Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यात प्रशासनाकडून अन्न भेसळविरोधी विशेष मोहीम तीव्र करण्यात आली असून, या अंतर्गत राहुरी आणि नेवासा तालुक्यात मोठी कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण २ लाख ८४ हजार १८० रुपये किमतीचे संशयित आईस्क्रीम आणि खाद्यतेल जप्त करण्यात आल्याची माहिती अन्न विभागाचे सहायक आयुक्त अ. अ. भोईटे यांनी दिली आहे. या मोहिमेदरम्यान राहुरी येथील ‘शिवशक्ती आईस्क्रीम’ या दुकानाची तपासणी करण्यात आली. तेथून ‘शिवशक्ती’ ब्रँडच्या गुलकंद आणि अमेरिकन नट्स आईस्क्रीमचे नमुने प्रयोगशाळेत विश्लेषणासाठी पाठवण्यात आले आहेत. हे आईस्क्रीम दर्जाहीन असल्याच्या संशयावरून प्रशासनाने ४१ हजार ४४० रुपये किमतीचे एकूण १४८ पॅकेट्स जप्त केले आहेत. दुसऱ्या कारवाईत नेवासा…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुरोगामी विचारांचे खंदे पाईक, जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक आणि नाशिक पदवीधर मतदार संघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांना राष्ट्रसेवा दलाच्या वतीने दिला जाणारा अत्यंत मानाचा ‘साने गुरुजी जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला आहे. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय आणि दीर्घ योगदानाची दखल घेऊन हा बहुमान त्यांना प्रदान करण्यात येत आहे. येत्या ४ जून २०२६ रोजी पुणे येथे आयोजित एका दिमाखदार सोहळ्यात डॉ. तांबे यांना हा पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार आहे. पेशाने एम. एस. सर्जन असलेले डॉ. सुधीर तांबे यांनी केवळ वैद्यकीय सेवाच केली नाही, तर संगमनेरचे नगराध्यक्ष पद सांभाळताना पालिकेच्या कारभाराला एक…
संगमनेर/पारनेर : पारनेर तालुक्यातील मांडवे बुद्रुक येथील एका ४० वर्षीय विवाहित महिलेचा मृतदेह डोलनर वस्तीवरील विहिरीत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मंगळवारी (दि. २) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ग्रामस्थांच्या मदतीने महिलेचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढला. सुरुवातीला महिलेची ओळख पटली नव्हती. मात्र काही तासांच्या तपासानंतर मृत महिलेची ओळख जिजाबाई काशिनाथ जाधव (वय ४०, रा. मांडे बुद्रुक, ता. पारनेर, जि. अहमदनगर) अशी पटली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. संबंधित महिला विहिरीत कशी पडली, हा अपघात आहे की आत्महत्या अथवा अन्य काही कारण आहे, याबाबत…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर सोपवल्या जाऊ शकतात. मानसिक शांतता लाभेल. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आर्थिक बाजू मजबूत राहील, जुनी रखडलेली कामे मार्गी लागतील. आरोग्याची काळजी घ्या, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज आर्थिक नियोजनासाठी उत्तम दिवस आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला लाभ मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात नवीन भागीदार मिळतील, ज्यामुळे भविष्यात फायदा होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आज नको त्या वादात पडणे टाळा, अन्यथा मानसिक त्रास होऊ शकतो. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील अवैध व्यवसायांवर आणि अतिक्रमणांवर प्रशासनाने मंगळवारी मोठी कारवाई केली आहे. संगमनेर नगर परिषद आणि शहर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील विविध भागांत सुरू असलेल्या तब्बल सात अवैध कत्तलखान्यांवर बुलडोझर फिरवून ते पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आले आहेत. या धडक मोहिमेमुळे अवैध कत्तलखाना चालकांचे धाबे दणाणले आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संगमनेर शहरातील जमजम कॉलनी, कादरी नगर आणि त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध कत्तलखाने सुरू असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दयानंद गोरे आणि संगमनेर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली एका विशेष मोहिमेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण होणे, ग्राहकांच्या वाहनांची बेशिस्त पार्किंग तसेच परिसरात अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी संगमनेर नगरपरिषदेने वेदांत वाईन्सला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मुख्याधिकारी दयानंद गोरे यांच्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली आहे. नगरपरिषद प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे की, पुणे-नाशिक महामार्गालगत असलेल्या वेदांत वाईन्ससमोर दररोज सायंकाळच्या वेळेत मोठ्या प्रमाणात ग्राहकांची गर्दी होत असते. मद्य खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांकडून वाहने रस्त्यावरच उभी केली जात असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. हा मार्ग शहरातील प्रमुख व वर्दळीचा असल्याने अपघाताचा धोका वाढत असल्याची बाब प्रशासनाने गांभीर्याने घेतली आहे. तसेच काही मद्यधुंद व्यक्तींकडून परिसरात गोंधळ घालण्याच्या तक्रारीही प्रशासनाकडे प्राप्त झाल्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: संगमनेर नगरपरिषदेचा भोंगळ कारभार आणि कंत्राटदारांची मिलीभगत आता सामान्य नागरिकांच्या जीवावर उठू लागली आहे. प्रभाग क्रमांक १३ व १४ मधील शनी मंदिरासमोर अवघ्या एक महिन्यापूर्वी लाखो रुपये खर्च करून तयार करण्यात आलेला दगडी रस्ता महिना उलटायच्या आतच पूर्णपणे उखडला आहे. प्रशासनाच्या या अत्यंत निकृष्ट दर्जाच्या कामामुळे आणि भ्रष्ट कारभारामुळे संगमनेरकर नागरिकांमध्ये संताप निर्माण झाला आहे. या गंभीर प्रकाराबाबत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे युवासेना विधानसभा प्रमुख अमोल डुकरे यांनी थेट मुख्याधिकाऱ्यांना पत्र देत प्रशासकीय ढिषाळपणाचे जाहीर वाभाडे काढले आहेत. तसेच प्रशासनाला जागे करण्यासाठी थेट ‘शिवसेना स्टाईल’ने आंदोलनाचा सणसणीत इशारा दिला आहे. रस्ता की मृत्यूचा…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन ऊर्जा देणारा ठरेल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत जुनी गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते, मात्र नवीन कोणताही मोठा निर्णय घेताना घाईगडबड करू नका. आरोग्याची काळजी घ्या आणि आहारावर नियंत्रण ठेवा. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची उत्तम साथ लाभणार आहे. अडकलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक दडपण कमी होईल. व्यापारात धनलाभाचे योग असून नवीन व्यावसायिक संबंध प्रस्थापित होतील. कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन तुम्हाला योग्य दिशा दाखवण्यास मदत करेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधुर होतील.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन, संगमनेर: शहरातील वाहतुकीची कोंडी फोडण्यासाठी आणि अतिक्रमणमुक्त मोहिमेअंतर्गत संगमनेर नगरपालिका प्रशासनाने आज मोठी कारवाई केली. अकोले बायपासवरील बीएड कॉलेजसमोरील अनधिकृत भाजीपाला मार्केट पालिकेच्या पथकाने पूर्णपणे हटवले. मात्र, या कारवाई दरम्यान पालिका कर्मचारी, पोलीस आणि भाजीपाला विक्रेत्यांमध्ये प्रचंड हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अतिक्रमण हटाव मोहिमेला हिंसक वळण लागून पोलीस आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार झटापट झाली. यात दोन कर्मचाऱ्यांचे कपडे फाटल्याची धक्कादायक घटना घडली असून, पोलिसांनी एका विक्रेत्याला ताब्यात घेतले असून त्याने मद्यप्राशन केले असल्याचे बोलले जात आहे. संगमनेर नगरपालिकेने शहरातील वाहतुकीला अडथळा ठरणारे रस्ते आणि चौक मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली आहे. शहरातील पेटीत हायस्कूल परिसरातील चौकात…
विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यातील विधानपरिषद निवडणुकीच्या अर्ज भरण्याच्या अंतिम टप्प्यात छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून एक मोठी बातमी समोर आली आहे. महायुतीच्या जागावाटपात ही जागा भाजपला सुटली असून भाजपने सुहास शिरसाट यांना उमेदवारी दिली आहे. मात्र, या निर्णयाला धुडकावून लावत शिवसेनेचे नेते अब्दुल सत्तार यांचे पुत्र समीर सत्तार यांनी अपक्ष अर्ज दाखल केला आहे. यानंतर स्वतः अब्दुल सत्तार यांनी भाजपवर अत्यंत गंभीर आणि खळबळजनक आरोप करत महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आणले आहेत. विधानपरिषद निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे जागा न मिळाल्याने सत्तार यांचा भाजपवरील राग अनावर झाला. अत्यंत आक्रमक भाषेत भाजपवर प्रहार करताना ते म्हणाले, शिवसेनेचे मुंडकं उडवण्याचं काम आपला मित्रपक्षच…
