Author: Annant Ppangarkar
मुंबई (महाराष्ट्र संवाद न्यूज) शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितले. श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात खासदार सदाशिव लोखंडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री शिंदे यांची सह्याद्री अतिथीगृह येथे भेट घेतली. यावेळी आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. बैठकीस बंदरे व खनिकर्ममंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, विधी व न्याय विभागाचे प्रधान सचिव निरज धोटे उपस्थित होते. संस्थानमधील प्रत्येक कर्मचारी हा सेवाभावी वृत्तीने काम करीत असून त्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात सकारात्मकतेने विचार करण्यात येईल. हे सर्वसामान्य, कष्टकऱ्यांचे, शेतकऱ्यांचे सरकार असून या सर्व घटकांच्या पाठीशी…
सह्याद्रीच्या डोंगररांगात मे महिन्यात आंबा, जांभळाच्या सिझन बरोबरच “करवंद” या फळाचा सिझन चालू होतो. करवंदाचे झाड झुडुपासारखे पसरलेले असते. त्याला काटे असतात. डोंगरावर ते नैसर्गिकपणे आलेले असतात. डोंगरावर यांच्या जाळी पसरलेल्या असतात. दाट व घट्ट जाळीत शिरता येत नाही. उन्हाळ्यात डोंगर रांगेतील घाटात त्या भागातील नागरिक झाडांचे पानाची टोपली करून त्यात “करवंदे” ठेवून विकायला बसतात. हे बघून आपण थांबतोच व करवंदे घेतो. माझे वडील तीर्थरूप भाऊसाहेब थोरात व भाऊ बाळासाहेब थोरात आम्हाला मे महिन्याच्या सुट्टीला आलेल्या सर्व मुलांना घेऊन माळशेज घाटात व इतर डोंगरावर करवंद खायला नेत. व करवदांच्या जाळ्यांमध्ये जाऊन आम्ही मोठे मोठे पिकलेले करवंदे खायचो. त्याचा आनंद आम्ही…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सहकारी महिलेचे आक्षेपार्ह फोटो कृषी विभागाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर टाकणाऱ्या त्या कृषी पर्यवेक्षकाचे विभागीय कृषी सहसंचालकांनी तात्काळ निलंबन केले आहे. पर्यवेक्षकाच्या निलंबनाच्या आदेश संगमनेर कृषी विभागाला प्राप्त झाल्याची माहिती मिळाली. संगमनेरच्या कृषी विभागाला पुरते बदनाम केलेल्या आणि त्याला अनेकदा पाठीशी घातलेल्या या रंगेल कर्मचाऱ्याच्या गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या चर्चानंतर कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी त्याच्यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले होते. व्हाट्सअप ग्रुपवर फोटो टाकले गेल्यानंतर जागा झालेल्या कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने यासंदर्भात वरिष्ठांना माहिती दिली होती. त्यानंतर कृषी विभागाच्या विभागीय कृषी सहसंचालक र. शा. नाईकवाडी यांनी संगमनेर कृषी विभागातील कृषी पर्यवेक्षक असलेल्या…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) अन्वये 30 मे 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. नगर जिल्ह्यात ग्रामपंचायत पोटनिवडणुक, मतदान, मतमोजणी व जयंती साजरी होणार आहेत. तसेच सभा, महासभा, आंदोलने इत्यादीमुळे सार्वजनिक शांतता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी 17 मे 30 मे 2023 रोजीच्या रात्रीचे 12 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागु राहतील, असे प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविले आहे. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेरच्या कृषी विभागातील एका कर्मचाऱ्याच्या रंगेल लीला मंगळवारपासून चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. कृषी पर्यवेक्षक असलेल्या या कर्मचाऱ्यांने आपल्याच खात्यातील एका महिलेचे अश्लील फोटो कार्यालयाच्या व्हाट्सअप ग्रुपवर सेंड केले आणि या कर्मचाऱ्यांच्या वेगवेगळ्या लीलांना तोंड फुटले आहे. कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून या कर्मचाऱ्यावर आता कोणती कारवाई केली जाते, याकडे लक्ष लागले आहे. नवीन नगर रोडच्या प्रशासकीय इमारतीमध्ये थेट वरच्या मजल्यावर कमी वर्दळीच्या ठिकाणी संगमनेर तालुका कृषी अधिकारी यांचे कार्यालय आहे. थेट वरच्या मजल्यावर असल्याने या कार्यालयाशी फारसा कोणाचा संपर्क येत नाही. याच कार्यालयात गेल्या काही वर्षापासून एक कर्मचारी ठाण मांडून बसला आहे. कर्मचाऱ्यांचे आपल्याच विभागातील महिलेसोबत गेल्या अनेक…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर तालुक्यातील १५ मंडळामध्ये आज बुधवार १७ मे २०२३ पासून ‘शासन आपल्या दारी’ शिबिरांस सुरुवात करण्यात आली आहे. या शिबिरांच्या माध्यमातून तालुक्यातील सर्व शासकीय विभागाचे अधिकारी-कर्मचारी एकाच छताखाली आले आहेत. शिबिरात नागरिकांना विविध योजनांची माहिती देण्यात येऊन जागेवरच त्यांच्या कामाबाबतची अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती संगमनेरचे नवे तहसीलदार धीरज मांजरे यांनी दिली. ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमांतर्गत १७ मे रोजी संगमनेर, धांदरफळ शिबलापूर (आश्वी खुर्द), घारगाव व साकुर या मंडळात शिबिर घेण्यात आले. या शिबिराच्या नियोजनासाठी मंडळ अधिकारी, विस्तार अधिकारी, कृषी पर्यवेक्षक, मंडळातील सर्व तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यक यांना जबाबदारी देण्यात आली आहे.…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) केंद्रीय अभ्यासक्रमाच्या (सीबीएसई) दहावी व बारावीच्या परीक्षेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलच्या विद्यार्थ्यानी जिल्ह्यात बाजी मारली आहे. शाळेने यंदाही आपल्या उज्ज्वल निकालाची परंपरा कायम राखतांना दहावीच्या जय नीलेश वाकचौरे व श्रेयान अनिकेत कासार यांनी प्रत्येकी 98 टक्के गुण मिळवतांना जिल्ह्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, ध्रुवच्याच संस्कृती दत्तू शेळके (97.80 टक्के) व श्रीशा विराज शिंदे (97.40 टक्के) यांनी अनुक्रमे द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवतांना ध्रुव ग्लोबलच्या यशाची पताका फडफडती ठेवली आहे. याशिवाय श्रीरंग गिरीश नाझीरकर, अद्वैत विवेक तळणीकर, तनया विक्रम गाडे, अनय सचिन नवले, अमनदीप नीतिन आरोटे, गायत्री विजय घुले, पृथ्वीराज प्रशांत देशमुख, जय विलास बेनके, साईतेज…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या आठव्या राष्ट्रीय क्रीडा नृत्य स्पर्धेत गीता परिवार संचलीत संस्कार बालभवनच्या मुलांनी देदीप्यमान यश मिळवले. स्पर्धेच्या प्रारंभापासून वर्चस्व प्रस्थापित करतांना बालभवनाच्या नृत्य कलाकांरानी 39 सुवर्णपदकांसह एकूण 50 पदकांची लयलुट केली. वैयक्तीक व सांघीक अशा दोन्ही प्रकारांमध्ये घवघवीत यश मिळवणार्या बालभवनला या राष्ट्रीय स्पर्धेचे अजिंक्यपद देण्यात आले. या स्पर्धेत बालभवनचे 25 नृत्य कलाकार सहभागी झाले होते. 13 वर्षांखालील मुलींच्या वैयक्तीक शास्त्रीय नृत्यप्रकारात रीत चेतन राजपाल, 17 वर्षांखालील गटातील अदिती राजेश लाहोटी यांनी उत्कृष्ट सादरीकरणाच्या जोरावर पहिल्या क्रमांकासह सुवर्णपदक मिळवले. 21 वर्षांखालील गटात जीया अमित बाफनाने रौप्यपदक व रिया गोपाल साकीने कांस्यपदकाची कमाई केली. 17…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) मुलीला बोलल्याच्या कारणावरून आईसह नातेवाईकांनी शिवीगाळ लाथाबुक्क्याने मारहाण करत कुऱ्हाडीने केलेल्या हल्ल्यात वडील गंभीर जखमी झाल्याचा प्रकार संगमनेर तालुक्यातील पोखरी हवेली येथे घडला आहे. या प्रकरणी मुलीच्या आईसह चार जणांविरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमसेन माधव रुपवते (वय 28 वर्ष, धंदा मजुरी रा. समनापुर, ता. संगमनेर, ह. रा. पोखरी हवेली, संगमनेर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून महेश विलास सोनवणे, संतोष संपत साळवे, सविता विलास सोनवणे, सोनल भीमसेन रुपवते (सर्व रा. पोखरी हवेली, ता. संगमनेर) यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 326, 323, 504, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भीमसेन रुपवते…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) नऊ वर्ष वयाच्या चिमुरडीवर संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे सोमवारी रात्री अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर पोलिसांनी विकृत आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. रमेश जयराम सांगळे (रा. सोनेवाडी, ता. संगमनेर, जि. अहमदनगर) असे विकृत आरोपीचे नाव आहे. संगमनेर तालुक्यातील सोनेवाडी येथे पीडित चिमूरडी आपल्या कुटुंबीयासमवेत एका विवाह समारंभासाठी आली होती. सोमवारी (ता. १५ मे) रात्री हळदीचा कार्यक्रम सुरू असताना पीडित चिमुरडी आपल्या आईसोबत तेथे उपस्थित होती. काही वेळानंतर पीडित चिमुरडी तेथून बाजूला गेले असता तिच्यावर लक्ष ठेवून असलेला रमेश सांगळे याने तिच्या अज्ञानपणाचा फायदा घेत तिला अंधारात…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) शासनाच्या विविध योजना राबविण्यासाठी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनाला ॲक्टिव्ह मोडवर आणतानाच शासन आपल्या दारी, महाराजस्व अभियान तसेच शासनाच्या विविध योजना मिशन मोडवर घेत गावागावत शिबीरे राबवा. जिथे भाजपचे आमदार नाही त्या विरोधी पक्षाच्या आमदारांच्या मतदारसंघातही या योजना प्रभावीपणे राबवा. कोणी जर यात अडचणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर माझा आदेश आहे म्हणून सांगा. विरोधकांच्या कोणत्याही दबावाला बळी पडू नका, काही अडचण आलीच तर थेट मला कळवा अशा सूचना राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी महसूल यंत्रणांना दिले. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन भवन येथे महसूल विभागाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विखे म्हणाले, शासनामार्फत…
जामखेड (महाराष्ट्र संवाद न्यूज) कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीमध्ये समसमान जागा मिळविणाऱ्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये झालेल्या सभापती, उपसभापतीपदाच्या निवडीत ईश्वर चिट्ठीने सभापतीपदाची माळ भाजपच्या तर उपसभापतीपदाची माळ राष्ट्रवादीच्या गळ्यात टाकली आहे. सभापती उपसभापती निवडणुकीत दोन्ही उमेदवारांना समसमान मते पडल्याने ईश्वर चिट्ठीचा कौल घेण्यात आला यात सभापतीपती भाजपचे शरद कार्ले तर उपसभापतीपदी विखे समर्थक कैलास वराट निवडून आले आहेत. जामखेड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विखे गटाने राष्ट्रवादीसोबत केलेल्या युतीनंतर झालेल्या निवडणुकीत भाजपचे नेते प्रा. राम शिंदे यांच्या गटाने नऊ तर राष्ट्रवादीचे राळेभात आणि विखे यांच्या युतीने नऊ जागा मिळविल्या होत्या. यात राळेभात गटाला साथ तर त्यांच्याबरोबर युती केलेल्या विखे यांच्या गटाला…
नारायणगाव (महाराष्ट्र संवाद न्यूज) आंबेगाव तालुक्यात नासिक-पुणे महामार्गावर शेवळेवाडी परिसरात धावत्या एसटी बसचे मागचे दोन्ही चाके अचानक निखळली. दोन्ही चाक निखळल्यानंतर देखील काही वेळ बस महामार्गावर धावतच होती. मात्र चालकाच्या प्रसंगावधनांमुळे मोठा अपघात टळला. बसमधील सर्व ३५ प्रवासी या अपघातातून सुखरूप बचावले आहे. सामान्य प्रवाशांची लालपरी असलेल्या बसचा हा अपघात भीषण होता. महामार्गावरून धावत असलेल्या बसचे दोन्ही चाके अचानकपणे निखळल्यानंतर देखील बस तिरपी होऊन पुढील दोन चाकांवर काही वेळ महामार्गावर धावत होती. धावणाऱ्या बसचे एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यामध्ये तर एक चाक बसच्या पुढे जाऊन पडले. अचानकपणे घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन बसमधील प्रवाशांच्या उरात…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) संगमनेर शहर पोलिसांनी मंगळवारी मध्यरात्री शहरातील जमजम कॉलनी परिसरात टाकलेल्या छाप्यात गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल करण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून एक लाख बारा हजार पाचशे रुपये किमतीचे गोवंश जनावरांचे गोमांस ताब्यात घेतले आहे. संगमनेर शहरातील अनधिकृत कत्तलखान्यांची राज्यभर ख्याती आहे. शेकडोने छापे टाकून देखील येथील कत्तलखाने बंद झालेले नाहीत. चोरी छूपके जमजम कॉलनीमध्ये सुरू असलेल्या कत्तलखान्यात गोवंश जनावरांची कत्तल केली जात असल्याची माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांना मिळाली होती. मथुरे यांनी या कत्तलखान्यावर कारवाईचे आदेश दिल्यानंतर पोलीस पथक मंगळवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास जमजम कॉलनी परिसरात या कत्तलखान्याचा शोध…
नेवासे (महाराष्ट्र संवाद न्यूज) त्रिमूर्ति पावन प्रतिष्ठान नेवासा फाटा येथे विश्व हिंदु परिषद दुर्गावाहिनी पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण वर्गास नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी येथील दुर्गांशी संवाद साधला ते म्हणाले, आजच्या दुर्गांनी राजमाता जिजाऊ, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्या देवी होळकर यांचा आदर्श घ्यावा. यावेळी बोलताना त्यांनी लव जिहादबद्दल चिंता व्यक्त केली. मुलींनी या षडयंत्राला बळी पडू नये, असे ते म्हणाले. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट केरळच्या वास्तविक घटनेवर आधारित असुन सर्वांनी हा चित्रपट बघावा व समाजामध्ये जागरूकता निर्माण करावी. हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आपला जन्म झाला आहे. आपन हिंदू आहोत, ही भाग्याची गोष्ट आहे. उद्याच्या दुर्गा तयार करण्याचे काम…
संगमनेर (महाराष्ट्र संवाद न्यूज) सामायिक विहिरीवरील पिण्याच्या पाण्याचा कॉक फिरविण्याचा कारणावरून ४३ वर्षीय व्यक्तीला शिवीगाळ, दमदाटी करत बेदम मारहाण करण्यात आली. लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत फिर्यादीचा डावा पाय घोट्यामध्ये फ्रॅक्चर झाल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात याप्रकरणी संगमनेर तालुक्यातील सावरगाव तळ येथील दोन महिलांसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी आणि फिर्यादी एकाच कुटुंबातील असून त्यांच्यातील वादाची परिणती थेट हाणामारीत झाली. संजय बाळासाहेब नेहे (वय 43 वर्ष, धंदा शेती व ड्रायव्हर रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर) असे मारहाणीतील जखमीचे नाव आहे. तर राजेंद्र बाळासाहेब नेहे, सौरभ बाळासाहेब नेहे, पुष्पा राजेंद्र नेहे, मनीषा रावसाहेब नेहे (सर्व रा.…
नाशिक (महाराष्ट्र संवाद न्यूज) साताऱ्या पाठोपाठ नाशिकमध्येही एसीबीने मोठी कामगिरी केली असून तब्बल तीस लाख रुपयांची लाच घेताना एका वकिलासह सहकार विभागाचा बडा मासा एसीबीच्या जाळ्यात अलगद अडकला आहे. यामुळे राज्याच्या सहकार विभागात खळबळ उडाली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदाचा निर्णय बाजूने लावून देण्याच्या बदल्यात तीस लाखाच्या लाचेची मागणी करण्यात आली होती. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदी तक्रारदार निवडून आले आहे. त्यांच्या निवडी विरोधात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात सुनावणी घेऊन या सुनावणीचा निर्णय तक्रारदाराच्या बाजूने देण्यासाठी जिल्हा उपनिबंधक सतीश भाऊराव खरे (वय ५७ वर्ष, रा. फ्लॅट नंबर २०१, आई हाईटस्, कॉलेज रोड, नाशिक व खाजगी…
अहमदनगर (महाराष्ट्र संवाद न्यूज) कर्मचारी भविष्य निधि संघटन (ई.पी.एफ.ओ.) कडून सदस्य, निवृत्तीवेतन धारक आणि कंपनी मालकासाठी प्रत्येक महिन्यात ‘निधि आपके निकट हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या महिन्यात हा कार्यक्रम संगमनेरमध्ये आयोजित करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. अहमदनगरच्या सहाय्यक भविष्य निधी आयुक्तांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २९ मे २०२३ सर्वांच्या सोयीसाठी संगमनेरमध्ये मालपाणी इंडस्ट्रियल पार्क समोर अकोले रोड येथे शिवशक्ती इमारतीमध्ये या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या सदस्यांच्या भविष्य निधीबाबत काही अडचणी असतील त्यांनी संबंधित कागदपत्रे सोबत आणावीत. याच कार्यक्रमात तक्रारींचे निवारण करण्यात येणार आहे, असे सहायक भविष्य निधी आयुक्त जिल्हा कार्यालय, अहमदनगर यांनी कळविले…
सातारा (महाराष्ट्र संवाद न्यूज) जिल्हा न्यायालयात दाखल असलेल्या प्रोबेट अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून देण्यासाठी दोन लाखाची मागणी करणारा आणि त्यासाठी एक लाख रुपये लाच स्वीकारणारा खाजगी वकील एसीबीने रंगेहात ताब्यात घेतला आहे. विलास बाळकृष्ण कुलकर्णी असे या वकिलाचे नाव आहे. या घटनेतील तक्रारदार हे एका शिक्षण संस्थेचे अध्यक्ष असून सातारा दिवाणी न्यायालयात शिक्षण संस्थेच्या वतीने प्रोबेट अर्ज दाखल आहे. लोकसेवकावर प्रभाव पाडून या अर्जाचा निकाल तक्रारदाराच्या बाजूने लावून घेण्यासाठी वकील कुलकर्णी यांनी तक्रारदाराला दोन लाख रुपये द्यावे लागतील असे सांगत पैशाची मागणी केली होती. त्यामुळे तक्रारदाराने सातारा विभागाच्या पोलीस उपाधीक्षक उज्वल वैद्य यांच्याशी संपर्क साधत तक्रार दाखल केली होती.…
शिर्डी (महाराष्ट्र संवाद न्यूज) राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना, खरीप हंगाम सन २०१६ पासून राबविण्यात येत आहे. योजनेची उद्दीष्टये :- ????नैसर्गिक आपत्ती, किड आणि रोगामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे. ????शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारित मशागतीचे तंत्रज्ञान व सामुग्री वापरण्यास प्रोत्साहन देणे. ???? पिकांच्या नुकसानीच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतक-यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे. ????कृषि क्षेत्रासाठीच्या पतपुरवठयात सातत्य राखणे. योजनेचे वैशिष्टये :- ????कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक आहे. ????खातेदारांचे व्यतिरिक्त कुळांसाठी सुध्दा ही योजना खुली ठेवण्यात आलेलो आहे. ????विमा संरक्षित रक्कम ही प्रत्येक पिकाच्या मंजूर कर्ज मर्यादे इतकी राहील. ????शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता दर हा खरीप हंगाम २ टक्के…
