Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाइन संगमनेर, प्रतिनिधी: घुलेवाडी (संगमनेर) येथील रहिवासी राजू मनोहर थोरात यांनी १५ ऑगस्टला प्रांताधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयासह आत्मदहनाचा इशारा दिला आहे. ट्रक चालकाने घरात झोपेत असताना कुटुंबाला चिरडून मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक आरोप केला आहे. या घटनेत थोरात यांच्या कुटुंबातील सदस्य गंभीर जखमी झाले असून घराचेही मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर थोरात यांनी याप्रकरणी प्रशासनाकडे वारंवार मदतीची मागणी करूनही अद्याप कोणतीही चौकशी न झाल्याचा आरोप केला आहे. या प्रकाराला कंटाळून थोरात यांनी हा निर्णय घेतला आहे. स्थानिक प्रशासन यापासून काय पावले उचलते याकडे लक्ष लागले आहे. राजू मनोहर थोरात, (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर यांनी दिलेल्या माहितीनुसार, १७ फेब्रुवारी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन माहेराहून २० लाख रुपये आणण्यासाठी सासरच्या त्रासाला कंटाळून स्नेहा विशाल झेंडगे (वय २७) या विवाहितेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात घडली आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाची घटना ताजी असतानाच हा प्रकार समोर आल्याने आमदार रोहित पवार यांनी समाजाने यातून कोणताही धडा घेतला नसल्याची खंत व्यक्त केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्नेहा झेंडगे आणि विशाल यांचा विवाह गेल्या वर्षी २ मे २०२४ रोजी झाला होता. लग्नानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींनी स्नेहाकडे कंपनी चालवण्यासाठी माहेरहून २० लाख रुपये आणण्याचा तगादा लावला. या पैशांसाठी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात आला. https://x.com/RRPSpeaks/status/1954558051442434467?t=uA3sdevQQ7sWZSaRCYw82A&s=19 छळाला कंटाळून स्नेहाने याआधीही पोलिसांत तक्रार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: जे काम पन्नास वर्षांत सर्व सत्तास्थानांवर असूनही तुम्हाला जमलं नाही, ते पोरं-बाळांनीच करून दाखवलं आणि पाणी आणल्याचं सिद्ध केलं, असा टोला लगावत माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी विरोधकांवर नाव न घेता जोरदार टीका केली. अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या निळवंडे डाव्या कालव्याचं पाणी अखेर संगमनेर तालुक्यातील गोरक्षवाडी येथे पोहोचलं आणि त्याचा जलपूजन सोहळा नुकताच पार पडला. या ऐतिहासिक क्षणी डॉ. विखे बोलत होते. डॉ. विखे म्हणाले की, निळवंडे डावा कालवा योजना गेल्या ३०-४० वर्षांपासून केवळ कागदावर होती. या काळात अनेक बैठका झाल्या, आश्वासनं दिली गेली, पण पाण्याचा एक थेंबही गोरक्षवाडी किंवा संगमनेरमध्ये पोहोचला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पोलीस असल्याचे भासवून दोघा अज्ञात भामट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाचे ५५ हजार रुपये लुटल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे. रवींद्र नारायण राजहंस (वय ७४ वर्ष, रा. भिंगारदिवे मळा, सावेडी, अहिल्यानगर) असे फसवणूक झालेल्या ज्येष्ठ नागरिकाचे नाव आहे. राजहंस यांच्या तक्रारीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात अज्ञात दोघा भामट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शनिवारी राजहंस जॉगिंग पार्क जवळ दुचाकीवर थांबले होते त्यावेळी डोक्यावर हेल्मेट घातलेला एक इसम दुचाकीवरून आणि दुसरा पायी त्यांच्या जवळ आला. या दोघांनी आपण पोलीस असल्याचे राजहंस यांना सांगितले. त्यापैकी एकाने पोलिसाचे ओळखपत्र दाखवत…
दोनशे रुपयांच्या वादातून तरुणाचा खून, चार जणांवर गुन्हा दाखल एक ताब्यात; संगमनेरच्या या गावातील घटना
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर – आश्वी, प्रतिनिधी अवघ्या दोनशे रुपयांच्या किरकोळ वादातून एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे घडली आहे. मतीन मेहबूब शेख (वय २२) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी आश्वी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी एका आरोपीला अटक करण्यात आली असून, इतर तिघांचा शोध सुरू आहे. ही घटना शुक्रवारी, (८ ऑगस्ट) रात्री ८:४५ वाजताच्या सुमारास घडली. मतीन शेख याने आसीफ शेख याला उसने दिलेले दोनशे रुपये त्यांच्या वडीलाकडे मागीतल्याचा राग आल्याने याच रागातून आरोपी आसिफ शेख, सोहेल आंधळे, पप्पू भांड, आणि गौतम गायकवाड यांनी मतीनला प्रतापपूर शिवारातील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त करत महाराष्ट्रातील महिलांच्या हक्कांसाठी आणि त्यांच्या सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या राज्य महिला आयोगाच्या कार्यक्षमतेवरच आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे रूपवते यांनी म्हटले आहे. ज्या तत्परतेने पुणे रेव्ह पार्टी आणि प्रांजल खेवलकर यांच्या प्रकरणात महिला आयोगाच्या अध्यक्षांनी ठोस भूमिका घेतली, त्याच तत्परतेने कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा आरोप करणाऱ्या पीडित दलित मुलीला न्याय मिळवण्यासाठी दोन मिनिटांचा वेळ दिला नाही. आयोगाच्या अध्यक्षा पुण्यामध्येच वास्तव्यास असताना, पीडित मुली तीन दिवस सातत्याने पोलीस स्टेशनबाहेर आंदोलनात बसल्या होत्या, तरीही त्यांना भेटायला अध्यक्ष गेल्या नाहीत, असे आयोगाच्या माजी सदस्या आणि वंचित बहुजन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिक: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यानंतर आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनीही निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर मतचोरी आणि घोटाळे झाल्याचा दावा करत, जर निवडणूक आयोगाने निवडणुकीसंदर्भात डिजिटल माहिती सार्वजनिक केली, तर सर्व घोटाळे समोर येतील, असे थोरात म्हणाले. जागतिक आदिवासी दिनानिमित्त नाशिकमध्ये आयोजित एका कार्यक्रमात पत्रकारांशी बोलताना थोरात यांनी हे मत व्यक्त केले. त्यांनी राहुल गांधी यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत सादर केलेल्या पुराव्यांचा संदर्भ देत, भाजप लोकशाही संपवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला. निवडणुका चुकीच्या पद्धतीने आणि घोटाळे करून जिंकल्या जात आहेत, असे ते म्हणाले. थोरात यांनी जनतेला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: अवैध वाळू उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे ॲक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी शनिवारी बुलढाण्यात घेतलेल्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना थेट ‘महाराष्ट्र धोकादायक व्यक्ती प्रतिबंधक कायद्यांतर्गत’ (MPDA) गुन्हे दाखल करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. या बैठकीत त्यांनी अवैध गौण खनिज उत्खननात सामील असलेल्या महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवरही लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिले. तसेच, यापुढे कोणत्याही मंत्री, खासदार किंवा आमदारांच्या शिफारशींना न जुमानता कारवाई करण्याचे निर्देश देत, यापुढे जिल्ह्यात अवैध वाळू उपसा झाल्यास जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांवर जबाबदारी निश्चित केली जाईल, असा सज्जड इशाराही त्यांनी दिला. यावेळी मंत्री बावनकुळे यांनी…
देशाच्या बहुतांश शासकीय यंत्रणांमध्ये सरकारी दलालांचा उच्छाद पराकोटीने वाढला आहे. सरकारच्या हातचं बाहुलं बनलेल्या या यंत्रणांवर प्रचंड टीका होऊनही त्यांना आपल्या कर्तव्याची जाणीव होत नाही. अगदी न्यायालयांनीही कान उपटले तरी तिथे बसलेल्यांनी आपल्यातला मुर्दाडपणा सोडला नाही. या यंत्रणांमध्ये अर्थातच देशातल्या निवडणूक आयोगाचा उल्लेख करावा लागतो आहे. देशातील निवडणुका या अपारदर्शक होऊ लागल्यापासून आयोगावर प्रचंड टीकेचे बाण सुटत आहेत. हा आयोग सत्ताधारी पक्षाचा बटिक झालाय, अशी टीका विरोधक कायमच करत आले आहेत. आपल्यावरचं बालंट दूर करण्यासाठी आयोगाचे अधिकारी पुराव्यांचं निमित्त करत पुन्हा सत्तेचे पाठिराखे बनतात. आयोगातील अधिकार्यांच्या या वर्तणुकीने आयोगाची अक्षरश: पिसं निघालीयत. तिरुनेलाई नारायण अर्थात टी. एन. शेषन यांच्या काळातील…
आदिवासी दिनानिमित्त ड्राय डे: सुमारे साडेतीन लाखाची दारू वाहतूक करताना संगमनेर पोलिसांची मोठी कारवाई
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: ड्राय डे च्या दिवशी दारू विकण्याच्या उद्देशाने एक व्यक्ती दारूची वाहतूक करत असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिसांना मिळाल्याने पोलिसांनी केलेल्या कारवाईमध्ये 3 लाख 35 हजार 360 रुपयांच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी शाहूनगर (अकोले) येथील राजेश बबन शिंदे याला दारूची वाहतूक करताना पकडण्यात आले. संगमनेर पोलिसांची अवैध दारू वाहतूक करणाऱ्यांवर ही मोठी कारवाई मानली जात आहे. शनिवारी (9 ऑगस्ट) अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या अनुषंगाने प्रशासनाने अकोलेमध्ये ‘ड्राय डे’चे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर राजेश बबन शिंदे (वय 40 वर्ष, रा. शाहूनगर, अकोले, ता. अकोले, जि. अहिल्यानगर)…
