Author: Annant Ppangarkar

विशेष प्रतिनिधी / नवी दिल्ली  जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळं नष्ट करुन ‘ऑपरेशन सिंदूर’द्वारे प्रत्युत्तर दिलं होतं. गेल्या तीन-चार दिवसांपासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव वाढला होता. भारत-पाकिस्तान सीमेवर युद्धजन्य स्थिती निर्माण झाली होती. अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. भारत आणि पाकिस्तान शस्त्रसंधीसाठी सहमत झाले आहे. भारताचे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनीही युद्धबंदीची पुष्टी केली आहे. त्यांनी सांगितलं, पाकिस्तानच्या डीजीएमओने ३.३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओला फोन केला. चर्चेनंतर आज संध्याकाळी ५ वाजल्यापासून युद्धबंदी लागू झाली आहे. जमीन, हवा आणि समुद्रावरील सर्व गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्यात आली आहे. दोन्ही देशांमध्ये १२ मे रोजी डीजीएमओ स्तरावरील चर्चा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अटकपूर्व जामीन मंजूर झाल्याच्या रागातून योगेश एकनाथ जाधव (वय २३, रा. कामत शिंगवे, ता. पाथर्डी) या युवकाची त्याच्या घरी जाऊन डोक्यात गोळी घालून हत्या करणाऱ्या आरोपी पोपट गणपत अदमाने (रा. जवखेडे दुमाला, ता. पाथर्डी) याला जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. यासोबतच न्यायालयाने आरोपीला दहा हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे. ही धक्कादायक घटना २४ नोव्हेंबर २०१८ रोजी पाथर्डी तालुक्यातील कामत शिंगवे येथे घडली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. तत्कालीन पोलीस निरीक्षक रमेश रत्नपारखी यांनी या गुन्ह्याचा तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याच्या सुनावणीदरम्यान…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – राहाता  पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमनपदी डॉ. सुजय विखे पाटील यांची, तर व्हाईस चेअरमनपदी सोपान शिरसाठ यांची बिनविरोध निवड झाली. नुकत्याच झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीनंतर झालेल्या विशेष बैठकीत ही निवड एकमताने करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी माणिकराव आहेर यांच्या उपस्थितीत चेअरमनपदासाठी सुनिल तांबे यांनी डॉ. सुजय विखे पाटील यांच्या नावाची सूचना मांडली, ज्याला अशोक घोलप यांनी अनुमोदन दिले. व्हाईस चेअरमनपदासाठी किरण दिघे यांनी सोपान शिरसाठ यांच्या नावाची सूचना मांडली आणि अनिल भोसले यांनी त्याला अनुमोदन दिले. जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले आणि मागील संचालक मंडळाच्या एकत्रित कामाचे…

Read More

मुंबई, ०८ मे भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पोलिस आणि प्रशासकीय यंत्रणेकडून राज्यातील एकूणच सुरक्षा आणि सज्जतेचा आढावा घेतला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी उपस्थित होते. मॉकड्रिल, ब्लॅकआऊट इत्यादी सर्वच बाबतीत समग्र आढावा घेताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विविध दिशानिर्देश दिले. तसेच राज्यातील महत्वाच्या पदांवर विशेषतः आरोग्य, आपत्ती व्यवस्थापन इत्यादी विभागांतील सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहे. प्रभारी मुख्य सचिव राजेशकुमार, राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला, मुंबई पोलिस आयुक्त देवेन भारती, मुंबई महापालिका आयुक्त भूषण गगराणी, नागरी सुरक्षाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक प्रभातकुमार, गृहविभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी, गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलिस महानिरीक्षक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर धावपळीच्या जीवनात सकस आहाराची गरज असताना, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नाची गुणवत्ता घटत आहे. निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती अत्यावश्यक आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये ‘शाश्वत शेती व युवा उद्योजक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे होते. व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यातील एका तरुणीला फसवून मुंबईतील मालाड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. पेपर दिल्यानंतर कॉलेजबाहेर असताना तिला एका अज्ञात मुलाचा फोन आला. त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ती तिथे गेली. त्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयित तरुणांनी तिला जबरदस्तीने थार गाडीमध्ये बसवून मालाड येथे नेले. मालाडमधील एका हॉटेलमध्ये तिला चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान,…

Read More

नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गुरुवारी (८ मे) या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “आज सर्वपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. हे ऑपरेशन योग्य दिशेने सुरू आहे आणि सुरक्षा दलांनी यात मोठे यश मिळवले आहे. मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत आणि दहशतवादी संघटनांचे कंबरडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय २२, रा. सोनई, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठ्या युक्तीने जेरबंद केले आहे. आरोपी वैरागर याला जमावाच्या मारहाणीनंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय वैरागर याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. २ मे २०२५ रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. आरोपी फरार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर पोलिसांनी काल (०७ मे) शहरातील मदिनानगर परिसरात छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लगेचच कार्यालयातील पोलीस नाईक राहूल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ.…

Read More

नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला. खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केल्याबद्दल आमदार खताळ यांनी सैन्याचे अभिनंदन केले. ही कारवाई केवळ दहशतवादी हल्ल्याचा बदला नसून, भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी दिलेले एक कणखर प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार खताळ म्हणाले, “देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या आपल्या जवानांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळेच आज प्रत्येक देशवासी सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे. या यशस्वी ऑपरेशनमागे जवानांची निष्ठा, संयम…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, तेच लोक आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वातावरण तयार करत आहेत आणि त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलिन करून, हे काही लोक निळवंडे पाण्याच्या आड लपून राजकारण करत आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी केली. संगमनेर तालुक्यात निळवंडेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक माध्यमांना पाठविण्यात आले यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले…

Read More

अहिल्यानगर, दि. ७ –  नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यातील शिर्डी आणि शनिशिंगणापूर येथे आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी त्वरित आवश्यक निधीसह प्रस्ताव सादर करावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयात सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी आयोजित जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. या बैठकीत अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, जिल्हा नियोजन अधिकारी दीपक दातीर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. विरेंद्र बडदे प्रत्यक्ष उपस्थित होते, तर संबंधित विभागांचे अधिकारी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी डॉ. आशिया म्हणाले की, उत्तर प्रदेशातील कुंभमेळ्याच्या आयोजनामुळे धार्मिक पर्यटनात मोठी…

Read More

अहिल्यानगर दि. ७- शासनाच्या ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ उपक्रमामुळे नागरिकांना कुठल्याही तालुक्यातील मिळकतीची दस्तनोंदणी जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात करता येणार आहे, अशी माहिती सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी महेंद्र एस. महाबरे यांनी दिली आहे. शासनाने १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार नोंदणी महानिरीक्षक रवींद्र बिनवडे यांनी युद्ध पातळीवर यंत्रणा राबवून एक जिल्हा एक नोंदणी हा उपक्रम १ मे पासून सुरु केला आहे. त्यामुळे आता एका जिल्ह्यातील समाविष्ट सर्व तालुक्यातील कुठल्याही गावाचे, मौजेचा दस्त जिल्ह्यातील कुठल्याही नोंदणी कार्यालयात नोंदविता येणार आहेत. हा उपक्रम यशस्वी झाल्यावर पुढील काळात ‘वन स्टेट वन रजिस्ट्रेशन’ यावर अंमलबजावणी होणार…

Read More

नवी दिल्ली-  अखेर भारताने दहशतवाद्यांविरोधात कठोर पाऊल उचलले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय हवाई दलाने पाकिस्तानमध्ये एअर स्ट्राईक करत अनेक दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. या कारवाईमुळे देशभरात आनंदाचे वातावरण पसरले असून, प्रत्येक भारतीयाची अनेक दिवसांपासूनची इच्छा पूर्ण झाली असल्याची भावना व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय गुप्तचर यंत्रणांनी पाकिस्तानमधील दहशतवादी ठिकाणांची अचूक माहिती पुरवली होती. या माहितीच्या आधारे भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी लक्ष्यावर अचूक हल्ला चढवला. या कारवाईत मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले असून, त्यांच्या पायाभूत सुविधांचेही मोठे नुकसान झाले आहे. या एअर स्ट्राईकनंतर देशात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. सीमाभागावर विशेष लक्ष ठेवले जात असून, कोणत्याही…

Read More

अहिल्यानगर (प्रतिनिधी) –  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थळी, चौंडी येथे राज्य मंत्रिमंडळाची आज, मंगळवारी एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या ऐतिहासिक बैठकीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य उपस्थित होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आणि विविध सामाजिक घटकांना लाभ मिळवून देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय या बैठकीत घेण्यात आले, ज्यामध्ये कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांचा समावेश आहे. या ऐतिहासिक मंत्रिमंडळ बैठकीत घेतलेल्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतीला उजाळा मिळणार आहे, तसेच राज्यातील महिला, धनगर समाज आणि धार्मिक स्थळांच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. बैठकीतील महत्त्वाचे निर्णय खालीलप्रमाणे: *…

Read More