Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज- गृहपाठाच्या बहाण्याने एका ८ वर्षीय विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी ५४ वर्षीय शिक्षकाला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीवर विनयभंग आणि बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण (पोक्सो) कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित मुलीच्या आईने कांजूरमार्ग पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, शुक्रवारी (२० जून) सायंकाळी पीडित मुलगी शाळेतून घरी परतल्यावर रडू लागली. आईने विचारणा केली असता, गणिताच्या तासाला शिक्षकाने स्वाध्याय आणि गणिताचे प्रश्न सोडवण्याच्या बहाण्याने तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचे तिने सांगितले. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, कांजूरमार्ग पोलिसांनी तात्काळ भारतीय न्याय संहिता कलम ७५ आणि पोक्सो कायद्याच्या कलम ८ व १२ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर शनिवारी (२१ जून) आरोपी शिक्षकाला…
संगमनेर, प्रतिनिधी: स्वातंत्र्यसेनानी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीने सुरू झालेले दंडकारण्य अभियान पर्यावरण संवर्धनाची एक मोठी लोकचळवळ बनले आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यंदाच्या वृक्षारोपण अभियानात सर्वांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या अतिथीगृहात झालेल्या १९ व्या दंडकारण्य अभियानाच्या नियोजन बैठकीत थोरात बोलत होते. यावेळी दंडकारण्य अभियानाचे मुख्य प्रवर्तक डॉ. सुधीर तांबे, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, दूध संघाचे चेअरमन रणजीतसिंह देशमुख, संपतराव डोंगरे, सुधाकर जोशी, आदिवासी सेवक प्रा. बाबा खरात, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. सुजित खिलारी, बाबुराव गवांदे, अनिल थोरात, सतीश गुंजाळ,…
यंत्रणेच्या मुर्दाडपणामुळे एखाद्या विद्यार्थीनीने तिचं आयुष्य कितीकाळ तुरुंगात काढावं? आंदोलनात भाग घेतला म्हणून या विद्यार्थीनीला कितीकाळ जामिनाविना तुरुंगात ठेवावं याला काही मर्यादा? केवळ ती विद्यार्थीनी मुस्लिम आहे म्हणून जर तिला असं खितपत पडावं लागत असेल तर लोकशाही म्हणून ढोल पिटण्यात काय अर्थ? तुम्ही घरी आहात. अचानक पोलिस येऊन तुम्हाला अटक करतात. तुम्ही कारण विचारता. एका गंभीर गुन्ह्याचा आरोप लावून ते तुम्हाला तुरुंगात टाकतात. तुम्ही भांबावून जाता. या गंभीर आरोपामागचा गुन्हा तुम्हाला जाणून घ्यायचा असतो. तुम्ही तो न्यायालयात जाणून घ्या, असं ते सांगत असतील आणि त्यासाठी पाच वर्षं न्यायालयात न्याय मिळत नसेल तर काय म्हणावं? ही मुलगी आशावादी आहे. पण तितकीच…
संगमनेर, प्रतिनिधी- जिल्हा पोलीस प्रमुखांच्या विशेष पथकाने काल, (२० जून) संगमनेर शहरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण ३५ लोकांवर कारवाई केली आहे. पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या या कारवाईत लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संगमनेरमध्ये थेट पोलीस अधीक्षकांच्या पथकाने केलेल्या या मोठ्या कारवाईनंतर आता संगमनेरमधील अन्य अवैध धंद्यांकडे लक्ष लागले आहे. स्थानिक पोलीस, एलसीबी हे अवैध धंदे बंद करण्यात यश मिळवितात की हे धंदे सुरूच राहतात हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. मात्र पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अशा कारवाया करण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. संगमनेर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी सायंकाळी पावणे सहा वाजता तेलीखुंट…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेर येथील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त भव्य योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात सह्याद्री विद्यालय, ज्युनिअर कॉलेज, एकविरा फाउंडेशन आणि जयहिंद लोक चळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने तब्बल 4000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. माजी आमदार डॉ. सुधीर तांबे आणि कॅन्सर तज्ज्ञ डॉ. जयश्री थोरात यांनी यावेळी विद्यार्थ्यांना योगाचे महत्त्व पटवून दिले. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येकाने आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे डॉ. सुधीर तांबे यांनी सांगितले. ते म्हणाले, योगामुळे शरीर लवचिक होते, त्यामुळे प्रत्येकाने नियमित योगासने करावीत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनीही आरोग्याला जपण्याचा मंत्र दिला होता. दररोज किमान वीस मिनिटे योगाभ्यास करणे आवश्यक…
मुंबई, २१ जून, २०२५: महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने राजकीय आणि सामाजिक आंदोलनांमुळे दाखल झालेल्या गुन्ह्यांमधील खटले मागे घेण्यासंदर्भात शुक्रवारी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या नवीन शासन निर्णयानुसार, ३१ मार्च, २०२५ पर्यंत ज्या गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाली आहेत, ते खटले आता मागे घेण्यास मान्यता देण्यात आली आहे. यापूर्वी, शासनाने ३१ ऑगस्ट, २०२४ पर्यंत दोषारोपपत्रे दाखल झालेल्या खटल्यांसाठी हे धोरण लागू केले होते. मात्र, ती मुदत संपल्याने आणि त्यानंतरही काही गुन्ह्यांमध्ये दोषारोपपत्रे दाखल झाल्याने, खटले मागे घेण्याच्या कालावधीत वाढ करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या संदर्भात, गृह विभागाने यापूर्वी २० सप्टेंबर, २०२२, १० नोव्हेंबर, २०२२, १४ सप्टेंबर, २०२३, १२ फेब्रुवारी, २०२४,…
संगमनेर, प्रतिनिधी आर्थिक व्यवहारापोटी दिलेला धनादेश न वटता परत आल्याने यासंदर्भात दाखल खटल्यात संगमनेर न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. न्यायालयाने मच्छिंद्र सदाशिव नवले याला दोन महिन्यांचा साधा कारावास आणि फिर्यादीला दंडाच्या रकमेसह ३७ लाख रुपये देण्याचा आदेश दिला आहे. रमेश रंगनाथ सातपुते हे हवाई दलातून निवृत्त झालेले अधिकारी असून, सध्या ते संगमनेर येथे वास्तव्यास आहेत. त्यांचे नातेवाईक असलेल्या मच्छिंद्र सदाशिव नवले यांनी गाळा आणि शेती घेण्यासाठी सातपुते यांच्याकडून सुरुवातीला १६ लाख रुपये आणि नंतर १९ लाख रुपये असे एकूण ३५ लाख रुपये उसने घेतले होते. ही रक्कम सन २०२१ मध्ये घेण्यात आली होती आणि ती २८ फेब्रुवारी २०२२ रोजी परत…
शुक्रवार २० जून – अहिल्यानगर: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) आज (शुक्रवारी) केलेल्या यशस्वी कारवाईत राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सुधाकर श्रीरंग मुंडे (वय ५७) यांना दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका सेवानिवृत्त ग्रामसेवकाकडून त्यांच्या बाजूने अहवाल पाठवण्यासाठी मुंडे यांनी ही लाच मागितली होती. मिळालेल्या माहितीनुसार, ५८ वर्षीय तक्रारदार हे सेवानिवृत्त ग्रामसेवक आहेत. राहुरीच्या गटविकास अधिकाऱ्यांच्या अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली होती. तक्रारदार सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्यावरील दोषारोप पत्राचा अहवाल गटविकास अधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेकडे पाठवणे अपेक्षित होते. हा अहवाल तक्रारदारांच्या बाजूने पाठवण्यासाठी गटविकास अधिकारी सुधाकर मुंडे यांनी स्वतः दहा हजार रुपयांची लाच मागितली आणि आज…
संगमनेर, प्रतिनिधी – सर्वोच्च न्यायालयाने जामीन अर्ज मंजूर केल्यानंतर पुन्हा गुन्हा केल्याने आरोपीला अटक करून ताब्यात घेण्याचे आदेश मिळण्याबाबत केलेल्या अर्जावर सुनावणी होऊन न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. आंबी खालसा (संगमनेर) येथील अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेल्याचा, धर्मांतर घडवून आणल्याचा व अत्याचार केल्याचा गंभीर आरोप असलेल्या लव्ह जिहाद प्रकरणातील मुख्य सहआरोपी युसुफ चौघुले यास यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. मात्र, यानंतर त्याला मध्यप्रदेशमध्ये ६ गावठी कट्टे व ४ जिवंत काडतुसांसह पकडून अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्याच्यावर पुन्हा गंभीर स्वरूपाचे आरोप वाढले होते. दरम्यान घारगाव पोलीस स्टेशन मार्फत सरकार पक्षातर्फे संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्यासमोर…
शुक्रवार 20 जून: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यात घुसून एका व्यक्तीने आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली आहे. जळगावच्या आकाशवाणी चौक परिसरात दुपारी घडलेल्या या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला असून, आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संजय वराडे (रा. जळगाव) असे या व्यक्तीचे नाव आहे, तो एक ठेकेदार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. त्यांचा ताफा आकाशवाणी चौकातून जात असताना, वराडे यांनी अचानक ताफ्यासमोर येत स्वतःच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी प्रसंगावधान…
