून प्रचंड तीव्र संताप व्यक्त होत आहे. इतिहासात संगमनेर शहराची अतिसंवेदनशील म्हणून नोंद असल्याने कोणत्याही मोठ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आणि महसूल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- मुलींचे शिक्षण ही समाजाची सर्वांत मोठी ताकद आहे. नगरपरिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनींना कोणत्याही सुविधांपासून वंचित राहावे लागू नये, यासाठी आपण कटिबद्ध आहोत. शाळेसंदर्भात शिक्षकांनी मांडलेल्या समस्या रास्त असून, नगरपालिकेच्या आगामी बैठकीत हा विषय मांडून शाळेसाठी आवश्यक तो निधी आणि भौतिक सुविधा लवकरात लवकर उपलब्ध करून दिल्या जातील. शाळा प्रशासनाला जेव्हा जेव्हा मदतीची गरज भासेल, तेव्हा शिवसेना त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी असेल, असा विश्वास शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी दिला. नगरपरिषदेच्या शाळांमधील विद्यार्थिनींना दर्जेदार शिक्षण आणि मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. याच भावनेतून शिवसेना नगरसेविका सूर्यवंशी यांनी संगमनेर नगरपरिषदेच्या घासबाजार येथील अहिल्यादेवी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – समृद्धी महामार्गावर गाडी दुरुस्त करणाऱ्या मॅकेनिकला चाकूचा धाक दाखवून मारहाण करत लुटणाऱ्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने यशस्वी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत चार आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे दोन साथीदार सध्या फरार आहेत. कोपरगाव ते शिर्डी रस्त्यावरील कोकमठाण शिवारात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. या घटनेची सविस्तर माहिती अशी की, ८ सप्टेंबर २०२६ रोजी मध्यरात्री सव्वा एक वाजेच्या सुमारास राहता तालुक्यातील साकुरी येथील रहिवासी आणि व्यावसायिक मॅकेनिक अभिषेक मच्छिंद्र गायकवाड (वय २०) हे समृद्धी महामार्गावरील पोल क्रमांक ५०८ जवळ एका आयशर कंपनीच्या गाडीची दुरुस्ती करत होते. त्यावेळी तिथे आलेल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने राहुरी परिसरात गोवंशीय जनावरांची कत्तल करून मांस विक्री करणाऱ्या चार वेगवेगळ्या ठिकाणी अचानक छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी ४ लाख १५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. यामध्ये १०५० किलो गोमांस, कत्तलीसाठी वापरली जाणारी हत्यारे, वजनकाटा आणि कत्तलखान्यातून ९ जिवंत लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुखरूप सुटका करण्यात आली. अहिल्यानगर जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, सुनील पवार, विशाल तनपुरे, अजिनाथ पाखरे आणि अमीरराजा आतार यांच्या…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – श्रीरामपूर शहरातील संशयास्पद आणि बेकायदेशीर भंगार दुकानांवर पोलिसांनी धडक कारवाई करत विनापरवाना वाहने तोडून शासनाची फसवणूक करणाऱ्या दोन भंगार दुकानदारांना अटक केली आहे. श्रीरामपूर शहर पोलिसांनी राबवलेल्या विशेष ‘कॉम्बिंग ऑपरेशन’दरम्यान ही कारवाई करण्यात आली असून, संशयित भंगार दुकानांमधून २१ हून अधिक चारचाकी आणि दुचाकी वाहने हस्तगत करण्यात आली आहेत. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या आदेशानुसार श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘ऑल आऊट ऑपरेशन’ व विशेष मोहीम राबवून कोम्बिंग ऑपरेशन करण्यात आले. श्रीरामपूर शहर व परिसरातून चोरीला गेलेल्या दुचाकी व चारचाकी वाहनांची बेकायदेशीरपणे खरेदी-विक्री आणि तोडफोड (Scrap) केली जात असल्याचा संशय पोलिसांना होता.…
आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जादायी राहील. कामाच्या ठिकाणी नवी आव्हाने मिळतील, ज्यांचे तुम्ही यशस्वीपणे निवारण कराल. आर्थिक बाबतीत जुन्या गुंतवणुकीतून अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरणात आनंद आणि सलोखा टिकून राहील. आरोग्य उत्तम राहील, मात्र वाहन चालवताना थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. वृषभ – आज आपल्याला कौटुंबिक बाबींवर थोडे अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. घरातील वरिष्ठ व्यक्तींच्या मौलिक सल्ल्याचा व्यवसायात मोठा फायदा होईल. नाहक खर्च वाढण्याची शक्यता असल्याने पैशांचे नियोजन व्यवस्थित करा. जोडीदारासोबतच्या नात्यात अधिक गोडवा आणि जवळीक निर्माण होईल. सायंकाळचा वेळ मानसिक शांततेसाठी अत्यंत उत्तम ठरेल. मिथुन – आजचा दिवस नवीन संधी…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – आगामी सणासुदीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासन विभागाने (FDA) अहिल्यानगरमध्ये एक मोठी आणि धडक कारवाई करत तब्बल ३ कोटी ९५ लाख ६२ हजार ३२० रुपये किंमतीचे ७५ हजार ३५६ किलो वजनाचे संशयास्पद बटर जप्त केले आहे. एमआयडीसी भागातील एका शीतगृहावर गुरुवारी रात्री ८ वाजेच्या सुमारास टाकलेली ही धाड शुक्रवारी सकाळी संपली. जप्त करण्यात आलेले बटर कमी दर्जाचे असल्याचा संशय असून त्यावर मुदत संपण्याच्या तारखेचा उल्लेख नसल्याने लेबल वर्णनाचे उल्लंघन झाल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे जिल्ह्यातील पाटस (ता. दौंड) येथील ‘मधुरमा क्रिमी डिलाईट’ या कंपनीने या पाश्चराईज्ड कुकिंग (अनसोल्टेड) बटरची निर्मिती केली…
गणेशोत्सवानिमित्त थोरात कारखान्यावर १४ ते २५ सप्टेंबर दरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने यंदाच्या गणेशोत्सव काळामध्ये कारखाना कार्यस्थळावर १४ ते २५ सप्टेंबर २०२६ या कालावधीत विविध दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात प्रसिद्ध कलाकारांची नाटके, मनोरंजक स्पर्धा आणि संगीतमय कार्यक्रमांची रेलचेल असणार असल्याची माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग पाटील घुले, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर व कार्याध्यक्ष रामदास तांबडे यांनी दिली. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या प्रेरणेतून अमृत सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवात या उपक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी सोमवार, १४ सप्टेंबर रोजी सकाळी ९ वाजता…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या १४ लहान-मोठ्या गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या कारवाईत सुमारे १ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, पाच फरार आरोपींविरोधात विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानुसार पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास जाधव, पोलीस अंमलदार विजय पवार, रिचर्ड गायकवाड, राहुल डोके, भगवान थोरात, सुनील मालणकर आणि महादेव भांड यांच्या पथकाने संगमनेर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर विधानसभा मतदारसंघातील विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेनंतर तब्बल २६,५८७ मतदारांची नावे रद्द करण्यात आल्याने नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी प्रशासनाने रद्द झालेल्या मतदारांची गाव, शहर आणि वॉर्डनिहाय स्वतंत्र यादी तातडीने जाहीर करावी, अशी आग्रही मागणी काँग्रेसचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केली आहे. तालुक्यात SIR अंतर्गत पार पडलेल्या मतदार यादी मोहिमेनंतर हजारो मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत. मात्र, आपले नाव यादीत आहे की नाही हे शोधण्यासाठी नागरिकांना मोठा वेळ घालवावा लागत आहे. जर महसूल प्रशासनाने २६,५८७ रद्द मतदारांची यादी स्वतंत्रपणे सार्वजनिक केली, तर…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठीच्या पथ विक्रेता तक्रार निवारण व विवाद निर्णय समितीवर संगमनेर नगरपरिषदेचे सेवानिवृत्त प्रशासन अधिकारी श्रीनिवास पगडाल आणि सेवानिवृत्त नायब तहसीलदार कृष्णा वालझाडे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. यासंदर्भातील अधिकृत आदेश अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी नुकतेच पारित केले आहेत. माहिती व तंत्रज्ञान आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, पथ विक्रेता अधिनियम २०१४ व महाराष्ट्र पथ विक्रेता नियम २०१६ अन्वये राज्यातील प्रत्येक स्थानिक प्राधिकरणासाठी शासकीय तक्रार निवारण व विवाद निर्णय समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार संगमनेर नगरपरिषद क्षेत्रासाठी संगमनेर येथील सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा न्यायदंडाधिकारी प्रथम…
आजचे राशिभविष्य- मेष आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि ऊर्जादायी ठरेल. कार्यक्षेत्रात नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे आणि तुमचे सहकाऱ्यांसोबतचे संबंध सुधारतील. आर्थिक व्यवहारात मात्र थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे, अन्यथा नाहक खर्च होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि प्रियजनांचा पूर्ण पाठिंबा मिळेल. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ आज मनात नवीन विचार आणि सकारात्मकता राहील. व्यवसायात जुन्या गुंतवणुकीतून चांगला फायदा मिळण्याचे योग आहेत. नोकरीत वरिष्ठांचे सहकार्य लाभेल, ज्यामुळे कामाचा ताण कमी होईल. कुटुंबातील एखाद्या सदस्याकडून शुभ बातमी ऐकायला मिळू शकते. वैवाहिक आयुष्यात गोडवा राहील आणि जुने मतभेद मिटतील. सायंकाळी मित्रांसोबत आनंदात वेळ व्यतीत होईल. मिथुन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेशी जोडलेल्या तरुणांशी थेट संवाद साधण्याच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षा समजून घेण्याच्या उद्देशाने वंचित बहुजन आघाडीने ‘जय भीम Gen-Z’ या नव्या टाउनहॉल मालिकेचा टीझर शनिवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केला. भारतातील लोकसंख्येत Gen-Z पिढीचा वाटा एक चतुर्थांशपेक्षा अधिक असल्याने, या नवीन राजकीय व सामाजिक घटकाला थेट जोडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने हे महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. टीझरसोबत प्रसिद्ध केलेल्या संदेशात पक्षाने म्हटले आहे की, फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेच्या तरुण पिढीसोबत संवाद साधण्यासाठी ही टाउनहॉल मालिका आयोजित करण्यात येत आहे. टीझरमध्ये या मालिकेचा अधिक तपशील देण्यात आलेला नसून ‘लवकरच येत आहे’ असा उल्लेख करण्यात आला आहे. टाउनहॉल बैठकीच्या माध्यमातून…
annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पारनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत धडक कारवाई करत अवैध सुगंधीत मावा तयार करणाऱ्या एका तरुणाला रंगेहात पकडले आहे. या कारवाईत मावा बनवण्याचे इलेक्ट्रॉनिक मशिन आणि सुगंधित तंबाखूचे साहित्य असा एकूण १ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिले होते. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मचाऱ्यांचे पथक पारनेर परिसरात गस्त घालत होते. यादरम्यान भाळवणी येथील हॉटेल रुचिराच्या पाठीमागील एका खोलीत बेकायदेशीरपणे सुगंधी तंबाखू, चुना आणि सुपारीचे मिश्रण करून मावा…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: इतर कोणत्याही सत्ता पद्धतीमध्ये स्वातंत्र्याला स्थान नसून ते फक्त लोकशाहीतच शक्य आहे. विस्कटलेला समाज आणि राज्य संस्था यांच्यातील महत्त्वाचा दुवा म्हणजे लोकशाही होय. घटनाकारांनी भारतीय समाजमनाचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी जी व्यवस्था निर्माण केली, तीच लोकशाही आज धोक्यात आली आहे की काय, अशी भीती निर्माण करणारी परिस्थिती सध्या देशात पाहायला मिळत असल्याचे प्रतिपादन दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक व ज्येष्ठ लेखक प्रा. डॉ. शरद बाविस्कर यांनी केले. महात्मा फुले यांच्या जन्मद्विशताब्दी निमित्त संगमनेर येथील सत्यशोधक विचार मंचाच्या वतीने आयोजित ‘अस्वस्थ भारताचे अंतरंग’ या विषयावरील विशेष व्याख्यानात ते मुख्य वक्ते म्हणून बोलत होते. या…
Annant Ppangarkar आजचे राशिभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठ तुमच्या कामगिरीवर खूश राहतील, त्यामुळे पदोन्नतीची शक्यता निर्माण होईल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची साथ उत्तम लाभल्यामुळे प्रलंबित कामे वेगाने पूर्ण कराल. आर्थिक स्थितीत सकारात्मक सुधारणा दिसून येईल आणि अचानक धनलाभाचे योग बनत आहेत. वृषभ – आज तुम्हाला संयम आणि शांतता राखण्याची गरज आहे. घाईगडबडीत कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, अन्यथा आर्थिक नुकसान होऊ शकते. कामाच्या ठिकाणी काही आव्हाने समोर येतील, परंतु सहकाऱ्यांच्या मदतीने त्यावर मात करणे शक्य होईल. कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांच्या स्वास्थ्याची…
Annant Ppangarkar महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – संगमनेर मार्गे जाणारा पुणे–नाशिक सेमीस्पीड रेल्वे प्रकल्प GMRT च्या अडथळ्याचे कारण देत रद्द करण्यात आल्यानंतर संगमनेरकरांसह चाकण, खेड, मंचर, नारायणगाव, आळेफाटा आणि सिन्नर परिसरातील नागरिकांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. या पार्श्वभूमीवर 9 ऑगस्ट 2026 रोजी झालेल्या उत्स्फूर्त आंदोलनाची ‘हवा काढण्यासाठीच’ संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांची भेट घेतली, असा गंभीर आणि थेट आरोप संगमनेर तालुका काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांनी केला आहे. शेलकर म्हणाले, आंदोलनापूर्वी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन नेमके काय साध्य करण्यात आले, हा प्रश्न आजही संगमनेरकरांसमोर अनुत्तरित आहे. संगमनेरातील एका कार्यक्रमात आमदार महोदयांनी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून काही ‘अपूर्ण कागदपत्रांची…
