Author: Annant Ppangarkar
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चर (MACCIA) च्या २०२६-२८ या द्विवार्षिक निवडणुकीत अहिल्यानगर जिल्ह्यातील सुधीर श्रीराम डागा, श्रीनिवास फूलचंद भंडारी आणि गोरख वसंतराव कुटे हे तिघे कार्यकारिणी सदस्य म्हणून बिनविरोध निवडून आले आहे. संघटनेत संगमनेरमधून दोघांची वर्णी लागली आहे. मुख्य निवडणूक अधिकारी सुरेश घोरपडे यांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निकालांनुसार अहिल्यानगर जिल्ह्यातील व्यापार व उद्योग क्षेत्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या तिन्ही नेत्यांची निवड बिनविरोध झाली आहे. राज्यातील इतर सर्व जिल्ह्यांचे निकाल आणि विजयी उमेदवारांची नावे – अध्यक्ष: सांगली जिल्ह्यातील रवींद्र परिसा माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. वरिष्ठ उपाध्यक्ष: मुंबईतून करुणाकर शेखर शेट्टी हे या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: शहरात बेकायदेशीर हत्यारे बाळगणाऱ्या दोन सराईतांना पोलिसांनी सापळा रचून अटक केली आहे. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे, एक धारदार चॉपर आणि मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालय व श्रीरामपूर शहर पोलिसांच्या संयुक्त पथकाने १६ जून २०२६ रोजी संध्याकाळी ही धडक कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांच्या पथकाने जर्मन हॉस्पिटलच्या मागे, पाण्याच्या पाटाजवळ सापळा रचला होता. तिथे संशयास्पदरित्या थांबलेल्या दोन इसमांना ताब्यात घेऊन त्यांची झडती घेतली असता हा बेकायदेशीर हत्यारांचा साठा उघडकीस आला. या कारवाईत पोलिसांनी नाझीम अन्वर पठाण (वय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवायांमुळे धास्तावलेल्या व्यापारी वर्गाकडून मुंढे यांच्या बदलीसाठी सरकारवर दबाव आणला जात आहे. बदलीच्या चर्चेवरून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने सरकारला थेट इशारा दिला आहे. तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून राज्यभरात भेसळखोरांवर दररोज कठोर कारवाई करून कोट्यवधींचा माल जप्त केला आहे. पूर्वी मनुष्यबळाची कमतरता सांगणारा हा विभाग आता अत्यंत सक्रिय झाला असून, नुकतीच पुण्यात साडेपाच हजार किलो आंबे आणि भेसळयुक्त आमरस नष्ट करण्याची मोठी कारवाई करण्यात आली. सनदी अधिकारी असलेले तुकाराम मुंढे हे कायम चर्चेत असतात. त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीमुळे त्यांना वारंवार बदलीला सामोरे जावे लागते. याचबरोबर सरकारकडून…
आजचे राशिभविष्य मेष- आज तुम्हाला दीर्घकाळापासून असलेल्या चिंता आणि तणावातून मोठा दिलासा मिळेल. महत्त्वाची रखडलेली कामे नातेवाईकांच्या सहकार्याने मार्गी लागतील आणि एखाद्या सन्माननीय व्यक्तीकडून उत्तम मार्गदर्शन लाभेल. आर्थिक लाभाचे नवीन मार्ग खुले होतील, मात्र कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे आहे. व्यवसायाचा विस्तार करण्यासाठी आणि नवीन योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे. वृषभ- आज कुटुंबात प्रेम आणि समजूतदारपणाचे वातावरण राहील, ज्यामुळे कौटुंबिक संबंध अधिक घट्ट होतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता असून दैनंदिन कामे विनाअडथळा पूर्ण होतील, परंतु खरेदी करताना किंवा आर्थिक व्यवहार करताना विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. निष्काळजीपणामुळे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोग्याच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई “केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,” अशी घोषणा करणारे अभिजित दिपके यांच्यावरील हल्ल्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जबाबदार असल्याचा थेट आरोप स्वतः दिपके यांनी केला आहे. ज्यांनी हल्ला केला, त्या संघाशी संबंधित हल्लेखोरांना संघाची फूस होती, असे दिपके यांनी म्हटले आहे. अभिजित यांच्या या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. जयपूरनंतर मंगळवारी नागपुरात आंदोलन आयोजित करण्यात आले होते. यावेळी अभिजित म्हणाले, “सोमवारी माझ्यावर हल्ला झाला. माझ्यावर हल्ला करणारे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. ६ जूनला दिल्लीतील जंतरमंतर मैदानावर आंदोलन केले होते, तेव्हाच आम्ही अल्टिमेटम दिला आहे. जोपर्यंत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: येथील सत्यशोधक विचारमंचच्या वतीने सुरू असलेल्या व्याख्यानमालेत शनिवारी (२० जून) प्रसिद्ध राजकीय विश्लेषक हनुमंत पवार यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. व्याख्यानमालेतील हे सहावे पुष्प आहे. शनिवारी सायंकाळी साडेपाच वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पडताणी कॉम्प्लेक्समधील व्यापारी असोसिएशन हॉलमध्ये हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संयोजकांकडून देण्यात आली आहे. या व्याख्यानाचा मुख्य विषय ‘झुंजायच्या गोष्टी (सात हुतात्म्यांची झुंज)’ असा आहे. संत तुकाराम महाराजांच्या अभंगातील एका ओळीवरून हे शीर्षक घेण्यात आले असून, आपल्या विचारांसाठी आणि निष्ठांसाठी संघर्ष करताना ज्या मान्यवरांनी प्राणांची आहुती दिली अशा सात थोर व्यक्तींची संघर्षगाथा हनुमंत पवार या व्याख्यानातून मांडणार आहेत. संगमनेर आणि परिसरातील नागरिकांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: रामराज्य हे केवळ शस्त्राच्या बळावर उभे राहत नसून, त्यासाठी शास्त्र, संस्कार आणि सदाचाराचा भक्कम आधार आवश्यक असतो. तसेच कोणतेही धर्मकार्य यशस्वी करण्यासाठी माणसाकडे दृढ इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध रामायणाचार्य ढोक महाराज यांनी केले आहे. गुंजाळवाडी येथे आयोजित परमपूज्य गगनगिरी महाराज अखंड हरिनाम सप्ताहातील रामकथेच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. सुमारे सात लाख भाविकांनी या ज्ञानयज्ञाचा लाभ घेतला असल्याचे संयोजकांनी म्हटले आहे, कथेच्या सांगतेनंतर महाप्रसादासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती. अधिक मासातील आठव्या पर्वाचे औचित्य साधून आयोजित या रामकथेच्या अंतिम सत्रात ढोक महाराजांनी आपल्या मधुर आणि ओजस्वी वाणीतून रामायणातील युद्धकांड आणि रामराज्य स्थापनेचे…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. आर्थिक बाबतीत दिवस प्रगतीचा असून जुनी येणी वसूल होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची खंबीर साथ लाभणार आहे. अडकलेली कामे गतीने पुढे सरकतील आणि व्यावसायिक क्षेत्रात धनलाभाचे उत्तम योग आहेत. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचा मान-सम्मान वाढेल. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यास मदत करेल. मानसिक शांतता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: शिर्डी लोकसभा मतदारसंघातील जनतेने ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने त्यांना निवडून दिले, त्या अपेक्षांची पूर्तता करण्यात खासदार पूर्णपणे अपयशी ठरल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेश प्रवक्त्या उत्कर्षा रूपवते यांनी केला आहे. रूपवते यांनी शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या गेल्या दोन वर्षांतील कारकिर्दीवर थेट आणि धारदार शब्दांत टीका केली आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी करत खासदार वाकचौरे यांच्या कामगिरीचा जाहीर पंचनामा केला. उत्कर्षा रूपवते म्हणाल्या की, ४ जून रोजी लोकसभेच्या निकालाला दोन वर्षे पूर्ण झाली असून या काळात खासदारांनी मतदारसंघात नेमकी काय कामे केली आणि कोणत्या विकासकामांना…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: राज्य विधिमंडळाचे आगामी पावसाळी अधिवेशन आगामी २२ जूनपासून सुरू होणार असून ते १० जुलैपर्यंत चालणार आहे. आज मुंबईत पार पडलेल्या विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार समितीच्या महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत अधिवेशनाच्या एकूण कालावधीसह विधिमंडळ कामकाजाच्या विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. २२ जून ते १० जुलै अशा जवळपास तीन आठवड्यांच्या या कालावधीत राज्य सरकारकडून विविध प्रलंबित विधेयके मंजुरीसाठी पटलावर ठेवली जातील, तसेच राज्याच्या महत्त्वाच्या आर्थिक आणि लोकहिताच्या मुद्द्यांवर दोन्ही सभागृहात चर्चा घडवून आणली जाईल. सध्याच्या राजकीय घडामोडी आणि राज्यातील विविध प्रलंबित प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर हे पावसाळी अधिवेशन अत्यंत वादळी ठरण्याची शक्यता वर्तवली…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: माणूस निसर्गातून जन्माला आला असून त्याला पुन्हा निसर्गातच विलीन व्हायचे आहे, हाच परमपूज्य गगनगिरी महाराजांचा संदेश होता. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण आणि निसर्गाचे जतन करणे हीच गगनगिरी महाराज आणि परमेश्वराची खरी सेवा ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. गुंजाळवाडी (संगमनेर) येथे अत्यंत भक्तिमय वातावरणात झालेल्या परमपूज्य विश्वविभूषित स्वामी गगनगिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या काल्याच्या कीर्तनप्रसंगी ते मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. या सांगता समारंभाप्रसंगी प्रसिद्ध समाजप्रबोधनकार हरिभक्त परायण निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे सुश्राव्य काल्याचे कीर्तन झाले. या सोहळ्याला व्यासपीठावर खासदार भाऊसाहेब वाकचौरे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, दिलीप…
मोहसीन शेख, संगमनेर नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभी अँग्लो उर्दू हायस्कूल, संगमनेर येथे विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात स्वागत करण्यात आले. शाळेच्या पहिल्याच दिवशी इयत्ता ५ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना शासनामार्फत प्राप्त झालेल्या पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांना गुलाबपुष्प व पेन देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास विद्यालयाचे चेअरमन शेख गनी हाजीसेठ, अंजुमन-ए-इस्लाम ट्रस्टचे चीफ ट्रस्टी अब्दुल्लाह हाजी हसन चौधरी, सेक्रेटरी हाजी पठाण शौकतखान मोहंमदखान, ट्रस्टी हाजी शेख एजाज शमशुद्दीन तसेच शालेय समिती सदस्य हाजी इनामदार शमशुद्दीन जैनुद्दीन उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांना शिक्षणाचे महत्त्व, शालेय शिस्त आणि उज्ज्वल भवितव्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक…
आजचे राशीभविष्य मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साही आणि सकारात्मक राहील. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि वरिष्ठ तुमच्या कामावर प्रसन्न राहतील. नवीन योजनांवर काम करण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आर्थिक बाजू भक्कम राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत वैचारिक मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवादादरम्यान संयम बाळगणे हितकारक ठरेल. वृषभ – आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे आज मार्गी लागतील. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत आणि नवीन व्यावसायिक भागीदारीतून चांगला फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात तुमचा सहभाग वाढेल, ज्यामुळे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन पुणे: राज्यातील अपुऱ्या पर्जन्यमानाची पार्श्वभूमी आणि धरणांमधील खालावलेला पाणीसाठा लक्षात घेऊन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ३१ ऑगस्ट २०२६ पर्यंत नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुनिश्चित करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश दिले आहेत. सिंचन भवन येथे आयोजित एका महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी या परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला कृष्णा व गोदावरी लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या महामंडळांचे कार्यकारी संचालक हनमंत धुमाळ, जयवंत गवळी यांच्यासह मुख्य अभियंता व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सध्या राज्यातील धरणांमध्ये एकूण उपयुक्त जलसाठा केवळ ३५७.५ टीएमसी म्हणजेच २५ टक्के इतकाच शिल्लक असून, तो गतवर्षीच्या तुलनेत कमालीचा कमी आहे. चालू वर्षात आतापर्यंत अत्यंत कमी पाऊस झाल्यामुळे…
पंतप्रधानपदाचा सर्वाधिक काळ कारभार केल्याच्या कारणास्तव नरेंद्र मोदी यांचा सुरू असलेला उत्सव कमालीचा चर्चेचा बनला आहे. एखाद्या व्यक्तीने अधिक काळ कार्यभार सांभाळला म्हणून त्याचे कौतुक करायला कोणाची ना नाही. यासाठी त्याच्या नावावर कामेही जमा असावीत. निमित्तमात्र आणि हौसमौज म्हणून असले कार्यक्रम होतच असतात, तसे या उत्सवाचे व्हायला नको. दुर्दैवाने त्यामागे असलेला कुटील डाव पाहिला की, या उत्सवाचा उबग आल्याशिवाय राहत नाही. मोदींनी अधिक काळ पंतप्रधानपद सांभाळले असे दाखवताना ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याहून किती महान होते, हे पुढे आणण्याचा पद्धतशीर आटापिटा सुरू आहे. कोणाचा कार्यकाळ किती, याहून त्याचा कार्यकाळ ‘कसा’ होता, याची मोजदाद करायची असते. पण आजकाल त्याचा विचार करण्याचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा ऊर्जावान राहील. नवीन कामांची सुरुवात करण्यासाठी वेळ अतिशय अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात तुमच्या कामगिरीचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, परंतु विनाकारण खर्च करणे टाळावे. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला संमिश्र फळे मिळतील. दिवसाच्या सुरुवातीला काही मानसिक तणाव जाणवू शकतो, परंतु दुपारनंतर परिस्थिती सुधारेल. संयम आणि शांतता राखणे आज हितकारक ठरेल. व्यापार्यांना आज मोठा आर्थिक व्यवहार करताना सावधगिरी बाबावी लागेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील. जोडीदाराची उत्तम साथ लाभल्याने मन प्रसन्न राहील. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीचा आणि नवनवीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: सरकार दारूबंदी करणार नाही आणि लोक सहजासहजी दारू सोडणार नाहीत, त्यामुळे महिलांनीच पुढाकार घेऊन घरातील व्यसनाला आळा घातला पाहिजे, देश जर महासत्ता करायचा असेल, तर आधी गाव आणि शेतकरी समृद्ध करणे गरजेचे असून आपले गाव हेच आपले खरे तीर्थक्षेत्र मानले पाहिजे, असे प्रतिपादन पाटोदा गावचे माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी केले. संगमनेर येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहातील शनिवारच्या व्याख्यानात ते बोलत होते. आपल्या व्याख्यानात पेरे पाटील यांनी अन्नभेसळ, प्लास्टिक प्रदूषण, बालविवाह, भ्रष्टाचार आणि ग्रामविकास यांसारख्या गंभीर विषयांवर अत्यंत रोखठोक भाषेत विचार मांडले. सध्या बाहेरच्या अन्नामध्ये मोठ्या प्रमाणावर भेसळ होत असून धने, जिरे, हळद, तिखट,…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन श्रीरामपूर: राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या श्रीरामपूर येथील भरारी पथक क्रमांक २ ने एका कारवाईत बनावट परदेशी दारू तयार करणाऱ्या व्यक्तीला रंगेहात पकडले आहे. याप्रकरणी घटनास्थळावरून पोपट भास्कर पवार याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ च्या विविध कलमांन्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली आहे. श्रीरामपूर येथील आशीर्वाद नगर भागात एका व्यक्तीकडून नामांकित ब्रँडची बनावट दारू तयार केली जात असल्याची खात्रीशीर माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे पथकाने तातडीने सदर ठिकाणी छापा टाकला. या छाप्यात ‘इम्पेरियल ब्लू’ आणि ‘रॉयल स्टॅग’ या नामांकित ब्रँड्सच्या व्हिस्कीच्या बनावट असलेल्या एकूण ११७ बाटल्या, एक दुचाकी वाहन आणि इतर साहित्य असा एकूण…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत ऊर्जेने भरलेला असेल. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा काळ उत्तम आहे. व्यवसायात धनलाभाचे योग दिसत आहेत, परंतु घाईघाईने कोणतेही आर्थिक निर्णय घेऊ नका. कुटुंबातील सदस्यांसोबत सुसंवाद साधल्यास मनाला शांतता लाभेल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची उत्तम साथ मिळेल. आरोग्याकडे थोडे लक्ष देणे गरजेचे आहे, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयी सुधारा. वृषभ: आज आर्थिक नियोजनावर भर देणे फायदेशीर ठरेल. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्या अंगावर येऊ शकतात, ज्यामुळे तुमचा मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलताना संयम बाळगणे आवश्यक आहे. मित्रांकडून महत्त्वाची मदत मिळू शकते. जुन्या वादांवर पडदा पडेल आणि कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. संध्याकाळच्या वेळी थोडा थकवा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई | विशेष प्रतिनिधी: राज्यातील गुटखा, तंबाखू आणि निकोटीनयुक्त पानमसाल्याच्या अवैध छुप्या साम्राज्याला मुळासकट उखडून टाकण्यासाठी अन्न व औषध प्रशासन (FDA) विभागाने आतापर्यंतचे सर्वात मोठे आणि आक्रमक पाऊल उचलले आहे. राज्यातील गुटखा माफियांचे नेटवर्क पूर्णपणे उद्ध्वस्त करण्यासाठी आता थेट ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे धाडसी आदेश एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या २१ वर्षांच्या धडाकेबाज प्रशासकीय कारकिर्दीतील हा सर्वात मोठा आणि ऐतिहासिक निर्णय मानला जात असून, या एकाच निर्णयाने राज्यातील गुटखा माफियांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. आतापर्यंत गुटख्यावरील कारवायांमध्ये केवळ लहान-मोठे पानटपरी चालक किंवा किरकोळ विक्रेतेच पोलिसांच्या…
