Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेर तालुक्यासह संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर, ग्रामीण भागाप्रमाणेच आता संगमनेर शहरातील सर्वसामान्य नागरिक, व्यापारी आणि व्यावसायिक यांनाही आर्थिक फटका बसत असल्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत शिवसेनेच्या नगरसेविका साक्षी सूर्यवंशी यांनी थेट नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांच्याकडे निवेदन देत शहरातील निवासी मालमत्ताधारकांना घरपट्टी आणि पाणीपट्टीमध्ये चालू आर्थिक वर्षासाठी ५० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची मागणी केली आहे. दुष्काळाच्या झळा केवळ ग्रामीण भागापुरत्या मर्यादित नसून त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम शहरी कुटुंबांच्या अर्थकारणावरही होत असल्याने नगरपरिषदेने या संकटकाळात नागरिकांच्या पाठीशी उभे राहावे, अशी आग्रही भूमिका त्यांनी घेतली आहे. या निवेदनामध्ये केवळ सवलतीची मागणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सामाजिक बांधिलकीतून डॉ. जयश्रीताई थोरात यांच्या पुढाकाराने एकविरा फाउंडेशन आणि परदेशात कार्यरत असलेल्या ‘बीएसटी आर्मी’च्या संयुक्त विद्यमाने संगमनेर तालुक्यातील आदिवासी व मागासवर्गीय वस्त्यांमधील जिल्हा परिषद शाळांतील ३०० विद्यार्थ्यांना उबदार स्वेटरचे वाटप करण्यात आले. कडाक्याच्या थंडीत या चिमुकल्यांना स्वेटरच्या रूपाने मायेची ऊब मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद फुलल्याचे पाहायला मिळाले. राजकारण हे केवळ सत्तेसाठी नसून समाजातील गोरगरीब, वंचित आणि दुर्बल घटकांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे प्रभावी माध्यम आहे, ही लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी जपलेली सामाजिक सेवेची परंपरा डॉ. जयश्रीताई थोरात अत्यंत समर्थपणे पुढे नेत आहेत. संगमनेर तालुक्यातील अत्यंत दुर्गम व मागास भागात गणल्या जाणाऱ्या चंदनापुरी येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- कर्जवसुलीच्या वादातून सुरू असलेल्या एका प्रकरणात शहर पोलीस स्टेशनच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, फिर्यादीचा जबाब न नोंदवल्याप्रकरणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी पोलीस निरीक्षकांना नोटीस बजावत जाब विचारला आहे. संगमनेर येथील फौजदारी न्यायालयाचे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जी. ए. करजगार यांनी या खटल्यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षकांना एक महत्त्वपूर्ण नोटीस बजावली आहे. कल्पेश गांधी विरुद्ध राष्ट्रसंत आचार्य आनंदऋषीजी महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, विद्यानगर, संगमनेर यांच्या प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात कर्जवसुलीच्या अनुषंगाने गुन्हा प्रलंबित आहे का आणि फिर्यादीने दिनांक २३ जुलै २०२५ रोजी दिलेल्या अर्जावर काय कारवाई केली, याबाबतचा मूळ विवाद आहे. न्यायालयाच्या १० जुलै…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत गेल्या दहा वर्षांहून अधिक काळ आरोग्यसेवा देणाऱ्या राज्यातील १४ हजार ७८७ पात्र कंत्राटी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना अखेर सकारात्मक दिशा मिळाली आहे. या कर्मचाऱ्यांसाठी समकक्ष वेतनश्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करण्यास राज्य शासनाने मान्यता दिली असून, त्यांच्या वेतनासाठी वार्षिक ९८३.८० कोटी रुपयांच्या खर्चालाही मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे दीर्घकाळापासून सेवेत असूनही नोकरीची अनिश्चितता आणि वेतनाच्या प्रश्नांना सामोरे जाणाऱ्या हजारो आरोग्य कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. या मागणीसाठी आमदार अमोल खताळ यांनी २०२६ च्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित केलेल्या प्रश्नांचा आणि केलेल्या पाठपुराव्याचा या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर उल्लेख होत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत ग्रामीण तसेच शहरी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- बाबूजी (प्रेमानंद रुपवते) हे अखिल महाराष्ट्रातील चळवळींत काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान राहिले असून प्रवर्तनाय साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक दूरदृष्टीची मांडणी केली. मुंबईतील चेतना महाविद्यालयात झालेल्या नवीन शैक्षणिक धोरण १९८६ विषयीच्या परिषदेद्वारे त्यांनी नव्या शैक्षणिक प्रवाहाची कार्यकर्त्यांमध्ये समज निर्माण केल्याचे नमूद करत, आज अशा प्रेरणा देणाऱ्या नेत्याची खऱ्या अर्थाने समाजाला गरज असल्याचे प्रतिपादन शिक्षणतज्ञ, विचारवंत अरविंद वैद्य यांनी केले प्रतिपादन केले. मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये बहुजन शिक्षण संघाच्यावतीने जनसामान्यांचे नेते बाबूजी उर्फ प्रेमानंद रुपवते यांच्या ८० व्या जन्मदिवसानिमित्त एका भव्य अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमास सुशिलाबाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – शेतीपंपासाठी नवीन विजेचा पोल उभा करण्यासाठी प्रत्येकी एक हजार रुपयांप्रमाणे एकूण सहा हजार रुपयांची लाच मागणारा महावितरणचा वरिष्ठ तंत्रज्ञ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) जाळ्यात अडकला आहे. बापूसाहेब ठकाजी वीरकर (वय ४०, रा. वाघोळी, ता. शेवगाव) असे या आरोपीचे नाव आहे. तपासात आरोपीने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यानंतर शेवगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. तपासानंतर समोर आलेली माहिती अशी की, तक्रारदाराच्या शेतात नवीन पोल उभा करण्यासाठी परिसरातील शेतकऱ्यांकडे प्रत्येकी १ हजार रुपयाप्रमाणे ६ हजार रुपयांची लाचेची मागणी करण्यात आली होती. याप्रकरणी तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतल्यानंतर, ८ ऑक्टोबर रोजी करण्यात आलेल्या पडताळणीमध्ये लाचेची…
आजचे राशिभविष्य- मेष – आजचा दिवस आपल्यासाठी उत्तम असून मेहनतीचे योग्य फळ मिळणार आहे. स्वतःमध्ये जबरदस्त आत्मविश्वास जाणवेल. मात्र नकारात्मक बोलण्यामुळे नातेसंबंध बिघडू शकतात, त्यामुळे संयमाने वागा आणि कोणालाही अपशब्द बोलू नका. कामाचा कंटाळा करून काम टाळणे घातक ठरेल. घरातील सदस्यांसोबत खरेदीला जाण्याचे योग आहेत. वृषभ – मनातील द्विधा अवस्था आज दूर होईल. बऱ्याच दिवसांपासून शोधत असलेल्या समस्येवर योग्य तोडगा सापडेल. मुलांकडून चांगली बातमी मिळाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण राहील. धनप्राप्तीसाठी आखलेल्या योजना यशस्वी ठरतील. मित्रांसोबत विनाकारण वेळ वाया घालवू नका आणि कुटुंबासोबतच कामावरही लक्ष केंद्रित करा. मिथुन – प्रत्येक कामात यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आपल्या कलागुणांना उत्तम वाव मिळेल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने संगमनेर शहरात छापा टाकून कत्तलीच्या उद्देशाने क्रूरपणे डांबून ठेवलेल्या तब्बल २५ गोवंशीय जनावरांची सुटका केली आहे. या धडक कारवाईमुळे अवैध गोवंश कत्तल करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कठोर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत. या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड आणि पथकातील अंमलदार गणेश लोंढे, गणेश धोत्रे, अभिजीत अरकल, रणजीत जाधव, अमृत आढाव, सतीष भवर, विशाल तनपुरे व योगेश कर्डीले यांना संगमनेर परिसरात अवैध धंद्यांची कसून माहिती घेऊन कारवाई करण्याच्या सक्त सूचना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- राहूरी तालुक्यात अवैध गौण खनिज उत्खनन आणि विनापरवाना वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल प्रशासनावर गौण खनिज माफियांची अरेरावी समोर आली आहे. कारवाई करण्यासाठी गेलेले परिवीक्षाधीन प्रांताधिकारी विनीत विक्रांत शिर्के यांच्यावर पिंपळगाव फुणगी परिसरात प्राणघातक हल्ला करण्यात आला. अवैध मुरूम व वाळू वाहतूक करणारा डंपर अडवला असता, आरोपींनी धक्काबुक्की करत प्रांताधिकाऱ्यांना डंपरमधून खाली ढकलून दिले तसेच त्यांच्या अंगावर वाहन घालून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत प्रांताधिकाऱ्यांनी बाजूला उडी मारल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या गंभीर प्रकरणी राहूरी पोलीस ठाण्यात डंपर चालक धनराज चौधरी, मालक दीपक उर्फ प्रवीण बबन लाटे (रा. चिंचोली, ता. राहूरी) यांच्यासह सहा अन्य अनोळखी…
आजचे राशिभविष्य – मेष- आजचा दिवस आपल्यासाठी उत्साही आणि सकारात्मक ऊर्जा घेऊन आला आहे. रखडलेली कामे मार्गी लागतील आणि वरिष्ठांकडून सहकार्य लाभेल. कौटुंबिक वातावरण आनंदामुळे प्रसन्न राहील. आरोग्याच्या दृष्टीने दिवस उत्तम आहे, परंतु खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे लक्ष देणे हिवाळ्याच्या दिवसात फायदेशीर ठरेल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होऊ शकतात. वृषभ- आजचा दिवस आर्थिक बाबतीत अत्यंत सावध राहण्याचा आहे. अनावश्यक खर्च टाळावेत आणि कोणालाही मोठा आर्थिक सवलत किंवा उधार देणे टाळावे. व्यवसायात मोठे निर्णय घेताना अनुभवी व्यक्तींचा सल्ला घेणे हिवाळयाच्या या दिवसात योग्य ठरेल. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संभाषणात संयम बाळगा. मिथुन- आज आपली सर्जनशीलता आणि बौद्धिक क्षमता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दैनिक युवावार्ता, युवा पॉलिप्रिंट आणि युवा उद्योग समूहाचे संचालक सुदीप किसन हासे यांनी ओरिएंटल विद्यापीठ, इंदोर येथून संगणक विज्ञान व अभियांत्रिकी विषयात पीएच.डी. यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे. व्यवसायाची मोठी जबाबदारी समर्थपणे सांभाळत त्यांनी मशीन लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंग या आधुनिक तंत्रज्ञान क्षेत्रात हे उल्लेखनीय संशोधन यश संपादन केले आहे. डॉ. सुदीप हासे यांनी “Design and Analysis of Cloud Deployed Intelligent Analysis of Real Time Twitter Data (TSaaS)” या विषयावर आपले संशोधन सादर केले. या संशोधनादरम्यान त्यांनी कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डीप लर्निंग आणि क्लाऊड कम्प्युटिंगवर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांच्या या संशोधनकाळात नामांकित स्कोपस इंडेक्स्ड जर्नल्समध्ये चार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर शहरातील फुलविक्रेते, रांगोळी, पणत्या, आकाशकंदील व झाडू विक्रेत्यांसह इतर सर्व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना आपला व्यवसाय करता यावा, यासाठी १ नोव्हेंबर ते १२ नोव्हेंबर २०२६ या कालावधीत रस्त्यालगत योग्य ठिकाणी तात्पुरती दुकाने लावण्यास परवानगी द्यावी, अशी जोरदार मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तालुकाप्रमुख अमर कन्हैयालाल कतारी यांनी केली आहे. यासंदर्भात आज संगमनेर नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष मैथिली तांबे यांना अधिकृत निवेदन सादर करण्यात आले. दिवाळी हा सण छोट्या व्यावसायिकांसाठी वर्षातील अत्यंत महत्त्वाचा काळ असून, या दिवसांत मिळणाऱ्या रोजगारावर आणि उत्पन्नावर अनेक गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांची दिवाळी अवलंबून असते. त्यामुळे या व्यावसायिकांना रोजगाराची आणि व्यवसायाची योग्य संधी…
आजचे राशीभविष्य- मेष – आजच्या दिवशी तुम्हाला जवळच्या एखाद्या मित्राकडून किंवा नातेवाइकाकडून अपेक्षित सहकार्य लाभेल. बऱ्याच दिवसांपासून मनात असलेली एखादी मोठी इच्छा पूर्ण होण्याची दाट शक्यता असून सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. नोकरी आणि व्यवसायामध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने मनात थोडी धाकधूक राहील, परंतु धैर्याने परिस्थितीचा सामना केल्यास यश नक्की मिळेल. आपल्या योजना गुप्त ठेवणे आज तुमच्या फायद्याचे ठरेल. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेताना सावध राहण्याचा आहे. कोणतेही मोठे किंवा नवीन काम सुरू करण्यापूर्वी घरातील अनुभवी व्यक्तींचा सल्ला नक्की घ्या. नोकरी आणि व्यवसायात सहकाऱ्यांसोबत मिळून काम केल्यास अपेक्षेपेक्षा जास्त यश मिळेल आणि रखडलेले प्रकल्प मार्गी लागतील. पैशांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- सभासद, शेतकरी, ऊस उत्पादक आणि कामगार यांच्या हिताला प्राधान्य देण्याची परंपरा जपणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने अपघाती मृत्यू झालेल्या सभासदांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. कारखान्याच्या वतीने सभासदांचा प्रत्येकी दोन लाख रुपयांचा विमा उतरविण्यात आला असून, या विमा संरक्षणांतर्गत अपघातात मृत्यू झालेल्या सभासदांच्या वारसांना प्रत्येकी दोन लाख रुपयांचे धनादेश राज्याचे माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते वितरित करण्यात आले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या नवीन प्रशासकीय इमारतीत हा कार्यक्रम झाला. यावेळी आंबी खालसा येथील कै. सुखदेव नामदेव गाडेकर, राजापूर येथील कै. माधव हासे आणि वडगाव पान येथील कै. मनाजी रेवजी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल करणाऱ्या आणि अवैध वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पोलिसांची कारवाई सुरूच असून, संगमनेर शहरात देखील कारवाई करण्यात आली आहे. कादरीनगर परिसरामध्ये कत्तलीच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या तब्बल १० गोवंशीय जनावरांची सुटका करण्यात आली असून, या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अहिल्यानगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी गोवंशीय जनावरांची कत्तल व अवैध वाहतूक करणाऱ्या इसमांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाच्या पार्श्वभूमीवर स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी विशेष तपास पथक तयार केले होते. हे पथक सोमवारी (दि. २७) संगमनेर शहर पोलीस ठाणे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरमधील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप असलेल्या कासम खान अमीर खान पठाण आणि अशफाक रफीक सय्यद या दोघांना अतिरिक्त सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्त केले आहे. सत्र न्यायाधीश व्ही. एच. पाटवदकर यांच्या न्यायालयासमोर या खटल्याची सुनावणी झाली. ३ डिसेंबर २०११ रोजी संगमनेर शहरातील तीन बत्ती चौकात ट्रॅफिक पोलीस म्हणून कर्तव्य बजावत असताना एका कार चालकाने गाडी चुकीच्या बाजूने आणल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. यावरून झालेल्या वादात आरोपींनी पोलिसाला शिवीगाळ, धमकी देऊन झटापट केल्याचा आणि शासकीय कर्तव्यात अडथळा आणल्याचा आरोप ठेवण्यात आला होता. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- तालुक्यात उद्भवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. सणासुदीच्या काळात दुष्काळग्रस्त कुटुंबांची दिवाळी अंधारात जाऊ नये या मानवतेच्या भावनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू कुटुंबांसाठी ‘दिवाळीचा शिधा’ उपलब्ध झाला आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमार्फत दुष्काळाची सर्वाधिक झळ बसलेल्या ग्रामीण भागातील घराघरांपर्यंत हा शिधा त्वरित पोहोचवला जाणार असल्याची माहिती आमदार अमोल खताळ यांनी दिली. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या माहितीनुसार तालुक्यातील दुष्काळ, पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोहयोची कामे आणि शेतकऱ्यांच्या थकबाकीच्या प्रश्नांवर प्रशासकीय नियोजन यासंदर्भात सविस्तर माहिती दिली. टंचाई आढावा बैठकांनुसार ज्या गावांमध्ये पाण्याची तीव्र टंचाई…
आजचे राशिभविष्य – मेष – आजचा दिवस आपल्यासाठी ऊर्जावान आणि उत्साही राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळाल्यामुळे प्रगतीचे मार्ग मोकळे होतील. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदाराची पूर्ण साथ लाभेल. आर्थिक बाबतीत केलेले प्रयत्न यशस्वी ठरतील. आरोग्याची काळजी घेणे गरजेचे असून बाहेरचे खाणे टाळावे. वृषभ – आजचा दिवस संयमाने वागण्याचा आहे. व्यवसायात आर्थिक लेनदेनाबाबत सावधगिरी बाळगावी, अन्यथा नुकसान होऊ शकते. कुटुंबातील सदस्यांसोबत जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, त्यामुळे बोलताना गोडवा ठेवा. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. मित्रांचे सहकार्य लाभेल. मिथुन – आजचा दिवस आपल्यासाठी लाभदायक ठरेल. अडकलेली कामे मार्गी लागतील आणि जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. नोकरीच्या ठिकाणी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- संगमनेरच्या समृद्ध साहित्यिक, सांस्कृतिक आणि नाट्यपरंपरेला आधुनिकतेची जोड देणारे, कवी अनंत फंदी यांच्या नावाने उभारण्यात येत असलेले एक हजार आसनक्षमतेचे अद्ययावत बंदिस्त नाट्यगृह लवकरच प्रेक्षकांच्या सेवेत दाखल होणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अंतिम टप्प्यातील कामाची आमदार सत्यजित तांबे यांनी प्रत्यक्ष पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांना उर्वरित कामे त्वरित पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या आहेत. हे अद्ययावत नाट्यगृह पूर्णत्वाकडे जात असल्याने संगमनेरमधील नाट्यप्रेमी आणि कलारसिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या कार्यकाळात कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह बंदिस्त करण्याच्या कामाचा पाया रचला गेला. या प्रकल्पासाठी आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुका आणि भीमाशंकर परिसरातील शेकडो एकर जंगल कथित प्रकल्पाच्या नावाखाली नष्ट केले जात असल्याचा गंभीर आरोप करत, या विनाशकारी जंगलतोडीला तात्काळ स्थगिती देण्याची जोरदार मागणी संगमनेर तालुक्यातील पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी केली आहे. या संदर्भात अनेक स्थानिक कार्यकर्त्यांच्या स्वाक्षरीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना संगमनेरचे प्रांताधिकारी अरुण उंडे यांच्यामार्फत निवेदन सादर करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, सध्या संपूर्ण महाराष्ट्रात वाढते तापमान, पाण्याची तीव्र टंचाई आणि दुष्काळसदृश परिस्थितीमुळे जनता होरपळून निघत आहे. यंदाच्या उन्हाळ्यात राज्यातील अनेक भागांत तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले असून…
