Author: Annant Ppangarkar
अहिल्यानगर दि.२४ – सहकारी साखर कारखाने शेतकऱ्यांच्या हितासाठी असल्याने शेतकऱ्यांना नुकसान होईल अशी कोणतीही कृती कारखान्यांनी करू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात साखर कारखान्यांच्या प्रश्नाबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्रादेशिक सहा संचालक साखर संतोष बिडवई, निवासी उपजिल्हाधिकारी शाहूराज मोरे, उप विभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, उपसंचालक साखर संजय गोंदे, जिल्हा सहकार उपनिबंधक गणेश पुरी, प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे, विशेष लेखा परीक्षक आर. एफ. निकम आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, साखर कारखान्यांनी एफआरपीपेक्षा कमी दर देऊ नये. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी शेतकऱ्याचे समाधान होईल असा दर देण्याचा प्रयत्न करावा. शेतकऱ्याला अधिकची रक्कम देता…
मंगळवार, २४ डिसेंबर अहिल्यानगर – न्यायालयाचे आदेश धाब्यावर बसवत राज्यात बहुतांश ठिकाणी बेकायदेशीर फ्लेक्सचा सुळसुळाट झाला आहे. या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर महानगरपालिका क्षेत्रात परवानगी न घेता मोठ्या प्रमाणात बॅनर, फलक, मोठे जाहिरात बोर्ड लावल्याचे प्रकार समोर आल्याने अशा अनधिकृत फलकांवर व फ्लेक्स बोर्डवर महानगरपालिकेमार्फत कारवाई सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यातील संगमनेर नगरपरिषद अशी कारवाई कधी करणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.गेल्या महिनाभरात महानगरपालिका प्रशासनाने १२ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. तर ७११ फलकांवर कारवाई करत ३४ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल केला आहे. आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांनी ही माहिती दिली. अनधिकृत फ्लेक्स बोर्ड संदर्भात कारवाईसाठी न्यायालयाने आदेश दिलेले…
मंगळवार २४ डिसेंबर संगमनेर – येथील शांती फाउंडेशनच्यावतीने दरवर्षी दिले जाणारे विविध क्षेत्रातील पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्ष व माजी नगराध्यक्षा दूर्गाताई तांबे यांनी पुरस्कार विजेत्यांच्या नावाची घोषणा केली. ५ जानेवारीला संगमनेरमध्ये विविध मान्यवरांचे उपस्थितीत पुरस्कारार्थींचा सन्मान केला जाणार आहेत. नाट्य क्षेत्रातील विशेष योगदानाबद्दल आणि मराठी, हिंदी विविध दूरचित्र वाहिन्यांवरील मालिकांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे उलटा चष्मा फेम डॉ. राजेश आहेर यांना नाट्य क्षेत्रासाठीचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. तमाशा क्षेत्रात योगदान देऊन ग्रामीण व शहरी जनतेचे मनोरंजन करतानाच प्रबोधनाची परंपरा चालवणारे जेष्ठ कलावंत आणि महाराष्ट्र राज्य लोकनाट्य मंडळाचे अध्यक्ष रघुवीर खेडकर यांना कांताबाई सातारकर…
मंगळवार, २४ डिसेंबर एका सॉफ्टवेअर इंजिनियरने आपल्या पत्नीसोबत केलेल्या विचित्र कृत्यामुळे पती-पत्नीच्या नात्याला तडा गेला आहे. पतीच्या विचित्र मागण्या आणि नको त्या गोष्टीसाठी केलेली जबरदस्ती आणि त्याही पुढे जात ओलांडलेल्या सर्वच मर्यादांमुळे कल्याणमध्ये घडलेल्या या घटनेने खळबळ उडाली. सोहेल शेख हा सॉफ्टवेअर इंजिनिअर आहे. कल्याण पश्चिमेला तो राहातो. छत्रपती संभाजीनगरमध्ये राहाणाऱ्या एका तरुणीबरोबर त्याचा जानेवारी २०२४ मध्ये विवाह झाला होता. हा त्याचा दुसरा विवाह होता. लग्नानंतर तो दुसऱ्या पत्नी बरोबर कल्याणमध्ये राहत होता. लग्नाला दोन तीन महिने झाल्यानंतर सोहेल हा आपले रंग दाखवू लागला. तो पत्नीला त्रास देवू लागला. पहिल्या पत्नीला घटस्फोट देण्यासाठी त्याने पत्नीकडे माहेरून पंधरा लाख रुपये आणण्याची…
अहिल्यानगर दि.२३ – जिल्हा विकास आराखड्याबाबत जिल्हा वार्षिक योजनेतील राखीव निधीचा विनियोग करताना विविध योजनांचे अभिसरण करून आर्थिक व सामाजिक उद्दिष्टे पूर्ण करण्यावर आणि विकास आराखड्यात रोजगार निर्मिती करणाऱ्या प्रकल्पांवर भर द्यावा, अशा सूचना नाशिक विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम यांनी केल्या. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महानगरपालिका आयुक्त यशवंत डांगे, अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी शाहुराज मोरे, जिल्हा मृद व जलसंधारण अधिकारी पांडुरंग गायसामुद्रे आदी उपस्थित होते. यावेळी डॉ. गेडाम म्हणाले, जिल्ह्याच्या विकासाला चालना देणाऱ्या कामांचा प्राधान्याने विचार व्हावा. विविध योजनांच्या अभिसरणाद्वारे विकासाचे…
परभणी, दि. २३ डिसेंबर परभणीतील तरुण सोमनाथ सुर्यवंशी हा संविधानाचे रक्षण करणारा होता. तो दलित असल्यानेच त्याची हत्या करण्यात आली आहे. हा पोलीस कोठडीतील मृत्यू असून सोमनाथ सुर्यवंशी यांच्या हत्येला जबाबदार असणाऱ्यांना लवकरात लवकर कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणी येथे सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांच्याशी सुमारे २० ते २५ मिनिटे संवाद साधला. परभणीतील घटनेची सर्व माहिती जाणून घेतली व कुटुंबाला धीर दिला. सुर्यवंशी यांच्या कुटुंबाला भेट दिल्यानंतर पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी म्हणाले की, सोमनाथ सुर्यवंशी यांचा कोठडीतील मारहाणीमुळे मृत्यू झाला आहे.…
सोमवार २३ डिसेंबर संगमनेर – काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेली संजय गांधी निराधार योजनेसह विविध प्रकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांची प्रकरणे गेल्या काही महिन्यांपासून प्रलंबित ठेवण्यात आली आहे. गोरगरीब, वृद्ध व निराधार लाभार्थ्यांना दिलासा मिळावा यासाठी ही प्रकरणे तात्काळ मार्गी लावण्याची मागणी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत केली आहे. या मागणीचे निवेदन संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांना सोमवारी देण्यात आले आहे. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, तत्कालीन मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात यांनी शासकीय योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले.…
सोमवार, २३ डिसेंबर श्रीरामपूर – श्रीरामपूरमध्ये मटका व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी लाच मागितल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांपैकी दोघांना श्रीरामपूर न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राहुल महादेव नरवडे, गौतम शंकर लगड व पोलीस नाईक रघुवीर ओंकार कारखीले या पोलीस कर्मचाऱ्यांवर लाच लुचपत प्रतिबंधक कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस हवालदार राहुल नरवडे व गौतम लगड यांनी ॲड. एजाज पठाण व ॲड. पंकज म्हस्के यांच्यामार्फत श्रीरामपूर न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. या जामीन अर्जावर विशेष न्यायाधीश तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. एन. साळवे यांच्यासमोर…
सोमवार, २३ डिसेंबर नाशिक – राज्याचे नवे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांची अहिल्यानगर जिल्हा ह्युमन इनोव्हेशन ऑर्गनायझेशन (सर्वांसाठी मानवाधिकार) या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी नाशिकमध्ये भेट घेत त्यांचे स्वागत करत शुभेच्छा दिल्या. संघटनेच्या माध्यमातून राज्यभर मानवी मूल्यांचे जतन व्हावे व सर्वांना न्याय मिळावा या भावनेने काम केले जात असताना मानवाधिकार संघटनेच्या या कामकाजामध्ये झिरवाळ यांचे पदाधिकाऱ्यांना नेहमी सहकार्य मिळत असते. नासिक येथील समाजसेवक व संस्थापक अध्यक्ष वसीम सय्यद (गुड्डू भाई) यांच्यामार्फत या संस्थेचे काम सुरू आहे. संघटनेच्या कामकाजासाठी सातत्याने मंत्रालय किंवा शासकीय विभागामध्ये सर्वसामान्य माणसांना न्याय हक्कासाठी लढा द्यावा लागतो. समाजातील सर्व शहरातील गोरगरीब व पिळवणूक झालेल्या नागरिकांना न्याय…
रविवार, २२ डिसेंबर संगमनेर – संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी परिसरात वन विभागाच्या आखत्यारीत येणाऱ्या जंगलामध्ये शनिवारी रात्री शरीराचे लचके तोडलेल्या अवस्थेत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. या तरुणाचा घातपात झाला की बिबट्याच्या हल्ल्यात याचा मृत्यू झाला याची माहिती अद्याप समोर आली नाही मात्र बिबट्याच्या हल्ल्यामध्ये या तरुणाचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. रामनाथ सूर्यभान गुरकुले (वय ३४, रा. सावरगाव तळ, ता. संगमनेर जि. अहिल्यानगर) असे या तरुणाचे नाव असल्याची माहिती समोर येत आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी घुलेवाडी (संगमनेर) येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेह लोणी येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या तरुणाच्या…
कथित मतांच्या आधारे राज्यात प्रचंड बहुमताची सत्ता प्राप्त होताच यापुढे बदला नव्हे बदल करणारी सत्ता राबवली जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. हे आश्वासन त्यांच्या बुध्दीचातुर्याप्रमाणे सत्ता सुरू होताच विरळ होण्याची चिन्हं दिसू लागली आहेत. मिळालेल्या बहुमताचा आधार घेत आपल्याला नको असलेल्या व्यक्ती, संस्था यांचा काटा काढण्याचा पध्दतशीर मार्ग अवलंबला जात आहे. केंद्रातल्या मोदी सरकारने आणि २०१४ नंतर राज्यातल्या युती सरकारने शहरी नक्षलवादाच्या नावाखाली केलेल्या कारवाया कशा कट कारस्थानी होत्या हे स्पष्ट दिसलं. खर्या नक्षलींना आवर घालण्याचा आव असला तरी प्रत्यक्षात सत्तेला जाब विचारणार्यांची तोंडं बंद करण्याचा हेतू स्पष्ट दिसत होता. सत्तेला जाब विचारणार्यांची मुस्कटदाबी करण्यासाठी घातक…
शनिवार, २१ डिसेंबर नागपूर – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. फडणवीस शिंदे पवार सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटपाला अखेर मुहूर्त लाभला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खात्याच्या चाव्या दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्या आहे. विखेंकडील महत्त्वाचे खाते काढून आता त्यांच्याकडे जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गृह खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता. महायुतीच्या ३९…
शनिवार २१ डिसेंबर संगमनेर – सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असलेल्या संगमनेरमध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ते बोलत होते. जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बालभारतीचे डॉ. अजितकुमार लोळगे, पुणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दिपाली जोगदंड, राजेंद्र वाकळे, प्रकल्पप्रमुख…
शनिवार २१ डिसेंबर संगमनेर – लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती दर्शवत असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यासाठी झाले आंदोलन – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्यावतीने आयोजित निषेध आंदोलनात थोरात बोलत होते यांची उपस्थिती – माजी…
शनिवार २१ डिसेंबर संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८०० रुपये व २०० रुपये उसविकास अनुदान याप्रमाणे प्रति टनामागे तीन हजार रुपयांचा भाव देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर वाटचाल करणाऱ्या व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे हीत सातत्याने जोपासले आहे. सातत्याने सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोठा विश्वास दर्शविला…
शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटना व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले. भाजपला आंबेडकरांविषयी असलेला राग या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आला आहे. या वक्तव्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे संगमनेरमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हे निषेध आंदोलन होत असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, संसदेमध्ये संविधानावर चर्चा…
शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टी धारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी करत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. गरीब गरजू नागरिक व शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (१९ डिसेंबर) प्रांताधिकार्यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, मात्र या योजनेचा लाभ गरजूं ऐवजी नोकरदार…
शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे. पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत…
शुक्रवार २० डिसेंबर नागपूर – राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै…
