Author: Annant Ppangarkar

अहमदनगर, २२ ऑगस्ट –  लहान मुलांसाठी बालस्नेही पोलीस स्टेशन कार्यान्वित करण्यात यावे, यासाठी लागणारा निधी हा जिल्हा नियोजन समितीमधून करावा तसेच यासाठी स्वतःच्या आमदार निधीतून निधी उपलब्ध करून देण्याबाबत सहमती दर्शवत यासंदर्भात पोलिसांनी लवकरात लवकर कार्यवाही करावी, असे निर्देश महाराष्ट्र विधान परिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नगरच्या पोलीस अधीक्षकांना दिले. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे गुरुवारी अहमदनगर दौऱ्यावर असतांना पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी डॉ. गोऱ्हे यांची भेट घेतली. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा घेतला. अहमदनगर जिल्ह्यात भरोसा सेल कार्यान्वित असल्याची माहिती पोलीस अधीक्षक ओला यांनी दिली. अहमदनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागातदेखील त्याचा उपयोग…

Read More

अहमदनगर, २२ ऑगस्ट महाराष्ट्रातील जास्तीत जास्त महिलांना लाडकी बहीण योजनेचा फायदा व्हावा हा सरकारचा हेतू आहे. लाडकी बहिण योजनेसंदर्भात जर बँकांनी तुमची अडवणूक केली तर बँकांवर कारवाई होऊ शकते, असा इशारा शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी बँकांना दिला. मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान योजेनेची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केली आहे. यानिमित्ताने अहमदनगरमध्ये मुख्यमंत्री लाडकी बहिण सन्मान यात्रेच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला शिवसेना नेत्या व उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती लावली. माजी महापौर शीला शिंदे, संपर्कप्रमुख उज्वला भोपळे, जिल्हाप्रमुख डॉ. शबनम इनामदार, जिल्हाप्रमुख मीरा शिंदे, जिल्हाप्रमुख अनिल शिंदे, जिल्हाप्रमुख…

Read More

नराधम आरोपींना चौकात जिवंत जाळा – दुर्गाताई तांबे गुरुवार, २२ ऑगस्ट संगमनेर – बदलापूर येथील शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ संगमनेरमध्ये हजारो विद्यार्थिनी व महिलांनी रस्त्यावर उतरून तीव्र निषेध करत या आरोपींना फाशी देण्याची आग्रही मागणी केली. तर अशा नराधम आरोपींना चौकामध्ये जिवंत जाळा, अशी मागणी महिला नेत्या दुर्गाताई तांबे यांनी केली. संगमनेर शहरात जयहिंद महिला मंच, एकविरा फाउंडेशन व विविध महिला संघटनांच्यावतीने भव्य निषेध मोर्चा झाला. यामध्ये दुर्गाताई तांबे, सुनीता कोडे, अर्चना बालोडे, डॉ. श्रद्धा वाणी, सुनीता कांदळकर, शितल उगलमुगले, सुरभी मोरे, मनीषा शिंदे, नम्रता पवार, अमृता राऊत, यांच्यासह ३ हजार मुली सहभागी झाल्या होत्या. सह्याद्री…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट संगमनेर : बदलापूर शाळेतील अल्पवयीन मुलीवर झालेल्या घृणास्पद लैंगिक अत्याचाराच्या निषेधार्थ शनिवारी (२४ ऑगस्ट) संगमनेर शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार असून आठवडे बाजारही बंद ठेवण्याचे आवाहन संगमनेर तालुका महाविकास आघाडीच्यावतीने करण्यात आले असून या अमानुष घटनेचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला आहे. पुरोगामी व सुसंस्कृत महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना बदलापूर येथे घडली. या घटनेचे संपूर्ण राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून राज्यभरातून या घटनेचा निषेध होत आहे. खरे तर महिला शक्ती ही देशाची ताकद आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये महिला सुरक्षित नाहीत. अनेक मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पालकांमध्ये घबराट आहे. आरोपींना कोणतीही जरब नाही. कायदा सुव्यवस्था ढासाळली…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अखेर एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी (२२ ऑगस्ट) सकाळी झालेल्या एमपीएससी बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) २५ ऑगस्टला होणाऱ्या परीक्षेत कृषी विभागाच्या २५८ पदांचा समावेश करण्याची मागणी करत स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी रात्री सुरू केलेले ठिय्या आंदोलन बुधवारीही सुरू ठेवले. खासदार सुप्रिया सुळे यांनी आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी आक्रमक भूमिका घेत मंगळवारी रात्रीपासून शास्त्री रस्ता येथे ठिय्या आंदोलन सुरू केले ओके. खासदार सुप्रिया सुळे यांनी या आंदोलकांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्यामुळे दोन्ही…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट जागतिक छायाचित्रकार दिनाचे औचित्य साधन संगमनेर तालुका फोटोग्राफर असोसिएशन चंदनापुरी येथील ‘विठ्ठल विसावा’ या मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम राबवून छायाचित्रकार दिन साजरा केला. स्वच्छता दूत आदित्य घाडगे व राजेश शहा यांना प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी निमंत्रित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी ओंकार राठी होते. ज्येष्ठ छायाचित्रकार काशिनाथ गोसावी, राम भागवत व शांताराम कोल्हे व्यासपीठावर होते. सकाळी सुरुवातीलाच मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली. यशस्वी फाऊंडेशनचे आदित्य घाडगे व त्यांची कन्या यशस्वी यांनी यासाठी मदत केली. त्यानंतर छायाचित्र, व्हिडिओ कॅमेऱ्याचे पूजन करून उपस्थितांचे मनोगत पार पडले. यावेळी ज्येष्ठ छायाचित्रकार निसर्ग देशमुख, कैलास खोले, सतीश जम्बुकर, दीपक घुले, राम भागवत, राजू…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट नाशिक : सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाच्या तरुण मुलाचा भल्या पहाटे निर्घृणपणे खून करण्यात आल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. फोन केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले असून पंचवटी पोलिसांसह गुन्हे शाखेची पथके हल्लेखोरांचा शोध घेत आहे. गगन प्रवीण कोकाटे (वय २४, रा. राधेश्याम निवास, वृंदावननगर, म्हसरूळ) असे खून झालेला पोलीस पुत्र युवकाचे नाव आहे. गगनच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याने तो जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला होता. मंगळवारी रात्रीपासून तो घरी आला नसल्याने त्याचे कुटुंबीय त्याचा शोध घेत होते. बुधवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमाराला गगन याचा मृतदेह कॉलनी रस्त्यावर आढळून आला. त्यानंतर त्याचे वडील प्रवीण कोकाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पंचवटी…

Read More

गुरुवार, २२ ऑगस्ट मुंबई : बदलापूर मधील शाळेत दोन चिमुकलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी येत्या शनिवारी (२४ ऑगस्ट) महाराष्ट्र बंदची हाक महाविकास आघाडीने दिली आहे. बुधवारी विधानसभा निवडणुकीच्या जागा वाटपाची चर्चा करण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक बोलविण्यात आली होती. या बैठकीत जागा वाटपाचा मुद्दा बाजूला ठेवत बदलापुरातील घटनेवर चर्चा करण्यात आली. आणि या विरोधात आवाज उठवण्यासाठी महाराष्ट्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या बंदमध्ये महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष सहभागी होणार असून डॉक्टर, वकील, पालक यांनीही बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले आहे. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या या बैठकीला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात, विरोधी…

Read More

आजचे राशीभविष्य  गुरुवार २२ ऑगस्ट २०२४ मेष— धन स्थानातील हर्षल गुरु आज अगदी आनंदी दिवस दर्शवतात. दुपारनंतर मात्र चीडचीड वाढेल. एखाद्या अप्रिय घटनेमुळे मन अस्वस्थ होईल. वृषभ— जन्मस्थ मंगळ हर्षल मुळे मानसीक ताणतणाव वाढण्याची शक्यता. स्वस्थानी असलेला भाग्येश अचानक धनलाभ दर्शवतो. मिथुन— धन स्थानातील रवी आज पैशासाठी संघर्ष करायला लावेल. मित्रांबरोबर वादविवाद टाळा. नोकरीच्या ठिकाणी मानहानी होण्याची शक्यता. कर्क— धन स्थानातील बुध शुक्रामुळे आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान वाढेल. चतुर्थ स्थानातील चंद्र वाहन योग दर्शवतो. सिंह— आज सगळ्यांशी प्रेमाने वागाल. आज प्रवास योग संभवतो. पराक्रमातील चंद्र भावांबरोबरचे संबंध सुधारण्यास मदत करील. कन्या— जोडीदाराबरोबर वाद संभवतो. आर्थीक समस्या, चिंता दुर होतील. आनंदी…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट मुरूम उत्खननासंदर्भात पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध गुन्ह्यात पंचनाम्यात तक्रारदाराला लाभ मिळवून देण्यासाठी पंचा समक्ष दोन लाख रुपये लाचेची मागणी करणाऱ्या मंडळ अधिकाऱ्याला एक लाख रुपयांचा पहिला हप्ता स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर एसीबीने रंगेहात पकडले आहे. सचिन भागवत सानप (वय ३९ वर्ष) रा. एमएसजी अपार्टमेंट, फ्लॅट क्रमांक चार जुना नगर नाका, बीड असे बीडच्या लाचखोर मंडल अधिकाऱ्याचे नाव आहे. लाचखोर सानप याला लाच लचकत च्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून शिवाजीनगर (बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. लाच लुचपतकडे तक्रार करणाऱ्या तक्रारदाराच्या नातेवाईक व इतरांविरुद्ध पिंपळनेर पोलीस ठाण्यात मुरूम उत्खननासंदर्भात गुन्हा दाखल…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट  संगमनेर – पथविक्रेता संरक्षण कायद्यानुसार संगमनेर नगरपालिका हद्दीतील नोंदणीकृत पथ विक्रेता समितीची निवडणूक मंगळवारी बिनविरोध पार पडली आहे. आठ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत सात सदस्यांची निवड बिनविरोध झाली असून एक जागा रिक्त राहिली आहे. निवड झालेल्या सदस्यांमध्ये दीपक भानुदास साळुंखे (इतर मागासवर्ग), संतोष गंगाधर मुर्तडक, (सर्वसाधारण), महेंद्र मांगीलाल शर्मा (सर्वसाधारण), दीपा सोमनाथ सोनुले (सर्वसाधारण महिला राखीव), सुगंधा किसन धाकतोडे (अनुसूचित जाती महिला राखीव), संजय वसंतराव बागले (विकलांग) व नर्गिस शब्बीर आत्तार (अल्पसंख्यांक) यांचा समावेश आहे. केंद्र सरकारच्या पथ विक्रेता (उपजीविका संरक्षण आणि पथविक्री विनियमन) अधिनियम २०१४ नुसार श्रीरामपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सोमनाथ…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट  बदलापूर येथील अत्याचार प्रकरणाचा राज्यभर निषेध सुरू असताना संगमनेरमध्ये देखील शिवसेना आणि शिवसेनेच्या महिला आघाडीच्या वतीने रस्त्यावर उतरून ‘लाडक्या बहिणींना पैसे नको, सुरक्षा द्या’, अशा घोषणा देत राज्याच्या गृह खात्याचा निषेध करण्यात आला. महिला संपर्कप्रमुख बेबीताई लांडगे, विधानसभा संपर्कप्रमुख सूर्यकांत शिंदे यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांच्या आदेशावरून शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) संगमनेरमध्ये बुधवारी हे आंदोलन करण्यात आले. आंदोलकांनी यावेळी बदलापूर अमानवीय घटनेचा निषेध करत नराधम आरोपीला फाशी देण्याची मागणी केली. तसेच पीडितांना न्याय देण्यास विलंब करणाऱ्या गृह खात्याचा घोषणा देत धिक्कार करण्यात आला. राज्याच्या गृहमंत्री पदावर कार्यरत असलेल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कार्यकाळ सपशेल अपयशी ठरला असल्याचा आरोप…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट गृह विभागाने राज्यातील ८२ पोलीस निरीक्षकांच्या बढतीचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार अहमदनगरच्या आर्थिक गुन्हे शाखेला स्वतंत्र पोलीस उपाधीक्षक मिळाले आहे. तर गेल्या आठवड्यातच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारलेल्या पोलीस निरीक्षक बापूसाहेब महाजन यांची देखील बढतीवर नाशिक पोलीस अकादमीत पोलीस उपअधीक्षक म्हणून बदली झाली आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाजन यांच्या रिक्त झालेल्या जागी आता पोलीस अधीक्षक आता कोणत्या पोलीस निरीक्षकाला संधी देतात, याकडे लक्ष लागले आहे. आगामी सण, उत्सव आणि होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुका लक्षात घेता संगमनेर शहर पोलीस ठाण्याला नवे पोलीस निरीक्षक मिळतात की महाजन यांच्याकडेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा तात्पुरता पदभार राहतो हे…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट  पुणे : अल्पवयीन मुलीला आधी प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर तिला दारूपासून तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार पुण्यात समोर आला आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या मैत्रिणीचा तर आरोपीच्या मित्राचा देखील सहभाग समोर आला आहे. शाळेत शिक्षण घेत असलेल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या फिर्यादीवरून पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणातील सर्व आरोपी अल्पवयीन आहेत. नीचपणाचा कळस गाठणाऱ्या या घटनेबाबत अधिक माहिती अशी, पीडित मुलगी आणि आरोपी यांची ओळख झाली होती. या ओळखीतून आरोपी मुलाने तिला अमिष दाखवून आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिच्यासोबत तर प्रेमाचे नाटक केले. त्यानंतर तिच्याशी गोड…

Read More

बुधवार, २१ ऑगस्ट पाश्‍चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, नैतिक मूल्याची घसरण, व्यसनाधिनता यासारख्या कारणांमुळे समाजात गुन्हेगारी वाढत आहे. तरूणांचे प्रमाण यामध्ये वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. त्यांच्या हातामध्ये बेड्या पडत आहेत. तरूणांच्या हातामध्ये नवनिर्मिती क्षमता आहे. समाजाचे भवितव्य तरूणांच्या हातामध्ये आहे. जीवन जगत असताना इतरांच्या दुःख, वेदना समजावून त्या कमी केल्यास निकोप आणि सुदृढ समाजाची निर्मिती होईल, असे प्रतिपादन विधी सेवा प्राधिकरणाच्या जिल्हा सचिव न्यायाधीश भाग्यश्री पाटिल यांनी केले. कलकत्ता येथे प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार आणि हत्या प्रकरणाच्या पार्श्‍वभूमीवर महाविद्यालयीन विद्यार्थींचे मनोबल वाढण्यासाठी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्यावतीने…

Read More

आजचे राशीभविष्य  बुधवार २१ ऑगस्ट २०२४ या राशीसाठी आर्थिक लाभ तर इतर राशींसाठी… मेष— धनस्थानी गुरु, मंगळ, हर्षल युती आज छप्पर फाडके आर्थीक लाभ होण्याची शक्यता. तब्येतीला सांभाळा, पोटाचे आजार होण्याची शक्यता. वृषभ— नवीन वाहन घेण्याची ईच्छा असेल तर ती आज पुर्ण होईल. आज नोकरीच्या ठिकाणी मानसन्मान मिळेल. मिथुन— राशी स्वामी बुध, रवी, शुक्राच्या युतीमधे पराक्रम स्थानी. आज आपल्या हातुन समाजासाठी काहीतरी मोठे कार्य होण्याची शक्यता. कर्क— आज राशीस्वामी अष्टमेशाबरोबर अष्टमस्थानी. सर्व स्वप्न पुर्ण होण्याचा दिवस. सिंह— आज तुमचा आत्मविश्वास तुम्हाला तुमचे स्वप्न पुर्ण करण्यास मदत करेल. दुपारनंतर उत्साही वातावरण, घरातील सगळे आज तुम्हाला मदत करण्यास उत्सुक असतील. कन्या— कोर्ट…

Read More

मंगळवार, २० ऑगस्ट मुंबई : बदलापूरमध्ये एका शाळेत मुलींवर झालेल्या अत्याचाराची अतिशय गंभीर दखल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली असून अशा घटना घडल्यास प्रसंगी संस्थाचालकांवर देखील कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. आरोपीला कडक शासन करण्यात येईल, यासाठी जलदगती न्यायालयात तातडीने खटला चालविण्याचे निर्देश देत त्यांनी या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी पोलीस आयुक्तांशीदेखील चर्चा केली. सखी सावित्री समित्या शाळांमध्ये स्थापन झाल्या आहेत किंवा नाही ते तपासण्याचे निर्देशही त्यांनी दिले. बदलापूर पूर्वेतील एका नामांकित शाळेत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराची माहिती मिळताच मुख्यमंत्र्यांनी तातडीने शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याशी चर्चा केली आणि अशा घटना होऊ नयेत म्हणून कायमस्वरूपी ठोस उपाय योजण्यास सांगितले. ज्या…

Read More

आजचे राशीभविष्य –  मंगळवार २० ऑगस्ट २०२४ मेष— कोर्ट कचेरीपासुन सावध रहा. ज्या विषयाची पुर्ण माहीती नाही त्यामधे पडु नका. वृषभ— आज सर्व काम मंद गतीने होतील. बहीणीसाठी खरेदीचा दिवस. आनंदी दिवस. मिथुन— आज प्रवासात दिवस जाईल. घरात आनंदी वातावरण राहील. शक्यतो जबाबदारीने वागा. कर्क— आज चारी बाजुने पैशाचा ओघ राहील. मित्र कंपनीकडुन फसगत होण्याची शक्यता. सिंह— आज सर्वाशी प्रेमाने वागाल. मानसीक ताणतणाव वाढेल. खबरदारी घ्या. कन्या— कारण नसताना चोरीचा आळ येण्याची शक्यता. आर्थिक व्यवहार सांभाळून करा. पैसा कुठे अडकवू नका. तुळ— आज शक्यतो प्रवास टाळा. कोणाला जामीन राहु नका. फसगत होण्याची शक्यता. वृश्चीक— स्वतःचे घर घेत असाल तर आज…

Read More

मंगळवार, २० ऑगस्ट  थायलंडच्या बँकॉकमध्ये झालेल्या नृत्य स्पर्धेत संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील चंदनेश्वर विद्यालयाने मोठे यश मिळविले. आठवी ते दहावी गटात प्रथम क्रमांक व पाचवी ते सातवी गटात द्वितीय क्रमांक मिळवत या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी देशाचे नाव साता समुद्रापार नेले. बँकॉकमध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत ५२ संघ सहभागी झाले होते. ग्रामीण भागातून संगमनेरच्या जनता शिक्षण प्रसारक मंडळ संचलित चंदनेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. विद्यालयाचे मुख्याध्यापक खेमनर यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यात सामाजिक कामात अग्रेसर असलेल्या राजनदादा शिंदे युवा मंचचे प्रमुख राजनदादा शिंदे यांनी सर्व विद्यार्थी व मार्गदर्शक शिक्षकांना सुरक्षित नेण्या-आणण्याची जबाबदारी आर्थिकदृष्ट्या स्वीकारून या विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी…

Read More

उमेद महिला बचतगट अभियानातील बहिणींचे वर्षा शासकीय निवासस्थानी रक्षाबंधन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बांधल्या राख्या मुख्यमंत्र्यांसाठी एक कोटी राख्यांचा संकल्प, राज्यातील बहिणींची कृतज्ञता सोमवार, १९ ऑगस्ट मुंबई – “माझ्या बहिणी राज्याच्या विकासात मोठं योगदान देतात. त्यांना आधार देण्यासाठी जे जे करता येईल ते करेन. आमची ताकद जसजशी वाढत जाईल, तशी आर्थिक मदतही वाढवली जाईल,”असे सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील बहिणींना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच रक्षाबंधनापुर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील दोन हप्ते जमा करण्याचा निर्धारही पूर्ण केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. राज्यातील उमेद अभियानातील महिलांनी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी पोहचून शिंदे यांचे औक्षण करून राख्या बांधल्या. शेकडो बहिणींच्या औक्षण आणि रक्षाबंधनामुळे वर्षा…

Read More