Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खांडगाव शिवारात एका १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी (१५ जुलै) पहाटे तीन-चार वाजेच्या सुमारास खांडगाव शिवारात ही घटना घडली. आरोपी गणेश चंद्रभान गायकवाड याने पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचा फायदा घेऊन तिला घरातून बोलावून घेतले. त्यानंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. हा प्रकार पीडितेच्या नातेवाईकांनी पाहिला असता, आरोपीने तुझ्या आईकडे जाऊ नको, नाहीतर कोण काय करते मी बघतो आणि एखाद्याला मारून टाकीन’ अशी जीवे मारण्याची धमकी दिली.…
अहिल्यानगर: श्रीरामपूर येथील सराईत गुन्हेगाराशी कथित संबंध असल्याच्या कारणावरून पोलीस अंमलदार शंकर चौधरी यांना अहिल्यानगरचे पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी तडकाफडकी निलंबित केले आहे. या धडक कारवाईमुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. पोलीस अंमलदार शंकर चौधरी हे यापूर्वी श्रीरामपूर येथील अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात कार्यरत होते. मात्र, त्यांच्यावर गुटखा तस्करीशी संबंधित कथित आरोप झाल्यानंतर त्यांची बदली पोलीस मुख्यालयात करण्यात आली होती. त्यानंतर नुकतेच त्यांचे सराईत गुन्हेगारांसोबतचे काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले होते. तसेच वाळू तस्करी व इतर गंभीर गुन्ह्यांतील संशयितांशी त्यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी केला होता. दरम्यान, श्रीरामपूरमधील हॉटेल व्यावसायिक आकाश…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव येथे गेल्या अनेक वर्षांपासून राजरोसपणे सुरू असलेल्या केमिकलयुक्त ताडी विक्रीच्या अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या संगमनेर पथकाने मंगळवारी सकाळी छापा टाकून कारवाई केली. पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका फिटनेस क्लबच्या पाठीमागील पत्र्याच्या शेडमध्ये हा काळा धंदा सुरू होता. या कारवाईत पथकाने तब्बल २२० लिटर केमिकलयुक्त ताडीचा मोठा साठा हस्तगत करून तो जागेवरच नष्ट केला आहे. या प्रकरणी सुनीता शेखय्या गुत्तेदार (वय ४४, रा. घारगाव) या महिला आरोपीविरुद्ध कारवाई करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक योगेश सावखेडकर, उपनिरीक्षक गोकुळ नायकोडी, महिला जवान स्वाती फटांगरे, सरस्वती वराट, जवान दत्ता…
युरियाचा बफर स्टॉक तातडीने खुला करा, अन्यथा तीव्र आंदोलन; संगमनेर तालुका काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : सध्या खरीप हंगामाने वेग घेतला असून तालुक्यातील शेतकऱ्यांना बाजरी, मका, सोयाबीन यांसारख्या पिकांसाठी युरिया खताची अत्यंत आवश्यकता आहे. मात्र, बाजारात युरियाचा तीव्र तुटवडा निर्माण झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाच्या ताब्यातील युरियाचा बफर स्टॉक तातडीने शेतकऱ्यांसाठी खुला करावा, अशी आग्रही मागणी संगमनेर तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. या संदर्भात उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांना एका शिष्टमंडळाद्वारे निवेदन देण्यात आले. यावेळी तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे, सहकार महर्षी थोरात कारखान्याचे संचालक विजय राहणे, सचिन दिघे, सरपंच नवनाथ कातोरे, संदीप गुंजाळ, अमोल गुंजाळ, शुभम गुंजाळ, योगेश गव्हाणे, अरुण गुंजाळ, सागर वामन, नामदेव शिंदे, सुनील लांडगे,…
आजचे राशिभविष्य मेष – आज तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात कामावर अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. गजकेसरी योगामुळे आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता असली तरी घाईगडबडीत कोणतेही निर्णय घेणे टाळा. व्यवसायात भागीदारीतून चांगला नफा मिळू शकतो. कौटुंबिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील आणि जोडीदाराची उत्तम साथ लाभेल. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ – आजचा दिवस तुमच्यासाठी प्रगतीकारक ठरेल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल आणि नवीन जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक बाबतीत दिवस अनुकूल राहील, जुनी येणी वसूल होऊ शकतात. सामाजिक कार्यात तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना बोलण्यावर नियंत्रण ठेवा. मिथुन – आज तुम्हाला कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन आणि कौतुक मिळेल. व्यवसायात नवीन योजना…
विशेष प्रतिनिधी / मुंबई अयोध्येतील राम मंदिरातील देणगी चोरीचं प्रकरण ताजं असताना, त्याबद्दल रामभक्तांमध्ये संताप असताना आता श्रीरामाच्या नावानं झालेला एक गंभीर घोटाळा समोर आला आहे. बीएड आणि शिक्षक प्रशिक्षण कॉलेजांचं कागदांवरील साम्राज्य उघडकीस आलं आहे. भाजपची सत्ता असलेल्या राज्यांमध्ये अनेक कॉलेज शेतांमध्ये, ओसाड जागांवर नोंदणीकृत आहेत. तिथे गेल्यावर दिसणारी परिस्थिती वेगळीच आहे. काही कॉलेज लहान शाळांच्या परिसरांमध्ये भरत आहेत. काही ठिकाणी तर एकाच पत्त्यावर तीन-तीन संस्थांना मान्यता देण्यात आलेली आहे. प्रत्यक्ष पडताळणीत अनेक त्रुटी आणि गायब पत्ते सापडल्यानंतरही बरकतउल्ला विद्यापीठाने केवळ एका नोटरी शपथपत्राच्या आधारावर १२५ खासगी बीएड कॉलेजांच्या प्रवेश प्रक्रियेला हिरवा झेंडा दाखवला आहे. या सगळ्यामुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याला…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: अहिल्यानगर शहरातून संगमनेर तालुक्यातील ‘टॉपटेन इम्पेरिअल’ इमारतीमधील बी-१ आणि बी-२ या गाळ्यांमध्ये एका वाईन शॉपचे स्थलांतर प्रस्तावित आहे. मात्र, या स्थलांतरामुळे परिसरातील शांतता, सुरक्षितता आणि स्थानिक व्यवसायांवर विपरीत परिणाम होणार असल्याने स्थानिक व्यापारी आणि नागरिकांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या संदर्भात स्थानिक व्यावसायिकांनी एकत्र येत आमदार अमोल खताळ यांना देखील विरोध दर्शविणारे निवेदन दिले आहे. या निवेदनावर विनीत देवेंद्र मेहता, कल्पेश चिमनलाल मेहता, भीमाशंकर रावबा चकोर, सिद्धार्थ ओझा, हर्षवर्धन खुळे यांच्यासह प्रमुख व्यावसायिकांच्या सह्या आहेत. या हरकतीमध्ये स्थानिक व्यावसायिकांनी प्रशासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. अहिल्यानगरहून संगमनेर तालुक्यात वाईन शॉप स्थलांतरित…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: शिवसेना पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकानुसार, संगमनेर तालुक्यात नव्या दमाच्या आणि निष्ठावान पदाधिकाऱ्यांकडे पक्षाची महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. नव्या निवडीमध्ये काही पदाधिकाऱ्यांना नारळ देण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिर्डी लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या अधिकृतपणे जाहीर करण्यात आल्या आहेत. या नव्या निवडीनुसार संगमनेर तालुकाप्रमुखपदी अमर कतारी आणि भीमाशंकर पावसे, संगमनेर तालुक्यातील मात्र शिर्डी विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या ३२ गावांसाठी तालुकाप्रमुख म्हणून प्रकाश गायकवाड यांचीदेखील तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. संगमनेर तालुक्यात पक्षाची बांधणी मजबूत करण्यासाठी उपजिल्हाप्रमुख म्हणून ग्रामीण भागासाठी सदाशिव हासे तर शहरी भागासाठी…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर : माणसाला आयुष्याच्या प्रवासाने भाकरीची खरी किंमत शिकवली आहे. त्याच भाकरीच्या भुकेने निर्माण झालेल्या समृद्ध साहित्यातून सामान्य माणसाच्या जगण्याच्या वेदना अत्यंत प्रभावीपणे टिपल्या गेल्या आहेत. त्यामुळेच नारायण सुर्वे यांच्यासारख्या थोर कवीचे साहित्य माणसाला संकटांशी लढण्याची, जगण्याची हिंमत आणि नवी शक्ती देते, असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष व ज्येष्ठ संपादक उत्तम कांबळे यांनी केले. संगमनेर येथील साहित्य कला व सांस्कृतिक संघ आणि सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात वरिष्ठ महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘साहित्य जत्रा’ कार्यक्रमात संमेलनाध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या साहित्य सोहळ्याचे उद्घाटन राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते करण्यात आले.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर: तालुक्यातील जांबुत बुद्रुक येथे चारित्र्याच्या संशयातून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून एका २८ वर्षीय विवाहितेने मुळा नदीपात्रात आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विठाबाई विकास घुले असे मृत महिलेचे नाव असून, या हृदयद्रावक घटनेमुळे पठार भागात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून घारगाव पोलिसांनी पतीसह सासरच्या तिघांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विठाबाई या घरच्यांना शेतात जात असल्याचे सांगून निघाल्या होत्या, मात्र त्या दीर्घकाळ परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांची शोधमोहीम सुरू केली होती. सुरुवातीला घारगाव पोलीस ठाण्यात त्या हरवल्याची तक्रारही नोंदवण्यात आली होती. शोध सुरू असताना टेकडवाडी…
